हृदयविकारचा झटका येण्याच्या महिनाभर आधी दिसतात हे 5 संकेत किंवा लक्षणे | Heart Attack Signs, Symptoms - MarathiDiary
आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

हृदयविकारचा झटका येण्याच्या महिनाभर आधी दिसतात हे 5 संकेत किंवा लक्षणे | Heart Attack Signs, Symptomsनमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण हृदयविकार चा झटका येण्याच्या एक महिना आधी आपल्याला कोणते संकेत किंवा लक्षणे दिसतात, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Heart Attack Lakshane

मित्रांनो, आजकाल बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही माणूस अनेक आजारांनी ग्रासलेला दिसतो. या वेग-वेगळ्या आजार मध्ये सध्या प्रामुख्याने हार्ट अटॅक चे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. मित्रांनो हार्ट अटॅक ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणसाला सर्वात जलद अगदी काही क्षणातच मृत्यू येतो. अनेक वेळा तर हार्ट अटॅक इतका पटकन व अचानक येतो की आपल्याला काही उपाययोजना देखील करता येत नाहीत.त्यामुळे हार्ट अटॅक बाबतीत अनेक लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. पण मित्रांनो, हृदयविकार चा झटका येण्याच्या महिनाभर आधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतात, किंवा काही लक्षणे दिसत असतात. ती लक्षणे जर आपण वेळीच ओळखली किंवा जर ते आपल्याला वेळीच समजले तर आपण येणारा हार्ट अटॅक रोखू शकतो. तर ती कोणती लक्षणे आहेत या बद्दल आपण पुढे जाणून घेऊ या. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

हार्ट अ‍ॅटॅक लक्षणे

Heart Attack Signs, Symptoms

हृदयविकार चा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी दिसणारे लक्षणे

कोणतेही मेहनतीचे काम न करता थकवा येणे:- मित्रांनो, हार्ट अटॅक येण्याचे पहिले व प्रमुख लक्षण म्हणजे कोणतेही शारीरिक काम न करता किंवा मेहनत न करता घाम येणे. मित्रांनो बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी अगदी थंडीच्या वातावरणात सुद्धा कुठलेही कारण नसताना किंवा शारीरिक काम नसताना बसल्या जागी अगदी दरदरून घाम येतो. ही असे कशामुळे होते तर हृदयाच्या धमनी मध्ये जर एखादं ब्लॉकेज असेल तर शरिराला हृदयापर्यंत रक्तपुरवण्याचे काम करताना जास्त मेहनत करावी लागते.

आणि या प्रोसेस मध्ये शरीराचे तापमान खूप अधिक वाढते. हे तापमान कमी राखण्यासाठी आपले शरीर जास्तीत जास्त घाम बाहेर काढत असते. त्यामुळे आपल्याला काही काम करत नसताना देखील भरपूर घाम येत असतो. त्यामुळे तुम्हाला जर असे होत असेल अगदी गरम होत नसताना देखील घाम येत असेल तर तुम्ही वेळीच हे लक्षण ओळखून योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे. तुमच्या हार्ट ब्लॉकेज ची टेस्ट करून घ्यावी व आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.

heart attack adhi lakshane

ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह मध्ये कमतरता येणे:- मित्रांनो, तुम्हाला जर चक्कर येत असतील किंवा सतत अशक्तपणा जाणवत असेल तर अश्या गोष्टी कडे दुर्लक्ष करू नका. आपल्या धमनींमध्ये अडथळा आल्याने शरीरातील विविध अंगांना रक्तप्रवाह कमी होतो आणि त्यामुळे ऑक्सिजन ही कमी पोहचतो. म्हणून मग चक्कर येणे, जीव घाबरणे, कमजोरी येणे अश्या समस्या येत असतात. अश्या वेळी तुम्ही डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक असते.छातीत दुखणे किंवा चमक येणे:- मित्रांनो, जर तुम्हाला बऱ्याचदा छातीत दुखत असेल किंवा चमक त्यात असेल तर हे हार्ट अटॅक येण्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते. आणि जर हे छातीत चमक येणे किंवा दुखणे वारंवार होत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टर च्या सल्ल्या नुसार योग्य ते उपचार सुरू केले पाहिजे.

पायाला किंवा हाताच्या सूज येणे:- मित्रांनो, हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी पायाला सूज येणे किंवा हाताच्या कोपऱ्याला सूज येणे असे प्रकार दिसायला लागतात. जेव्हा आपल्या धमन्यां मध्ये ब्लॉकेजेस असतात त्यावेळी हृदयाला शरीराकडे रक्त पोहचवताना किंवा शरीरातून हृदयाकडे रक्त पोहचवताना आपल्या शिरा खूप मेहनत घेत असतात, आणि त्यामुळे त्या फुलतात आणि मग शरीराच्या विविध अंगांना जसे की पायाला किंवा हाताला सूज येते.

त्यामुळे मित्रांनो, जर काही कारण नसताना तुम्हाला हात पायाला सूज येत असेल तर ते हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते.

सतत सर्दी, ताप किंवा फ्लू होणे:- मित्रांनो, हार्ट अटॅक येण्याआधी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी, ताप किंवा फ्लू सारखे आजार आपल्याला ग्रासतात. त्यामुळे तुम्हाला ही जर सतत सर्दी, ताप, फ्लू किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते देखील हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते.

पाठीला किंवा छातीत मुंग्या येणे:- मित्रांनो, तुम्हाला जर पाठीतून छातीकडे मुंग्या येत असतील तर हे देखील हार्ट अटॅक येण्या चे एक प्रमुख लक्षण आहे. बऱ्याच वेळा सुरुवातीला याचे प्रमाण खूप कमी असते नंतर मात्र ते वाढत जाते. त्यामुळे या प्रकारचे लक्षण जर तुम्हाला दिसत असतील तर तात्काळ तुम्ही डॉक्टर चा सल्ला घ्यावा.तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण हृदयविकार चा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी कोणते लक्षणे दिसतात, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: heart attack marathi, heart problems in marathi, heart attack signs in marathi, heart attack Symptoms in marathi, heart attack lakshane, heart attack info in marathi, how to prevent heart attack, mini heart attack, heart attack test at home, causes of heart attack, early signs of heart disease, हृदयविकारचा झटका, heart attack warning signs marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!