दीर्घकाळ टिकणाऱ्या बेस्ट ट्रॉली बॅग्स | Best Trolley Bags In India
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण भारतातील बेस्ट ट्रॉली बॅग्स कोणते आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, सुट्ट्यांच्या दिवसात बरेच जण फिरायला जाण्याचे प्लॅन्स करतात. त्यासाठी आधी पासूनच आपण तयारी करून ठेवतो. या तयारीत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बॅग. कुठेही जायचे असेल तर बॅग ही लागतेच. त्यासाठी आपण आधीच बॅग बघतो जी चांगल्या क्वालिटीची असेल, योग्य आकाराची व वजनाची असेल, तसेच त्यात भरपूर सामान बसेल का, ती सुरक्षित आहे का, तसेच बॅगला उचलणं किंवा सांभाळणं सुद्धा सोपं आणि सोयीचं असायला हवं. त्यासाठी तुमच्याकडे ट्रॉली बॅग ही असायलाच हवी. पण ट्रॉली बॅगच का घ्यावी, त्याचा उपयोग काय, ट्रॉली बॅग घेताना कोणत्या गोष्टी तपासून पहाव्यात, कोणत्या ब्रँडची ट्रॉली बॅग घ्यावी, अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
ट्रॉली बॅग का घ्यावी व त्याचे फायदे काय आहेत
मित्रांनो, चांगल्या क्वालिटी ची ट्रॉली बॅग ही दीर्घकाळ टिकते. तसेच या ट्रॉली बॅग्स वापरण्यास सोप्या असतात. अगदी वृद्ध व्यक्ती सुद्धा ही बॅग कॅरी करू शकतात. यामध्ये दिलेल्या व्हील्समुळे ट्रॉली बॅग्स इझिली मूव्ह करता येतात. या ट्रॉली बॅग्स वेग-वेगळ्या साईझ मध्ये, कलर मध्ये व वेग-वेगळ्या डिझाइन मध्ये सुद्धा मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. तसेच लाईट वेट बॉडी असणाऱ्या या ट्रॉली बॅग वापरण्यास हलक्या, मजबूत आणि टिकाऊ असतात. बऱ्याच ट्रॉली बॅग्स मध्ये तुम्हाला सामान ठेवण्यासाठी कम्पार्टमेंट किंवा पाऊच सुद्धा बघायला मिळतात. तसेच या बॅग्स वॉटर रेझिस्टंट, स्क्रॅच रेझिस्टंट असतात. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने यात कॉम्बिनेशन लॉक किंवा टीएसए लॉक सिस्टिम पण देण्यात येते. म्हणून जर तुम्ही प्रवासासाठी एखादी बॅग घेण्याचा विचार करत असाल तर ट्रॉली बॅग चा विचार नक्की करा.
भारतातील सर्वात चांगले ट्रॉली बॅग
आता भारतातील सर्वात चांगले ट्रॉली बॅग कोणते आहेत त्या बद्दल जाणून घेऊ या
Skybags Cardiff Polyester ट्रॉली बॅग
मित्रांनो, स्कायबॅगच्या या ट्रॉली बॅग्स खूप कार्यक्षम असतात. या ट्रॉली बॅगची बिल्ड क्वालिटी ही पॉंलीस्टर (Polyster) ची बनलेली आहे. त्यामुळे तुम्ही या बॅग मध्ये ऍडिशनल म्हणजे च जास्तीचे सामान ही भरू शकता. या बॅगमध्ये तुम्हाला 39 लिटरची कॅपॅसिटी मिळते. तसेच या बॅग चे वजन हे अंदाजे 2330 ग्रॅम इतके असू शकते. म्हणजे वजनाने हलके असल्यामुळे तुम्ही ही बॅग इझिली कॅरी करू शकता व हलवू शकता.
याशिवाय या ट्रॉली बॅगमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन लॉक सिस्टीम बघायला मिळते. जे एक सुरक्षित लॉक सिस्टीम आहे. या ट्रॉली बॅगमध्ये तुम्हाला दोन व्हील्स दिले गेले आहेत. तसेच या ट्रॉली बॅग वर तुम्हाला तीन वर्षांची वॉरंटी मिळते. आणि ऍमेझॉन वर ही ट्रॉली बॅग तुम्हाला फक्त 1500 रुपये पर्यंत मिळू शकते.
