फोन पे/ गुगल पे मध्ये फास्टॅग चा बॅलन्स चेक कसा करायचा? | How to Recharge FASTag - MarathiDiary
FASTag

फोन पे/ गुगल पे मध्ये फास्टॅग चा बॅलन्स चेक कसा करायचा? | How to Recharge FASTag



नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण फोन पे/ गुगल पे अँप मध्ये फास्टॅग चा बॅलन्स चेक करणे आणि रिचार्ज करणे, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Kontyahi Gadicha FASTag Balance Check

मित्रांनो, आजकाल बरेच जण कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. आणि राष्ट्रीय महामार्ग वर प्रवास करताना टोल नाके येतात. आणि तिथे पेमेंट करण्यासाठी आता लोकं कॅश न वापरता FASTag फिचर वापरून पेमेंट करतात. पण बऱ्याचदा आपल्या FASTag मधील बॅलन्स कमी होतो किंवा संपतो आणि ते आपल्या लक्षात येत नाही. आणि काही असेही लोकं आहेत ज्यांना अजून ही FASTag मध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे हे कसे जाणून घ्यायचे ते माहीत नसते. आणि मग ऐनवेळी पेमेंट करताना आपली फजिती होते.



पण मित्रांनो, काळजी करू नका, या लेखातून आम्ही तूम्हाला तुमच्या फोन पे आणि गुगल पे ऍप मधून तुमचा FASTag चा बॅलन्स चेक कसा करायचा? या बद्दल माहिती सांगणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

फोन पे ऍप मधून FASTag चा बॅलन्स चेक/ रिचार्ज

फोन पे ऍप मधून FASTag चा बॅलन्स चेक कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: सर्वात पहिले गुगल प्ले स्टोअर वरून फोन पे/ PhonePe ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

PhonePe Varun FASTag Balance Check Step 1

स्टेप 2: नंतर तुम्हाला तुमचे फोन पे ऍप ओपन करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट इंटरफेस मध्ये तुम्हाला खाली Recharge & Pay Bills या ऑप्शन मध्ये See All ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

PhonePe Varun FASTag Balance Check Step 2

स्टेप 3: नंतर Recharges चा ऑप्शन बघायला मिळेल. या नंतर FASTag Recharge या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.



PhonePe Varun FASTag Balance Check Step 3

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे. इथे ज्या बँकेचे फास्टॅग घेतले आहे ती बँक सिलेक्ट करायची आहे.

PhonePe Varun FASTag Balance Check Step 4

स्टेप 5: त्या नंतर पुढे तुम्हाला तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर (Vehicle Registration Number ) टाकायचा आहे. आणि नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

PhonePe Varun FASTag Balance Check Step 5

स्टेप 6: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या FASTag चा बॅलन्स बघता येईल. जर तुम्हाला तुमच्या FASTag वर रिचार्ज करायचा असेल तर वरती अमाऊंट टाकायची आहे नंतर Proceed To Pay च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

PhonePe Varun FASTag Balance Check Step 6

नंतर तुमचा यूपीआय पिन टाकून Ok बटन वर क्लिक करायचे आहे. व थोड्याच वेळात तुमचा FASTag रिचार्ज सक्सेसफुली होऊन जाईल. आणि हा रिचार्ज झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही तुमचा FASTag बॅलन्स परत चेक करू शकता.

गुगल पे ऍप मधून FASTag चा बॅलन्स चेक/ रिचार्ज

गुगल पे ऍप मधून FASTag चा रिचार्ज कसा करायचा? व बॅलन्स चेक कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.



स्टेप 1: सर्वात पहिले गुगल प्ले स्टोअर वरून गुगल पे/ Google Pay ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

Gpay Varun FASTag Balance Check Step 1

स्टेप 2: नंतर गुगल पे ऍप ओपन करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट इंटरफेस मध्ये तुम्हाला खाली View all ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Gpay Varun FASTag Balance Check Step 2

स्टेप 3: त्या नंतर पुढे तुम्हाला FASTag Recharge चा ऑप्शन बघायला मिळेल.

Gpay Varun FASTag Balance Check Step 3

स्टेप 4: त्या नंतर आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे. इथे ज्या बँकेचे फास्टॅग घेतले आहे ती बँक सिलेक्ट करायची आहे.

Gpay Varun FASTag Balance Check Step 4

स्टेप 5: त्या नंतर पुढे तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर (Vehicle Number ) टाकायचा आहे. आणि नंतर Link FASTag या बटन वर क्लिक करायचे आहे.

Gpay Varun FASTag Balance Check Step 5

स्टेप 6: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला वाहन ज्या व्यक्तीचे आहे त्या व्यक्तीचे नाव दिसेल व FASTag ऍक्टिव्ह आहे की नाही ते लिहिलेले दिसेल. त्या नंतर खाली कन्फर्म/ Confirm बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या FASTag चा बॅलन्स बघता येईल.

Gpay Varun FASTag Balance Check Step 6

स्टेप 7: आता जर तुम्हाला तुमच्या FASTag वर रिचार्ज करायचा असेल तर तिथेच खाली तुम्हाला Recharge च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला किती रुपयांचे रिचार्ज करायचे आहे ती अमाउंट टाकायची आहे. व त्या नंतर पुढे तुम्हाला यूपीआय चा ऑप्शन येईल. तिथे तुमचा यूपीआय पिन टाकून Ok बटन वर क्लिक करायचे आहे. व थोड्याच वेळात तुमचा FASTag रिचार्ज सक्सेसफुली होऊन जाईल. आणि हा रिचार्ज झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही तुमचा FASTag बॅलन्स परत चेक करू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की आता भारतातील जवळपास सर्व टोल बूथ फास्टॅगला सपोर्ट करतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या FASTag च्या खात्यात जर पैसे कमी असतील, आणि जर तुमच्या कडे कॅश देखील नसेल तर तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, आणि दिलीच तर टोलच्या दुप्पट पैसे भरावे लागतील. त्यामुळे टोल भरल्या नंतर तुमच्या FASTag खात्यात शिल्लक राहिलेल्या पैशांचा नेहमी मागोवा ठेवा व वेळोवेळी चेक करत रहा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण फोन पे मध्ये फास्टॅग चा बॅलन्स चेक कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: FASTag Balance Check Free, FASTag Balance Check PhonePe, FASTag Balance Check Gpay, FASTag Balance Check Google Pay, 4 Wheeler FASTag Balance Check, Gadicha FASTag Balance Check, FASTag Balance Tapasne, FASTag Balance Shodah, FASTag Balance Check Kasa Karaycha, FASTag Recharge Kasa Karaycha, FASTag Recharge on Gpay, FASTag Recharge on PhonePe, fastag recharge, hdfc fastag recharge, fastag recharge by vehicle number, fastag recharge online using vehicle number, fastag, recharge balance check, fastag recharge hdfc bank, fastag recharge by chassis number, fastag recharge check, fastag recharge app, fastag recharge airtel, fastag recharge with vehicle number, fastag recharge idfc bank, fastag recharge phonepe, fastag recharge bank of baroda, fastag recharge chassis number, fastag recharge equitas, fastag recharge kaise kare, fastag recharge means, fastag recharge kotak login, fastag recharge online axis bank, fastag recharge karur vysya bank, fastag recharge canara bank, fastag recharge nhai, fastag recharge online sbi, fastag recharge online icici, fastag recharge south indian bank, fastag recharge by credit card,fastag recharge gpay, fastag balance check phonepe, fastag balance check gpay

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद