शांत झोप लागण्यासाठी रामबाण उपाय | How to Get Good Sleep at Night
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात रात्रीच्या वेळेस शांत झोप लागण्यासाठी काय करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असे म्हटले जाते. चांगले आरोग्य राहण्यासाठी आपण व्यायाम, चांगला आहार वगैरे गोष्टी करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, चांगले आरोग्य राहण्यासाठी झोप ही तितकीच महत्वाची आहे.
अनेक जणांना झोप न येण्याची किंवा शांत झोप न लागण्याची समस्या असते. दिवस भर कितीही थकून आले तरी ही अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. पण आता काळजी करू नका, शांत झोप येण्यासाठी काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याच बरोबर शांत झोप न येण्याची कारणे काय आहेत, शांत झोप न आल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतात या अश्या अनेक गोष्टी बद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आजचा आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
झोप न येण्याची कारणे
मित्रांनो, झोप न येण्याची अनेक कारणे आहेत. जसे की, जर तुम्हाला काही टेन्शन असेल तर शांत झोप लागत नाही. तसेच झोप न येण्यासाठी तुमचा आहार, तुमचे आरोग्य किंवा तुमची दिनचर्या , झोपण्या आधी तुम्ही काय करता या अश्या बऱ्याच गोष्टी मुळे शांत झोप येत नाही.
मित्रांनो, असे म्हणतात की लहान मुलांना आठ ते दहा तासांची झोप आवश्यक असते. तर प्रौढ व्यक्तींना सहा ते सात तासांची झोप आवश्यक असते. पण अलीकडच्या काळात अनेक प्रौढ व्यक्ती अतिझोपेच्या आहारी गेलेल्या दिसतात. त्यातच दुपारी तीन चार तास झोपणे या कारणांमुळे सुद्धा रात्री शांत झोप लागत नाही.
या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त काही शारीरिक आजार किंवा सवयीमुळे सुद्धा रात्री शांत झोप लागत नाही. जसे की काहींना घोरण्याची सवय असते त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो व झोप मोड होते. तसेच रात्रीमधे मधे लघवीला उठणे , छातीत जळजळ होणे म्हणजे ऍसिडिटीचा त्रास होणे या कारणांमुळे सुद्धा रात्री च्या वेळेस शांत झोप येत नाही.
याशिवाय आत्ताच्या काळात झोप न येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणचे मोबाईलचा अति वापर. रात्री मोबाईल बघणे, गेम्स खेळणे, पिक्चर्स किंवा वेब सिरिझ बघणे, अश्या गोष्टींमुळे रात्री झोप लागत नाही. म्हणजेच मोबाइलचा अति वापर हे सुद्धा शांत झोप न येण्याचे कारण आहे. याशिवाय अनेक महिलांमध्ये मेनोपॉज मुळे सुद्धा लवकर झोप येत नाही.
झोपे चे दुष्परिणाम
मित्रांनो, झोपे चे जसे चांगले परिणाम असतात तसेच काही दुष्परिणाम सुद्धा असतात. झोप कमी झाल्यामुळे तसेच जास्त प्रमाणात झोप घेतल्याने त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागतात. कमी झोपेमुळे किंवा अति झोपेमुळे आळस येतो. व आपली कामे करण्याची शक्ती मंदावते. थोडक्यात काय तर स्थूलपणा वाढतो.
या शिवाय झोपेचा आपल्या बुद्धीवर तसेच स्मरण शक्ती वर ही परिणाम होतो. अति झोप झाल्यास किंवा कमी झाल्यास स्मरण शक्ती कमी होऊ शकते. तसेच कमी झोप मिळाल्याने किंवा अति झोप घेतल्याने हृदया संबंधी आजार होण्याची शक्यता असते.
या शिवाय झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिझोपेमुळे डोळ्याखाली काळे डाग पडणे, किंवा डोळ्यांखालील त्वचा सुजणे अश्या समस्या होतात. तसेच लैंगिक क्षमतेवर सुद्धा परिणाम होऊन शरीरात आळस निर्माण होतो. अश्या वेळेस नैराश्याची भावना सुद्धा निर्माण होऊ लागते.
तसेच झोप अपुरी झाल्यास स्मृतिभ्रंश सुद्धा होऊ शकतो. किंवा अपुऱ्या झोपे मुळे शरीरातील हार्मोन्स बॅलन्स बिघडते. व त्यामुळे डायबेटीस होण्याची शक्यता असते. एकंदरीतच झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अति प्रमाणात झोप घेतल्याने संपूर्ण जीवनशैली वर दुष्परिणाम होतो.
