नॉर्मल डिलिव्हरी Vs सी-सेक्शन (सिझेरियन) संपूर्ण माहिती: फरक, फायदे, तोटे, खर्च | Normal Vs C Section Delivery
- नॉर्मल व सी- सेक्शन डिलिव्हरी फरक
- नॉर्मल (Normal) डिलिव्हरी सविस्तर माहिती
- सिझेरियन / सी सेक्शन डिलिव्हरी सविस्तर माहिती
- नॉर्मल डिलिव्हरी चांगली की सिझेरियन डिलिव्हरी ?
नमस्कार मित्र व मैत्रिणीं, आज आपण नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी यातील फरक, व त्यांचे फायदे, तोटे जाणून घेणार आहोत. तसेच प्रसूतीसाठी नॉर्मल डिलिव्हरी चा पर्याय निवडावा की सिझेरियन चा, कोणती पद्धत चांगली या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आई होणे ही जरी निसर्गाची एक देणगी असली, तरी ही आई होणं काही सोपे काम नाहीये. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा करते. तेव्हा पासून तिला अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेच्या या 9 महिन्यांत होणाऱ्या आईला ज्या वेदना होतात ते शब्दात मांडणे खूप कठीण आहे. आणि जेव्हा 9 महिन्यांची गर्भधारणा शेवटच्या टप्प्यात असते आणि मूल जन्माला येण्यासाठी तयार असते, तेव्हा तर होणाऱ्या आईला गर्भधारणेच्या सर्वात कठीण काळातून जावे लागते.
कारण जसजशी प्रसूती ची वेळ जवळ येते, तसतशी स्त्री सुरक्षित प्रसूतीची चिंता करू लागते. त्यातही ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई बनणार आहेत त्यांच्या मध्ये तर प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदनांबद्दल एक वेगळीच भीती असते. आणि त्यामुळे होणाऱ्या आई बाबांना एक मोठा प्रश्न पडतो की बाळाच्या जन्मासाठी आपली पारंपारिक प्रसूती पद्धत वापरावी की सध्या प्रचलित होत असलेली सी- सेक्शन ? मित्रांनो, पूर्वी जेव्हा मोठं मोठी हॉस्पिटल्स, अल्ट्रासाऊंड मशिन्स नव्हते तरी सुद्धा आई बाळाला जन्म देतच होती. पण हल्ली बाळांचा जन्म हा नॉर्मल डिलिव्हरी द्वारे न होता जास्त करून सिझेरियन डिलिव्हरी अर्थात सी-सेक्शन द्वारे करण्यात येत असल्याचे ऐकू येते.
हा लेख वाचा: प्रेग्नन्सी टेस्ट किट: चाचणी कधी व कशी करावी? कोणते किट वापरावे?
हा लेख वाचा: IVF (टेस्ट ट्यूब बेबी) संपूर्ण माहिती – IVF म्हणजे काय, प्रक्रिया, फायदे, खर्च, सक्सेस रेट, दुष्परिणाम
पण मग काय सी सेक्शन करूच नये का? फक्त नॉर्मल डिलिव्हरी च होणे चांगले असते का? असे अनेक प्रश्न होणाऱ्या आई बाबांना पडत असतात. तसं पाहिलं तर काही बाबतीत बाळांचा जन्म सिझेरियन डिलिव्हरीने होणे चांगले ठरते. मात्र दुसरीकडे याचे दुष्परिणामही आहेत. जे सिझेरियन डिलिव्हरी नंतर प्रत्येक आईला कमी जास्त प्रमाणात भोगावे लागतात. मग सी सेक्शन प्रमाणे नॉर्मल डिलिव्हरी मध्ये दुष्परिणाम नसतात का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत जे होणाऱ्या प्रत्येक आईला पडत असतात.
आणि शेवटी एकच प्रश्न असतो तो म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी चांगली की सी सेक्शन? कोणता पर्याय निवडावा? पण मैत्रिणींनो, काळजी करू नका, तुमचं टेन्शन थोडंस हलकं करण्याचा आज आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी चांगली की सी सेक्शन चांगले? आणि या दोन्ही पद्धती मध्ये काय फरक आहे, त्यांचे फायदे- तोटे काय आहेत,या बद्दल माहिती सांगणार आहोत. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी की सी- सेक्शन डिलिव्हरी हा निर्णय घेताना तुम्हाला या माहितीची नक्कीच मदत होईल. म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
नॉर्मल डिलिव्हरी (Normal) व सी- सेक्शन (C-Section) फरक
मैत्रिणींनो, नॉर्मल डिलिव्हरी मध्ये बाळाचा जन्म हा नैसर्गिक पद्धतीने म्हणजे स्त्रीच्या योनी मार्गातून होतो. मात्र बाळाला जन्म देताना खूप वेदना (लेबर पेन) सहन कराव्या लागतात. पण डिलिव्हरी नंतर आईला जास्त काही त्रास होत नाही.
दुसरीकडे सिझेरियन डिलिव्हरी मध्ये आईला लेबर ओएन होत नाही, मात्र यामध्ये आईच्या पोटाच्या खालच्या बाजूला कट करून ऑपरेशन करून बाळ बाहेर काढावे लागते. यात डिलिव्हरी आधी काही त्रास होत नसला तरीही डिलिव्हरी नंतर टाके पडल्याने आईला त्रास होतो, व तेव्हा काळजी घेणे आवश्यक असते.
मित्रांनो, आता एक एक करून नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ
Normal delivery / नॉर्मल डिलिव्हरी सविस्तर माहिती
मित्रांनो, जर डिलिव्हरी मध्ये कोणतीही गुंतागुंत नसेल आणि आई व बाळ दोघांनाही काही धोका नसेल तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे योनीमार्गाद्वारे डिलिव्हरी केली जाते. यालाच नैसर्गिक प्रसूती होणे असेही म्हटले जाते. मित्रांनो, नॉर्मल डिलिव्हरी मध्ये चार टप्पे असतात. या चारही टप्प्यातून होणाऱ्या आईला जावे लागते, आणि त्यासाठी प्रचंड वेदना म्हणजेच लेबर पेन सहन करावे लागतात. चला तर मग एक एक करून सर्व टप्प्यांबाबत माहिती जाणून घेऊ
पहिल्या टप्प्यात प्रसूती कळा सुरू होतात आणि प्रसूती कळा सुरू झाल्यावर गर्भाशयाच्या आतील दाब वाढत असतो त्यामुळे गर्भाशयाचे तोंड हळूहळू उघडत असते. त्यानंतर बाळ ज्या गर्भाजलाच्या पिशवीत असते ती पिशवी फुटते आणि त्यानंतर बाळाच्या डोक्याच्या दबावामुळे गर्भाशयावर ताण येऊन हळूहळू पिशवीचे तोंड उघडू लागते. इथे गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे उघडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो त्यात अगदी तीन ते बारा तासापर्यंतचा वेळ सुद्धा लागतो.
जर प्रसूतीच्या कळा म्हणजेच लेबर पेन जोराने येत असतील तर काही वेळातच गर्भाशयाचे तोंड उघडते पण जर बारीक कळा येत असतील तर मात्र जास्त वेळ लागू शकतो. ज्या स्त्रियांचे पहिले बाळंतपण असते त्यांना गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी 12 तास सुद्धा लागू शकतात. या टप्प्यामध्ये स्त्रीने एखाद्या व्यक्तीच्या हाताला धरून चालावे त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे बाळ लवकर खाली सरकण्यास व गर्भाशयाचे तोंड लवकर उघडण्यास मदत होते.
दुसऱ्या टप्प्यात गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे उघडते आणि बाळाच डोक बाहेर दिसू लागत. त्यानंतर हळूहळू बाळाचे हात, छाती, पाय बाहेर येतात अशाप्रकारे बाळ आणि गर्भाशयातील पाणी बाहेर येते. प्रसुतीची पहिलीच वेळ असल्यास यासाठी दोन तासांचा कालावधी लागू शकतो, तर इतर स्त्रियां मध्ये यापेक्षा कमी वेळात ही अवस्था पूर्ण होते. काही वेळा योनीमार्ग लहान असल्यास किंवा बाळाच डोकं मोठं असल्यास योनीच्या ठिकाणी छोट्या चिरा म्हणजे कट देऊन योनी मार्ग मोठा करावा लागतो.
काही वेळा बाळाचे डोके बाहेर दिसत नसल्यास व बाळ बाहेर येण्यास उशीर लागत असल्यास फॉरसेप्स किंवा व्हॅक्युम यांचा वापर केला जातो आणि बाळ बाहेर काढले जाते. बाळ जन्मल्यावर ते रडते. बाळाच्या रडण्यामुळे त्याचा श्वासोच्छ्वास ठीक आहे असे समजले जाते. त्यानंतर बाळाची नाळ चिमटा लावून योग्य प्रकारे कट केली जाते. अशा प्रकारे इथे दुसरा टप्पा पूर्ण होतो.
तिसऱ्या टप्प्यात प्लासेंटा व मेम्बरेन्स बाहेर काढणे आवश्यक असते. प्लासेंटा बाहेर काढण्यासाठी नाळेला थोडं ताण देऊन ओढले जाते. यामुळे गर्भाशयापासून प्लासेंटा बाहेर येतो. साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर दहा ते वीस मिनिटातच प्लासेंटा बाहेर काढणे आवश्यक असते, यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
चौथा टप्पा हा ऑब्झर्वेशनचा असतो. प्लासेंटा बाहेर आल्यानंतर बाळ आणि बाळंतीण यांच्यासाठी पहिला एक तास हा खूप महत्त्वाचा असतो. या कालावधीत बाळ आणि बाळंतीण यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाते. या काळात जर गर्भाशयाचे आकुंचन कमी झाले तर खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो.
आणि जर असे होत असेल तर त्यासाठी ताबडतोब योग्य उपचार केले जातात. तसेच बाळाची श्वास क्रिया वगैरे सर्व सगळे सुरळीत आहे की नाही याची तपासणी देखील या एका तासात केली जाते. अशा प्रकारे इथे चौथा टप्पा पूर्ण होतो. आणि नॉर्मल डिलिव्हरी ची प्रोसेस पूर्ण होते.
नॉर्मल डिलिव्हरी चे फायदे
- नॉर्मल पडिलिव्हरी मध्ये फक्त आईच नाही तर बाळ सुद्धा गर्भाशयातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असते. या प्रोसेस मध्ये म्हणजे योनीमार्गातून बाहेर पडत असताना, बाळाच्या फुप्फुसातून गर्भजल बाहेर फेकले जाते आणि त्यामुळे बाळाचा श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहतो आणि बाळाला श्वसनाच्या समस्या कमी येतात.
- नॉर्मल डिलिव्हरी ने जन्मलेल्या बाळाला आरोग्याच्या कमी समस्या येतात. ऍलर्जी समस्या कमी होतात आणि ही बाळे स्तनपान लवकर करतात.
- तसेच पोटातून बाहेर येताना बाळ श्वासाद्वारे चांगले जिवाणू आत घेते आणि त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत होते.
- मित्रांनो, बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत आईचा खूप मोठा सहभाग असतो आणि तो अनुभव आईसाठी खूप सकारात्मक आणि सशक्त करणारा अनुभव असतो. तसेच नॉर्मल डिलिव्हरी च्या पूर्ण प्रोसेस दरम्यान आई व बाळाचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने आई आणि बाळामध्ये चांगला बंध निर्माण होतो.
- याशिवाय नैसर्गिक प्रसूती दरम्यान शरीरात एंडोर्फिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो. हा हार्मोन वेदना कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे नैसर्गिक प्रसूती नंतर लवकर रिकव्हरी होते.
- तसेच नॉर्मल डिलिव्हरी नंतर, स्त्री शारीरिक दृष्ट्या बाळाला दूध पाजण्यास सक्षम असतात. आणि उठायला व बसायला त्रास होत नसल्याने ती आपल्या बाळाला आरामात बसून स्तनपान करू शकते.
- जर पहिली प्रसूती नॉर्मल असेल तर दुसऱ्यांदा सुद्धा नॉर्मल प्रसूती होण्याचे चान्सेस वाढतात. आणि महत्वाचे म्हणजे नॉर्मल प्रसूती नंतर पाठदुखीचा त्रास होत नाही.
नॉर्मल डिलिव्हरी चे तोटे
- नॉर्मल डिलिव्हरी मध्ये, बाळाच्या जन्म नक्की केव्हा होईल हे निश्चित नसते आणि तुम्ही तो ठरवू ही शकत नाही. त्यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या वेदना खूप वेळ सहन कराव्या लागतात आणि त्यामुळे आईवर ताण येतो.
- काहीवेळा, प्रसूती दरम्यान काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा कमी होतात. अशा वेळी, आईला भूल देऊन तात्काळ सी-सेक्शनसाठी नेले जाते.
- तसेच काही केसेस मध्ये जेव्हा बाळ मोठे किंवा बाळाचे वजन जास्त असते तेव्हा प्रसुती दरम्यान सक्शन कप्स म्हणजे व्हॅक्युम किंवा फोर्सेप्सची गरज भासते.
- शिवाय बाळाचे डोके मोठे असल्यास बाळाला बाहेर काढण्यासाठी वजायनल कट म्हणजे योनीमार्गात चिर पडावी लागते. व बाळ बाहेर आल्यानंतर तिथे स्टीचेस म्हणजे टाके घातले जातात, या टाक्यांचा नंतर काही दिवस त्रास सहन करावा लागतो.
Cesarean Delivery or C- Section /सिझेरियन किंवा सी सेक्शन डिलिव्हरी
सिझेरियन डिलिव्हरी लाच सी- सेक्शन ( C-section delivery) असेही म्हणतात. जेव्हा एखादी गर्भवती स्त्री नॉर्मल पद्धतीने बाळाला जन्म देऊ शकत नाही, तेव्हा डॉक्टरांना सी- सेक्शनची निवड करावी लागते. त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नसला तरी सी- सेक्शन डिलिव्हरी बाबत महिलांच्या मनात अनेक प्रकारच्या संकोच किंवा शंका असतात. चला तर मग या सिझेरियन डिलिव्हरी बद्दल सर्व काही जाणून घेऊ या.
मित्रांनो, बाळाच्या जन्मासाठी सी- सेक्शन करावे की नाही, हे बहुतेकदा डॉक्टरांवर अवलंबून असते. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये जर आई किंवा बाळाचा किंवा दोघांचाही जीवाला धोका असेल तर डॉक्टर सी-सेक्शनचा निर्णय घेतात. याव्यतिरिक्त देखील अनेक कारणे आहेत जेव्हा सी- सेक्शन केले जाते. जसे की.
- बाळ पोटात उलटे म्हणजे पाय खाली व डोके वर झाले असेल किंवा तिरकस झाले असेल तर सी सेक्शन चा निर्णय घेतला जातो.
- बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकली असेल तर
- आईच्या पोटात दोन किंवा अधिक मुले असतील तर
- पहिले मुल सी सेक्शन झाले असेल तरी देखील दुसऱ्या वेळेस सी सेक्शन करावे लागू शकते.
- बाळाचे डोके जर बर्थ कॅनल पेक्षा खूप मोठे असेल तर त्यावेळी सुद्धा सिझेरियन चा निर्णय घेतला जातो.
- बाळाने पोटात शी केली असेल तर त्याला संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यावेळी सिझेरियन करावे लागते.
- आईला हर काही आजार असेल किंवा थायरॉईड, ब्लडप्रेशर, डायबिटीज सारखे आजार असतील तरी देखील सिझेरियन चा निर्णय घ्यावा लागतो.
- काही केसेस मध्ये प्री मॅच्युअर डिलिव्हरी केली जाते त्यासाठी सिझेरियन चा पर्याय निवडला जातो.
- बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थित नसतील किंवा जर बाळाचा विकास नीट झाला नसेल तर सिझेरियन चा निर्णय घेणे योग्य ठरते.
- प्लासेंटा प्रिव्हिया असेल म्हणजे प्लासेंटा गर्भपिशवीच्या तोंडाशी असेल तर बाळाचा बाहेर येण्याचा मार्ग बंद होतो. अश्या परिस्थितीत देखील सी- सेक्शन करावे लागते.
सिझेरियन डिलिव्हरी कशी केली जाते
मित्रांनो सिझरियन डिलिव्हरी मध्ये ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढायला लागते आणि हे ऑपरेशन करण्याच्या दोन पद्धती आहेत
- गर्भाश्याच्या खालच्या भागावर आडवा छेद देऊन केलेले ऑपरेशन (Lower segment caesarean section – L.S.C.S.)
- गर्भाशयाच्या वरच्या भागावर उभा छेद देऊन केलेले ऑपरेशन (Upper segment caesarean section)
यापैकी शक्यतो पहिल्या प्रकारानेच प्रत्येक ऑपरेशन हल्ली केले जाते व ते मातेच्या दृष्टीने जास्त सुरक्षित असते.
सुरक्षित सिझेरियन डिलिव्हरी करन्याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे
1) Anesthesia ( ऍनेस्थेसिया): मित्रांनो, ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी, प्रसूती वेदनामुक्त आणि आरामदायी व्हावी यासाठी आईला भूल दिली जाते. ही एकतर एपीड्यूरल किंवा स्पाइनल किंवा सामान्य भूल असू शकते. आणि ऍनेस्थेशीया हा पाठीच्या खालच्या मणक्यात दिला जातो. ज्यामुळे कमरेच्या खालचा बगग बधिर होतो व त्या भागात वेदना जाणवत नाही.
2) Incision (चीर मारणे): या नंतर एकदा का भूल लागू झाली की डॉक्टर खालच्या ओटीपोटात म्हणजे प्युबिक हेअरलाइन जवळ किंवा ज्याला बिकिनी लाईन असेही म्हणतात. त्याच्या जवळ आडवी चिर मारतात. आणि बाळापर्यंत पोहचण्यासाठी पोटात अनेक ठिकाणी चिर मारावी लागते. ही चीर पहिले वरच्या स्किन लेयर वर नंतर, फॅट चा लेयर कट केला जातो, त्या नंतर मांसपेशी ला कट मारून अम्नीयोटिक सॅक ला कट मारून मग बाळापर्यंत पोहचले जाते. म्हणजे ही चिर किती खोल असते याचा अंदाज तर तुम्हाला आला असेलच.
3) Delivery of the Baby (बाळाची प्रसूती): आता गर्भाशयावर चीर केल्यावर डॉक्टर हळूच काळजी पूर्वक बाळाला बाहेर काढतात. बाळाला व्यवस्थित श्वासोच्छ्वास घेता यावा यासाठी बाळाच्या नाकातून आणि तोंडातून अम्नीओटिक फ्लूइड शोषून काढले जातो.
4) Cord Clamping and Cutting (कॉर्ड क्लॅम्पिंग आणि कटिंग): बाळ बाहेर आल्यावर त्याची नाळ कापली जाते आणि बाळाला प्लेसेंटापासून वेगळे केले जाते.
5) Placenta Removal (प्लासेंटा काढणे): आता प्रसूती झाल्या नंतर, गर्भाशयातून प्लासेंटा काळजी पूर्वक काढून टाकला जातो.
6) Uterine and Abdominal Incision Closure (गर्भाशय व पोट बंद करणे): आता शेवटी एक एक करून कट केलेले सर्व लेयर परत शिवले जातात. रक्तस्त्राव आणि संसर्ग टाळण्यासाठी योग्य प्रकारे स्टीचेस घालून बंद करणे आवश्यक आहे.
7) Monitoring and Recovery (देखरेख आणि रिकव्हरी): डिलिव्हरी चिबप्रोसेस पूर्ण झाल्यावर बाळ आणि बाळंतीण दोघांना 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये देखभालीसाठी रहावे लागते. यात शस्त्रक्रियेनंतर आईचे बारकाईने निरीक्षण करतात. तसेच टाक्यांमध्ये कुठेही संसर्ग तर पसरत नाही ना हे पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. तसेच आईचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी रक्तदाब, हार्टबीट आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचे परीक्षण केले जाते. व साधारण २४ तासानंतर मातेला उभे राहता येते, चालता येते, तसेच बसून स्तनपानही करता येते.
8) Postoperative Care (शस्त्रक्रियेनंतरची काळजी): मित्रांनो, शस्त्रक्रियेनंतर लगेच डिस्चार्ज मिळत नाही. तर त्या नंतर काय काळजी घ्यावी या बद्दल आईला मार्गदर्शन केले जाते. त्यात जड उचलणे टाळावे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यास सांगितले जाते. शस्त्रक्रियेनंतर खाण्यापिण्याची ही विशेष काळजी घ्यायला सांगितले जाते. म्हणजेच शस्त्रक्रियेनंतर हलका, सहज पचणारा पण पौष्टिक आहार घ्यावा. तसेच ऑपरेशन नंतर, डॉक्टर 8 दिवस अंघोळ करण्यास मनाई करतात. घरी आल्यावरही हा नियम पाळायचा असतो. कारण पाणी पडल्याने टाके निघण्याची किंवा उघडण्याची भीती असते. आणि जास्तीत जास्त वेळ बेड रेस्ट करण्यास सांगतात.
सिझेरियन डिलिव्हरी चे फायदे
- मित्रांनो, आई आणि बाळाच्या जीवाला धोका असेल तर सिझेरियन किंवा सी- सेक्शन पेक्षा दुसरा कोणताही पर्याय योग्य नाही.
- सी- सेक्शन हे वेळेपूर्वी प्रसूतीसाठी वरदान मानले जाते. कारण कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्या असतील तर त्यामध्ये सिझेरियन करणे चांगले मानले जाते. उदाहरणार्थ, रक्तदाब, हृदयरोग किंवा थायरॉईड, डायबिटीज वगैरे.
- याशिवाय आता तर सी- सेक्शनची फॅशन सुरु झाली आहे. जर तुम्हाला स्वतःला सी-सेक्शन डिलिव्हरी करायची आहे, तर दिवस व वेळ वगैरे आधीच ठरवता येते आणि आता लोक ते देखील करतात.
सिझेरियन डिलिव्हरी चे तोटे
- सिझेरियन किंवा सी- सेक्शन नंतर रिकव्हरीसाठी बराच वेळ लागतो.
- या ऑपरेशन मध्ये महिलांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू शकते.
- तसेच ऑपरेशन नंतर लगेच बाळाला स्तनपान देऊ शकत नसल्याने, स्तनपानाच्या टप्प्यात येण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण स्वतःहून उठणे अवघड असते.
- तसेच नैसर्गिक प्रसूतीच्या तुलनेत सिझेरियनचा खर्च खूप जास्त असतो.
- जर पहिली गर्भधारणा सिझेरियन असेल तर दुसऱ्यांदाही सिझेरियनचा होण्याची शक्यता असते.
- सिझेरियन नंतर काही वेळेला बाळाला ‘जाँडिस’ म्हणजेच कावीळ होण्याचा धोका असू शकतो.
- मित्रांनो, वरील तोटे असले तरी डॉक्टर ‘सी सेक्शन’ फक्त आणीबाणीच्या परिस्थितीतच म्हणजे खूपच गरज असेल तर निवडतात, म्हणजे ‘शेवटच्या क्षणी’.
- सिझेरियनने जन्मलेल्या मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. कारण जन्माच्या वेळेस काही चांगले बॅक्टेरिया च्या शरीरात जात नाहीत.
