डिजीलॉकर: म्हणजे काय, अकाउंट कसे बनवायचे, डॉक्युमेंट ऍड कसे करायचे - MarathiDiary
Government App

डिजीलॉकर: म्हणजे काय, अकाउंट कसे बनवायचे, डॉक्युमेंट ऍड कसे करायचे

नमस्कार मित्रांनो, आज आपण डिजीलॉकर म्हणजे काय? डिजीलॉकर अकाउंट कसे बनवायचे,व त्यावर डॉक्युमेंट्स ऍड कसे करायचे? त्याची सर्व प्रोसेस काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Digilocker Mahiti

मित्रांनो, अशी एक ही जागा नाही जिथे आपल्याला कागदपत्रांची गरज पडत नाही. शाळा, कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणे असो, सरकारी काम असो किंवा इतर कोणतेही काम असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडत असते. उदाहरण द्यायचे झाले तर, जेव्हा आपण एखाद्या सरकारी कार्यालयात कोणत्याही कामानिमित्त जातो तेव्हा आपल्याला एखाद्या कागदपत्राची मागणी केली जाते. पण जर त्या वेळी आपल्याकडे तो कागद नसला तर आपल्याला सरकारी कार्यालयात पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. एवढंच नाही तर काही वेळा प्रवासा दरम्यान या डॉक्युमेंट्स ची फाइल किंवा बॅग हरवली तर अशा वेळी ही सर्व कागदपत्रे आपल्याला नव्याने बनवण्यासाठी वेळ आणि पैसे या दोन्ही गोष्टी खर्च कराव्या लागतात. या अश्या गोष्टी घडू नये असे वाटत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या ‘डिजीलॉकर’ सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे. हो मित्रांनो, ‘डिजीलॉकर’ मध्ये तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अगदी सुरक्षित ठेवू शकता. या डिजीलॉकर सुविधेबद्दल आपण पुढे अजून सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. सर्वात पहिले डिजीलॉकर म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या



What Is DigiLocker?

डिजीलॉकर म्हणजे काय

मित्रांनो, डिजिलॉकर ही भारत सरकार द्वारे सुरू केलेली एक डिजिटल स्वरूपाची लॉकर सेवा आहे. ही सेवा सरकार द्वारे फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. मित्रांनो, या डिजीलॉकर सेवेचा उद्देश हा भारतीय नागरिकांना त्यांच्या महत्वाच्या डॉक्युमेंट्स ला इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेवा आधार सेवेशी जोडण्यात आली आहे. यात तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत नाहीत तर फक्त इश्यू/ऍड करावे लागतात. तसेच हे डॉक्युमेंट्स तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स सारखेच असतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवायची गरज पडली तर तिथे तुम्ही तुमचे डिजीलॉकर मध्ये असलेले डॉक्युमेंट दाखवू शकता. यात प्रत्येक व्यक्तीला कागदपत्रे स्टोअर करून ठेवण्यासाठी सुमारे 1 जीबी इतकी जागा म्हणजेच स्टोरेज दिले जाते. आणि डिजीलॉकर हे वेबसाईट किंवा मोबाईल अँप द्वारे ऍक्सेस करता येते. त्यामुळे कधीही व कुठेही तुम्ही ही कागदपत्रे उपलब्ध करून देऊ शकता.

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे आवश्यक असणारे डॉक्युमेंट किती महत्त्वाचे आहेत, हे सांगण्याची गरज नाही. खरंतर ही कागदपत्रे म्हणजे त्या व्यक्तीची ओळख असते. म्हणूनच तुम्ही तुमची कागदपत्रे डिजीलॉकर मध्ये ठेवावी. यात तुम्ही तुमचा शाळेचा दाखला, जन्मदाखला, मार्कशीट, वोटर आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, RC, रेशन कार्ड, यांसारखे अनेक महत्वाचे कागदपत्रे आपण सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे आपले हे महत्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला प्रत्यक्ष बाळगण्याची गरज पडणार नाही. याशिवाय जेव्हा तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, ते आता द्यावे लागणार नाहीत. कारण तुम्ही संबंधित व्यक्तीला तुमची कागदपत्रे थेट संगणकावर उपलब्ध करून देऊ शकता. त्यावरून नोकरी देणारी संस्था किंवा व्यक्ति ते डॉक्युमेंट्स थेट पाहू शकतील व तपासू शकतील.

आता डिजीलॉकर मध्ये अकाउंट कसे तयार करायचे ते जाणून घेऊ या

How to create DigiLocker account



डिजीलॉकर मध्ये अकाउंट कसे तयार करायचे

मित्रांनो, डिजीलॉकर मध्ये अकाउंट कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले प्ले स्टोअर मधून तुम्हाला डिजिलॉकर (DigiLocker) अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. व ओपन करायचे आहे.

Digilocker Var Account Tayar Karne Step 1

स्टेप 2: त्या नंतर तुम्हाला लँग्वेज म्हणजेच भाषा सिलेक्ट करायची आहे. व Continue या बटन वर क्लिक करायचे आहे.

Digilocker Var Account Tayar Karne Step 2

स्टेप 3: त्या नंतर तुम्हाला डिजीलॉकर बद्दल सांगितले जाईल, की ते Secure असतं, Eazy access असतं, आणि तुम्ही याला Anytime anywhere म्हणजे कधीही व कुठेही ऍक्सेस करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या Lets go या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Digilocker Var Account Tayar Karne Step 3

स्टेप 4: आता पुढे तुम्हाला अँप चे होम पेज ओपन झालेले दिसेल. त्यात खाली Get Started या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.



Digilocker Var Account Tayar Karne Step 4

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. Sign In आणि Create account. यात जर तुमचे आधीच अकाउंट तयार केलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट साइन इन करायचे आहे. आणि जर अकाउंट नसेल तर तुम्हाला नवीन अकाउंट तयार करावे लागेल.

स्टेप 6: मित्रांनो, अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला Create account या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Digilocker Var Account Tayar Karne Step 6

स्टेप 7: नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे काही बेसिक डिटेल्स टाकावे लागतील. जसे की तुमचे पूर्ण नाव (आधार कार्ड प्रमाणे), आधार कार्ड प्रमाणे तुमची जन्म तारीख (Date of Birth) टाकायची आहे. त्यानंतर तुमचे जेंडर सिलेक्ट करून मग तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व मोबाईल वर आलेला सहा अंकी सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. त्या नंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व शेवटी Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Digilocker Var Account Tayar Karne Step 7

स्टेप 8: आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Digilocker Var Account Tayar Karne Step 8

स्टेप 9: मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे युझरनेम सिलेक्ट करायचे आहे. व नंतर Submit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व Ok करायचे आहे. व नंतर तुमचे युझरनेम सुकसेसफुल्ली क्रिएट झाले आहे असा मेसेज येईल. व तुम्ही लॉग इन होऊन जाल.

Digilocker Var Account Tayar Karne Step 9

अशा प्रकारे तुमचे डिजीलॉकर वर अकाउंट तयार झाले आहे आत्ता आपण डिजीलॉकर वर डॉक्युमेंट हस्सू इश्यू/ऍड कसे करायचे ते बघुयात.

How To Upload Documents On Digilocker?

डिजीलॉकर मध्ये डॉक्युमेंट ऍड कसे करायचे

स्टेप 1: मित्रांनो, आता तुम्हाला डिजीलॉकर अँपच्या होम पेज Search असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्च ऑप्शन मध्ये Search for documents वर क्लिक करायचे आहे.

Digilocker Document Add Kase Karayche Step 1

स्टेप 2: मित्रांनो, आता तुम्हाला डिजीलॉकर मध्ये जे डॉक्युमेंट इश्यू/ऍड करायचे आहे ते सर्च करा. उदाहरणार्थ जर तुम्हाला आधार कार्ड इश्यू करायचे असेल तर सर्च ऑप्शन मध्ये आधार कार्ड असे टाइप करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला Consent/संमती प्रोव्हाइड करायचे आहे. त्यासाठी I Agree या ऑप्शन वर क्लिक करा.

Digilocker Document Add Kase Karayche Step 2

स्टेप 3: मित्रांनो, आधार कार्ड ला रेजिस्टर असलेल्या तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचे आधार कार्ड इश्यू होऊन जाईल.

Digilocker Document Add Kase Karayche Step 3

मित्रांनो, My issue documents या ऑप्शन मध्ये आधार कार्ड च्या समोर दिलेल्या तीन डॉट्स वर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचे आधार कार्ड पाहू शकता. तुम्ही त्याला शेअर करू शकता, आणि pdf मध्ये देखील पाहू शकता. तसेच डाउनलोड ही करू शकता. तसेच आधार कार्ड वर क्लिक केल्यास तुम्ही तुमचे डिजीलॉकर चे आधार कार्ड पाहू शकता.

पुढच्या वेळेस डिजीलॉकरला जोडलेले सर्व डॉक्युमेंट पाहण्यासाठी अँपच्या होम पेज वर खालच्या बाजूला असलेल्या Issued बटन वर क्लिक करा आणि आत्ता तुम्हाला तुमच्या डिजीलॉकर अँपला जोडलेल्या सर्व डिक्युमेन्ट ची लिस्ट दिसेल.

Digilocker Document Add Kase Karayche Step 4

डिजीलॉकर मध्ये पॅन कार्ड ऍड कसे करायचे

स्टेप 1: मित्रांनो, याच प्रकारे जर तुम्हाला पॅन कार्ड इश्यू करायचे असेल तर Search for documents क्लिक करून सर्च ऑप्शन मध्ये पॅन कार्ड (PAN Card) सर्च करायचे आहे.

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड वर असलेले नाव टाकायचे आहे, तसेच पॅन नंबर देखील टाकायचा आहे. व नंतर Get Document वर क्लिक करायचे आहे. व लगेच तुमचे पॅन कार्ड ऍड होऊन जाईल. व तुम्ही तुमचे पॅन कार्ड डिजीलॉकर मध्ये पाहू शकता.

How to add your Driving License to Digilocker?

डिजीलॉकर मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे

मित्रांनो, तुम्हाला जर तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डिजीलॉकर ऍड करायचे असेल तर, डिजीलॉकर अँपच्या होम पेज Search ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला Driving License Maharashtra टाईप करायचे आहे. नंतर खाली आलेल्या ऑपशन मधून Motor Vehicle Department Maharashtra ऑपशन निवडायचा आहे. आत्ता नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा आहे, आणि नंतर Get Document बटन वर क्लिक करायचे आहे. आत्ता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स समोर Fetching असे लिहून येईल.

तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स काही वेळातच तुमच्या डिजीलॉकर अँप मध्ये ऍड होईल. ते बघण्यासाठी अँपच्या होम पेज वर खालच्या बाजूला असलेल्या Issued बटन वर क्लिक करा आणि आत्ता तुम्हाला तुमच्या डिजीलॉकर अँप ला जोडलेल्या सर्व डिक्युमेन्टची लिस्ट दिसेल.

डिजीलॉकर मध्ये मार्कशीट ऍड कसे करायचे

मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे मार्कशीट ऍड करायचे असेल तर तुम्हाला सर्च ऑप्शन मध्ये जाऊन तुमचे State Board सिलेक्ट करायचे आहे. व ज्या क्लास चे (उदा. 10, 12 वी) मार्कशीट इश्यू करायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे व नंतर काही माहिती भरायची आहे. जसे की जर तुम्ही 10 वी चे मार्कशीट इश्यू करत आहात. तर तुम्हाला त्याचे Year of Passing, Seat Number, Total Marks Obtained टाकून नंतर Session सिलेक्ट करायचे आहे. म्हणजे मार्च किंवा ऑक्टोबर. व त्या नंतर Get Document ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व लगेच तुमचे मार्कशीट ऍड होऊन जाईल व तुम्ही ते मार्कशीट डिजीलॉकर मध्ये पाहू शकता.

डिजीलॉकर चे फायदे व तोटे काय आहेत?

  1. मित्रांनो, डिजीलॉकर चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यात आपली डॉक्युमेंट्स एकदम सुरक्षित राहतात.
  2. तसेच डिजीलॉकर वरील सर्व कागदपत्रे ही सरकारी व गैर सरकारी संस्था मध्ये वॅलीड असतात.
  3. डिजीलॉकर वापरणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे.
  4. मित्रांनो, DigiLocker वरून तुम्ही तुमचे डॉक्युमेंटचे डिजिटल फॉरमॅट कुठेही व कधीही पाहू शकता, डाउनलोड करू शकता आणि शेअर देखील करू शकता.
  5. याशिवाय कधी कधी ओरिजिनल डॉक्युमेंट्स वर पाणी शाई किंवा इतर काही सांडल्यास ते खराब होतात. पण तुम्ही जर डिजीलॉकर मध्ये डॉक्युमेंट्स ऍड केल्यास या सर्व त्रासांपासून तुमची सुटका नक्कीच होईल.
  6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडी चालवताना तुम्हाला गाडीची कागदपत्रं किंवा RC, लायसन्स ठेवण्याची गरज नाही. कारण डिजीलॉकर वरून तुम्ही तुमचा डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स, RC पोलिसांना दाखवू शकता.

डिजिलॉकरचे तोटे काय आहेत

मित्रांनो, प्रत्येक गोष्टी चे जसे फायदे असतात तसेच तोटे पण असतात. असे अनेक मोबाईल अँप देखील आहेत जे तुमच्या कडून अनावश्यक माहिती गोळा करतात. पण डिजिलॉकर मध्ये असे काहीही नाही. कारण डिजिलॉकर हे एक सरकारी अँप आहे, त्यामुळे ते तुम्हाला खूप मदत करते आणि डिजिलॉकर हे अँप वापरण्यात कोणतीही हानी किंवा तोटे नाही. फक्त तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे.

डिजिलॉकर किती सुरक्षित आहे?

मित्रांनो, आपले बँक खाते जितके सुरक्षित असते तितकेच डिजिलॉकर देखील सुरक्षित आहे. कारण डिजीलॉकर मध्ये, आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावा लागतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही डिजिलॉकर वरून तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंट मध्ये प्रवेश कराल, तेव्हा तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड द्वारे लॉग इन करावे लागेल. व नंतरच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स युझ करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण डिजिलॉकर अकाउंट कसे बनवायचे, त्यात डॉक्युमेंट्स ऍड कसे करायचे, त्याचे फायदे व तोटे या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

Tags: Digilocker Mhanje Kay, Digilocker Var Account Kase Banavayche, Digilocker Var Marksheet Add Kashi Karaychi, Digilocker Var 10 Marksheet Add kashi Karaychi, Digilocker Var 12 Marksheet Add Kashi Karaychi, Digilocker Var Driving Licence Add kase Karayche, Digilocker Var RC Book Add Kase Karayche

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद