कार परफ्यूम/एअर फ्रेशनर: कोणता घ्यावा, चांगले एअर फ्रेशनर कोणते आहेत ?, एअर फ्रेशनरचे प्रकार कोणते| Car Air Freshener
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात चांगले कार एअर फ्रेशनर किंवा कार परफ्यूम कोण-कोणते आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. तसेच कार एअर फ्रेशनर खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात त्याबद्दल ही माहिती सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो, सकाळी फ्रेश मुडमध्ये कामावर जाताना तसेच कामावरून घरी येताना किंवा कधी पिकनिकला किंवा एखाद्या लॉंग ड्राईव्हला जाताना आपण कार वापरतो. पण जर तुमच्या या कार मधून कोंदट वास येत असेल तर अश्या कारमध्ये बसून प्रवास करणे प्रत्येकाला नकोसे वाटते. त्यामुळे तुम्हाला व तुमच्या सोबत बसणाऱ्या प्रवाशांना सुद्धा या वासाचा त्रास होऊ लागतो. अश्या वेळेस तुमच्या कडे कार एअर फ्रेशनर किंवा कार परफ्युम नक्कीच असायला हवे.
तुमच्या कारच्या ऍक्सेसरिझ पैकी एक कार परफ्युम सुद्धा आहे. त्यामुळे त्याकडे ही तुमचे लक्ष असलेच पाहिजे. त्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँडचा कार परफ्यूम खरेदी करणे आवश्यक आहे. तुमच्या कारमध्ये जर तुम्ही एअर फ्रेशनर किंवा कार परफ्युम वापरला तर तुमचा प्रवास हा दुर्गंधी मुक्त होऊन आरामदायी व आनंददायी नक्कीच होईल आणि तुम्हाला गाडीत बसायला ही छान वाटेल. पण कार परफ्यूम खरेदी करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, हे आपण या लेखात पाहणार आहोत.
कार परफ्यूम/एअर फ्रेशनर खरेदी करताना
चला तर मग कार परफ्युम खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात ते जाणून घेऊ या
परफ्युम चे प्रकार (Type of Perfume) – मित्रांनो, कोणताही कार परफ्युम खरेदी करताना मार्केट मध्ये कोण-कोणत्या प्रकारचे कार परफ्यूम उपलब्ध आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. सहसा कार परफ्यूम 1) लिक्विड बेस, 2) जेल बेस, 3) प्लग इन्स वगैरे प्रकार मध्ये येतात. यापैकी जास्त करून लिक्विड बेस कार परफ्युम जास्त प्रमाणात वापरला जातात. कारण या लिक्विड बेस परफ्यूमला आपण हवे तेव्हा ऑन व ऑफ करू शकतो.
कार परफ्यूमचा लुक – मित्रांनो, कार परफ्युम घेताना त्याचा लुक पण तितकाच चांगला असायला हवा. कारण कार परफ्युम पण तुमच्या कार ऍक्सेसरिझ पैकी एक आहे. त्यामुळे तुमच्या कारच्या इंटेरिअरला चांगला लुक देण्यासाठी कार परफ्युमचा लुक पण चांगला दिसायला हवा.
सुगंध किती वेळ टिकू शकतो (Longevity) – मित्रांनो, Longevity म्हणजे तुमचा कार परफ्युमचा सुगंध किती वेळ पर्यंत टिकून राहील ते पाहणे महत्वाचे आहे. जसे की आपण बॉडी परफ्युम खरेदी करताना तो किती लॉंग लास्टिंग आहे हे चेक करतो, त्याच प्रमाणे कार परफ्युम चा सुगंध पण लॉंग लास्टिंग म्हणजे बराच वेळ टिकणारा असायला हवा.
प्रमाण (Quantity) – मित्रांनो, कार परफ्युम खरेदी करताना त्याची क्वांटीटी किती आहे ते सुद्धा चेक करणे गरजेचे आहे. काही कार परफ्युम लिटर मध्ये येतात, तर काही ग्रॅम मध्ये येतात त्यामुळे त्यांची क्वांटीटी चेक करून घ्या.
वासाचा प्रकार (Fragrance Type) – मित्रांनो, कार परफ्युम घेताना त्याचा fragrance चा प्रकार कोणता आहे ते बघून घ्या. काही उग्र असतात तर काही लाईट स्मेल असलेले असतात. त्यामुळे तुमच्या गरजे नुसार व आवडी नुसार Fragrance Type निवडा.
रिफिल (Fragrance Refill) – मित्रांनो, कार परफ्युम निवडताना असा निवडा की जो संपल्यावर परत रिफिल करता येईल. ही सुविधा तुम्हाला फक्त लिक्विड बेस परफ्युम मध्ये भेटते. म्हणजे तुमच्या कार चे लिक्विड परफ्युम संपल्यावर तुम्ही त्याला परत रिफिल करू शकता. पण इतर प्रकारच्या परफ्युम मध्ये तुम्हाला रिफिल चा ऑपशन मिळत नाही.
सर्वात चांगले कार परफ्यूम/एअर फ्रेशनर
आता भारतातील सर्वात चांगले कार परफ्युम कोण कोणते आहेत ते जाणून घेऊ या
Ambi Pur कार एअर फ्रेशनर
मित्रांनो, Ambipure च्या कार एअर फ्रेशनर मध्ये तुम्हाला citrus चा fragrance अनुभवायला मिळतो. हे एक लिक्विड बेस कार एअर फ्रेशनर आहे. ज्याची कॅपॅसिटी 7.5 ml असून तुम्ही याला रिफिल पण करू शकता. याची डिझाइन पण एर्गोनॉमिकली व कॉम्पॅक्ट असून हे कार एअर फ्रेशनर खूप लाईटवेट आहे. हे कार एअर फ्रेशनर कोणत्याही कार मध्ये इझिली सेट होऊन जाते.
तसेच तुमच्या कारच्या इंटेरिअरच्या दृष्टीने सुद्धा हे कार एअर फ्रेशनर चांगले दिसेल. या कार एअर फ्रेशनर ची किंमत बघायची झाली तर ऍमेझॉन वर याची किंमत तुम्हाला 270 रुपयेच्या आसपास मिळू शकते.
Godrej aer twist कार एअर फ्रेशनर
मित्रांनो, गोदरेजच्या या कार एअर फ्रेशनर मध्ये तुम्हाला कस्तुरी सुगंध (smokey musk fragrance) अनुभवायला मिळते. हा एक जेल बेस कार परफ्युम आहे जो 45 ग्रॅम कॅपॅसिटी मध्ये येतो. तसेच यात तुम्हाला वेग वेगळे fragrance पण उपलब्ध आहेत. या कार एअर फ्रेशनर ची किंमत 320 रुपये च्या आसपास ऍमेझॉन वर मिळू शकते.
One Musk Organic कार परफ्युम
मित्रांनो, हे कार एअर परफ्युम हळू हळू सुगंधी वास सोडतो. याचा परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे. तसेच या मध्ये वेग वेगळे fragrance बघायला मिळतात. या शिवाय याचा फ्राग्रन्स हा musk बेस्ड आहे. तुमच्या कारसाठी हा एक natural fragrance देणारा उत्तम कार एअर फ्रेशनर आहे. पण हा कार परफ्युम पंधरा ते वीस दिवस पर्यंत चालतो. याची किंमत ऍमेझॉन वर तुम्हाला 325 रुपये पर्यंत मिळू शकते.
Areon Wish Gel कार एअर फ्रेशनर
मित्रांनो, areon चा हा कार एअर फ्रेशनर पाच ते आठ आठवड्यापर्यंत चालतो. हा एक जेल बेस्ड कार एअर फ्रेशनर आहे. या कार एअर फ्रेशनर चा लुक एवढा चांगला नाहीये, पण तुम्हाला लुक पेक्षा जर लॉंग लास्टिंग एअर फ्रेशनर हवा असेल तर हा कार परफ्युम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. याची ऍमेझॉन वर किंमत 327 रुपये च्या जवळ पास असू शकते.
Auto Pearl Airpro कार एअर फ्रेशनर
मित्रांनो, autopearl चे हे कार एअर फ्रेशनर ची डिझाइन खूप आकर्षक आणि युनिक आहे. अगदी एखाद्या माइक सारखे हे एअर फ्रेशनर दिसते. अनेक वेग वेगळ्या fragrance मध्ये हे कार एअर फ्रेशनर मार्केट मध्ये उपलब्ध आहे. फक्त longivity च्या दृष्टीने हे कार एअर फ्रेशनर जास्त चांगला नाही. याच्या fragrance स्टिक्स या रिप्लेसेबल दिल्या आहेत. याची किंमत ही अंदाजे 419 रुपये च्या जवळ पास असू शकते.
कार परफ्युम किंवा कार एअर फ्रेशनर चे फायदे
- कार परफ्युम वापरल्या ने तुमची कार दुर्गंधी मुक्त होते.
- काही कार परफ्युम हे स्प्रे टाइप असतात त्यामुळे इतर प्रवासांसोबत आलेले किटाणू ते मारून टाकतात.
- कार परफ्युम वेग-वेगळ्या प्रकारचे असल्याने तुम्ही ते तुमच्या कारच्या एअरकॉन वेंट मध्ये चिपकवू शकता, प्लग इन करू शकता, स्प्रे करू शकता, किंवा कप होल्डर मध्ये ही उघडे करून ठेवू शकता.
- कार एअर फ्रेशनर किंवा कार परफ्युम वापरल्याने तुम्हाला प्रत्येक वेळी कारला आतून घासण्याची व धुण्याची गरज पडत नाही. कार परफ्युमच्या वापराने कारच्या आत येत असलेला घाण वास निघून जातो.
- कार परफ्युमच्या सुगंधाने तुम्हाला फ्रेश व रिलॅक्स वाटते व तुमचा मुड बदलून तुम्हाला तणावा पासून दूर ठेवते.
- मित्रांनो, कार परफ्युम वेग-वेगळ्या प्रकारच्या fragrance मध्ये येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडी नुसार कोणत्याही प्रकारचा सुगंधित कार परफ्युम निवडू शकता. तसेच कार परफ्युम संपल्या वर सुद्धा नंतर बराच काळ त्यांचा सुगंध टिकून राहतो.
- तसेच कार परफ्युम विविध आकर्षक डिझाइन मध्ये येतात, त्यामुळे तुमच्या कार चे इंटेरिअर अजून च छान दिसते व कारला एक वेगळीच शोभा येते.
कार परफ्युम चे तोटे
- मित्रांनो, कार परफ्युमचा वास हा तात्पुरता असतो. अनेक वेळा कार परफ्युमच्या वासामुळे इंधनाचा वास येत नाही. त्यामुळे जर काही कार चे इंधन लीक वगैरे असेल तर कार परफ्युममुळे ते लवकर कळून येत नाही. परिणामी काही अनर्थ होऊ शकतो.
- तुम्ही जर जेल बेस कार परफ्युम वापरत असाल तर त्यामुळे कार मध्ये धुळीचे कण अडकून राहतात.
- काही एअर फ्रेशनर कृत्रिम सुगंध वापरून तयार केले जातात, व त्यात पेट्रेलियअम पासून मिळणारे सॉलव्हेंट्स पण एकत्र केले जातात त्यामुळे एक विशिष्ट तापमाना वर हे कार परफ्युम उष्णता निर्माण करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे एक कार एअर फ्रेशनर किंवा कार परफ्युम तुमचा संपूर्ण प्रवास आनंददायी व सुगंधित बनवू शकतो. म्हणून आज तुमच्या कारसाठी एक कार एअर फ्रेशनर नक्की खरेदी करा. त्यासाठी आमचा आजचा हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी आशा करतो. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा लेख आवडला असेल किंवा महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।