ई-श्रम कार्ड ऑनलाईन काढा 5 मिनिटात | E Shram Card Online Registration - MarathiDiary
E Shram CardSidebar PostTop Post

ई-श्रम कार्ड ऑनलाईन काढा 5 मिनिटात | E Shram Card Online Registration



नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन लेखात आपण असंघटीत कामगारांसाठी असलेल्या ई श्रम कार्ड बद्दल जाणून घेणार आहोत. भारत सरकरने ई-श्रम कार्डसाठी नवीन पोर्टल चालू केले आहे. या नवीन वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं ई-श्रम कार्ड काही मिनिटात बनवू शकता.

मित्रांनो, ई – श्रम कार्ड हे भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी बनवलेली एक सुविधा आहे. यात कामगारांना ई श्रम नावाचे कार्ड दिले जाते. या द्वारे कामगारांना सरकारद्वारे सामाजिक सुरक्षा तसेच विमा संरक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.



कामगारांना ही सुविधा पोहचवण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई श्रम नावाचे सेवा सुरु केले आहे. या पोर्टल वर संबंधित कामगाराला नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या कामगाराला ई श्रम कार्ड दिले जाते.

ई श्रम कार्डसाठी कोण कोण अर्ज करू शकत?

मित्रांनो, आपल्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी वर काम करणारे मजूर, भूमिहीन शेत मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार इत्यादी सर्व कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करु शकतात.

फक्त ई श्रम कार्डसाठी त्या कामगाराच वय हे 18 ते 59 या दरम्यान असावं. तसेच आयकर भरणारे, EPFO, ESIC यांचे सदस्य असणाऱ्या व्यक्ती ई श्रम कार्डसाठी नोंदणी करू शकत नाही.

ई-श्रम कार्ड हे कसे काढायचे ते बघूया

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम मध्ये UMNAG असे सर्च करायचे आहे. त्यातले सर्वात पहिली वेबसाईट http://web.umang.gov.in यावर क्लिक करायचे आहे. किंवा या लिंक वर umang.gov.in क्लिक करा

स्टेप 2: त्यानंतर उजव्या साईडला Login/Register असे बटन आहे त्यावर क्लिक करायचे आहे.



E Shram Card Online Registration Step

स्टेप 3: नंतर पुढचं पेज येईल त्यावर जर तुमचं UMANG वेबसाइट वर अकाऊंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि MPIN टाकून लॉग इन करू शकता आणि जर अकाऊंट नसेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता. त्यासाठी खाली असेलेल्या Create Account या लिंक क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 4: सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर Get OTP यावर क्लिक करायचे आहे. ओटीपी येईल तो तिथे टाकायचा आहे. नंतर कॅपच्या कोड आहे तसा टाकायचा आहे व टर्म्स अंड काँडिशन्स (Terms and Conditions ) वर टिक करायचे आहे. आणि शेवटी Register बटन वर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला पिन (MPIN) तयार करायचा आहे (म्हणजे लॉगिन करण्यासाठी पासवर्ड). चार डिजिट चा पिन टाकून खाली पुन्हा एकदा पिन टाकून Next बटन वर क्लिक करायचे आहे. हा पिन भविष्यात तुम्हाला या वेबसाइट वर लॉगिन करण्यास कामाला येईल.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 6: आता तुमच्यासमोर एक पॉप उप उघडेल, या मध्ये जी माहिती/प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते ऑपशनल आहेत; म्हणजे माहिती भरली नाही तरी चालेल.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 7: पुढच्या पेजवर तुम्हाला Search ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला eshram असे सर्च करायचे आहे.



E Shram Card Online Registration Step

स्टेप 8: Eshram सर्च केल्यानंतर तुम्हाला Department चा ऑप्शन मध्ये eshram service ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 9: त्यानंतर तुम्हाला General Services मध्ये Registration या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 10: आता येथे तुम्हाला दोन्ही ऑप्शन हे No/No करायचे आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं कोणत्याही प्रकारचा पीएफ अकाउंट नाहीये किंवा पीएफ तुमचा कापला जात नाहीये किंवा तुम्ही ESIC मेंबर नाहीये. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला NO करायचे आहे. कारण यापैकी तुमचं काहीही असेल तर तुम्ही eshram कार्ड काढू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

आधार कार्ड वरची माहिती

आता तुम्हाला आधार कार्ड विषयी माहिती द्यायची आहे.

स्टेप 1: तुम्हाला आता मोबाईल नंबर विचारला जाईल, जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड ला लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे. नंतर तुम्हाला OTP येईल तो OTP तुम्ही तेथे टाकून Verify OTP वर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 2: पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि I agree वर क्लिक करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

आता तुमच्यासमोर आधार कार्ड ला लिंक असलेली माहिती दिसेल, जसे नाव, जन्मतारीख इत्यादी नंतर माहिती तपासून; I agree वर क्लिक करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

आता तुम्हाला पाच प्रकारची माहिती द्यायची आहे १) पर्सनल इन्फॉर्मेशन २) रेसिडेंटअल डिटेल्स ३) एज्युकेशन क्वालफकेशन ४) ऑक्युपेशन अँड स्किल्स ५) बँक अकाउंट डिटेल्स

पर्सनल इन्फॉर्मेशन (वैयक्तिक माहिती)

स्टेप 1: पुढच्या पेजवर तुम्हाला वैयक्तिक माहिती द्यायची आहे. जे लाल रंगाचे स्टार असतील, तीच माहिती जरी दिली तरी चालू शकते.
तुमचा मोबाईल नंबर इंटर करायचा आहे. तुम्हाला त्यात मॅरीड आहात की अन मॅरीड आहात टाकायचे आहे. नंतर वडिलांचे नाव आणि तुमची जी कॅटेगिरी आहे ती टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात की नाही ते टाकायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

स्टेप 2: नंतर तुम्हाला Nominee Details टाकायचे आहे. त्यामधे तुम्हाला नॉमिनी चे नाव, त्यांची जन्मतारीख, जेंडर आणि त्यांचं तुमच्यासोबत नात टाकायच आहे व Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

रेसिडेंटअल डिटेल्स (निवासी माहिती)

E Shram Card Online Registration Step

स्टेप 1: सर्वात पहिले महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे.

स्टेप 2: नंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही कुठे राहतात ते निवडायच आहे.

स्टेप 3: नंतर तुम्हाला पर्मनंट (कायम) आणि करंट (चालू) पत्ता द्यायचा आहे.

सर्वात पहिले करंट ऍड्रेस विचारला आहे तर तुम्ही ग्रामीण भागातून आहे की शहरी भागातून ते सिलेक्ट करायच आहे. ग्रामीण भागात असेल तर Rural आणि शहरी भागात असेल तर Urban असे टाकायचे आहे. त्यानंतर हाऊस नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर तुम्ही आत्ता कोणत्या जिल्ह्यमध्ये राहतात ते टाकायच आहे. ते टाकलं तर तुम्ही कोणत्या तालुक्यात राहतात ते निवडायचे आहे. त्यानंतर गावाचं नाव व पिनकोड आणि तुम्ही त्या जागेवर किती वर्षे पासुन राहतात ते निवडायचे करायचा आहे.

स्टेप 4: तुम्हाला परमनंट ऍड्रेस विचारला जाईल तर त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागातून आहात की शहरी भागातून हे टाकायचे आहे व नंतर बाकीची माहिती जी असेल ती टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

एज्युकेशन क्वलिफिकेशन (शैक्षणिक पात्रता)

E Shram Card Online Registration Step

स्टेप 1: यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षण किती झालेल आहे, ते तुम्हाला द्यायचं आहे. जे काय तुमचं शिक्षण झाले असेल किंवा नसेल ते टाकायच आहे.

स्टेप 2: नंतर तुम्हाला तुमचा Monthly Income Slab (मासिक उत्पन्न स्लॅब) सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही दहा हजार पेक्षा कमी कमवतात की जास्त ते सिलेक्ट करायचा आहे. तुमचं जे इन्कम आहे ते निवडायचं आहे त्यानंतर संबिट Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

ऑक्युपेशन अँड स्किल्स (व्यवसाय आणि कौशल्य)

E Shram Card Online Registration Step

स्टेप 1: Primary Occupation मध्ये तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्ही काय काम करतात ते टाकायचं आहे. तुम्हाला सर्च करण्यासाठी सुद्धा ऑप्शन देतात. त्यामध्ये तुम्ही जे काही काम करतात तेथे सर्च करायचे आहे. उदा. Agriculture असे टाकायचे आहे.

जर तुम्हाला भरपूर ऑप्शन बघायचे असेल तर तुम्हाला तेथे कोडचा देखील ऑप्शन दिलेला आहे. जिथे Primary Occupation आहे तिथे खाली निळ्या रंगांमध्ये लिहिलेले आहे तिथे क्लिक करायचं आहे. जे NCO कोड आहे. तुम्ही कोणत्या कोड मध्ये बसता आहे तुम्हाला चेक करायचा आहे.

