Government Cards

5 सर्वात महत्त्वाचे सरकारी कार्ड: कसे मिळवायचे, फायदे, कागदपत्रे, अटी व शर्ती

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण सर्वात महत्त्वाचे पाच सरकारी कार्ड कोण कोणते आहेत, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

5 Sarkari Card

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहेत की आपले भारत सरकार आपल्या नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवित असते. आणि आजही या योजनांचा देशातील अनेक लोक फायदा ही घेत आहेत. पण त्या साठी तुमच्याकडे त्या त्या योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्या कडे काही सरकारी योजनांचे कार्ड असणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत तुम्ही कार्ड बनवत नाहीत तो पर्यंत तुम्हाला शासनाचा लाभ मिळत नाही.



मित्रांनो, यामध्ये असे ही काही कार्ड आहेत की जर ते कार्ड तुमच्याकडे असतील तर तुमच्या दवाखान्याचा किंवा आर्थिक परिस्थितीत पैशांचा खर्च देखील दूर होणार आहे. तर ते कोणते पाच महत्वाचे कार्ड आहेत जे तुमच्या कडे असणे गरजेचे आहे, व त्याचे काय फायदे मिळतात, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा, वगैरे सर्व गोष्टी बद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

kisan credit card maharashtra

किसान क्रेडिट कार्ड (KCC Card)

मित्रांनो, हे कार्ड खास करून शेतकरी बांधवांसाठी बनवले जाते. या कार्ड च्या साहाय्याने शेतकरी बँकेतून कर्ज घेऊ शकता. हे कार्ड बँकेतच बनवले जाते. त्यासाठी आधी kcc क्रेडिट अकाउंट ओपन केले जाते. व त्यावरून शेतकऱ्यांना रुपये डेबिट कार्ड दिले जाते. या कार्ड चा फायदा म्हणजे शेतकरी आपल्या शेती संबंधित कोणत्याही कामासाठी कार्ड वरून कर्ज घेऊ शकता. आणि जे कर्ज त्यांना कमीत कमी व्याजदरावर दिले जाते. याशिवाय त्यांना सबसिडी चा लाभ ही मिळतो. जर शेतकऱ्याने 1,60,000 रुपये पर्यंत लोन घेतले तर त्याला त्यावर कोणत्याही प्रकारची सेक्युरिटी देण्याची गरज पडत नाही.

तसेच तीन लाख रुपयांपर्यंत लोन वर केवळ 4 टक्के व्याजदरानुसार शेतकऱ्यांना सहज लोन मिळू शकते. आणि शिवाय त्यावर सबसिडी देखील मिळते. मित्रांनो, केसीसी कार्ड सोबत शेतकऱ्यांना रुपये डेबिट कार्ड देखील दिले जाते. यामुळे शेतकरी शेती संबंधित कामासाठी कधीही हवे तेव्हा एटीएम मशीन मधून पैसे डेबिट जर शकतात. केसीसी कार्ड चा अजून एक फायदा म्हणजे केसीसी अकाउंट वर असलेल्या पैश्यांवर कोणतेही व्याज लागत नाही. फक्त शेतकऱ्याने काढलेल्या पैश्यांवर च व्याज लागते. त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असे कार्ड आहे.

मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या pmkisan.gov.in या संकेतस्थळा वरती जाऊन क्रेडिट कार्ड हा अर्ज डाऊनलोड करावे लागेल व त्यानंतर तो अर्ज भरून जवळच्या बँकेत द्यावा लागेल त्यानंतरच तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

Labor card maharashtra

मजदूर कार्ड

मित्रांनो, मजदूर कार्ड ला लेबर कार्ड असेही म्हटले जाते. जे लोक कमी- उत्पन्न असलेल्या आर्थिक विभागातील आहेत, किंवा अंगमेहनती, शेती आणि इतर अशा प्रकारच्या कामांतून उदरनिर्वाह करतात अश्या लोकांसाठी लेबर कार्ड बनवले जाते. या कार्ड द्वारे मजदूर लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.



