Subscription Plans

सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन प्लॅन्स 2023: किंमत, फायदे, ऑफर्स | Sony LIV Subscription Plans 2023

नमस्कार मित्रानो, मित्रांनो, आज आपण Sony LIV च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत. यात आपण प्लॅन ची किंमत, त्याचे फायदे, ऑफर्स, वैधता या सर्वां बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, कोरोना महामारी च्या काळात सोनी लिव्ह ने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यामुळे सोनी लिव्ह आता प्रत्येक घरात पोहचले आहे. म्हणूनच Sony LIV हे भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ-ऑन- डिमांड प्लॅटफॉर्म पैकी एक प्लॅटफॉर्म बनले आहे. Sony LIV ला 2013 मध्ये भारतातील पहिली OTT सेवा म्हणून सादर करण्यात आले होते. मित्रांनो, SonyLIV अँप अँड्रॉइड टीव्ही डिव्हाइस, सॅमसंग स्मार्ट टीव्ही, ऍमेझॉन फायर टीव्ही, फायर एचडी डिव्हाइस, रोकू डिव्हाइस, ऍपल टीव्ही, क्रोमकास्ट डिव्हाइस आणि सोनी ब्राव्हिया स्मार्ट टीव्ही अश्या विविध टीव्ही ला सपोर्ट करते. तसेच Sony LIV वेग वेगळे टीव्ही शो, मूव्हीज, वेब सिरीज आणि लाइव्ह स्पोर्ट्स UEFA चॅम्पियन्स लीग, WWE, UFC आणि असे बरेच काही होस्ट करते. हा पण हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला Sony LIV चे सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Sony Pictures Networks India Ltd ने अलीकडेच भारतात आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स मध्ये बदल केले आहेत. यातच आता सोनी लिव्ह ने एक नवीन Sony LIV मोबाईल-ओन्ली प्लॅन ऍड केला आहे, हा प्लॅन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असलेल्या सर्व कन्टेन्ट एका वेळी फक्त एकाच स्मार्ट फोन स्क्रीन बघू शकणार आहेत.



Sony LIV plan information in marathi

मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर, जर तुम्ही तुमच्या आवडत्या टीव्ही शो, मूव्हीज आणि लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट्स चा आनंद घेण्यासाठी सर्वात योग्य मार्ग शोधत असाल तर Sony LIV चे सबस्क्रिप्शन प्लॅन्स तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे Sony LIV च्या विविध सबस्क्रिप्शन प्लॅनसह तुम्ही तुमच्या आवडत्या शो आणि चित्रपटांच्या ऍड फ्री स्ट्रीमिंगचा तुम्ही कधीही आनंद घेऊ शकता. Sony LIV च्या या सबस्क्रिप्शन प्लॅन्स ची किंमत काय आहे, त्याची वैधता व फायदे काय आहेत, या सर्व गोष्टीं बद्दल पुढे आपण जाणून घेणारच आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Best Sony LIV Subscription Plans

सोनी लिव्ह चे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स: मासिक कि वार्षिक

मित्रांनो, सोनी लिव्ह चे सबस्क्रिप्शन प्लॅन्स वेग वेगळ्या किंमतीत व विविध वैधता कालावधीसाठी आपल्या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून देते. तसेच तुम्ही जर मासिक किंवा वार्षिक कालावधीसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन्स शोधत असाल तर Sony LIV तुमच्या साठी एक योग्य पर्याय आहे. तसेच Sony LIV सबस्क्रिप्शन प्लॅन्स मध्ये Scam 1992, Gullak, Sony, SAB TV शो, ब्लॉकबस्टर मूव्हीज, हॉलीवूड टीव्ही शो आणि TEN Sports live TV पासून WWE च्या पॅकेज केलेल्या टेलिकास्टपर्यंतच्या स्पोर्ट्स कन्टेन्ट, UFC, UEFA चॅम्पियन्स लीग आणि इतर क्रीडा स्पर्धा पाहू शकणार आहे. भारतात Sony LIV सबस्क्रिप्शन प्लॅन्स कोणते आहेत, त्यांची किंमत, वैधता, आणि फायदे यांबद्दल आता आपण जाणून घेऊ या.

Sony LIV subscription plans mahiti

299 रुपयांचा सोनी लिव्ह प्रिमियम प्लॅन (Rs 299 Sony LIV Premium Plan)

मित्रांनो, 299 रुपये चा हा सोनी लिव्हचा प्रिमियम मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये तुम्ही लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल, Sony LIV ओरिजिनल्स टीव्ही शो आणि मूव्हीज आणि हॉलीवूड मूव्हीज चा ही समावेश आहे. हा प्लॅन एकाच वेळी लॉग इन करता येऊ शकणार्‍या पाच डिव्‍हाइसेस ला सपोर्ट करते, परंतु त्यापैकी एकावेळी फक्त एकच स्क्रीन व्हिडीओ पाहता येतात. तसेच सोनी लिव्ह चे ग्राहक स्टिरिओ 2.1 साउंड आउटपुट सह Full HD 1080p रिझोल्यूशन कन्टेन्ट चा आनंद घेऊ शकणार आहेत. याशिवाय, लाइव्ह स्पोर्ट्स, चॅनेल आणि रिऍलिटी टीव्ही शो पाहताना वेळोवेळी स्क्रीन वर ऍड दाखविल्या जातात.