नॉर्मल डिलिव्हरी चांगली की सिझेरियन डिलिव्हरी ?
आता नॉर्मल डिलिव्हरी चांगली की सिझेरियन डिलिव्हरी ? नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय प्रयत्न करावे?
मित्रांनो, सिझेरियन मध्ये दिलेल्या इंजेक्शन आणि कट्समुळे आईला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. कधीकधी स्टिचेसचाही त्रास होतो. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टरही महिलांना जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठीच प्रयत्न करावा असं सागंतात. खरंतर नॉर्मल डिलिव्हरी ही प्रत्येक स्त्री साठी खूप महत्त्वाची बाब आहे. पण सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात फारच कमी महिलांच्या वाट्याला नॉर्मल डिलिव्हरी येते. पण आम्ही या लेखात सांगितलेले काही सोपे आणि परिणामकारक उपाय जर तुम्ही लक्षात ठेवले तर नक्कीच तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत मिळेल.
- जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही गरोदर आहात, तेव्हा पासून नियमित स्वरूपात डॉक्टरांचा सल्ला घेत राहायला हवा. मनात कोणतीही शंका असेल तर ती वेळच्या वेळी डॉक्टरांना विचारावी.
- डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे योग्य वेळी व्यायाम, औषध घ्यावी. कधीकधी कसं विचारायचं असा वाटत असेल तरीही असं करू नका. मनातील गोष्टी गरोदरपणात मनात ठेऊ नका. कारण त्यामुळे तणाव अधिक वाढतो.
- डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे अथवा कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाने या दिवसात करणे योग्य नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.
- नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे नियमित चालणे. रोज चालल्याने तुम्हाला ताजी हवा आणि मनाला शांतताही मिळेल. आणि चालताना अगदी सावकाश संथ गतीने चालावे. किमान अर्धा तास तरी.5. तसेच नॉर्मल डिलिव्हरी साठी व्यायाम आणि योगा केल्याने त्रासही कमी होतो आणि डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत मिळते. परंतु तुम्ही योग्य व्यायाम करत आहात की नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा त्याचा उलट परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे योगा अथवा व्यायाम करताना तो देखरेखी खाली व योग्य मार्गदर्शनाखालीच करावा.
- गरोदरपणामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी योग्य व चांगल्या झोपेची आवश्यकता असते. त्यामुळे कमीत कमी 8 ते 9 तासांची झोप गरोदरपणा मध्ये आवश्यक आहे.
- गर्भावस्थेत जितके आनंदी राहता येईल आणि जितके अधिक तणावापासून दूर राहता येईल तितके राहा. तुम्हाला गरोदरपणात मूड स्विंग्स होतील पण तुम्हाला शांत व तणावमुक्त राहणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आवडती पुस्तके वाचा, आवडते चित्रपट पाहा. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका.
- नॉर्मल डिलिव्हरी व्हायला हवी असेल तर तुम्ही किमान घरातल्या घरात तरी कामं करायलाच हवीत. इतकंच नाही तर तुम्ही झाडू मारणं, कचरा काढणं, लादी पुसण, वगैरे हलकी काम करावी आणि इतरही काही कामं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांनी सांगितल्यानुसार करायला हवीत.
- यासोबतच नॉर्मल डिलिव्हरीसाठी खाण्याकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशा अवस्थेत योग्य वेळी आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात आयरन आणि कॅल्शियमची कमतरता होते. त्यामुळे असा आहार घ्यावा ज्यात हिरव्या भाज्या आणि ज्युस, अंडे आणि ताज्या फळांचा समावेश असेल. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पोटातील बाळाला योग्य प्रोटीन आणि विटामिन्स मिळतात. तसेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करा.
- अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणात भरपूर पाणी प्यावे. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नये. गरोदर स्त्री ने रोज दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी पिले पाहिजे. याचा नॉर्मल डिलिव्हरी साठी खूप उपयोग होतो.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी यातील फरक, व त्यांचे फायदे तोटे जाणून घेतले. तसेच प्रसूतीसाठी नॉर्मल डिलिव्हरी चा पर्याय निवडावा की सिझेरियन चा, कोणती पद्धत चांगली या बद्दल ही जाणून घेणे. तसेच नॉर्मल डिलिव्हरी साठी के करावे,या बद्दल माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. मित्रांनो व मैत्रिणींनो,मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल, तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचल्या बद्दल… धन्यवाद।
हा लेख वाचा: प्रेग्नन्सी टेस्ट किट: चाचणी कधी व कशी करावी? कोणते किट वापरावे?
हा लेख वाचा: IVF (टेस्ट ट्यूब बेबी) संपूर्ण माहिती – IVF म्हणजे काय, प्रक्रिया, फायदे, खर्च, सक्सेस रेट, दुष्परिणाम
FAQ
नॉर्मल डिलिव्हरीची लक्षणे काय आहेत?
नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बाळाचं डोकं हे मूत्राशयाजवळ आल्याने स्त्रीला लघवी रोखता येत नाही. तसेच अत्यंत जास्त वेदना आणि कळा यायला सुरुवात होतात आणि त्याचप्रमाणे काही महिलांच्या बाबतीत रक्तस्रावही सुरू होतो. कमरेतून व पाठीतून असह्य वेदना सुरू व्हायला लागतात आणि पायातूनही कळा येतात. तर काही जणींना जुलाब होऊ लागतात. ही नॉर्मल डिलिव्हरीची सर्वसामान्य लक्षणं आहेत.
कोणत्या प्रकारची डिलिव्हरी उत्कृष्ट आहे?
याच उत्तर अर्थातच नॉर्मल डिलिव्हरी च उत्कृष्ट आहे. कोणत्याही स्त्री ला आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असेच वाटते. कारण त्याचा जो काही त्रास होतो तो फक्त एकदाच. बाळ जन्माला आल्या नंतर भविष्यात काही त्रास होत नाही.
सिझेरियन डिलिव्हरी नंतर टाके किती दिवस दुखतात?
साधारणपणे सिझेरियन टाके आठ ते दहा दिवसात बरे होतात, पण पूर्णपणे बरे होण्यासाठी एक महिना पण लागू शकतो.
प्रसूती ही नॉर्मलच व्हायला हवी हे त्या गरोदर स्त्रीवर बिंबवणं योग्य आहे का?
अर्थातच, नाही. खरं सांगायचं तर बाईची नैसर्गिक प्रसूती होणं महत्त्वाचं आहे. पण तिचं सिझर झालं म्हणजे तिच्यात काही तरी कमतरता आहे. तिने तेवढा प्रयत्न केला नाही कळा देऊ किंवा सोसू शकली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. हा समाजामध्ये पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. तसेच सिझेरियन होण म्हणजे आपण कमी पडलो असं नसून आपल्या आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा सुरक्षित निर्णय आहे, हा विचार होणं महत्त्वाचं आहे. आणि तो झाला तर सिझेरियनला चिटकलेले समज गैरसमज कोणत्याही बाईवर, तिच्या मानसिकतेवर परिणाम करु शकणार नाहीत. त्यामुळे प्रसूती ही नॉर्मलच व्हायला हवी हे त्या गरोदर स्त्रीवर बिंबवण्यापेक्षा, तुझी प्रसूती व्यवस्थित होणं, तू सुखरुप असणं, बाळ सुखरुप असणं हे बिंबवणं महत्त्वाचं असतं.
Tags: normal delivery marathi, c section delivery, c section procedure, cesarean delivery cost, normal delivery mahiti, normal delivery kashi hote, normal delivery info in marathi, normal delivery in marathi, c section delivery info in marathi, c section delivery in marathi, c section delivery mahiti, c section delivery kashi keli jate, cesarean delivery in marathi, cesarean delivery info in marathi, cesarean delivery kashi keli jate, cesarean delivery mahiti, normal ki cesarean, konti changli normal ki cesarean, cesarean ani c section delivery farak