IVF संपूर्ण माहिती: IVF म्हणजे काय, प्रक्रिया, फायदे, खर्च, सक्सेस रेट, दुष्परिणाम
- IVF म्हणजे काय?
- IVF प्रक्रिया (Process)
- IVF ची गरज कोणाला आहे?
- IVF ट्रीटमेंटचे फायदे काय आहेत?
- IVF उपचाराचा खर्च किती असतो?
- IVF चा सक्सेस रेट किती आहे?
- IVF प्रक्रियेचे दुष्परिणाम काय आहेत?
नमस्कार मित्रांनो, आज आपण IVF म्हणजे काय या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यात आयव्हीएफ (IVF) ट्रीटमेंट कोणी करावी, केव्हा करावी, त्यासाठी किती खर्च येतो, त्यातील समज गैरसमज कोणते, आयव्हीएफ ट्रीटमेंट यशस्वी होते का, त्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही ट्रीटमेंट करावी, या अश्या सर्व प्रकारच्या गोष्टीं बद्दल आपण सविस्तर पणे माहिती जाणून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आई होणं ही प्रत्येक स्त्री इच्छा असते. आणि गर्भधारणा होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या नैसर्गिक गर्भधारणे मध्ये पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीबीजांचे मिलन हे स्त्री च्या शरीरात होते. आणि त्या नंतर गर्भधारणा होते आणि 9 महिन्यांनंतर मूल जन्माला येते. मूल झाल्या नंतर पालकत्वाची मिळालेली ही अनुभूती खरच खूप खास आणि अद्भुत असते. परंतु काहीवेळा काही कारणांमुळे जोडप्यांना मूल होण्यात अडचण येऊ शकते, आणि वंध्यत्वाचा सामना करावा लागतो.
तसं पाहिलं तर मूल न होण्याचे कारण काही असू शकते जसे की शुक्राणू, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब, किंवा स्त्रीबीज या मध्ये काही समस्या असु शकतात. आणि त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नाही, पण अश्या वेळी निराश न होता तुमच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी उपाय म्हणून एक उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करू शकता, ते म्हणजे IVF (आयव्हीएफ). मित्रांनो IVF ही एक एडवान्सड फर्टिलिटी टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे तुमचं पालक होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
मित्रांनो, आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया दोन्ही एकच आहे. हि प्रक्रिया आधी टेस्ट ट्यूब बेबी नावाने ओळखली जायची. आता आयव्हीएफ हेच टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिये च विकसित नाव आहे.
हा लेख वाचा: प्रेग्नन्सी टेस्ट किट: चाचणी कधी व कशी करावी? कोणते किट वापरावे?| Pregnancy Test Kit
हा लेख वाचा: नॉर्मल डिलिव्हरी Vs सी-सेक्शन (सिझेरियन) संपूर्ण माहिती: फरक, फायदे, तोटे, खर्च | Normal Vs C Section Delivery
मित्रांनो, खर तर IVF हे एक वरदानच आहे. पण हा शब्द अनेकदा ऐकला जरी असला तरी ही प्रक्रिया नेमकी काय असते याबाबत अनेकांना कल्पना नसते. तुमची हीच समस्या लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलो आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला आयव्हीएफ बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आणि महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती तुम्हाला इथे म्हणजे एकाच ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात पहिले आयव्हीएफ (IVF) म्हणजे काय ते जाणून घेऊ या
IVF म्हणजे काय?
मित्रांनो, IVF म्हणजे In Vitro Fertilization. यालाच टेस्ट ट्यूब बेबी म्हणून देखील ओळखले जाते. आयव्हीएफ प्रक्रियेत फर्टिलायझेशन ची प्रक्रिया ही पूर्ण पणे शरीराबाहेर प्रयोगशाळेत करण्यात येते. या प्रक्रियेत निरोगी आणि सशक्त स्त्रीबीज आणि सशक्त स्पर्म घेऊन प्रयोगशाळेत यांचं एकत्रीकरण एका काचेच्या प्लेट मध्ये करण्यात येतं. आणि नंतर एका विशिष्ट तापमानात ते ठेवलं जातं. आणि त्यातून गर्भ विकसित होतो. हा तयार झालेला गर्भ मग स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो.
आयव्हीएफ प्रक्रिया (IVF Process)
मित्रांनो, आयव्हीएफ च्या प्रक्रियेत गर्भधारणेच्या यशाची शक्यता वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाच्या स्टेप्स सामील असतात, त्या कोणत्या स्टेप्स असतात ते पुढे जाणून घेऊ या.
Ovary Stimulation (अंडाशय उत्तेजित करणे):- मित्रांनो, आयव्हीएफ मधील पहिली स्टेप्स म्हणजे अनेक स्त्रीबीज बनविण्यासाठी स्त्रीचे अंडाशय उत्तेजित करणे ज्याला इंग्लिश मध्ये ovaries stimulate करणे असे म्हणतात. अनेक फॉलिकल्स तयार होऊन त्यांच्या चांगल्या डेव्हलपमेंट साठी काही औषधे व खास करून हार्मोनल इंजेक्शन्स दिले जातात.
Retrieving the spermatozoa (स्त्रीबीज प्राप्त करणे):- त्या नंतर एकदा स्त्रीबीज परिपक्व (mature) झाले की स्त्रीबीज काढण्यासाठी एक लहानशी शस्त्रक्रिया केली जाते. अल्ट्रासाऊंड गाईडन्स वापरून, एक पातळ सुई अंडाशयातील स्त्रीबीज काढण्यासाठी इन्सर्ट केली जाते.
Sperm collection (शुक्राणू गोळा करणे):- आता ज्या दिवशी स्त्रीबीज प्राप्त केले त्याच दिवशी, पुरुष जोडीदार स्पर्म म्हणजेच शुक्राणूचे सॅम्पल देतो, यातून प्रयोगशाळेत निरोगी आणि सर्वात ऍक्टिव्ह स्पर्म वेगळे केले जातात.
Feetilization (फलन):- त्या नंतर कलेक्ट केलेले स्त्रीबीज आणि तयार केलेले स्पर्म्स मध्ये फर्टिलायझेशन घडवून आणण्यासाठी एका प्रयोगशाळेच्या डिश मध्ये दोन्ही एकत्र केले जातात. या प्रक्रियेवर जवळून लक्ष ठेवले जाते, आणि भ्रूणच्या (embryo) डेव्हलपमेंट चे व्यवस्थित निरीक्षण केले जाते.
Embryo culture (भ्रूण संवर्धन):- फर्टिलायझेशन नंतर, तयार होणाऱ्या भ्रूणांचे अनेक दिवसांसाठी प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते. या दिवसांत भ्रूणाची क्वालिटी आणि डेव्हलपमेंट चे मुल्यांकन केले जाते.
Transfer of embryos (भ्रूणांचे हस्तांतरण):- मित्रांनो, या स्टेप मध्ये स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर करण्यासाठी चांगल्या व उत्कृष्ट क्वालिटीचे भ्रूण (embryo) निवडले जातात. भ्रूण ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया तशी सोपी असते आणि त्यात एक बारीक कॅथेटर (catheter) वापरून गर्भाशयाच्या कॅव्हिटी मध्ये निवडलेले भ्रूण ठेवणे जातात.
Pregnancy test (गर्भधारणा चाचणी):- भ्रूणाचे म्हणजेच embryo चे ट्रान्सफर झाल्या नंतर सुमारे दहा ते पंधरा दिवसांनी, आयव्हीएफ यशस्वी झाले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एक गर्भधारणा चाचणी म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते.
IVF ची गरज कोणाला आहे?
मित्रांनो, आयव्हीएफची अशा जोडप्यांना शिफारस केली जाते, ज्यांना अनेक कारणांमुळे नैसर्गिक रीत्या गर्भधारणेत समस्या येत असतात. त्यामुळे खाली अशा काही सामान्य परिस्थिती दिल्या आहेत जेव्हा तुम्हाला IVF ची गरज पडू शकते.
- फॅलोपियन ट्युब ब्लॉक किंवा डॅमेज असणे:- मित्रांनो, ज्या स्त्रियांचे फॅलोपियन ट्यूब ब्लॉक किंवा डॅमेज झालेले आहे अशा स्त्रियांचे स्त्रीबीज गर्भाशय पर्यंत जाऊ शकत नाहीत, आणि परिणामी नैसर्गिक रित्या गर्भधारणा होऊ शकत नाही. अश्या व्यक्तींसाठी आयव्हीएफ एक चांगला उपचार आहे.
- शुक्राणूंची (sperm) संख्या कमी असणे किंवा शुक्राणूंची क्वालिटी खराब असणे:- पुरुषां मध्ये जर शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा खराब क्वालिटी चे शुक्राणू असतील, तर नैसर्गिक रीत्या स्त्रीबिजाचे फर्टिलायझेशन घडवून आणणे कठीण होऊ शकते. आणि अश्या परिस्थितीत तुम्ही आयव्हीएफ उपचाराची मदत घेऊ शकता.
- अस्पष्ट फलन (Unexplained Fertility):- काही वेळा सर्व टेस्ट केल्या नंतर ही, वंध्यत्वाचे अचूक कारण कळून येत नाही. त्यावेळी तुम्ही आयव्हीएफ चा विचार करू शकता.
- एंडोमेट्रियोसिस ( Endometriosis):- या अवस्थेमुळे गर्भाशयाच्या बाहेर भित्तीका बनवणाऱ्या टिश्यू ची वाढ होते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. या वर उपाय म्हणून आयव्हीएफ योग्य पर्याय ठरू शकतो.
- अंडोत्सर्गाचा विकार ( Ovulation Disorder):- मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ओव्युलेशन सायकल किंवा मासिक पाळी अनियमित असलेल्या महिलांना आयव्हीएफचा फायदा होऊ शकतो.
- अनुवांशिक विकार ( Genetic Disorders):- अनुवांशिक विकार असणारी जोडपी प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक चाचणीसह आयव्हीएफची निवड करू शकतात.
IVF (आयव्हीएफ) उपचाराचे फायदे काय आहेत?
- आयव्हीएफ द्वारे समलिंगी जोडपी डोनेटेड स्पर्म वापरून प्लाकत्वाचा अनुभव घेऊ शकता.
- तसेच ज्या स्त्रिया एकट्या राहतात व जर त्यांना आई बनण्याची इच्छा असेल तर त्या डोनर चे स्पर्म वापरून आयव्हीएफचा पर्याय वापरू शकतात.
- आजकाल उशिरा लग्न करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाढत्या वयासोबत स्त्रियांची प्रजननशीलता कमी होत जाते. त्यावेळी आयव्हीएफ चा वापर करून यशस्वी गर्भधारणेच्या शक्यता वाढतात.
- प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक चाचणी सह आयव्हीएफ काही अनुवांशिक विकारांचा अपत्यांमध्ये प्रसार रोखण्यास मदत करू शकते.
- तसेच नैसर्गिक रित्या गर्भधारणेसाठी अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या जोडप्यांना आयव्हीएफ एक अत्यंत प्रभावी उपाय प्रदान करते.
- कारण स्पष्ट नसलेले वंध्यत्वाच्या विविध समस्यांचे निराकरण आयव्हीएफ द्वारे केले जाऊ शकते.
- आयव्हीएफ मुळे स्वस्थ गर्भधारणे पासून ते स्वस्थ बाळाच्या जन्मापर्यंत आणि गर्भपाताचा धोका कमी करण्यापर्यंत, लाखो जोडप्यांना फायदा झाला आहे.
- आयव्हीएफ उपचार द्वारे तुम्ही गर्भधारणा करण्यासाठीची वेळ देखील ठरवू शकता.
IVF उपचाराचा खर्च किती असतो?