699 रुपयांचा सोनी लिव्ह प्रिमियम प्लॅन (Rs 699 Sony LIV Premium Plan)

मित्रांनो, 699 रुपये ला असणारा सोनी लिव्हचा हा प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन सहा महिन्यांच्या कालावधी सह येतो. या प्लॅन मध्ये वरच्या मासिक प्लॅनचा कंटेंट आहे. या प्लॅन मध्ये तुम्ही मोबाईल, टॅब्लेट, वेबसाइट आणि स्मार्ट टीव्ही अशा एकूण पाच उपकरणांवर लॉग इन असताना एकाच वेळी दोन उपकरणां/स्क्रीन वर 1080p रिझोल्यूशन मध्ये व्हिडीओ पाहू शकणार आहात. आणि या प्लॅन मध्ये हि तुम्ही स्टिरिओ 2.1 साउंड चा आनंद घेऊ शकता. परंतु या प्लॅन मध्ये लाइव्ह स्पोर्ट्स, चॅनेल आणि रिऍलिटी टीव्ही शो या सारख्या विशिष्ट प्रकारच्या कन्टेन्ट वर वेळोवेळी जाहिराती दाखविल्या जातात.



999 रुपयांचा सोनी लिव्ह प्रिमियम प्लॅन (Rs 999 Sony LIV Premium Plan)

मित्रांनो, 999 रुपये ला असणारा सोनी लिव्हचा हा प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन सर्वात महाग असून एका वर्षाच्या कालावधी सह येतो. हा प्लॅन रू 699 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच समान कंटेंट देते. आणि यात सुमारे 400 रुपये पर्यंत तुम्ही बचत करू शकता. मित्रांनो, Sony LIV प्रीमियम च्या या वार्षिक प्लॅन मध्ये ओरिजिनल्स टीव्ही शो आणि चित्रपटांचे Full HD स्ट्रीमिंग, हॉलीवूड चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, यांचा समावेश होतो. या प्लॅन मध्ये तुम्ही मोबाईल, टॅब्लेट, वेबसाइट आणि स्मार्ट टीव्ही अशा एकूण पाच उपकरणांवर लॉग इन असताना एकाच वेळी दोन उपकरणां/स्क्रीन वर 1080p रिझोल्यूशन मध्ये व्हिडीओ पाहू शकणार आहात. आणि या प्लॅन मध्ये हि तुम्ही स्टिरिओ 2.1 साउंड चा आनंद घेऊ शकता.

हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन मोठ्या कुटुंबासाठी जे एकावेळी 2 (मोबाईल, TV, लॅपटॉप) डिव्हाईस वर सोनी लिव्ह बघणार आहे त्यासाठी योग्य राहील. आणि ज्या लोकांकडे मोठा स्मार्ट टीव्ही आहे आणि ज्यांना हाय क्वालिटी मध्ये व्हिडीओ बघणे आवडते त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे.

599 रुपयांचा सोनी लिव्ह मोबाईल ओन्ली प्लॅन (Rs 599 Sony LIV Mobile Only Plan)

मित्रांनो, नावाप्रमाणेच सोनी LIV मोबाइल-ओन्ली प्लॅन ची किंमत रू 599 असून ते त्याची वैधता एक वर्षाची देण्यात आली आहे. हा सबस्क्रिप्शन प्लॅन तुम्हाला 720p व्हिडिओ रिझोल्यूशन सह मोबाइल स्क्रीनववर OTT कन्टेन्ट देण्याची परवानगी देते. परंतु हा प्लॅन लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही ला सपोर्ट करत नाही.

हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन एकट्या माणसासाठी जो एकाच मोबाइल वर सोनी लिव्ह बघणार आहे त्यासाठी योग्य राहील.

Sony LIV सबस्क्रिप्शन प्लॅन: किंमत, फायदे, वैधता

Sony LIV सबस्क्रिप्शन प्लॅन्सवैधताफायदे
सोनी लिव्ह फ्री प्लॅनपूर्ण वेळ फ्री आहे– निवडक टीव्ही शो आणि चित्रपट
– फक्त 15 व्हिडिओंची मर्यादा
– नोंदणीची आवश्यकता नाही
– 1080p व्हिडिओ सपोर्ट
– लाइव्ह स्पोर्ट्स, चॅनेल पाहण्याची मर्यादा
299 रु सोनी लिव्ह प्रिमियम प्लॅन1 महिना– सोनी चे ओरिजिनल्स शो, चित्रपट
– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– 1080p व्हिडिओ सपोर्ट
– पाच डिव्‍हाइसेस सपोर्ट पण एका वेळी एकाच पाहू शकतो
– ऑडिओ मध्ये स्टिरिओ 2.1 सपोर्ट
699 रु सोनी लिव्ह प्रिमियम प्लॅन6 महिने– सोनी चे ओरिजिनल्स शो, चित्रपट
– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– 1080p व्हिडिओ सपोर्ट
– पाच डिव्‍हाइसेस सपोर्ट पण एका वेळी दोनच पाहू शकतात
– ऑडिओ मध्ये स्टिरिओ 2.1 सपोर्ट
999 रु सोनी लिव्ह प्रिमियम प्लॅन1 वर्ष– सोनी चे ओरिजिनल्स शो, चित्रपट
– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– 1080p व्हिडिओ सपोर्ट
– पाच डिव्‍हाइसेस सपोर्ट पण एका वेळी दोनच पाहू शकतात
– ऑडिओ मध्ये स्टिरिओ 2.1 सपोर्ट
599 रु सोनी लिव्ह मोबाइल ओन्ली प्लॅन1 वर्ष– सोनी चे ओरिजिनल्स शो, चित्रपट
– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– 720p व्हिडिओ सपोर्ट
– एका वेळी एकाच मोबाइल पाहू शकता
– ऑडिओ मध्ये स्टिरिओ 2.1 सपोर्ट
  • Salute/सलूट (2022)
  • Bachelor/बॅचलर (2021)
  • James/जेम्स (2022)
  • Madhuram/मधुरम (2021)
  • Freedom Fight/फ्रीडम फाइट (2020)
  • Enemy/एनमी (2021)
  • Skylab/स्कायलॅब (2021)
  • Churuli/चुरुली (2021)
  • Dark Waters/डार्क वॉटर्स (2019)
  • Jodi/जोडी (2019)
  • Check/चेक (2021)
  • Seeru/सिरू (2020)
  • 1917 (2019)
  • Airaa/आयरा (2019)
  • A Dog’s Purpose/अ डॉगस पर्पस (2017)
  • Jersey/जर्सी (2022)
  • Dev/देव (2019)
  • Mr. Majnu/मिस्टर मजनू (2019)
  • Satya/सत्या (1998)
  • Dear Comrade/डिअर कॉम्रेड (2019)
  • Wrapping Up/रैपिंग उप
  • The Rocket Boys/द रॉकेट बॉइ
  • Girls Hostel/गर्ल्स हॉस्टेल
  • Gullak/गुल्लक
  • Scam 1992/स्कैम 1992
  • Maharani/महाराणी
  • A Simple Murder/अ सिम्पल मर्डर
  • Avrodh: The Siege Within/अव्रोध
  • College Romance/कॉलेज रोमान्स
  • Nirmal Pathak Ki Ghar Vapsi/निर्मल पाठक की घर वापसी
  • Undekhi/उनदेखी

FAQ

Sony LIV चे सबस्क्रिप्शन कॅन्सल करता येऊ शकते का?

नाही मित्रांनो, एकदा का तुम्ही Sony LIV चे सबस्क्रिप्शन घेतले की ते कॅन्सल करता येत नाही. तुम्ही हे सबस्क्रिप्शन वापरत नसलात तरीही एकदा केलेले पेमेंट परत केले जाणार नाही. म्हणून कोणत्या ही सबस्क्रिप्शन चे पेमेंट करताना एकदा विचार करा.

Sony LIV चे कन्टेन्ट डाउनलोड करू शकतो का?

मित्रांनो, लाइव्ह शो सोडून तुम्ही इतर कोणतेही कॉटेंट तुमच्या डिव्हाइस मध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. पण काही ठरावीक कालावधीसाठी. नंतर ते एक्सपायर होते व तुम्हाला ते परत डाउनलोड करावे लागते. आणि सहसा डाउनलोड ऑपशन हा मोबाइल आणि टॅबलेट मधेच उपलब्ध असतो, टीव्ही वर नाही.

Sony LIV मध्ये ऍड पण दाखविल्या जातात का?

मित्रांनो, सोनी लिव्ह स्ट्रीमिंग सेवा त्यांच्या ग्राहकांना फक्त लाइव्ह स्पोर्ट्स आणि टीव्ही वर तसेच Sony LIV च्या प्रिमियम मासिक योजनेत जाहिराती दाखवते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण Sony LIV चे विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल जाणून घेतले. यासह आपण या प्लॅन ची किंमत, वैधता व काय फायदे आहेत ते सुद्धा जाणून घेतले आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच तुम्हाला जर आमचा आजचा हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. आणि असेच नवं नवीन लेख व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नेहमी भेट देत रहा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!