शांत झोपेसाठी उपाय
मित्रांनो, झोपेच्या समस्या होऊ नयेत म्हणून तसेच आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्यावर काही उपाय करता येतात. त्या बद्दल जाणून घेऊ या.
- मित्रांनो, शांत झोप लागण्यासाठी तुम्ही व्यायाम, योगासने किंवा मेडिटेशनचा उपयोग करू शकता.
- तुम्हाला जर रात्री लवकर झोप येत नसेल तर दिवसा झोपणं तुम्हाला टाळावे लागेल.
- रात्री लवकर झोप लागत नसेल तर तुम्ही एखादे सौम्य संगीत ऐकू शकता. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील करता आणि झोप पण लवकर येते.
- आजकाल बरेच जणं रात्री झोपण्यापूर्वी बराच वेळ मोबाइल किंवा लॅपटॉप बघत बसतात. त्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. परिणामी रात्री शांत झोप येत नाही. म्हणून तुम्हाला जर रात्री निवांत झोप पाहिजे असेल तर तुमचे मोबाइल वगैरे वस्तू बंद करून ठेवा.
- शांत झोप लागण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे तुमच्या झोपेचे नियोजन करा. ठराविक वेळेत झोप व ठराविक वेळेत उठणे गरजेचे आहे.
- शांत झोप लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताण तणाव पासून लांब राहणे. कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. शांत झोप लागेल.
- झोपण्या आधी तुमच्या आवडीचे गाणे ऐका किंवा एखादे पुस्तक वाचा. त्यामुळे ही तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते. फक्त इ-बुक वाचू नये.
- मित्रांनो, प्रत्येकाची झोपण्याची सवय ही वेग वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला ज्या पोझिशन मध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या पोझिशन मध्ये झोपा. पण शक्यतो चांगली झोप लागण्यासाठी डाव्या कुशी वर झोपणे चांगले असते. त्यामूळे तुम्ही ही सवय लावून घेतली तर याच तुम्हाला नक्की फायदा होईल.
- अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण अश्या पदार्थांमुळे झोप मोड होते. त्यामुळे झोपण्याच्या चार ते पाच तास आधी चहा, कॉफी किंवा कॅफेन युक्त पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा.
- जर तुम्हाला रात्री शांत झोप येत नसेल तर गरम पाण्याने अंघोळ करा आणि झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होतात आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
- या शिवाय जर रात्री शांत झोप हवी असेल तर चांगले विचार करा. जेणे करून मनात जास्त विचार येणार नाही व डोके शांत राहील. त्यामुळे झोप पण चांगली येते.
- रात्री झोपताना हलक्या रंगाचे व सैल कपडे घालावे.
- रात्रीच्या जेवणात तिखट, तेलकट, व मसाले दार पदार्थ खाऊ नका व दोन घास कमी खावे, त्यामुळे जळजळ कमी होईल व झोप शांत लागेल.
- रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला तेलाने मालिश करावी. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते व शांत झोप लागण्यास मदत होते.
- तसेच तुमची खोली, बेड सगळं नीटनेटके व स्वच्छ असावे, त्यामुळे ही झोपे वर चांगला परिणाम होतो.
- तुम्हाला जर शांत झोप येत नसेल तर उशीचा वापर करणे बंद करा म्हणजे झोपताना उशी न घेण्याची सवय लावा. उशीचा सुद्धा झोपेवर परिणाम होतो.
- तसेच झोपण्याआधी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास ही शांत झोप लागते.
- पुरेशी झोप घ्या. कारण झोप फक्त मनाच्या आरोग्यासाठी च नव्हे तर शरीरासाठी पण खूप आवश्यक आहे.
तर मित्रांनो, शरीराच्या इतर क्रिया प्रमाणे शांत ‘झोप’ ही क्रिया पण होणे खूप गरजेचे असते. अश्या प्रकारे आज आपण शांत झोप लागण्यासाठी वेग-वेगळे उपाय बघितले. तुम्हाला ही जर शांत झोप न येण्याचा त्रास असेल तर सांगितलेले उपाय नक्की करून बघा. आणि शांत झोपेचा आनंद घ्या. आणि हो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।