गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा | फाइन ऑनलाईन कसा चेक करावा - MarathiDiary
Check Maharashtra RTO FineHome Page 1Maharashtra 2 - 4 Wheeler E-Challan CheckMaharashtra Traffic ChallanNo Parking E-Challan CheckSidebar 1Sidebar PostTop Post

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा | फाइन ऑनलाईन कसा चेक करावा



नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड (फाइन) लावला जातो. हि दंडाची प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला लागलेला फाइन तुमच्या नकळत तुमच्या गाडीच्या नंबरला लिंक केला जातो. आणि त्याचा एक मेसेज महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांकडून तुमच्या फोन वर पाठवला जातो.

तो मेसेज पाहून तुम्हाला समजते कि तुमची काहीतरी चूक झालेली आहे. कधी कधी तुमची चूक नसतानाही तुम्हाला फाइन लावला जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची ? आणि जर खरंच चूक झालेली असेल तर हा फाइन ऑनलाइन कसा भरायचा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण गाडीचा फाइन ऑनलाईन कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊ.



मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाईटला भेट द्याची आहे

वेबसाइट लिंक – mahatrafficechallan.gov.in

तर या वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला E-Challan Payment Maharashtra State स्क्रीनवर दिसेल. या स्क्रीनवर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वेहिकल नंबर (Vehicle No.) आणि चलन नंबर (Challan No.) हे दोन ऑप्शन दिसतील.

तर आपण वेहिकल नंबर हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला गाडीचा नंबर टाकायचा आहे. गाडीचा नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला चेसी नंबरचे (Chassis/Engine no.) शेवटचे चार आकडे इथे टाईप करायचे आहेत.

नंतर I’am not robot हा कँपचा कोड सोडवायचा आहे. नंतर सबमिट (Submit) बटन वर क्लिक करायचे आहे.



How To Pay Maharashtra Traffic Challan Online (1)

आता तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्या पेजवर तुमच्या गाडीवर आत्तापर्यंत किती इ-चलन फाडले गेले आहेत याची यादी दिसेल.

त्या यादीवर थोडे उजव्या बाजूला स्क्रोल करून प्रत्येक चलनावर किती फाईन आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि फाईन कोणत्या कारणास्तव लागलेला आहे ते ही समजून घेऊ शकता. तसेच पेमेंट स्टेटस (Payment Status) कॉलम वर Paid असेल तर तो फाईन तुम्ही भरलेला असतो. जर पेमेंट स्टेटस (Payment Status) हा Unpaid असेल तर तो फाईन तुम्हाला भरायचा असतो.

तसेच दुसरा कॉलम व्हू (View) चा असतो त्याखाली डोळ्याची चिन्ह असते त्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही त्या चलनाची सविस्तर माहिती बघू शकता. जसे कि…

  • चलन नंबर / Challan No.
  • चलनाची तारीख / Violation Date
  • ड्राइविंग लाइसेंस नंबर / License No.
  • गाडीचा नंबर / Vehicle No.
  • पेमेंट स्टेटस / Payment Status
  • चलन पैसे / Amount
  • चलनाची जागा / Challan Location
  • पुरावे / Evidences
  • चलनाची कारणे / Violation(s)

या माहितीमध्ये पुरावे / Evidences भागात क्लिक केल्यावर तुमच्या गाडीला चलन फाडण्यावेळचा फोटो जोडलेला असतो. तर हा फोटो तुमचा आहे का? एकदा चेक करायचं आहे. जर हा फोटो तुमचा नसेल तर तुम्ही तक्रार करू शकतात. या तक्रारीची लिंक त्यावरच तुम्हाला मिळेल. म्हणजेच Grievance चा ऑप्शन असेल तिथे आपण तक्रार दाखल करू शकता.

माहिती बरोबर असेल तर आता चलनाचा फाइन कसा भरायचा ते बघू. त्यासाठी चलनाची यादी असलेल्या पेज वर या, ज्या चलनाचा फाइन भरायचा आहे त्यावर टिक करून वरती असलेले Select echallans & Click here to pay बटन क्लिक करायचे आहे.



How To Pay Maharashtra Traffic Challan Online (2)

आता पेमेंटच्या Terms and conditions, Security Policy वाचून घ्यायच्या आहेत. नंतर ॲग्री (Agree) ऑप्शन वर टिक करायचे आहे. नंतर तुम्हाला उजव्या बाजूला Pay Now चे बटन येईल. त्यावर क्लिक करायचं आहे.

How To Pay Maharashtra Traffic Challan Online (3)

क्लिक केल्यानंतर तुम्हाला Pay Through BillDesk या ऑप्शन वर क्लिक करायच आहे.

How To Pay Maharashtra Traffic Challan Online (4)

आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पर्याय विचारले जातील जसे कि… क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, QR Code किंवा UPI

या ऑप्शन पैकी कोणत्याही एका ऑप्शन द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.

तर आपण QR Code या ऑप्शन द्वारे पेमेंट कसे करायचे ते बघणार आहोत. तर QR Code या ऑप्शन वर क्लिक करायच आहे.

How To Pay Maharashtra Traffic Challan Online (5)

नंतर Make Payment बटन वर क्लिक करायचा आहे. हा ऑप्शन तेव्हाच येईल, जेव्हा तुम्ही BillDesk ने पेमेंट करता.

How To Pay Maharashtra Traffic Challan Online (6)

आता नवीन पेज वर तुम्हाला खाली QR Code दिसेल, त्यावर क्लिक करा. तो मोठा होऊन तुमच्यासमोर दिसेल. आता तुम्हाला तुमच्या आवडत्या UPI अँप ने तो QR Code स्कॅन करून पेमेंट करायचं आहे.

How To Pay Maharashtra Traffic Challan Online (7)

पेमेंट पूर्ण झाल्यावर पेमेंट सक्सेसफुल ची स्क्रीन तुम्हाला दिसेल. आता त्या हिरव्या लाईनवर क्लिक करायचं. त्या हिरव्या लाईन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची रिसीट दिसेल. नंतर ती रिसीट तुम्ही डाऊनलोड करायची आणि अशा प्रकारे तुम्ही इ-चलन किंवा फाईन भरलेला आहे. आता तुम्ही परत वेबसाईटवर जाऊन वेहिकल नंबर (Vehicle No.) आणि चलन नंबर (Challan No.) टाकून स्टेटस पाहू शकता. तिथे Payment Status मध्ये तुम्हाला चलन Paid झालेला दिसेल.

How To Pay Maharashtra Traffic Challan Online (8)

अशाप्रकारे तुम्ही इ-चलन किंवा फाईन ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद