पीएफ अकाउंट मधील बॅलन्स चेक करा (तीन प्रकारे) | Check PF Account Balance - MarathiDiary
EPFHome Page 1Sidebar 1एम्प्लॉई पोव्हिडन्ट फंड (EPF)

पीएफ अकाउंट मधील बॅलन्स चेक करा (तीन प्रकारे) | Check PF Account Balanceनमस्कार मित्रांनो, आज आपण पीएफ अकाउंट मधील बॅलन्स चेक कसा करायचा याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Check PF Account Balance in Marathi

मित्रांनो, पीएफ म्हणजे Provident Fund हा कोणत्याही नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण पीएफ ही एक प्रकारचा निवृत्ती नंतरची गुंतवणूक आहे. आता तुम्ही गरज पडल्यास पीएफ मधील फंड ही काढून घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही जर नोकरदार असाल आणि तुमच्या पगारातून दर महिन्याला तुमचा पीएफ कट होत असेल तर तुम्ही वेळोवेळी तुमचा पीएफ बॅलन्स हा चेक करायला हवा. आणि त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पध्दती सांगणार आहोत. यात चार सोप्या पद्धतीद्वारे तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकता. तुम्हाला ही जर या चार पद्धती जाणून घ्यायच्या असतील हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.Check PF Account Balance through Miss Call

पहिली पध्दत: मिस कॉलद्वारे पीएफ बॅलन्स जाणून घ्या

मित्रांनो, पीएफ बॅलन्स चेक करण्याच्या या पद्धतीत तुम्हाला ना UAN नंबर ची गरज आहे ना पीएफ अकाउंटची ना इंटरनेट ची गरज आहे. तर इथे फक्त तुमचा मोबाईल नंबर पीएफ अकाउंटला रजिस्टर असायला हवा. तसेच इथे तुम्ही फक्त epfo ने जारी केलेल्या नंबर वर मिस कॉल करून पीएफ बॅलन्स चेक करू शकणार आहात.

त्यासाठी तुम्हाला epfo च्या 9966044425 या नंबर वर missed call करायचा आहे. तुम्ही मिस्ड कॉल दिल्यानंतर लगेचच तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबर वर epfo द्वारे sms पाठवला जातो ज्यात तुमच्या पीएफच्या बॅलन्सचे डिटेल्स असतात.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

खाली दिलेल्या इमेज मध्ये तुम्ही पूर्ण प्रोसेस बघू शकता. तसेच मेसेज चा फॉरमॅट कसा असेल ते पण तपासून पहा. पण लक्षात ठेवा – या प्रोसेस साठी तुमच्या पीएफ अकाउंट वर आधार KYC पूर्ण कम्प्लिट असणे ही आवश्यक आहे.क्र.हा लेखा वाचा
1पीएफ ऑनलाइन क्लेम/Withdraw कसा करायचा
2ESIC संपूर्ण माहिती: म्हणजे काय, फायदे, सुविधा व लाभ, विमा, नोंदणी
Check PF Account Balance through Miss-Call

Check PF Account Balance through text SMS

दुसरी पद्धत: मेसेजद्वारे PF माहिती मिळवा

मित्रांनो, दुसऱ्या पद्धतीत तुम्ही epfo द्वारे जारी केलेल्या नंबर वर SMS करून पीएफ बॅलन्स चेक करू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला मेसेज बॉक्स मध्ये EPFOHO असे टाइप करून नंतर स्पेस द्यायची आहे व तुमचा UAN नंबर टाइप करायचा आहे. आणि हा मेसेज 7738299899 या नंबर वर सेंड करायचा आहे. त्यानंतर लगेच तुमच्या रेजिस्टर नंबर वर epfo द्वारे एक SMS पाठवला जातो, ज्यात तुमच्या पीएफ चे बॅलन्स डिटेल्स असतात.

या प्रोसेससाठी पण तुमचा मोबाईल नंबर पीएफ अकाउंट ला रेजिस्टर असायला हवा व आधार KYC पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

Check PF Account Balance through SMS

तिसरी पद्धत: वेबसाइटद्वारे PF बॅलन्स जाणून घ्या

Check PF Account Balance through the epfo website

मित्रांनो, वरील दोन्ही पद्धतीत तुम्हाला फक्त पीएफ चा बॅलन्स दाखवला जातो. पण तुम्हाला जर तुमच्या पीएफ मध्ये कधी पैसे जमा केले आहेत, कधी काढले आहेत, किती पैसे जमा केले व किती काढले गेले, तसेच epfo द्वारे किती इंटरेस्ट दिला गेला हवं सर्व चेक करायचे असेल म्हणजेच तुम्हाला जर पीएफ चे पूर्ण स्टेटमेंट किंवा पासबुक चेक करायचे असेल तर तुम्ही तिसरी पद्धत वापरू शकता.स्टेप 1: यात तुम्हाला सर्वात पहिले epfo च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे. व उजव्या बाजूला दिलेल्या ऑप्शन मधून e- passbook या ऑप्शन मध्ये जायचे आहे.

epfo वेबसाईट – epfindia.gov.in

Check PF Account Balance through the Website Step 1

स्टेप 2: यानंतर नेक्स्ट पेज वर तुमचा UAN नंबर, पासवर्ड व कॅपचा टाकून लॉग इन करायचे आहे. व तुमचे epfo पोर्टल वर लॉग इन होउन जाईल. जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या पीएफ अकाउंट वर लॉग इन करत असाल तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचा UAN Number ऍक्टिव्हेट करावा लागतो.

UAN नंबर ऍक्टिव्हेट करण्यासाठी हा लेख वाचा => पीएफ अकाउंट चा पासवर्ड तयार कसा करायचा ?

Check PF Account Balance through the Website Step 2

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला तुमचा employer (कंपनी) सिलेक्ट करायचा आहे. ज्याचा तुम्हाला पीएफ बॅलन्स चेक करायचा आहे. व या नंतर तुम्हाला View Passbook ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Check PF Account Balance through the Website Step 3

स्टेप 4: त्यानंतर ज्या आर्थिक वर्षाचे बॅलन्स चेक करायचे आहे ते वर्ष सिलेक्ट करायचे आहे. या नंतर लगेचच तुमच्या समोर तुमचे पीएफ बॅलन्सचे पूर्ण स्टेटमेंट ऑपन होईल व आता तुम्ही तुमच्या पीएफ चे सर्व Statement बघू शकता.

हा लेखा पण वाचा: पीएफ (PF) घरबसल्या ऑनलाइन क्लेम/Withdraw कसा करायचा

मित्रांनो तुम्हाला जर हे स्टेटमेंट pdf मध्ये डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही ते डाउनलोड ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला Download Passbook वर क्लिक करायचे आहे. व पूर्ण पीएफ बॅलन्स स्टेटमेंट डाउनलोड होऊन जाईल.

चौथी पद्धत: उमंग अँपवरून पीएफ माहिती जाणून घ्या

Check PF Account Balance through UMANG app

स्टेप 1: मित्रांनो, या पद्धतीत तुम्हाला सर्वात पहिले epfo ची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला काही आयकॉन दिसतील त्यातील उमंग आयकॉन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: या नंतर उमंग ची वेबसाईट ओपन होऊन जाईल. जर तुम्ही आधीच उमंग वर रेजिस्टर असाल तर तुमचा मोबाईल नंबर व ओटीपी च्या सहाय्याने लॉग इन करायचे आहे. आणि जर तुम्ही उमंग वर रेजिस्टर नसाल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून आलेल्या ओटिपी द्वारे रेजिस्टर व्हायचे आहे व लॉग इन करायचे आहे.

स्टेप 3: त्यानंतर नेक्स्ट पेज वर सर्च ऑप्शन मध्ये तुम्हाला epfo टाइप करून epfo department ला निवडायचे आहे.

स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला खाली काही ऑप्शन दिसतील त्याआधी तुम्हाला पीएफ अकाउंट वर लॉग इन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला login बटन वर क्लिक करायचे आहे. व नंतर तुमचा UAN नंबर टाकून get OTP वर क्लिक करायचे आहे व तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे पीएफ अकाउंट वर लॉग इन पूर्ण होऊन जाईल.

स्टेप 5: आता तुम्ही खाली दिलेल्या ऑप्शन पैकी View Passbook या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्या employer (कंपनी) ला सिलेक्ट करायचे आहे व लगेच तुमच्या समोर तुमचे पीएफ पासबुक ओपन होईल. व तुम्ही तुमचे पीएफ बॅलन्स स्टेटमेंट बघू शकता. मित्रांनो, इथे तुम्ही पूर्ण स्टेटमेंट PDF मध्ये डाउनलोड करू शकता.

मित्रांनो, ही पूर्ण प्रोसेस तुम्ही उमंग अँप डाउनलोड करून ही करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीएफ बॅलन्स चेक कसा करायचा या बद्दल सविस्तर पणे जाणून घेतले. आशा करतो या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

Tags: PF Balance Check in Marathi, EPF Balance Check in Marathi, PF Balance Check Mahiti, PF Paise Tapasne, PF Jama Check, PF Kiti Jama Zala Check Kara, pf in marathi, epf marathi, epfo marathi, provident fund in marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!