तसेच मुलींच्या लग्नासाठी कन्यादान सहायता दिली जाते. तसेच जर एखाद्या लेबरचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख पर्यंत सहायता दिली जाते. आणि महत्वाचे म्हणजे वयाच्या साठ वर्षा नंतर मजदूरांना पेन्शन सुद्धा दिली जाते. या व्यतिरिक्त ही या कार्ड द्वारे मजदूरांना अनेक स्कीम चा लाभ दिला जातो.

e shram card maharashtra

ई श्रम कार्ड

मित्रांनो, ई श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी बनवले जाते. असंघटित म्हणजे जे नियमितपणे काम करतात पण त्यांचे कुठेही म्हणजे कोणत्याही कंपनीत, किंवा कोणत्याही संघटनेत रजिस्ट्रेशन नसते. उदाहरणार्थ, कार्पेन्टर, मिस्त्री, पेंटर, प्लम्बर वगैरे जे श्रमिक असतात ते आपल्या कामात निपुण तर असतात पण त्यांचे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये नाव रजिस्टर नसते, अश्या कामगारांना ई -श्रम कार्ड दिले जाते. या कार्ड मध्ये एक UAN नंबर असतो जी त्या कामगाराची ओळख असते.

व त्या द्वारेच सरकार कडे त्या त्या कामगारांचे सर्व डिटेल्स व डेटा जातो. व जेव्हा कधी पण नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही महामारी येते तेव्हा सरकार ई श्रम कार्ड द्वारे कामगारांच्या खात्यावर पैसे पोहचवते. उदाहरणार्थ, कोरोनाच्या काळात ज्यांचे ई- श्रम कार्ड काढलेले होते त्या त्या व्यक्तीच्या खात्यावर सरकारने 500 रुपये प्रति महा पैसे दिले होते. मित्रांनो, ई- श्रम कार्ड द्वारे भविष्यात अजून ही काही लाभ मिळू शकतात.

त्यामुळे जर तुम्ही असंघटित श्रमिक किंवा कामगार असाल आणि तुमचे जर कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये रजिस्ट्रेशन नसेल तर सरकारचे हे ई- श्रम कार्ड तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावे. हे कार्ड तुम्ही स्वतः ही काढू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला सरकारच्या या eshram.gov.in या संकेतस्थळ वर जाऊन ई श्रम कार्ड काढावे लागेल.

Ayushman Bharat Health Card Mahiti

आयुष्यमान भारत कार्ड

मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड हे एक असे कार्ड आहे की जे तुमच्याकडे असले तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत दवाखान्याचा खर्च हा मोफत दिला जातो. म्हणजेच आयुष्यमान कार्ड चे फायदे असे आहेत की जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला एखादा गंभीर आजार असेल व त्या आजारावर सरकारी किंवा प्रायव्हेट दवाखान्यात उपचार चालू असेल आणि जर हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमचा तिथे पाच लाख रुपया पर्यंत बिल हे कमी होऊ शकते किंवा पाच लाख रुपया पर्यंत तुमचा मोफत उपचार होऊ शकतो.

सविस्तर माहिती वाचा – आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड सोप्या सरळ भाषेत माहिती

तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्त कागदपत्र देखील तुम्हाला लागणार नाहीत. मित्रांनो आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या ayushmanbharat.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन हे कार्ड काढावे लागेल. किंवा कुठल्याही जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथून आयुष्यमान भारत कार्ड साठी अर्ज करू शकता. तसेच setu.pmjay.gov.in या साईट वर जाऊन तुमचे नाव चेक करू शकता व कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता.

bpl card maharashtra

BPL (बीपीएल) कार्ड/ रेशन कार्ड

मित्रांनो, बीपीएल कार्ड हे गरीब कुटुंबातील लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. म्हणजेच जे लोक गरिबी रेषेखाली आहेत त्यांच्यासाठी बीपीएल कार्ड बनवले जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना बीपीएल शिधापत्रिकेद्वारे म्हणजे रेशन कार्ड द्वारे आर्थिक मदत करण्यासाठी, त्यांना काही मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देण्याचे काम सरकार करते. त्यामुळे ज्या कुटुंबांकडे खाण्यासाठी रेशनही नाही, अशा कुटुंबांना ही सुविधा मिळते जेणेकरून ते स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरू शकतील.

या लोकांना अन्न, घर सुरक्षा, जमीन, ग्राहक सेवा, शिक्षण इत्यादी काही मुख्य गोष्टी सरकारकडून पुरवल्या जातात. तसेच बीपीएल धारक व्यक्तीला मुलीच्या लग्नाकरिता देखील कन्यादान सहायता केली. जाते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सर्वात महत्त्वाचे पाच सरकारी कार्ड कोण कोणते आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: government allowance card, card governmen, govt card, sarkari card, top serkari kard, bharatke top gov card, indian top card, government free card list, government farmer card, government free card in marathi, bharat sarkar free card, bharat sarkar cards in marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!