पीएफ अकाउंट चा पासवर्ड तयार कसा करायचा ? | How to generate PF UAN Password
नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएफ UAN चा पासवर्ड तयार कसा करायचा या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, तुम्ही पण जर नोकरदार असाल तर तुम्हाला माहीत असेल तर आजकाल जवळ जवळ बऱ्याच नोकरीच्या ठिकाणी पीएफ कापला जातो. आणि सेवा निवृत्तीच्या वेळी हा पूर्ण जमा झालेला पीएफ तुम्हाला दिला जातो. या शिवाय नोकरीच्या दरम्यान ही तुम्ही epfo च्या रुल्स नुसार काही प्रमाणात तुमचा पीएफ काढू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का हा पीएफ काढण्यासाठी, पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी, पीएफ ची केवायसी अपडेट करण्यासाठी, तुम्हाला पीएफ अकाउंट ला सर्वात पहिले लॉग इन करावे लागते.आणि त्यासाठी तुमचे युझरनेम व पासवर्ड या दोन्ही गोष्टींची आवश्यकता पडते. इथे युझरनेम म्हणून तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकावा लागतो. पण पासवर्ड कसा तयार करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसते. पण काळजी करू नका आजकब्या या लेखात असमही तुम्हाला पीएफ UAN चा पासवर्ड कसा तयार करायचा या बद्दल च सांगणार आहोत, त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.
पीएफ अकाउंट चा पासवर्ड तयार कसा करायचा
स्टेप 1: मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या पीएफ अकाउंट वर लॉग इन करत असाल तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचा UAN number ऍक्टिव्हेट करावा लागतो व पासवर्ड तयार करावा लागतो.
यात तुम्हाला सर्वात पहिले epfo च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे. व उजव्या बाजूला दिलेल्या ऑप्शन मधून Online Claims Member Account Transfer या ऑप्शन मध्ये जायचे आहे.
epfo वेबसाईट – epfindia.gov.in
स्टेप 2: जेव्हा तुम्ही Unified पोर्टल वर जाल तेव्हा तुम्हाला लॉग इन स्क्रीन बघायला मिळेल. तिथेच खाली तुम्हाला काही लिंक दिसतील, त्यातील Activate UAN या लिंक वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 3: त्या नंतर नेक्सट पेज वर तुम्हाला तुमचा UAN Number टाकायचा आहे. त्या नंतर तुमचा आधार नंबर , तुमचे पूर्ण नाव, तुमची जन्म तारीख टाकायची आहे. व नंतर तुमचा आधार ला रेजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. दिलेला कॅपचा टाकून खाली दिलेले डिस्क्लेमर ऍक्सेप्ट करून खाली Get Authentication Pin या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: या नंतर तुमच्या आधार रेजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून Validate OTP and Activate UAN या बटन वर क्लिक करायचे आहे.
या नंतर तुमचा UAN नंबर सक्सेसफुली ऍक्टिव्हेट केला जाईल. व तुमचा लॉग इन पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबर वर SMS केला जाईल. या नंतर तुम्ही तुमचा युझरनेम व पासवर्ड टाकून तुमचे पीएफ अकाउंट लॉग इन करू शकता. व पीएफ शी रिलेटेड कोणतीही गोष्ट तुम्ही घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.
हा लेखा पण वाचा => पीएफ (PF) घरबसल्या ऑनलाइन क्लेम/Withdraw कसा करायचा
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीएफ UAN नंबर ऍक्टिव्हेट कसा करायचा व पासवर्ड तयार कसा करायचा या बद्दल जाणून घेतले. आशा करतो की या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद