ZEE5 सबस्क्रिप्शन प्लॅन्स 2023: किंमत, फायदे, ऑफर्स | ZEE5 Subscription Plans 2023
- ZEE5 सबस्क्रिप्शन प्लॅन्स
- ZEE5 सबस्क्रिप्शन प्लॅन: किंमत, फायदे, वैधता
- ZEE5 वरील लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही शो
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, आज आपण ZEE5 च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत. यात आपण प्लॅन ची किंमत, त्याचे फायदे, ऑफर्स, वैधता या सर्वांबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, ZEE5 हे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पैकी एक प्लॅटफॉर्म आहे. ऑन-डिमांड व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा ही एस्सेल ग्रुपच्या मालकीची असून 2018 मध्ये भारतात सादर करण्यात आली. तेव्हा पासून zee5 प्लॅटफॉर्मने अनेक मनोरंजक चित्रपट, टीव्ही शो आणि बऱ्याच काही गोष्टी प्रदान केल्या आहेत. OTT प्लॅटफॉर्म, Android, iOS, Amazon Fire TV, Android TV यांसारख्या सर्व प्रमुख प्लॅटफॉर्म वर ZEE5 उपलब्ध आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना फ्री आणि प्रिमियम कन्टेन्ट ऑफर करते.
![ZEE5 plan information in marathi](https://marathidiary.com/wp-content/uploads/2023/04/ZEE5-plan-information-in-marathi.jpeg)
ज्या ग्राहकांना या सर्व अनुभवांचा आनंद घ्यायचा आहे ते ZEE5 प्रीमियम सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. सबस्क्रिप्शन मॉडेल झी 5 च्या ग्राहकांना अनेक मनोरंजक फायदे ऑफर करते. ज्यात सुरुवातीला, सदस्य सर्व Zee5 ओरिजिनल आणि एक्सकल्युझिव्ह, तसेच अनेक ब्लॉकबस्टर मूव्हीज, सर्व ALT बालाजी शो, जिंदगी टीव्ही शो, किड्स, लाइव्ह टीव्ही आणि टेलिकास्ट पूर्वी टीव्ही शो इत्यादी गोष्टी पाहू शकतात. याशिवाय झी 5 ही व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा आपल्या ग्राहकांना चक्क 12 भाषां मध्ये बरेचशे कन्टेन्ट ऑफर करते. ज्यात ओरिजिनल्स, शो, मुव्हीज, म्युझिक यांसारख्यांचा समावेश आहे. काही शो हे झी5 च्या ग्राहकांसाठी अगदी विनामूल्य आहेत तर काही प्रिमियम कन्टेन्ट हे पेड आहेत. तसेच अलीकडेच ZEE5 च्या प्रिमियम प्लॅनमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या प्लॅनबद्दल पुढे आपण सविस्तर पणे चर्चा करणारच आहोत. तसेच या प्लॅनची किंमत किती आहे, त्यांची वैधता, व त्यांचे फायदे काय आहेत या अश्या सर्व गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही ही जर झी5 चे सबस्क्रिप्शन प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
ZEE5 चे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स
मित्रांनो, झी 5 चे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आता तीन प्रकार मध्ये उपलब्ध आहेत. ज्यांचे नावे Mobile (मोबाईल), Premium HD (प्रीमियम HD) आणि Premium 4k (प्रिमियम 4k) असे आहेत. या प्लॅन्स मध्ये झी5 च्या सर्व ओरिजिनल्स आणि एक्सकल्युझिव्ह, ब्लॉकबस्टर मूव्हीज, ALT बालाजी शो, जिंदगी टीव्ही शो, किड्स, लाईव्ह टीव्ही, आणि टीव्ही शोज बिफॉर द टेलिकास्ट म्हणजेच टेलिकास्टपूर्वी टीव्ही शो चा समावेश आहे. तसेच ZEE5 च्या हे प्लॅन्स स्क्रीन, रिझोल्युशन, आणि किंमतीच्या बाबतीत एकमेकापासून भिन्न आहेत. प्रत्येक प्लॅनची किंमत किती आहे, ते आपण जाणून घेऊ या.
![ZEE5 subscription plans mahiti](https://marathidiary.com/wp-content/uploads/2023/04/ZEE5-subscription-plans-mahiti.jpg)
499 रुपयांचा ZEE5 मोबाईल प्लॅन ( Rs 499 Zee5 Mobile Plan)
मित्रांनो, ZEE5 चा सर्वात स्वस्त कोणता सबस्क्रिप्शन प्लॅन असेल तर तो 499 रुपयांचा झी5 मोबाईल प्लॅन. नावाप्रमाणेच या प्लॅन ची किमत ही रू. 499 इतकं असून त्याची वैधता 12 महिन्यांची दिली गेली आहे. हा प्लॅन एक मोबाईलच्या स्क्रीन ला HD (720p) च्या कमाल व्हिडीओ क्वालिटी आउटपुटला सपोर्ट करतो. याशिवाय या प्लॅन मध्ये तुम्ही स्टिरीओ साउंड चा आनंद घेऊ शकणार आहात.
हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन एकट्या माणसासाठी जो एकाच मोबाइल वर झी5 बघणार आहे त्यासाठी योग्य राहील.
799 रुपयांचा ZEE5 प्रिमियम HD प्लॅन (Rs 799 ZEE5 Premium HD Plan)
मित्रांनो, या प्लॅन्स ची वार्षिक फी रू 999 इतकी आहे. परंतु मर्यादित कालावधीच्या ऑफर सह हा प्लॅन आता रू 799 मध्ये उपलब्ध आहे. यात ही नावाप्रमाणेच या प्लॅन ची किंमत रू 799 असून याची वैधता 12 महिन्यांची देण्यात आली आहे. तसेच या प्लॅन मध्ये जास्तीत जास्त व्हिडीओ क्वालिटी ही FHD (1080p) इतकी मिळत असून एकावेळी ते दोन स्क्रीन (मोबाईल, TV, लॅपटॉप) ला सपोर्ट करते. याशिवाय या प्लॅन मध्ये तुम्ही डॉल्बी 5.1 साउंड चा आनंद घेऊ शकणार आहात.
हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन थोट्या कुटुंबासाठी जे एकावेळी 2 (मोबाईल, TV, लॅपटॉप) डिव्हाईस वर झी5 बघणार आहे त्यासाठी योग्य राहील. आणि ज्या लोकांना व्हिडीओ हाय क्वालिटी मध्ये बघणे आवडते त्यांच्यासाठी.
1499 रुपयांचा ZEE5 प्रिमियम 4K प्लॅन (Rs 1499 ZEE5 Premium 4K Plan)
मित्रांनो, नावात सांगितल्या प्रमाणे या प्लॅन ची किंमत ही रू 1499 इतकी असून त्याची वैधता 12 महिन्यांची देण्यात आली आहे. आणि या प्लॅन मध्ये जास्तीत जास्त व्हिडीओ क्वालिटी ही UHD (2160p) इतकी मिळत असून एकावेळी ते चार स्क्रीन (मोबाईल, TV, लॅपटॉप) ला सपोर्ट करते. याशिवाय या प्लॅन मध्ये तुम्ही डॉल्बी ऍटमॉस साउंड चा आनंद घेऊ शकणार आहात.
हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन मोठ्या कुटुंबासाठी जे एकावेळी 4 (मोबाईल, TV, लॅपटॉप) डिव्हाईस वर झी5 बघणार आहे त्यासाठी योग्य राहील. आणि ज्या लोकांकडे मोठा स्मार्ट टीव्ही आहे आणि ज्यांना हाय क्वालिटी मध्ये व्हिडीओ बघणे आवडते त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे.
ZEE5 सबस्क्रिप्शन प्लॅन: किंमत, फायदे, वैधता
ZEE5 सबस्क्रिप्शन प्लॅन्स | प्लॅन किंमत | फायदे |
---|---|---|
मोबाईल प्लॅन | 499 रु. | – 2800+ ब्लॉकबस्टर चित्रपट – 150+ वेब सिरीज – टीव्ही शो, जाहिरातमुक्त – ZEE5 आणि Alt Balaji कन्टेन्ट – 720p रिझोल्यूशन – 1 मोबाईल स्क्रीन |
प्रिमियम HD प्लॅन | 799 रु. | – 2800+ ब्लॉकबस्टर चित्रपट – 150+ वेब सिरीज – टीव्ही शो, जाहिरातमुक्त – ZEE5 आणि Alt Balaji कन्टेन्ट – 1080p रिझोल्यूशन – 2 स्क्रीन (मोबाईल, TV, लॅपटॉप) |
प्रिमियम 4K प्लॅन | 1499 रु. | – 2800+ ब्लॉकबस्टर चित्रपट – 150+ वेब सिरीज – टीव्ही शो, जाहिरातमुक्त – ZEE5 आणि Alt Balaji कन्टेन्ट – 1080p रिझोल्यूशन – 4 स्क्रीन (मोबाईल, TV, लॅपटॉप) |
ZEE5 वरील लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही शो
- RRR/आरआरआर
- The Kashmir Files/काश्मीर फाइल्स
- Kedarnath/केदारनाथ
- Forensic/फॉरेन्सिक
- Spider-Man: No Way Home/स्पायडर-मॅन: नो वे होम
- Valimai/वालीमाई
- Aranmanai 3/अरमानई 3
- Attack: Part 1/अटॅक: पार्ट 1
- Silence… Can You Hear It?/साइलन्स… कॅन यु हिअर इट?
- Rashmi Rocket/रश्मी रॉकेट
- Garuda Gamana Vrishabha Vahana/गरुड गमना वृषभ वाहना
- Bob Biswas/बॉब बिस्वास
- Ardh/अर्ध
- Jersey/जर्सी
- Dharmaveer/धर्मवीर
- Zombivili/झोंबिवली
- Pandu/पांडू
- Jhund/झुंड
- Chintu Ka Birthday/चिंटू का बर्थडे
- Taj: Divided by Blood/ताज: डिवीडेंड बाय ब्लड
- Hotel Mumbai/हॉटेल मुंबई
- Atomic Blonde/ऍटोमिक ब्लँडे
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण झी5 च्या विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल जाणून घेतले. हे प्लॅन्स घेऊन तुम्ही लोकप्रिय वेब सिरीज, चित्रपट तसेच टीव्ही शो, किड्स शो, वगैरे गोष्टी ZEE5 वर पाहू शकता व त्यांचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।
FAQ
ZEE5 OTT कन्टेन्ट कोण कोणत्या भाषेत उपलब्ध आहेत?
मित्रांनो, ZEE5 अनेक भाषांमध्ये मनोरंजक कन्टेन्ट ऑफर करते. त्यापैकी सर्वात लोकप्रिय भाषा म्हणजे. इंग्रजी, हिंदी,बंगाली,मल्याळम,तमिळ, तेलुगु, कन्नड, मराठी, ओरिया, भोजपुरी, गुजराती, पंजाबी या आहेत.
ZEE5 मोफत पाहता येऊ शकते का?
मित्रांनो, तुम्ही ZEE5 वर काही गोष्टी तुम्ही कोणत्याही पेड प्लॅन शिवाय पाहू शकता. जसे की एखाद्या नवीन सीझनचा पहिले भाग, मुलांसाठी काही मनोरंजन शो, किंवा मागच्या वर्षातील काही आयकॉनिक टीव्ही शो इत्यादी.
ZEE5 डॉल्बी ऍटमॉस ला सपोर्ट करते का?
मित्रांनो, झी5 डॉल्बी ऍटमॉस ला सपोर्ट करण्यासाठी तुमच्या कडे 4K किंवा डॉल्बी ऍटमॉस ला सपोर्ट करणारा टीव्ही असायला हवा.