सुकन्या समृद्धी योजना 2023 सोप्या सरळ भाषेत | Sukanya Samruddhi Yojna 2023
- सुकन्या समृद्धी योजनेचीथोडी माहिती
- सुकन्या समृद्धीचे खाते कोण उघडू शकते?
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे आणि तोटे काय आहेत
नमस्कार मित्रानो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण सुकन्या समृद्धी योजना, याबद्दल तसेच त्याचा इंटरेस्ट रेट, योजनेचा फॉर्म कसा भरायचा, त्याचे फायदे, नियम व अटी अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, तुमच्या घरात लहान मुलगी आहे का? जर तुमच्या घरात लहान मुलगी असेल तर तुम्हाला तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे जमवून तिचे भविष्य सुरक्षित करायचे आहे का? पण यासाठी काय करावे ते सुचत नाही? काळजी करू नका, कारण तुम्हाला तुमच्या लहान मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजने मध्ये गुंतवणूक करणे सुरू करा. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे भविष्य सुरक्षित करणारी एक उत्तम योजना आहे. देशातील बरेच लोक या योजनेत गुंतवणूक करत आहेत व आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करत आहेत. ही योजना नेमकी कशी आहे? या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते? त्यासाठी पात्रता काय आहेत वगैरे माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा
एक हात मदतीचा: आम्ही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब कुटुंबे असतील जे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
सर्वात पहिले सुकन्या समृद्धी योजने बद्दल थोडी माहिती
Sukanya Samruddhi Yojna Information
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकार द्वारे 2015 साली सुरू करण्यात आली. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियान अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजने अंततर्गत, 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने पालक किंवा त्यांचे कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही रु. 250 ते रु. 1.50 लाख पर्यंत निवेश करू शकता. भविष्यात मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी बचत करणे थोडक्यात मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनेचा चा मुख्य उद्देश आहे. तसेच या योजने अंतर्गत फक्त मुलींचे खाते उघडले जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता. या योजनेत खाते मुलीच्या नावानेच उघडले जाते. व यात 7.6% व्याजदर दिला जातो. मुलीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला गुंतवलेले पैसे परत मिळतात.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कुटुंबातील किती मुलींना योजनेचा लाभ मिळेल?
मित्रांनो, या योजने अंतर्गत कुटुंबातील दोन मुलींना योजनेचा लाभ मिळू शकतो. जर एखादया कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्यापैकी फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. पण जर एका कुटुंबात आधी एक मुलगी व नंतर जुळ्या मुली झाल्यास त्यांना स्वतंत्र पणे योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतील. तसेच फक्त 10 वर्षांखालील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजना खाते कोण उघडू शकते?
- मित्रांनो 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे पालक त्यांच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात. तसेच पालक आपल्या दोन मुलींसाठी हे खाते उघडू शकतात.
- आधीपासून चालू खाते असताना, मुलीच्या आजी आजोबा, इतर नातेवाईकांना सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची परवानगी नाही. परंतु, जर पालकांचा मृत्यू झाला असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालक झालेला नातेवाईक त्या मुलीसाठी खाते उघडू शकतो.
- कारदेशीर रित्या दत्तक घेतलेल्या मुली साठी तिचे पालक खाते उघडू शकतात.
- जो पर्यंत मुलगी 18 वर्षे पूर्ण होत नाही तो पर्यंत पालक किंवा कायदेशीर पालक खाते चालवू शकतात. त्या नंतर मुलीची केवायसीची कागदपत्रे जमा करून मुलीला खाते चालविण्याचा व पैसे काढण्याचा अधिकार मिळतो.
सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याजदर दिले जाते?
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेत सध्या दरवर्षी 7.6% व्याजदर दिला जातो. तसेच दर तिमाहित नवीन दर जाहीर केले जातात. आणि व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.
सुकन्या समृद्धी योजनेच्या रकमेचे कॅल्क्युलेशन खालील प्रकारे केले जाते.
वर्ष | सुरुवातीची शिल्लक | ठेव | व्याज | अंतिम शिल्लक |
---|---|---|---|---|
1 | 0 | 5000 | 380 | 5380 |
2 | 5380 | 5000 | 789 | 11169 |
3 | 11169 | 5000 | 1229 | 17398 |
4 | 17398 | 5000 | 1702 | 24100 |
5 | 24100 | 5000 | 2212 | 31312 |
6 | 31312 | 5000 | 2760 | 39071 |
7 | 39071 | 5000 | 3349 | 47421 |
8 | 47421 | 5000 | 3984 | 56405 |
9 | 56405 | 5000 | 4667 | 66071 |
10 | 66071 | 5000 | 5401 | 76473 |
11 | 76473 | 5000 | 6192 | 87665 |
12 | 87665 | 5000 | 7043 | 99707 |
13 | 99707 | 5000 | 7958 | 112665 |
14 | 112665 | 5000 | 8943 | 126607 |
15 | 126607 | 0 | 9622 | 136230 |
16 | 136230 | 0 | 10353 | 146583 |
17 | 146583 | 0 | 11140 | 157723 |
18 | 157723 | 0 | 11987 | 169710 |
19 | 169710 | 0 | 12898 | 182608 |
20 | 182608 | 0 | 13878 | 196487 |
21 | 196487 | 0 | 14933 | 211420 |
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपये गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6 टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 126607 इतकी रक्कम मिळेल तर 21 वर्षाला एकूण 211420 रुपये मिळतील.
तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला 21 वर्षानंतर मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुठे उघडावे?
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ची खाते प्रामुख्याने पोस्ट ऑफिस मध्ये उघडली जातात. तसेच या योजनेचे खाते सरकारी बँकांमध्ये ही सुरू करता येते. यात मुख्य करून खालील बँकांचा समावेश आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
- इंडियन बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- युनियन बँक ऑफ इंडिया
- आयसीआयसीआय बँक
- ऍक्सिस बँक
- कॅनरा बँक
- देना बँक
- IDBI बँक
- पोस्ट ऑफिस, वगैरे.
सुकन्या समृद्धी योजने साठी अर्ज कसा करावा?
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन योजनेचा अर्ज भरू शकता. तसेच या योजनेत तुम्हाला तुमच्या बजेट नुसार महिन्याला किंवा वर्षातून एकदा पैसे भरावे लागतात. यात वर्षाला कमीत कमी रू 250 व जास्तीत जास्त रू 1.5 लाख पर्यंत भरू शकतात. तसेच ज्या तारखेला खाते उघडले आहे त्या तारखेपासून ते 15 वर्षांपर्यंत तुम्हाला दरवर्षी खात्यात किमान रक्कम जमा करावी लागेल. यानंतर, खात्याची मॅच्युरिटी पूर्ण होई पर्यंत खात्यात व्याज मिळत राहील.
सुकन्या समृद्धी योजनेत खाते कसे उघडायचे?
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन अश्या दोन्ही प्रकारे खाते उघडू शकता
1) ऑनलाईन पद्धतीने खाते कसे उघडायचे – मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेचे कगते ऑनलाइन पद्धतीने उघडण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेत खाते उघडायचे आहे त्या बँकेची ऑफिशियल वेबसाइट ला भेट देऊन SSY साठी दिलेला फॉर्म पूर्णपणे भरून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देऊन फॉर्म सबमिट करायचा आहे. तुमचे SSY खाते उघडले जाईल.
2) ऑफलाईन पद्धतीने खाते कसे उघडायचे – मित्रांनो, तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने SSY खाते उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेच्या फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरून कागदपत्रे जोडायची व तो फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म पडताळणी झाल्यावर तुमचे खाते उघडले जाईल व त्याचे पासबुक पालकांना दिले जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
Sukanya Samruddhi Yojna Documents
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत…
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- आधार कार्ड, फोटो
- पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो
- पत्याचा पुरावा
योजनेचा परिपक्वता कालावधी किती आहे?
मित्रांनो, मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर ती मुलगी योजनेत जमा झालेली रक्कम काढू शकते.
सुकन्या योजनेतून पैसे कसे काढता येतील?
पुढील परिस्थितीत तुम्ही पैसे काढू शकता
- मुलीचे लग्न जमल्यास तुम्ही योजनेतून पैसे काढू शकता.
- पालकांचा किंवा खाते धारकाचा मृत्यू झाला असल्यास योजनेत जमा केलेले पैसे काढू शकतात.
- जर एखादा अर्जदार खात्यात पैसे भरू शकत नसल्यास खाते बंद करून जमा झालेली रक्कम काढता येते.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत लागू कर किती आहे?
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कुठलाही कर भरावा लागत नाही. म्हणजे ही योजना पूर्णपणे कर मुक्त आहे. तसेच आयकर विभाग च्या कर नियमांनुसार, 1961 च्या कलम 80C अंतर्गत, आयकर रिटर्न मध्ये प्रति वर्ष रु. 1.5 लाखां पर्यंत कर सवलत मिळू शकते. म्हणजेच योजनेत गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज तसेच परिपक्वता रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
- मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर कर मुक्ती मिळते. म्हणजेच ही योजना पूर्णपणे कर मुक्त आहे.
- जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
- या योजनेत तुम्ही रू 250 पासून खाते उघडू शकता, जी खूपच कमी रक्कम आहे.
- मुलीच्या भविषयसाठी, शैक्षणिक खर्चासाठी व लग्नासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे.
- तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यावर पुढील शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी खात्यातून 50% रक्कम काढता येते.