स्टेप 2: नंतर तुम्ही तिथे किती वर्ष काम करता आणि अनुभव किती आहे तो टाकायचा आहे. नंतर संबिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

बँक अकाउंट डिटेल्स (बँकेची माहिती)

स्टेप 1: तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. व तो अकाउंट नंबर तुम्हाला पून्हा एकदा करायचा आहे.

स्टेप 2: नंतर तुमच्या बँक अकाउंट वर तुमचं काय नाव आहे ते पूर्ण स्पेलिंग सहित टाकायचे आहे.

स्टेप 3: नंतर IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर सर्व माहिती भरून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Submit बटन वर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल. ती एकदा चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर सर्वात खाली यायचं आहे आणि सर्वात खाली टर्म्स अंड काँडिशन्स (Terms and Conditions ) वर टिक करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

E Shram Card Online Registration Step

जसं तुम्ही Submit बटन वर क्लिक कराल तेव्हा तुमचं eshram कार्ड जे आहे ते तयार झालं असेल. आणि ते डाऊनलोड करण्यासाठी खाली Download या ऑप्शन वर क्लिक करून ते डाऊनलोड करायच आहे.

ई श्रम कार्ड चे फायदे

  • मित्रांनो, ज्या मजुरांनी ई श्रम कार्ड नोंदणी करून घेतले आहे त्यांना देशात कुठेही रोजगार मिळवणे सोपे होणार आहे.
  • ई श्रम पोर्टल वर नोंदणी केलेल्या कामगारांना 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे.
  • ई श्रम कार्ड धारक कामगाराचा अपघात झाल्यास, मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण पणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाईल. तसेच जर कामगारास अंशतः अपंगत्व आले तर विमा योजने अंतर्गत त्याला 1 लाख रुपये मिळतील. (प्रत्येक राज्याची पोलिसी वेगळी असू शकते)
  • तसेच या कार्डाच्या सहाय्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, स्वयं रोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, सामाजिक सहाय्य योजना इत्यादी या सारख्या राष्ट्रीय योजनांचा लाभ मिळू शकतो.
  • तसेच कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळतो. जसे की मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन, मुलांसाठी शिष्यवृत्ती, तूमच्या कामासाठी मोफत साधने इत्यादी.
  • काहींना घर बांधणीसाठी मोफत निधी ही दिला जातो.
  • केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा थेट लाभ ई श्रम कार्ड धारकांना मिळणार आहे.
  • त्याच बरोबर भविष्यात लवकरच या सोबत रेशन कार्ड सुद्धा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कामगाराला देशातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल.

ई श्रम कार्ड चे तोटे किंवा नुकसान काय आहेत?

  • मित्रांनो, जर तुम्ही इतर लोकांचे बघून ई श्रम कार्ड काढले असेल आणि जर तुम्ही उच्च शिक्षण घेत आहात तर ई श्रम कार्ड काढणे तुमच्यासाठी नुकसान ठरू शकते. कारण यामुळे भविष्यात तुम्हाला नोकरी मिळवण्यास किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यास अडचणी येऊ शकतात.
  • तसेच ई श्रम कार्ड आधार कार्डच्या माहितीच्या आधारे बनवलेले असल्याने विद्यार्थ्यांनी ई श्रम कार्ड बनवू नये. नाहीतर भविष्यात नुकसान होऊ शकते.
  • जर तुम्ही ई श्रम काढले असेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तुम्हाला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही. तसेच सरकारी नोकरी मिळण्यास अडचणी येतील.
  • जे वृद्ध लोक आता ई श्रम कार्ड बनवत आहेत त्यांना वयाच्या 60 वर्षा नंतर वृद्धापकाळात पेन्शन योजने साठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • या शिवाय वृद्ध महिला सुद्धा 60 वर्षानंतर पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  • म्हणूनच मित्रांनो, उगाच लालचे पोटी इ श्रम कार्ड बनवू नका. एकदा ई श्रम कार्ड काढले की परत मिटवणे अवघड आहे. जर तुम्ही चुकून ई श्रम कार्ड तयार केले असेल तर ते डिलीट करण्याची प्रोसेसचे वेबसाइट वर लवकरच अपडेट होईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ई श्रम कार्ड चे फायदे तोटे बद्दल व इतर माहिती बद्दल जाणून घेतले आहे. आशा करतो की तुम्हाला आजचा लेख आवडला असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Tags: e shram card, e shram card tayar karne, e shram card mahiti, e shram card kase tayar karayche, e shram card banva, e shram card free, e shram card info in marathi, e shram card Marathi, shramik card

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद