सर्व प्रकारचे कूकिंग करू शकणारे सर्वात चांगले मायक्रोवेव्ह ओव्हन | Best Convection Microwave Oven
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रमाणे नव-नवीन माहिती घेऊन येत असतो. आज ही आम्ही तुमच्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. या लेखात आपण मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करताना त्यात कोणत्या गोष्टी पहाव्यात, त्याचे फायदे-तोटे काय आहेत, तसेच भारतातील बेस्ट मायक्रोवेव्ह ओव्हन कोण कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आजकालच्या आधुनिक काळात सर्वच बाबतीत बदल घडून आले. अगदी आपलं स्वयंपाक घर सुद्धा. दिवसें दिवस आपले स्वयंपाक घर अजूनच आधुनिक होत चालले आहे. याचे कारण म्हणजे नव-नवीन उपकरणे. याच उपकरणां पैकी एक असे उपकरण आहे जे आजकाल घराघरात आढळून येते ते म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. या मायक्रोवेव्ह ओव्हनमुळे स्वयंपाक करणे खूप सुलभ आणि रंजक झाले आहे. पण अजून ही काही जणांना कोणते मायक्रोवेव्ह ओव्हन चांगले आहे, त्याचा फायदा काय या बाबतीत माहिती नाही. त्यामुळे तुम्हासर्वांसाठी आम्ही आजचा हा लेख घेऊन आलो आहोत. या मध्ये तुम्हाला मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.
सर्वात पहिले मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या
मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे काय ?
मायक्रोवेव्ह ओव्हन हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ओव्हनच्यामध्ये अन्न ठेवले जाते, नंतर ओव्हन चालू झाल्यावर मॅग्नेट्रॉन नावाच्या इलेक्ट्रॉन ट्यूबद्वारे मायक्रोवेव्ह तयार केले जातात. या मायक्रोवेव्ह धातूचे कोटिंग असल्याने ओव्हनच्या आतील भागात परावर्तित (reflect) होतात, आणि अन्न या वेव्हला शोषून घेते. मायक्रोवेव्हमुळे अन्नातील पाण्याचे रेणू (molecules) कंप (vibrate) पावतात, ज्यामुळे अन्न शिजवून उष्णता निर्माण होते. अशा पद्धतीने ओव्हनचा उपयोग पदार्थ शिजवण्यासाठी, बेक करण्यासाठी, गरम करण्यासाठी केला जातो.
मायक्रोवेव्ह ओव्हनचे प्रकार
Types of Microwave Oven
खरंतर मायक्रोवेव्ह ओव्हन तीन वेग वेगळ्या प्रकारांत येते. एक म्हणजे सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन, ग्रिलिंग मायक्रोवेव्ह ओव्हन आणि तिसरे म्हणजे कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन.
1) सोलो मायक्रोवेव्ह – यापैकी सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन हे इतर प्रकार पेक्षा स्वस्त असे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. तसेच ते किफायतशीर व वापरण्यास सोपे आहे. यात तुम्ही जेवण गरम करू शकता तसेच इतर बेसिक कूकिंग करू शकता. पण यात तुम्ही ग्रीलिंग व बेकिंग करू शकत नाही.
2) ग्रीलिंग मायक्रोवेव्ह – ग्रीलिंग मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये हिटिंग कॉईल असतात ज्यामुळे उष्णता तयार होऊन तुमचे अन्न शिजते. तसेच या ग्रील मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तुम्ही कोणते ही फूड ग्रील करू शकता. अगदी व्हेज किंवा नॉन व्हेज. तसेच तुम्ही यात बेसिक कूकिंग करू शकता, चहा कॉफी वगैरे बनवू शकता, रिहीटिंग म्हणजे जेवण पुन्हा गरम करू शकता, तसेच रोस्टिंग पण करू शकता.
3) कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह – तर कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन हा सर्वात जास्त वापरला जाणारा मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. यात हिटर व पंखा पण असतो ज्यामुळे उष्णता सर्व बाजुंना पसरते. म्हणजेच सर्व बाजूनी हिटिंग केले जाते. या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तुम्ही सर्व प्रकारचे जेवण बनवू शकता. यात तुम्ही ग्रीलिंग, बेकिंग, रिहीटिंग वगैरे सर्व काही करू शकता. फक्त याची किंमत इतरांपेक्षा थोडी जास्त आहे. पण याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे यात तुम्ही सर्व प्रकारचे कूकिंग, बेकिंग, ग्रीलिंग, रिहीटिंग करू शकता.
मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात
Things to Consider Before Buying a Microwave Oven
- क्षमता (Capacity) – मित्रांनो मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करण्याआधी तुम्हाला किती लीटरचा मायक्रोवेव्ह लागेल ते माहीत असायला हवे. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मायक्रोवेव्ह ओव्हन निवडावा लागेल. शक्यतो दोन माणसासाठी 20 लिटरचा मायक्रोवेव्ह पुरेसा होता. पण जर तुमच्या कुटुंबात चार ते पाच सदस्य असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही 30 लिटर पेक्षा जास्त कॅपॅसिटी असलेला मायक्रोवेव्ह ओव्हन निवडायला हवा. पण कॅपॅसिटी वाढली की किंमत ही वाढेल हे लक्षात असू द्या.
- कूकिंग पॉवर – मित्रांनो, मायक्रोवेव्ह ओव्हन हे 700 वॅट ते 1200 वॅट पॉवर पर्यंत येते. जेवढे अधिक वॅट तेवढं जेवण लवकर बनते पण जास्त वॅटचा मायक्रोवेव्ह ओव्हन वापरल्यास त्याचे आयुष्य कमी होते. त्यामुळे शक्यतो थोडे कमी वॅट चे मायक्रोवेव्ह खरेदी करावे.
- टाइमर आणि प्रीहिट (Preheat) – मित्रांनो, तुम्ही घेत असलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये टायमर आणि प्रीहिटचा ऑप्शन आहे का ते नक्की चेक करा. बिल्ड इन टाइमर (Built-in timer) असल्याने अन्न किती वेळ शिजवायचे आहे ते सेट करता येते तसेच जेवण पूर्ण झाल्यावर बीप वाजवून आपल्याला आठवण करून देतो. तसेच काही पदार्थांना प्रिहिटिंगची आवश्यकता असते. त्यामुळे प्रिहिटिंगचा ऑप्शन ही मायक्रोवेव्ह मध्ये असावा. या शिवाय मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ऑटो कूक मेनूचा ऑप्शन पण दिलेला असतो.
- चाइल्ड कंट्रोल लॉक – मित्रांनो, लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये चाइल्ड कंट्रोल लॉक सिस्टीम असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही पासवर्ड ही सेट करू शकता.
- ऑटो शट ऑफ फिचर – मित्रांनो, ऑटो शट ऑफ फ़ंक्शन् मुळे जेवण पूर्ण तयार झाल्यावर ते आपोआप बंद होते. त्यामुळे जर कधी लक्षात राहिले नाही तर हे फ़ंक्शन खूप कामी येते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये हे फ़ंक्शन आहे का ते चेक करा.
- टर्नटेबल रोटेशन (Turntable Rotating) – मित्रांनो तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये हे फ़ंक्शन असायला हवे. या फ़ंक्शनमुळे तुमचे जेवण मायक्रोवेव्ह मध्ये सर्व बाजूनी समान शिजले जाते व तुम्हाला खात्री देते की कमी एक्सपोझरमुळे तुमचे जेवण जळत नाही किंवा कमी शिजले जात नाही.
- इझी क्लिनिंग – मित्रांनो, अनेक मॉडेल हे ऑटो क्लिनिंग फ़ंक्शन सह येतात. तसेच तुम्ही असे मायक्रोवेव्ह ओव्हन घेऊ शकता ज्याचे ग्रीस फिल्टर्स काढता येतील. त्यामुळे ते धुवून स्वच्छ करता येतील.
- डिफ्रोस्टिंग (Defrosting) – या फिचर चा उपयोग तुम्ही एखादे फ्रोझन फूड गरम लवकर करण्यासाठी करू शकता.
- ऑपरेटिंग पॅनल (Operating Panel) – मित्रानो, काही महागड्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये नॉब च्या ऐवजी डिजिटल डिस्प्ले दिलेला असतो जो तुम्ही तुमच्या बोटांच्या सहाय्याने सेट करू शकता. तसेच टायमिंग दिसण्यासाठी डिस्प्ले पण दिला जातो.
- एक्सेसरीज (Accessories) – मित्रांनो, मायक्रोवेव्ह ओव्हन घेताना त्यासोबत तुम्हाला कोण-कोणत्या ऍक्सेसरिझ दिल्या जात आहेत ते चेक करा. खास करून यात तुम्हाला ग्लोव्स, कव्हर तर घेतलेच पाहिजे. तसेच जर तुम्ही मायक्रोवेव्ह भिंतीवर लावणार असाल तर वॉल माऊंट दिले जाते.
आता भारतातील सर्वात चांगले कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन कोणते आहेत ते बघू या. या आर्टिकल मध्ये आपण भारतातील चांगल्या 5 कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल माहिती बघणार आहोत.
सर्वात चांगले मायक्रोवेव्ह ओव्हन
Best Convection Microwave Oven
1) IFB 30 L कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
मित्रांनो, आईएफबी चे हे मायक्रोवेव्ह ओव्हन मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच यांची सर्विस पण खूप चांगली आहे. यात तुम्हाला 101 कूकिंग मेनू दिले आहेत. यात तुम्हाला क्लॉक दिले आहे जे टायमर सह येते. शिवाय यात 10 पॉवर लेव्हल्स दिले आहेत. तसेच यात तुम्हाला कूलिंग आणि किपिंग वॉर्मचे फीचर्स पण देण्यात आले आहेत. या मायक्रोवेव्ह ओव्हनचा ऑपरेटिंग व्होल्टेज हा 230 वोल्ट चा आहे.
या शिवाय यात तुम्हाला दोन ग्रील आणि मायक्रोवेव्हचे कॉम्बिनेशन आणि चार कन्व्हेक्शन, मायक्रोवेव्हचे कॉम्बिनेशन दिले आहे. या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व मॅग्नेट्रॉन वर तीन वर्षांची वॉरंटी मिळते. या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तुम्हाला ओव्हर हीटिंग पासून संरक्षण मिळते तसेच यात चाइल्ड लॉक सेटिंगचा ऑप्शन पण आहे. यात तुम्ही स्टीम क्लीनिंग पण करू शकता. याच्या ऑपरेटिंग बद्दल सांगायचे झाले तर मायक्रोवेव्ह तुम्ही 1400 वॅट पर्यंत, कन्व्हेक्शन 2200 वॅट पर्यंत नेऊ शकता. आणि जर तुम्ही ग्रील करत असाल तर ते तुम्ही 1250 वॅट पर्यंत नेऊ शकता. याच्या प्लेटचा डायमिटर हा 31.5 असून त्याचे वजन हे 19 किलो पर्यंत आहे. तसेच या मायक्रोवेव्ह ओव्हन ची किंमत ही 12,500 रुपयेच्या आसपास असू शकते.
2) LG 30L कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
मित्रांनो, एलजी चे हे मॉडेल 30 लिटर चे आहे. या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जवळ जवळ सर्वच फीचर्स बघायला मिळतात. या मॉडेल वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व मॅग्नेट्रॉन वर चार वर्षांची वॉरंटी मिळते. यात तुम्हाला 301 ऑटो कूक मेनू मिळतात ज्यात 211 भारतीय कूक मेन्यू आहेत. या मायक्रोवेव्ह ओव्हन चे वजन हे 27 किलो पर्यंत असते. याच्या प्लेट चा डायमिटर 31.5 सेमी आहे. व हा मायक्रोवेव्ह ओव्हन 2500 वॅट पर्यंत जाऊ शकतो.
या मायक्रोवेव्ह ओव्हनची किंमत 16,000 रुपयेच्या जवळ पास असु शकते. या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये चाइल्ड लॉक फ़ंक्शन पण दिले आहे जे लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगले आहे. तसेच यात ऑटो डिफ्रॉस्टचे ऑप्शन पण दिले आहे. या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तुम्हाला सहा पॉवर लेव्हल्स दिल्या आहेत. असे हे एलजी चे मायक्रोवेव्ह ओव्हन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
3) Samsung 28L कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
मित्रांनो, या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी बघायला मिळते. यात तुम्हाला तंदूर टेक्नॉलॉजी मिळते. म्हणजे तुम्ही यात तंदूर रोटी किंवा तंदुरी फूड पण खूप चांगल्या प्रकारे बनवू शकता. 101 भारतीय कूकिंग मेनू यात दिले आहेत. या मायक्रोवेव्ह चे वजन हे 17 किलो पर्यंत आहे. या शिवाय 2100 वॅट पर्यंत याची पॉवर जाऊ शकते. यात तुम्हाला deodorization फिचर पण मिळते. म्हणजे जर तुम्ही नॉन व्हेज बनवणार असाल तर नॉनव्हेज चा वास या फिचर द्वारे निघून जातो.
या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व मॅग्नेट्रॉन वर चार वर्षांची वॉरंटी मिळते. तसेच या मायक्रोवेव्ह ओव्हन ची किंमत तुम्हाला 15,000 रुपयेच्या आसपास मिळू शकते. यात ही तुम्हाला चाइल्ड लॉक फ़ंक्शन मिळते व डिफ्रॉस्टचे फिचर बघायला मिळणार आहे. तर 28 लिटरच्या कॅपॅसिटी मध्ये हे मायक्रोवेव्ह ओव्हन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.
4) Godrej 28L कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
मित्रांनो, गोदरेजचे हे 28 लिटर चे मॉडेल मार्केट मध्ये खूप लोकप्रिय आहे. याचे फीचर्स आणि फीड बॅक पण खूप चांगले आहे. या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व मॅग्नेट्रॉन वर तुम्हाला पाच वर्षांची वॉरंटी मिळते. यात तुम्हाला इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी पण बघायला मिळते. तसेंच 350 प्री ऑटो कूक मेनू दिले आहेत. याची कॅव्हिटी ही स्टेनलेस स्टीलचे आहे तसेच यात चाइल्ड लॉक फिचर पण देण्यात आले आहे. तसेच स्टीम क्लिनिंगचा ऑप्शन तुम्हाला यात बघायला मिळतो.
या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये डिफ्रोस्टिंग पण खूप फास्ट होते. तसेच 2500 वॅट पॉवर मध्ये हे ऑपरेट होऊन जाते. याच्या टर्नटेबलच्या प्लेट चा डायमिटर हा 31 सेमी असून या मायक्रोवेव्ह ओव्हन चे एकूण वजन हे 15 किलो पर्यंत आहे. या मायक्रोवेव्ह ओव्हन ची किंमत ही अंदाजे 17,500 रुपये पर्यंत असू शकते.
5) Samsung 32L कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन
मित्रांनो, तुमचे कुटुंब जर मोठे असेल तर तुमच्यासाठी हा मायक्रोवेव्ह ओव्हन एकदम परफेक्ट आहे. यात नवीन टेक्नॉलॉजी व नवीन फीचर्स दिले आहेत. ज्यामुळे तुमचे जेवण लवकर व अगदी सोपे होते. यात तुम्हाला स्लिम फ्रायचा ऑप्शन दिला आहे ज्यात तुम्ही खूप कमी तेलात फ्रेंच फ्राय वगैरे फ्राय करू शकता. तसेच यात तंदूर टेक्नॉलॉजी पण बघायला मिळते. शिवाय यात तुम्हाला सिरॅमिक फनेलची कॅव्हिटी मिळते. या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते व मॅग्नेट्रॉन वर पाच वर्षांची वॉरंटी मिळते. जास्तीत जास्त 2100 वॅट पर्यंत तुम्ही याची पॉवर नेऊ शकता.
तसेच याचे वजन 20 किलो पर्यंत आहे. 247 ऑटो कूक मेनू आहेत ज्यापैकी 240 भारतीय कूक मेनू आहेत. या प्रोडक्ट ची किंमत ही अंदाजे 17,000 रुपये पर्यंत असू शकते.चाइल्ड लॉक फिचर सोबतच यात तुम्हाला फास्ट डिफ्रॉस्टिंग फिचर पण बघायला मिळणार आहे. तसेच हे मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ करणे ही खूप सोपे आहे.
मायक्रोवेव्ह ओव्हनचे फायदे – तोटे
मायक्रोवेव्ह ओव्हनचे फायदे
Benefits of Microwave Oven
- मित्रांनो, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जेवण बनवणे हे गॅस स्टोव्ह वर करण्यापेक्षा सोपे आणि कमी वेळ लागणारे आहे.
- मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जेवण बनवतांना कमी तेल लागते, त्यामुळे ओव्हन मध्ये जेवण बनवणे आरोग्यास चांगले आहे.
- मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जेवण बनवताना कमी भांडी लागतात.
- मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जेवण लवकर गरम होते तसेच पुन्हा अन्न गरम करण्यासाठी कमी वेळ लागतो.
- मायक्रोवेव्ह मध्ये जेवण बनवणे जितके सोपे आहे तितकेच ते साफ करणे ही सोपे आहे.
- तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जेवण डिफ्रॉस्ट (फ्रोझन फूड गरम) करणे ही खूप सोपे व कमी वेळेत होते.
- लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही मायक्रोवेव्ह ओव्हन चांगले आहे. कारण यात तुम्हाला चाइल्ड लॉक सिस्टीम देण्यात येते.
- मायक्रोवेव्ह मध्ये टाइमर सेटिंग व हिट सेटिंगचा ऑप्शन दिला जातो त्यामुळे तुम्ही हवा तो टाइम व हिटिंग पॉवर सेट करू शकता.
- मायक्रोवेव्ह ओव्हनचा अजून एक फायदा म्हणजे मायक्रोवेव्ह कमी ऊर्जा वापरतात म्हणून वीज बिल ही कमी येते.
- मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जेवण बनवताना ते जळत नाही. तसेच समान चव आणि पोषण असलेले अन्न आपल्याला मिळते.
मायक्रोवेव्ह ओव्हनचे तोटे
Disadvantages of Microwave Oven
- मित्रांनो तुम्हला जर काही कुरकुरीत पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन चा वापर करू शकत नाही. कारण मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम होते पण कुरकुरीत होत नाही.
- मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तुम्ही तळण्याचे पदार्थ म्हणजेच डिप फ्राय पदार्थ बनवू शकत नाही तसेच चपाती व रोटी पण बनवता येत नाही.
- मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जेवण बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे भांडी लागतात. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त खर्च होऊ शकतो.
- मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये शिजवलेल्या अन्नातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अन्न कोरडे होते. त्यामुळे सतत असे अन्न खाल्ल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.
मायक्रोवेव्ह ओव्हन ची काळजी कशी घ्यावी
How To Take Care Of Your Microwave
मित्रांनो, तुम्हाला जर मायक्रोवेव्ह ओव्हन जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्याची देखभाल करणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
- मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवताना तो मोकळ्या जागेत ठेवा. जर त्याच्या आजूबाजूला भिंत असेल तर भिंती पासून तीन चार इंच दूर ठेवा.
- तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन इलेक्ट्रिक सॉकेटच्या जवळ ठेवा जेणे करून त्याची वायर जास्त ताणली जाणार नाही.
- मायक्रोवेव्ह ओव्हन पाण्याजवळ किंवा गॅस शेगडी जवळ ठेवू नका. मायक्रोवेव्ह ओव्हन वर पाण्याचे शिंतोडे उडाल्या वर शॉर्ट सर्किट होऊ शकते. तसेच गरम होणाऱ्या वस्तू जवळ ठेवल्यास ओव्हनचा बाहेरचा पृष्टभाग गरम होऊन ओव्हनची डिझाइन खराब होऊ शकते.
- मायक्रोवेव्ह ओव्हन उत्तम प्रकारे चालू ठेवण्यासाठी त्याला नियमित पणे स्वच्छ केले पाहिजे. त्यासाठी मायक्रोवेव्ह पूर्ण पणे थंड झाल्यावर ओल्या कपड्याने पुसू शकता किंवा व्हिनेगर किंवा लिंबू वापरू शकता.
- मायक्रोवेव्हच्या आतला व बाहेरचा भाग डिशवॉशिंग लिक्विड ने स्वच्छ करू शकता. तसेच मायक्रोवेव्ह दुर्गंधी मुक्त करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि पाणी देखील वापरू शकता. ही सर्व साफ सफाई करताना हातमोजे घालावे.
- मायक्रोवेव्हचे नुकसान होऊ नये म्हणून मायक्रोवेव्ह मध्ये सूट होतील असेच भांडे वापरा.
- मित्रांनो मायक्रोवेव्ह ओव्हन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात काही पदार्थ गरम करू नये. जसे की मायक्रोवेव्ह मध्ये पाणी गरम करण्यास मनाई आहे. कारण जास्त पॉवर मुळे पाणी खूप गरम होते पण त्यात बुडबुडे येत नाही त्यामुळे काढताना पाणी किती गरम झाले याचा अंदाज येत नाही व तुम्हाला भाजू शकते.
- मित्रांनो, बऱ्याच जणांना मायक्रोवेव्हचे दार हाताच्या कोपऱ्याने बंद करायची सवय असते तसे करू नका. त्यामुळे मायक्रोवेव्हचे स्विच आणि दार ही खराब होऊ शकतात. आणि त्यांची दुरुसती करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे मायक्रोवेव्हचे दार हळुवार पणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो.
- तसेच मायक्रोवेव्ह चे दार उघडताना ते भिंतीला वगैरे धडकणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनच्या बाहेरच्या भागाला इजा होणार नाही.
- मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये अन्न न ठेवता तो चालू करू नका. त्यामुळे आतील भागाचे नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो.
- मायक्रोवेव्ह ओव्हनचा एखादा भाग बिघडला तर स्वतः दुरुस्त करू नका. एखादया सर्विस मॅनला बोलवा व दुरुस्त करून घ्या.
तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मायक्रोवेव्ह ओवन बद्दल बरीच माहिती जाणून घेतली. तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात तसेच भारतातील बेस्ट मायक्रोवेव ओवन पण आपण बघितले. तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल आणि जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद