वैद्यकीय चाचणी व रिपोर्ट (Medical Test & Report)

प्रेग्नन्सी टेस्ट किट: चाचणी कधी व कशी करावी? कोणते किट वापरावे? | How To Use A Pregnancy Test Kit

नमस्कार मैत्रिणींनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी व कशी करावी आणि त्यासाठी कोणते किट वापरावे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Home pregnancy test in marathi

मैत्रिणींनो, आई होणं ही प्रत्येकिसाठी खूप मोठा आनंद देणारी गोष्ट असते. त्यात जर आपल्या मासिक पाळीची तारीख चुकली की आपण गरोदर आहोत की नाही, असा विचार मनात येतो. खरंतर मासिक पाळी चुकली म्हणजे गरोदर आहोत असे प्रत्येक वेळी होत नाही. कधी कधी हार्मोनल इमबॅलन्स मुळे सुद्धा मासिक पाळीची तारीख पुढे जाते. पण तरी सुद्धा आपण गरोदर आहोत की नाही ते तपासण्यासाठी गर्भधारणा चाचणी म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट करणे उपयोगी ठरते.



हा लेख वाचा: IVF (टेस्ट ट्यूब बेबी) संपूर्ण माहिती – IVF म्हणजे काय, प्रक्रिया, फायदे, खर्च, सक्सेस रेट, दुष्परिणाम

हा लेख वाचा: नॉर्मल डिलिव्हरी Vs सी-सेक्शन (सिझेरियन) संपूर्ण माहिती: फरक, फायदे, तोटे, खर्च | Normal Vs C Section Delivery

ही प्रेग्नन्सी टेस्ट घरच्या घरी लघवीचे सॅम्पल घेऊन करता येते. आणि त्यासाठी बाजारात प्रेग्नन्सी टेस्ट किट सुद्धा उपलब्ध आहेत. या किट चा वापर करून घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट करता येते, आणि प्रेग्नन्सी कन्फर्म करणे सोपे जाते. पण ही प्रेग्नन्सी टेस्ट कशी करायची, केव्हा करायची, टेस्ट करण्यासाठी प्रेग्नन्सी किट कसे वापरायचे, हे बऱ्याच जणींना माहीत नसते. त्यामुळे गोंधळ उडतो.

पण मैत्रिणींनो, आता चिंता करू नका, कारण या लेखात आम्ही तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट कशी करायची व कधी करायची या बद्दल माहिती सांगणार आहोत. तसेच कोणते प्रेग्नन्सी टेस्ट किट चांगले आहे, आणि टेकसे वापरावे या बद्दल देखील मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

प्रेग्नन्सी टेस्ट कशी व कधी करायची?

मैत्रिणींनो, अनेकदा महिलांचा हाच मोठा प्रश्न असतो की प्रेग्नंन्सी टेस्ट किती दिवसांनी व केव्हा करायला हवी? जर तुम्हाला देखील हाच प्रश्न पडत असेल, तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणतीही स्त्री गर्भवती आहे याची खात्री तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा महिलेच्या रक्तात किंवा लघवी मध्ये HCG हॉर्मोन म्हणजे ( Human chorionic gonadotropin) हार्मोन तयार होऊ लागतो. अनेकदा ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 6 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो.



पण जर तुमचे पीरियड रेग्युलर असतील व आता पिरिओडिक सायकल मिस झाली असेल तर तुम्ही पीरियड मिस होण्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रेग्नंन्सी टेस्ट करू शकतात. अथवा अनेक डॉक्टर मासिक पाळी चुकल्याच्या 7 दिवसांनी देखील टेस्ट करण्याची सल्ला देतात. कारण या नंतर केलेली प्रेग्नंन्सी टेस्ट अचूक रिजल्ट देते.

प्रेग्नन्सी टेस्ट किट द्वारे घरी गर्भधारणा चाचणी कशी करावी?

मैत्रिणींनो, प्रेग्नन्सी टेस्ट किट हे गर्भ राहिला आहे की नाही हे तपासण्याचा करण्याचा सर्वात विश्वासार्ह, सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो. हे किट सुमारे पाच मिनिटांत आपल्याला रिझल्ट देते. त्यात तुम्ही कोणतेही प्रेग्नंन्सी टेस्ट किट आणली तरी त्याची वापर करण्याची पद्धत सारखीच असते. हे किट जसे वापरायचे त्याची संपूर्ण पद्धतीची माहिती त्याच्या पॅकेट वर देण्यात आलेली असते. तसेच काही इन्स्ट्रक्शन्स देखील दिलेल्या असतात. प्रेग्नन्सी टेस्ट कसे वापरायचे ते पुढील स्टेप्स द्वारे समजून घेऊ.

स्टेप 1: मैत्रिणींनो, सर्वात आधी एका स्वच्छ भांड्यात तुमची सकाळची पहिली युरिन (मूत्र) घ्यायची आहे.

स्टेप 2: यानंतर किट सोबत मिळालेल्या ड्रॉपर मध्ये युरिन चे काही थेंब घ्यायचे आहे. आता किट मध्ये मिळालेल्या टेस्ट स्ट्रीप किंवा कार्ड वर दिलेल्या पॉईंट मध्ये ड्रॉपर मध्ये भरलेल्या लघवीचे 3-5 थेंब टाकावे. परंतु याची काळजी घ्यावी की पॉइंट च्या बाहेर रीडिंग स्ट्रिप वर थेंब पडू देऊ नये.

Pregnancy Kit Urine Sample Location

स्टेप 3: हे सर्व प्रोसेस झाल्यावर पूर्णपणे रिझल्ट येण्यासाठी 5 मिनिटं वाट पाहावी. पाच मिनिटानंतर जर रीडिंग स्ट्रिप मध्ये 1 गुलाबी रंगाची रेषा दिसत असेल तर याचा अर्थ महिला गर्भवती नाही.
पण जर स्ट्रिप वर 2 गुलाबी रेषा दिसत असतील तर याचा अर्थ महिला गर्भवती आहे.

आणि टेस्ट केल्यानंतरही जर रीडिंग स्ट्रिप काहीही दाखवत नसेल तर तुम्ही आणलेले टेस्टिंग किट खराब/Faulty आहे असे समजावे व नवीन किट आणून टेस्ट करावे.

Pregnancy Kit Test Result Reference Image

स्टेप 4: जर वेगवेगळ्या रंगाच्या रेषा किंवा एक गडद आणि दुसरी फिकट रेषा दिसत असेल तर तुमची टेस्ट व्यवस्थित झालेली नाही व याचा अर्थ असाही असतो की तुमच्या लघवीत एचसिजी (HCG) हार्मोन ची कमतरता आहे. असे झाल्यास काही दिवसानंतर पुन्हा एकदा टेस्ट करून पहावी.

Prega News Pregnancy Test Kit Amazon खरेदी करण्यासाठी इथे => क्लिक करा <=

मैत्रिणींनो, किट द्वारे केलेली गरोदरपणाची टेस्ट शक्यतो 99% बरोबर असते. परंतु तरही कधीकधी आपणास चुकीचे परिणाम देखील पाहण्यास मिळू शकतात. जर टेस्ट केल्यावरही आपणास शंका राहत असेल तर आपण एकदा आपल्या डॉक्टरांशी नक्की संपर्क करावा.

प्रेग्नन्सी टेस्ट झाल्या नंतर लक्षात ठेवायच्या गोष्टी

  1. जर तुमचे परिणाम सकारात्मक आले असतील म्हणजे जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही गर्भवती आहात असे समजावे आणि घरी टेस्ट झाल्यावर डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा टेस्ट करावी.
  2. तसेच तुमचे परिणाम जर नकारात्मक असतील म्हणजेच जर महिला गरोदर नसेल परंतु तरीही महीलेले गरोदर असल्याचे वाटत असेल तर अश्या परिस्थितीत देखील तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन चेक अप करावे.
  3. बऱ्याचदा अनेक महिला वापरलेले किट परत वापरतात. तर असे करू नये. महिलेच्या हार्मोन्स मुळे किट खराब झालेले असते. त्यामुळे सावधानता बाळगावी.

कोणते प्रेग्नन्सी टेस्ट किट वापरावे?

मैत्रिणींनो, तसे पाहिले तर बाजारात अनेक प्रेग्नन्सी टेस्ट किट उपलब्ध आहेत. पण चांगल्या किट वापरायच्या असतील तर तुम्ही, प्रेगा न्युज, एक्यु, आय कैन सारखे प्रेग्नन्सी टेस्ट किट तुम्ही वापरू शकता. यापैकी प्रेगा न्युज जास्त प्रचलित आहे. व एका किटची किंमत ही परवडणारी म्हणजे फक्त 50 रुपये आहे.

Prega News Pregnancy Test Kit
Prega News Pregnancy Kit 50rs मध्ये इथे क्लिक करून Amazon वर बघा

हा लेख वाचा: IVF (टेस्ट ट्यूब बेबी) संपूर्ण माहिती – IVF म्हणजे काय, प्रक्रिया, फायदे, खर्च, सक्सेस रेट, दुष्परिणाम

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी व कशी करावी? त्यासाठी कोणते किट वापरावे या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

FAQ

प्रेग्नन्सी टेस्ट किट चुकीची असू शकते का?

प्रेग्नन्सी किटच्या एक्सपायरी तारखेनंतर गर्भधारणा चाचणी घेतल्यास, त्याचा परिणाम चुकीचा असू शकतो. तसेच जर प्रेग्नेंसी किट योग्य वातावरणात ठेवली नाही तर ती एक्सपायरी डेटच्या आधीच खराब होऊ शकते.

प्रेग्नन्सी टेस्ट किट किती वेळा वापरता येते?

मैत्रिणींनो, काही महिलांना असे वाटते की या किट्सचा वापर दोनदा केला जाऊ शकतो आणि त्यावर दोनदा युरिन टाकून रिझल्ट मिळवला जाऊ शकतो, पण तसे होत नाही. कोणतेही किट वापरले तरीही ते फक्त एकदाच वापरू शकतो, त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकत नाही.

प्रेग्नन्सी टेस्ट सकाळी किती वाजता करावी?

मैत्रिणींनो, जेव्हा गर्भ गर्भाशयाला जाऊन मिळतो, तेव्हा HCG हार्मोन्स तयार होतात. आणि या हार्मोन मुळेच कळते की महिला गर्भवती आहे. त्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट सकाळच्या पहिल्या युरिन (मूत्र) सह केली पाहिजे कारण सकाळच्या पहिल्या युरिन मध्ये या हार्मोनचे प्रमाण जास्त असते.

Tags: pregnancy test kit in marathi, how to check pregnancy at home without kit in marathi, prega news chi mahiti, prega news kit in marathi, prega news kit price how to use in marathi, prega news kit use in marathi, pregnancy kit marathi, pregnancy kit use in marathi, pregnancy test kit marathi, pregnancy test kit result in marathi, pregnancy test kit use in marathi, pregnancy test kit kase vaparayche, pregnancy test kit kase use karayche, pregnancy test kit info in marathi, pregnancy kit in marathi, Prega News pregnancy test kit, i-can pregnancy test kit, Velocit pregnancy test kit, Clearblue pregnancy test kit

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!