मित्रांनो, आयव्हीएफच्या उपचाराचा खर्च हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. जसे की, तुम्ही कोणत्या शहरात किंवा देशात राहताय, तसेच विविध फर्टिलिटी क्लिनिक्स उपचाराचे विविध पॅकेजीस तुमच्या समोर प्रस्तुत करतात, ज्यांच्यामुळे एकंदर खर्चावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय अनुवांशिक चाचणी करणे किंवा भ्रूण फ्रीझ करून ठेवणे यांच्यासारख्या अतिरिक्त कार्यप्रणालीचा समावेश असल्यास खर्च वाढू शकतो. तसेच काही जोडप्यांना यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी अनेक आयव्हीएफ सायकल्स ची गरज पडू शकते, ज्यामुळे एकूण खर्चात भर पडते.
यासोबतच आईवीएफची किंमत तुमचे वय, वैद्यकीय इतिहास या घटकांवर देखील अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, प्रत्येक जोडप्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळे उपचाराचा खर्च सुद्धा प्रत्येक जोडप्यानुसार बदलत असतो. त्यामुळे तुम्ही जर ivf उपचार घ्यायचे ठरवलेच असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, आईवीएफ साठी महागडी उपकरणे आणि कुशल डॉक्टरांची आवश्यकता असते. शिवाय, या फर्टिलिटी प्रक्रियेसाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आणि उपकरणांमध्ये नवीनतम तंत्रज्ञान आवश्यक आहे. तसेच तज्ञ, अनुभवी आणि विश्वासार्ह डॉक्टर किंवा क्लिनिक निवडणे हे महत्वाचे आहे.
IVF चा सक्सेस रेट किती आहे?
मित्रांनो, आयव्हीएफ उपचाराचा सक्सेस रेट हा स्त्रीचे वय, एकंदर स्वास्थ्य आणि वंध्यत्वाचे मूळ कारण, यांच्यासह विविध घटकांवर अवलंबून असतो. तसं पाहिलं तर आयव्हीएफच्या यशाचा दर हा 40% ते 65% पर्यंत असतो. योग्य प्रजनन तज्ञाचा सल्ला घेतल्यास विशिष्ट परिस्थिती नुसार अधिक अचूक मूल्यांकन केले जाऊ शकते. काही काही केसेस मध्ये हा सक्सेस रेट 74 टक्क्यांपर्यंत सुद्धा असतो. शेवटी, आयव्हीएफ उपचार हे वंध्यत्वाचा सामना करत असलेल्या जोडप्यांसाठी आणि व्यक्तींसाठी एक आशा आहे. आणि आता तर आयव्हीएफ हा पालकत्व प्राप्त करण्यासाठी एक यशस्वी मार्ग बनला आहे.
IVF प्रक्रियेचे दुष्परिणाम काय आहेत?
मित्रांनो, IVF प्रक्रिये मध्ये जोखीम सोबतच आणि संभाव्य दुष्परिणाम देखील असतात. आयवीएफ सारख्या फर्टिलिटी ट्रीटमेंट केल्याने स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक ताण पडतो. ट्रीटमेंट साठी स्त्रीला अनेक इंजेक्शन दिले जातात ज्यामुळे सुद्धा शरीरात अनेक बदल होतात आणि त्याचे शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसू शकतात. तसेच आयव्हीएफ मुळे मल्टीपल प्रेग्नन्सी होऊ शकते. अशा प्रकारच्या प्रेग्नन्सी या गुंतागुंतीच्या असतात आणि त्यात कधी कधी आई व बाळ दोघांच्या जीवाला धोका असतो. पण हे खूप कमी केसेस मध्येच होते. मल्टीपल बर्थ मध्ये सी सेक्शनचे धोके, जेस्टेशनल डायबेटीस, उच्च रक्तदाब, परी क्लेम्पसिया, प्रीमेच्युर बर्थ सारख्या समस्यांचा देखील धोका असतो.
याशिवाय आयव्हीएफ मध्ये हार्मोनल इंजेक्शन घ्यावी लागतात. या हार्मोनल इंजेक्शनमुळे इंजेक्शनच्या जागी वेदना तर होतातच याशिवाय मूड स्विंग, हॉट फ्लॅशेज, योनी कोरडी पडणे, पोट फुगणे, स्तनांमध्ये वेदना होणे, वजन वाढणे, डोके दुखी, मळमळ, चक्कर येणे, ब्लीडींग होणे, थकवा जाणवणे, पुरेशी झोप न येणे यांसारख्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. हे सर्व प्रॉब्लेम प्रत्येकाला होतातच असे नाही. शेवटी प्रत्येक व्यक्ती चे शरीर वेगळे त्यामुळे होणारे दुष्परिणाम ही कमी अधिक प्रमाणात असतात.
मित्रांनो, त्यामुळे आयव्हीएफ उपचार घेण्याआधी आपल्या पतीशी आणि घरच्यांशी योग्य सल्लामसलत करूनच पुढचे पाउल उचलावे. जर जास्त समस्या येणार नसेल आणि डॉक्टर त्याची शाश्वती देत असतील तर तुम्ही आयवीएफचा वापर करू शकता.
IVF करण्याआधी काय करावे आणि काय करू नये?
मित्रांनो, IVF ही एक खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत होणाऱ्या आई-वडिलांना त्यांचे एकूण शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राखणे आवश्यक असते. भरपूर प्रोटिन्स, दैनंदिन फॉलिक अॅसिड आणि मल्टीविटामिन यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. मद्यपान आणि धुम्रपान याबरोबरच अँटी-इन्फ्लेमेटरी पदार्थ, आर्टिफिशियल गोड पदार्थ आणि साखरेचे प्रमाण असलेले अन्न, बेकरी चे पदार्थ हे काटेकोरपणे टाळायला हवे. तसेच आयव्हीएफ उपचार करण्यापूर्वी काही टेस्ट करणे आवश्यक असते, त्या डॉक्टर च्या सल्ल्यानुसार करून घ्याव्या. ज्यात प्रामुख्याने FSH, AMH किंवा HSG टेस्ट, तसेच थायरॉईड हार्मोनल टेस्ट, तसेच हिपॅटायटीस सी, हिपॅटायटीस बी, एचआयव्ही आणि सिफिलीस यांसारखे विविध रोग ओळखण्यासाठी इन्फेक्शन स्क्रिनिंग करणे आवश्यक असते.
IVF फर्टिलिटी क्लिनिक निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.?
IVF फर्टिलिटी क्लिनिक निवडताना
मित्रांनो, तुमच्या आयव्हीएफ ट्रीटमेंट साठी फर्टिलिटी क्लिनिक निवडताना त्या क्लिनिक ची अधिकृत वेबसाइट आणि उपचार सुविधा, ते वापरत असलेले तंत्रज्ञान, प्रयोगशाळा आणि त्यांच्याकडे असलेली इतर संसाधने ता बद्दल माहिती घ्या. तसेच त्या क्लिनिक किंवा हॉस्पिटल चा सक्सेस रेट किती आहे याचा मागोवा घ्या. मित्रांनो, आयव्हीएफ हा एक महागडा व खर्चिक उपचार असल्याने प्रत्येकाला ते परवडत नाही, या ट्रीटमेंट चा खर्च ऐकून बहुतेक लोक त्यांची कल्पना सोडून देतात. जर तुम्हाला वाटत असेल की उपचार तुमच्या बजेटच्या बाहेर आहे, तर तुम्ही इतर शहरे पाहू शकता कारण ते शहरानुसार उपचाराच्या किमती कमी जास्त होत राहतात.
तसेच महत्वाचे म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे तुमचा IVF उपचारांचा खर्च कमी करण्यात मदत होऊ शकते. आणि IVF प्रक्रियेसाठी जाणे म्हणजे तुम्हाला नियमितपणे क्लिनिकला भेट द्यावी लागेल. त्यामुळे आयव्हीएफ क्लिनिक तुमच्या घराजवळ पास असल्यास ते उपयुक्त ठरेल आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला क्लिनिक मध्ये वेळेत पोहोचता येईल.अश्या प्रकारे सर्व गोष्टी पडताळून तुम्ही समाधानी झाल्यानंतरच पुढे जाणे योग्य आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण IVF (आयव्हीएफ) च्या संपूर्ण प्रक्रिये बद्दल तसेच त्याचे फायदे – दुष्परिणाम वगैरे सर्व प्रकारच्या माहिती बद्दल जाणून घेतले. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
हा लेख वाचा: नॉर्मल डिलिव्हरी Vs सी-सेक्शन (सिझेरियन) संपूर्ण माहिती: फरक, फायदे, तोटे, खर्च | Normal Vs C Section Delivery
FAQ
IVF साठी योग्य वेळ कोणती?
जर जोडप्याचे वय ३० वर्षांपेक्षा कमी किंवा जास्त असेल आणि एक वर्ष प्रयत्न करून देखील मूल होत नसेल तर IVF डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला दिला जातो.
IVF चा फुल फॉर्म काय आहे?
मित्रांनो, IVF म्हणजे In Vitro Fertilization ( इन विट्रो फर्टिलाइजेशन).
IVF च्या पूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागतो?
मित्रांनो, साधारणपणे IVF च्या एका सायकलला सुमारे दोन ते तीन आठवडे लागू शकतात, पण ट्रीटमेंट साठी लागणारा काळ तुमच्या फर्टिलिटी स्तिथी नुसार कमी जास्त देखील होऊ शकतो.
IVF ट्रीटमेंट साठी EMI चे पर्याय असतात का?
मित्रांनो, आजकाल बरेच IVF सेंटर्स ट्रीटमेंट दरम्यान तुम्हाला EMI चा पर्याय देतात. प्रक्रिया सुरू करण्याआधी संबंधित क्लिनिक मध्ये त्या बद्दल चौकशी करावी..
IUI आणि IVF मध्ये काय फरक आहे?
मित्रांनो, IUI ही एक प्रक्रिया आहे जिथे शुक्राणू थेट गर्भाशयात ठेवले जातात आणि गर्भधानाची प्रक्रिया शरीरात होते. दुसरीकडे, आयव्हीएफ मध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणूं काढून घेतले जातात आणि त्यांचे एकत्रीकरण प्रयोगशाळेत केले जाते.
आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी मधील फरक काय?
मित्रांनो, आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया दोन्ही एकच आहे. हि प्रक्रिया आधी टेस्ट ट्यूब बेबी नावाने ओळखली जायची. आता आयव्हीएफ हेच टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिये च विकसित नाव आहे.
IVF ट्रीटमेंट नंतर सामान्य प्रसूती शक्य आहे का?
IVF ट्रीटमेंट नंतर गर्भधारणा अगदी नैसर्गिक गर्भधारणे सारखीच असते. ज्या स्त्रिया IVF ने गरोदर राहिल्या आहेत त्यांची अगदी अन्य स्त्रियां प्रमाणेच C-Section किंवा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.
Tags: ivf marathi, ivf treatment in marathi, indira ivf information in marathi, indira ivf marathi, ivf in marathi, ivf information in marathi, ivf marathi information, ivf marathi mahiti, ivf marathi meaning, ivf meaning in marathi, ivf meaning marathi, ivf pregnancy in marathi, ivf pregnancy process in marathi, ivf procedure in marathi, ivf process in marathi, ivf process step by step in marathi, ivf test in marathi, ivf treatment in marathi language, ivf treatment information in marathi, ivf treatment marathi, ivf treatment meaning in marathi, ivf treatment process in marathi, meaning of ivf in marathi, IVF Mahiti Marathi, IVF Mhanje Kay, IVF Kashi Keli Jate, IVF Karavi Ka, IVF Koni Karavi, IVF Means in Marathi, IVF Treatment Mahiti, IVF Treatment info in Marathi , IVF Information in Marathi, Test Tube Baby Mhanje Kay, IVF ani Test Tube Baby Yatil Farak, Test Tube Baby Mhaje Kay, Test Tube Baby Kashi Keli Jate, Test Tube Baby Price in Marathi, IVF Price