- तसेच विशेष परिस्थितीत मुदती पूर्वी पैसे काढण्याची परवानगी या योजनेत दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेचे तोटे
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY चे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत… जसे की…
- या योजनेत पैसे बराच काळ अडकून राहतात.
- योजना सुरू झाली तेव्हा व्याजदर जास्त होता, पण आता व्याजदर कमी दिला जातो. भविष्यात ही जर व्याजदर अजून कमी झाला तर मिळणारे रिटर्न्स कमी होतील.
- या योजनेचा सर्वात मोठा तोटा म्हणजे मुलगी 18 वर्षांची झाल्यावर सुकन्या खात्याचे सर्व अधिकार तिला मिळतात. व एक मोठी रक्कम तिच्या हातात पडते. तसेच मुलगी किशोरवयात (टीन एज) मध्ये असल्याने मिळालेल्या पैश्यांची गैरवापर होऊ शकतो.
- या योजनेत वर्षाला फक्त 1.5 लाख रुपये पर्यंत भरता येतात. जेमर एखाद्या पालकाला त्यापेक्षा जास्त रक्कम भरायची असेल तर भरता येत नाही.
- सामान्यतः फक्त दोन मुलींचे खाते उघडण्यास परवानगी आहे.
- काही कारणांस्तव पालक उशिरा या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करतात. पण योजनेच्या नियमां नुसार 10 वर्षांवरील मुलींना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जर मुलगी 11 वर्षांची जरी असेल तरी तिला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- मित्रांनो, जर तुम्ही बँकेशी तुलना केली तर सुकन्या समृद्धी योजनेत व्याज जास्त दिले जाते. पण बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांचा विचार केला तर सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा जास्त जास्त परतावा देणारे पर्याय आहेत. जसे की म्युच्युअल फंड एसआयपी, इ एल एस एस वगैरे…
सुकन्या समृद्धी योजनेत पैसे कसे जमा करावे?
मित्रांनो, या योजनेत तुम्हाला 15 वर्षे पैसे भरावे लागतात त्यामुळे ते कश्या पद्धतीने भरावे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. SSY खात्यात पैसे तुम्ही रोख, चेक द्वारे, DD डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने (उपलब्ध असेल तर) भरू शकता.
1000 रू जमा केल्यावर सुकन्या समृद्धी योजनेत मॅच्युरिटी झाल्यावर किती रुपये मिळतील?
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेत सध्या 7.6 टक्के व्याजदर मिळत आहे. जर एखादया पालकाने योजनेत दर महिन्याला 1000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी वर त्यांना 5 लाख च्या जवळपास रक्कम मिळते. ( भविष्यात व्याजदर कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे म्युच्युरिटी रक्कम बदलू शकते.)
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सुकन्या समृद्धी योजने बद्दल माहिती जाणून घेतली. ज्यांच्या घरात 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली आहेत त्यांनी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा. कारण मुलीच्या शिक्षणसाठी, लग्नासाठी अनेक पालक कर्ज काढतात, अशी वेळ तुमच्या वर येऊ नये म्हणून यासाठी आजचा या योजनेत गुंतवणूक करणे सुरू करा. व आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करा. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल किंवा महत्वपुर्ण वाटलं असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्याच नवं नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद
FAQ
सुकन्या समृद्धी योजनेत खात्यात कमी रक्कम भरल्यास काय होईल?
मित्रांनो, तुम्ही जर सुकन्या योजनेत किमान रक्कम नाही भरली तर तुमचे खाते डिफॉल्ट म्हणजेच निष्क्रिय मानले जाईल. व खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला 50 रू दंड भरावा लागेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ट्रान्सफर करता येऊ शकते का?
हो मित्रांनो, तुम्ही तुमचे SSY खाते पोस्ट ऑफिस मधून बँकेत किंवा बँकेतून पोस्टात ट्रान्सफर करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला जास्तीत जास्त किती पैसे भरू शकतो?
मित्रांनो, सुकन्या योजनेत तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर काय आहे?
मित्रांनो, सध्या 2023 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के इतका आहे. तसेच दर तिमाहित नवीन दर जाहीर केले जातात. आणि व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.
सुकन्या समृद्धी योजने वर कर्ज घेता येते का?
नाही. मित्रांनो, सुकन्या योजनेवर कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध नाही. पण तुम्ही मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 50% रक्कम काढू शकता. व उर्वरित रक्कम 21 व्या वर्षी काढता येते.
एखादी व्यक्ती एकाच वेळी सुकन्या समृद्धी योजना आणि PPF या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकते का?
हो मित्रांनो, तुम्ही एकाच वेळी सुकन्या समृद्धी योजना व PPF या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकता.
Tags: samruddhi yojna,pradhan mantri samriddhi yojana,samriddhi yojana 2023,samriddhi yojana scheme,samruddhi yojana,samruddhi kanya yojana