Aristocrat Sienna Polycarbonate ट्रॉली बॅग
मित्रांनो, तुम्हाला जर हार्ड मटेरिअलने बनलेले ट्रॉली बॅग हवे असेल तर Aristocrat चे हे मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. कारण ही ट्रॉली बॅग पॉली कार्बोनेट मटेरियलची म्हणजेच हार्ड प्लास्टिक मटेरिअल ने बनलेली आहे. त्यामुळे ही बॅग खूप मजबूत व टिकाऊ बनते. तसेच या ट्रॉली बॅगमध्ये तुमचे समान पण सुरक्षित राहते. या ट्रॉली बॅगची लॉकिंग सिस्टीम बघायची झाली तर यात तुम्हाला नंबर लॉक तसेच कॉम्बिनेशन लॉकची सुविधा पण देण्यात आली आहे. या ट्रॉली बॅगची कॅपॅसिटी पण 30 लिटर पर्यंत मिळते.
शिवाय या ट्रॉली बॅगचे वजन हे फक्त 2.5 किलो पर्यंत असू शकते. त्यामुळे ही बॅग तुम्ही सामाना सोबत सहज मूव्ह करू शकता. तसेच या ट्रॉली बॅगला तुम्हाला चार व्हील्स मिळतात जे तुमच्या प्रवास आणखी सोयिस्कर बनवतात. या ट्रॉली बॅग वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते आणि याची किंमत बघायची झाली तर ऍमेझॉन वर ही बॅग तुम्हाला जवळ पास 2500 रुपये पर्यंत मिळू शकते.
Safari Ray Polycarbonate ट्रॉली बॅग
मित्रांनो, ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने ही ट्रॉली बॅग खूप सपोरटीव्ह (Supportive) आणि सोयीस्कर आहे. तसेच अतिशय चांगल्या क्वालिटीची ही बॅग बनलेली आहे. म्हणजेच ही ट्रॉली बॅग पॉली कार्बोनेट सारख्या हार्ड मटेरिअल ची बनलेली आहे. त्यामुळे लॉंग लास्टिंग आहे, वॉटर प्रूफ आहे. सफारीची ही ट्रॉली बॅग तुम्हाला जवळ जवळ 58 लिटर कॅपॅसिटी ची मिळते म्हणजेच या ट्रॉली बॅग चा आतील भाग हा खूप प्रशस्त आहे. त्यामुळे सामान ठेवायला पुरेशी जागा मिळते. तसेच या ट्रॉली बॅगचे वजन हे अंदाजे 3.5 किलो पर्यंत असू शकते. यामध्ये ही तुम्हाला चांगली लॉकिंग सिस्टीम बघायला मिळते.
शिवाय यात तुम्हाला चार व्हील्सचा सपोर्ट मिळतो. त्यामुळे ही बॅग इझिली मूव्ह होते. या ट्रॉली बॅग वर तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते आणि ऍमेझॉन वर याची किंमत ही अंदाजे 3600 रुपये पर्यंत असू शकते. या ट्रॉली बॅगची डिझाइन ही खूप स्टायलिश आणि आकर्षक आहे. याचे हँडल ही चांगल्या क्वालिटी चे आहे. सफारीच्या या मजबूत आणि टिकाऊ पणामुळे ही ट्रॉली बॅग लोकांची पसंतीची बॅग बनली आहे.
American Tourister Ivy Polypropylene ट्रॉली बॅग
मित्रांनो, या ट्रॉली बॅगची सर्वात चांगली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या बॅग मध्ये तुम्हाला टीएसए लॉक सिस्टीम देण्यात आली आहे. जी एक सुरक्षित लॉक सिस्टीम आहे. तसेच ही ट्रॉली बॅगमध्ये तुम्हाला पॉली प्रॉपायलीन (Polypropylene) मटेरिअलची बिल्ड क्वालिटी बघायला मिळते. जी एक हार्ड मटेरिअलची असून याच्या सरफेस वर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅचेस पडत नाहीत. त्यामुळे ही टिकाऊ ट्रॉली बॅग वापरण्यास एक उत्तम पर्याय आहे. याची कॅपॅसिटी पण जवळ जवळ 20 किलो असून या ट्रॉली बॅग चे वजन हे अंदाजे 3.5 किलो पर्यंत असू शकते. या ट्रॉली बॅग तुम्हाला चार व्हील्स मिळतात जे 360° मध्ये रोटेट होतात.
या बॅगमध्ये तुम्हाला कम्पार्टमेंट सुद्धा दिले गेले आहेत. तसेच या ट्रॉली बॅग वर तुम्हाला तीन वर्षांची वॉरंटी मिळते आणि याची किंमत बघायची झाली तर ही ट्रॉली बॅग तुम्हाला 3800 ते 4000 रुपये पर्यंत ऍमेझॉन वर मिळू शकते. याची उंची पण 28 cm पर्यंत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर एका चांगल्या ब्रँडची ट्रॉली बॅग शोधत असाल तर अमेरिकन टुरिस्टर ची ही ट्रॉली बॅग तुमच्यासाठी एक खूप चांगला पर्याय आहे.
Skybags Trooper Polycarbonate ट्रॉली बॅग्स
मित्रांनो, स्कायबॅग ट्रूपरची ही ट्रॉली बॅग एक लोकप्रिय असे मॉडेल आहे. या ट्रॉली बॅगमध्ये तुम्हाला 97 लिटर ची कॅपॅसिटी बघायला मिळते आणि याचे वजन हे 3.9 किलो पर्यंत असू शकते. तसेच या बॅगची हाईट ही 75 cm पर्यंत दिली आहे. या ट्रॉली बॅगची बिल्ड क्वालिटी चांगली असून ती पॉली कार्बोनेट सारख्या हार्ड मटेरिअलची बनलेली आहे. तसेच तुमच्या सामानाला सुरक्षित ठेवण्यासाठी यात तुम्हाला कॉम्बिनेशन लॉक सिस्टीम देण्यात आली आहे.
तसेच तुमच्या प्रवासाला सोपे आणि इझी बनवण्यासाठी यात तुम्हाला चार व्हील्स देण्यात आले आहे जे 360 डिग्री मध्ये रोटेट होतात. या ट्रॉली बॅगवर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळत असून याची किंमत ही अंदाजे 5000 रुपये पर्यंत असू शकते. याची डिझाइन खूप आकर्षक आहे, तसेच यावर तुम्हाला निळ्या आणि पांढऱ्या रंगांचे शेड्स दिले आहेत जे या बॅग ला एक वेगळा व क्लासि लुक देते.
ट्रॉली बॅग खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
1) वजन – मित्रांनो, तुमच्या ट्रॉली बॅग चे वजन जितके कमी असेल तितकेच बॅग कॅरी करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. ट्रॉली बॅग घेताना त्याचे वजन शक्यतो तीन किलो पर्यंत असावे. कारण बॅगच्या वजना सोबतच तुमच्या कपड्यांचे व सामानाचे पण वजन त्यात ऍड होते. म्हणून बॅग कॅरी करायला काही त्रास व्हायला नको म्हणून ट्रॉली बॅग खरेदी करताना त्याचे वजन शक्यतो कमीच असावे.
2) ट्रॉली बॅग ची साईझ आणि डायमेंशन्स – मित्रांनो, ट्रॉली बॅग घेताना त्याची साईझ वगैरे चेक करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर जास्त दिवसांसाठी बाहेर जाणार असाल तर तुम्हाला सामानाच्या दृष्टीने मोठया साईझची बॅग लागेल. पण जर तुम्ही एअर ट्रॅव्हलिंग करणार असाल तर तुम्हाला एका पर्टीक्युलर साईझचीच बॅग लागते. तसेच ट्रॉली बॅग या वेग-वेगळ्या साईझ मध्ये बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जर जास्त करून एअर ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्या हिशोबाने तुम्हाला तुमची ट्रॉली बॅग निवडायची आहे.
3) स्टोरेज किंवा कॅपॅसिटी – मित्रांनो , कोणतीही ट्रॉली बॅग घेताना त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे ते बघणे खूप महत्त्वाचे आहे. काही ट्रॉली बॅगमध्ये तुम्हाला कम्पार्टमेंट सुद्धा दिले जातात. जे सामान ठेवण्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार व सामन नुसार तुम्हाला योग्य त्या स्टोरेज कॅपॅसिटी ची ट्रॉली बॅग निवडायची आहे.
4) ट्रॉली बॅग चे व्हील्स आणि हँडल्स – मित्रांनो, ट्रॉली बॅग सोबतचा तुमचा प्रवास सोपा करण्यासाठी तुम्हाला हे फिचर या बॅग मध्ये दिलेले असतात. ट्रॉली बॅग घेताना त्याचे व्हील्स चांगल्या क्वालिटी चे आहेत की नाही ते चेक करणे महत्त्वाचे असते. तसेच चार व्हील्स चे बॅग हे कॅरी करायला जास्त चांगले असतात. शिवाय चार व्हील्स असले की बॅग खेचायला जास्त मेहनत करावी लागत नाही व ती इझिली मूव्ह होते. या शिवाय ट्रॉली बॅग चे हँडल ही चांगल्या क्वालिटी चे व चांगल्या मटेरियल चे बनलेले असावे जेणे करून ते जास्त काळ टिकेल.
5) ट्रॉली बॅग बिल्ड क्वालिटी – मित्रांनो, ट्रॉली बॅग घेताना एक गोष्ट आवर्जून पहावी ती म्हणजे तुम्ही निवडलेल्या ट्रॉली बॅगची बिल्ड क्वालिटी. तुमच्या बॅग ची बिल्ड क्वालिटी ही चांगल्या मटेरियल ची बनलेली असावी. शक्यतो पॉलीस्टर म्हणजे फॅब्रिक क्वालिटीची किंवा पॉलीकार्बोनेट जी हार्ड प्लास्टिक मटेरियलची बनलेली असते. पॉलीकार्बोनेट ने बनलेल्या ट्रोली बॅग्स या कुठल्याही वातावरणात तुमच्या सामानाला डॅमेज होऊ देत नाही व सुरक्षित ठेवते. तर फॅब्रिक बेस असलेले बॅग्स मध्ये काही पर्टीक्युलर वातावरणात तुमचे सामान डॅमेज होऊ शकते. पण या फॅब्रिक बेस असलेल्या बॅग चा फायदा म्हणजे तुम्ही यात जास्तीचे सामान ऍडजस्ट करू शकता. पण पॉलिकार्बोनेट मटेरियलच्या बॅग मध्ये तुम्ही कुठलेही जास्तीचे सामान ऍडजस्ट करू शकणार नाही कारण ते हार्ड प्लास्टिक मटेरिअल चे बनलेले असते. त्यामुळे ट्रॉली बॅग खरेदी करताना त्याची बिल्ड क्वालिटी नक्की तपासून बघा.
6) सेक्युरिटी – मित्रांनो, कोणत्याही ट्रॉली बॅगमध्ये सेक्युरिटी सिस्टीम ही असतेच. शक्यतो ट्रॉली बॅग मध्ये तीन प्रकारचे लॉकिंग सिस्टीम बघायला मिळतात. पहिल्या प्रकारात तुम्हला ट्रॅडिशनल लॉक मिळते. जे तुम्हाला एका कुलूपाच्या मदतीने लॉक करावे लागते. पण अश्या प्रकारची लॉक सिस्टीम लवकर खराब पण होते आणि इझिली ब्रेक पण करता येते. त्यामुळे या प्रकारचे लॉक सिस्टीम असलेले बॅग शक्यतो घेऊ नये.
लॉक सिस्टीम चा दुसरा प्रकार म्हणजे कॉम्बिनेशन लॉक. ही लॉक सिस्टीम तुम्हाला ट्रॉली बॅग मध्ये इन बिल्ड मिळते. यात फक्त तुम्हाला दोन्ही चेन ला यात लॉक करायचे असते. याची चावी पण तुम्हाला बॅग मध्ये दिली जाते. त्याच्या सहाय्याने तुम्ही परत अनलॉक जर शकता.
लॉक सिस्टीमचा तिसरा प्रकार म्हणजे टीएसए लॉक. ही लॉक सिस्टीम पण कॉम्बिनेशन लॉक प्रमाणेच असते. पण यात तुम्हाला एक ऍडिशनल फिचर दिले जाते. जर तुम्ही एअर ट्रॅव्हलिंग करत असाल आणि एअर ऑथोरिटीला जर तुमची बॅग चेक करायची असेल आणि जर तुमच्या बॅग मध्ये टीएसए लॉक असेल तर तुमची बॅग न तोडता ते एका पर्टीक्युलर चावी ने उघडून तुमचे सामान चेक करू शकता. ही एक युनिव्हर्सल key असते. जी फक्त टीएसए लॉक असणाऱ्या बॅगसाठीच वापरली जाते. आणि ती फक्त एअर ऑथोरिटी च वापरू शकता. त्यामुळे ट्रॉली बॅग घेताना तुम्ही शक्यतो टीएसए लॉक सिस्टीम असलेलीच बॅग घ्या.
7) वॉरंटी व किंमत – तुम्ही जी ट्रॉली बॅग घेत आहात त्याचा वॉरंटी पिरियड किती आहे ते एकदा नक्की चेक करा. तसेच तुम्ही निवडलेली ट्रॉली बॅग ही तुमच्या बजेट मध्ये बसणारी हवी.
ट्रॉली बॅग्स साफ व स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स
मित्रांनो, ट्रॉली बॅग घेताना आपण ती चांगल्या क्वालिटी ची बघतो आणि त्याचे होतील तेवढे पैसे ही देतो कारण ती जास्त काळ पर्यंत टिकावी. पण तुम्हाला तुमची ट्रॉली बॅग जास्त काळ टिकवायची असेल तर तिला साफ व स्वच्छ ठेवणे ही तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकता.
- मित्रांनो, प्रवास वरून आल्या वर तुमची बॅग साफ करून ठेवा. त्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मीठ यांचे मिश्रण करून एक सुती कपडा त्या मिश्रणात बुडवून त्याने तुमची बॅग आतून स्वच्छ पुसून घ्या. नंतर पुन्हा एका कोरड्या कपड्याने पुसून घ्या व थोडा वेळ हवेशीर ठेवा. असे केल्याने बॅग मधून वास ही येणार नाही आणि तुमची बॅग पहिल्या सारखी स्वच्छ होईल.
- तुमच्या ट्रॉली बॅग ला बाहेरून साफ करण्यासाठी तुम्ही पाणी आणि डिटर्जंटचा वापर ही करू शकता.
- तुमच्या बॅगवर जर कुठला डाग लागला असेल तर तुम्ही बेकिंग सोडा चा वापर करू शकता. बेकिंग सोडा ने कुठल्याही डाग लगेच साफ होतो. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा मध्ये एक चमचा टूथपेस्ट किंवा नेलपेंट रिमूव्हर टाकून त्याचे मिश्रण करा व जिथे डाग लागला आहे ति जागा साफ करू शकता.
- याशिवाय ट्रॉली बॅग चे हँडल आणि व्हील्स याची देखभाल घेणे ही तेवढेच महत्वाचे आहे. प्रवासातून आल्या वर बॅग चे हँडल आणि व्हील्स स्वच्छ धुवून घ्या. तसेच जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर स्क्रू तपासून बघा व ते व्यवस्थित करून घ्या. तसेच कधीही प्रवासाला जाण्याआधी बॅग व त्याचे हँडल आणि व्हील्स नीट चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रवासात काही प्रॉब्लेम येणार नाही.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ट्रॉली बॅग बद्दल बरीच शी माहिती जाणून घेतली तसेच भारतातील बेस्ट ट्रॉली बॅग कोणते आहेत ते ही बघितले. आशा आहे की तुम्हाला आजचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच तुम्हाला किंवा तुमच्या मित्र-मंडळींना ही हा लेख नक्की शेअर करा. जेणे करून ट्रॉली बॅग घेताना त्यांना याचा उपयोग होईल. धन्यवाद।