किचन आणि बाथरूमसाठी बेस्ट एक्झास्ट फॅन्स | Best Exhaust Fan for Kitchen and Bathroom
नमस्कार मित्रांनो, आज आपण किचन, बाथरूम आणि इतर रूममध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्झास्ट फॅन बद्दल माहिती बघणार आहोत. तसेच सर्वात बेस्ट एक्झास्ट फॅन्स कोणते आहेत ते ही जाणून घेणार आहोत.
सर्वात पहिले एक्झास्ट फॅन्स (Exhaust Fans) म्हणजे काय ते जाणून घेऊ या
मित्रांनो, एक्झास्ट फॅन म्हणजे एक प्रकारचा फॅन आहे, ज्याचा उपयोग खोलीतील वास, धुळीचे कण, धूर, ओलावा म्हणजे आर्द्रता तसेच हवेतील इतर दूषित पदार्थ बाहेर काढून खोलीतील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर एक्झास्ट फॅन खोली तून गरम किंवा दूषित हवा बाहेर काढून आत मध्ये फ्रेश हवा ठेवण्यास मदत करतो.
एक्झॉस्ट फॅन (Exhaust Fan) खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
मित्रांनो, मार्केट मध्ये अनेक प्रकारचे, लहान, मोठे, कव्हर असणारे व नसणारे अशे एक्झॉस्ट फॅनचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. पण त्यातून तुमच्यासाठी कोणता योग्य राहील हे ठरवणे जरा कठीण काम असते. त्यासाठी तुम्हाला खाली हे खरेदी मार्गदर्शक दिले आहे. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल.
एक्झॉस्ट फॅन खरेदी करताना पुढील गोष्टी पहाव्यात…
1) एक्झॉस्ट फॅनमधील ब्लेड ची संख्या – मित्रांनो, बाजारात तुम्हाला दोन ब्लेड असणारे तसेच पाच ब्लेड असणारे पण एक्झॉस्ट फॅन्स दिसतील. तुम्हाला जर अधिक कार्यक्षम फॅन हवा असेल तर जेवढे जास्त ब्लेड असतील तेवढी चांगले कार्य तो एक्झॉस्ट फॅन करेल. म्हणजे कमी RPM वर चांगले काम होईल.
2) एक्झॉस्ट फॅनच्या ब्लेडची रचना – मित्रांनो, एक्झॉस्ट फॅनच्या ब्लेडची रचना म्हणजे ते ब्लेडस कोणत्या मटेरियल चे बनले आहे ते तपासून पाहणे. एक्झॉस्ट फॅन चे ब्लेडस हे प्लास्टिकचे किंवा इतर धातूचे किंवा लोखंडाचे पण बनलेले असतात. हे ब्लेडस जर धातूचे असतील तर कालांतराने त्यांना गंज लागू शकतो व नंतर ते चांगले काम करू शकणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही प्लास्टिक ब्लेड असलेले एक्झॉस्ट फॅन घेतले तर ते टिकाऊ पण असतात आणि त्यांना गंज पण लागत नाही. त्यामुळे शक्यतो प्लास्टिक ब्लेड असलेले च एक्झॉस्ट फॅन घ्यावे.
3) एक्झॉस्ट फॅन्सच्या आवाजाची पातळी – मित्रांनो, एक्झॉस्ट फॅन घेताना त्याच्या आवाजाची पातळी तपासणे खूप आवश्यक असते. काही एक्झॉस्ट फॅनचे मोटर्स हे जड असतात. त्यामुळे त्यांचा आवाज खूप येतो. या आवाजामुळे तुम्हाला तसेच घरातल्या लोकांना त्रास होऊ शकतो. म्हणून एक्झॉस्ट फॅन खरेदी करताना त्याच्या आवाजाची पातळी नक्की तपासून पहा.
4) आकार (Size) – मित्रांनो, एक्झॉस्ट फॅन घेताना तो तुमच्या भिंतीत व्यवस्थित बसु शकेल अश्याच आकाराचा एक्झॉस्ट फॅन खरेदी करा. बाजारात एक्झॉस्ट फॅनचे वेग वेगळे आकार उपलब्ध आहेत. तुमच्या इलेक्ट्रिशियन कडून जागेची साईझ मोजून मगच त्या साईझचा एक्झॉस्ट फॅन खरेदी करा.
5) CFM क्षमता – मित्रांनो, CFM म्हणजेच क्यूबिक पर मिनिट. आणि त्याद्वारे प्रति मिनिट किती एअर फ्लो होते ते बघितले जाते. एक्झॉस्ट फॅन ची CFM क्षमता जेवढी जास्त असेल तेवढं तो फॅन चांगला आहे, असे समजले जाते.शक्यतो 50 ते 100 CFM आणि 200 ते 300 स्वीप साईझ असलेले प्रोडक्ट मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या खोलीच्या आकार नुसार तुम्ही तो निवडू शकता.
6) एक्सटर्नल गार्ड (External Guard) – मित्रांनो, एक्सटर्नल गार्ड हे कोणत्याही एक्झॉस्ट फॅनचे एक खूप महत्त्वाचे फिचर आहे. या फिचरमुळे कुठलेही पक्षी किंवा पाल वगैरे घरात येऊ शकत नाही. तसेच बाहेरील धूळ घरात येण्यापासून ही हे एक्सटर्नल गार्ड प्रतिबंधित करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्झॉस्ट फॅन खरेदी कराल तेव्हा त्यात हे फिचर असेल याची खात्री करा.
7) वॉरंटी – मित्रांनो, तुम्ही घेत असलेल्या प्रोडक्ट वर वॉरंटी आहे की नाही, तसेच किती वॉरंटी आहे, हे तपासून बघणे खूप महत्त्वाचे आहे. साधारणपणे प्रोडक्ट वर एक वर्षाची किंवा दोन वर्षांची वॉरंटी मिळत असते. वॉरंटी शिवाय कोणतेही प्रोडक्ट खरेदी करू नये.
8) एक्झॉस्ट फॅनचा ब्रँड – मित्रांनो, ब्रँड हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचे खूप महत्त्व आहे. एक्झॉस्ट फॅन घेताना तो चांगल्या ब्रँडचा निवडा. खालच्या दर्जाचा एक्झॉस्ट फॅन घेतल्यास आगीचा धोका संभवू शकतो. म्हणून खरेदी करताना त्याचा ब्रँड चांगला आहे की नाही ते तपासून पहा.
भारतातील सर्वात चांगले एक्झॉस्ट फॅन्स
Best exhaust fans in india
1) ओरिएंट एक्झॉस्ट फॅन्स (Orient Electric Ventilator 200mm Exhaust Fan)
मित्रांनो, ओरिएंटचा हा एक्झॉस्ट फॅन घरात वापरण्यासाठी एक योग्य पर्याय आहे. हा एक्झॉस्ट फॅन पाच ब्लेड सह येतो. तसेच या फॅनचा वेग 1250 RPM आहे आणि एअर फ्लो 280 CFM आहे. याची संपूर्ण बॉडी ही प्लास्टिक ची असून याचे वजन ही कमी आहे. या फॅनची डिझाइन खूप चांगली आहे. तसेच याला एक शटर पण दिले आहे. ज्यामुळे बाहेरची धूळ वगैरे आत येत नाही. या एक्झॉस्ट फॅन ची किंमत ही अंदाजे 1250 रुपये पर्यंत असू शकते. आणि या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते.
2) उषा एक्झॉस्ट फॅन्स (Usha Crisp Air Exhaust Fan)
हा फॅन वजनाने खूप हलका आहे. तसेच या फॅनचा परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे. यात तुम्हाला पाच डिझाइन ब्लेडस मिळतात. तसेच यात तुम्हाला हाय सक्शन मोटर मिळते ज्याचा आवाज पण कमी येतो. आणि ही मोटर शंभर टक्के कॉपरची बनलेली आहे. तसेच यात तुम्हाला ऑटोमॅटिक बॅक शटर म्हणजे एक्सटर्नल गार्ड दिले आहे. जे बाहेरील डस्ट पार्टीकल्सला आत येण्यास प्रतिबंधित करतात. याची बॉडी पण ABS प्लास्टिक मटेरियल ची बनली आहे. जी रस्ट फ्री आहे.
फॅनचे स्पीड 1300 RPM आहे. या फॅन ची किंमत ही अंदाजे 1300 रुपयेच्या जवळपास असू शकते. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.
3) हॅवेल्स एक्झॉस्ट फॅन (Havells Ventil Air 230mm Exhaust Fan)
मित्रांनो, हा एक्झॉस्ट फॅन मेटल कन्स्ट्रकटेड आहे. तसेच याला पावडर कोटेड मेटॅलिक फिनिशिंग दिली आहे. तसेच या फॅनमध्ये तुम्हाला स्टीलचा बर्ड गार्ड दिला आहे, सोबतच 29 स्पोक्स आणि तीन डिझाइन मेटल ब्लेड दिले आहे. हे ब्लेडस ऐरोडायनामीकली (Aerodynamically) डिझाइन केले आहेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स देतात. या फॅनची मोटर पण पॉवर फुल आहे जे फक्त 40 वॅट ऊर्जा खर्च करते. तसेच या फॅनची आवाजाची तीव्रता ही खूप कमी म्हणजे फक्त 40 ते 45 DB इतकी आहे.
तसेच या फॅन चा स्पीड 1350 RPM आहे. या एक्झॉस्ट फॅन ची किंमत ही अंदाजे 1350 रुपये असू शकते. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.
4) लूमनस एक्झॉस्ट फॅन (Luminous Vento Deluxe 250mm Exhaust Fan)
मित्रांनो, स्टायलिश डिझाइनचे असे हे एक्झॉस्ट फॅन आहे. तसेच हाय क्वालिटी मटेरियलनी हा फॅन बनला आहे. तसेच याचे ब्लेड्स हे ऐरोडायनामीकली डिझाइन केले आहेत. जे खूप हाय स्पीड ने फिरतात (रोटेट) होतात. कमी व्होल्टेज मध्ये पण हे फॅन चांगला परफॉर्मन्स देते. यात तुम्हाला पाच ब्लेडस दिले आहेत जे पॉंलीप्रोपिलीनचे बनले आहेत. आणि खूप टिकाऊ आहेत.
या फॅनमध्ये तुम्हाला डस्ट प्रूफ शटर दिले आहे. या प्रोडक्ट ची किंमत ही अंदाजे 1230 रुपये असू शकते. व या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.
एक्झॉस्ट फॅन चे फायदे काय आहेत
- मित्रांनो एक्झॉस्ट फॅनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा फॅन रूम मधील आर्द्रता यसेच धूळ आणि दुर्गंधी पण कमी करतो.
- तुमच्या टॉयलेट तसेच किचन मधील वास ही खूप एक्झॉस्ट फॅन मुळे खूप कमी होऊ शकतो. टॉयलेट सारख्या ठिकाणी तुम्ही एअर फ्रेशनर वापरून वास कमी करू शकता पण एक्झॉस्ट फॅन फक्त दुर्गंधी कमी नाही करत तर ती पूर्ण पणे बाहेर काढतो.
- तसेच किचन मधील तिखट वास सुद्धा घरात पारू न देता एक्झॉस्ट फॅन बाहेर काढून टाकतो.
- एक्झॉस्ट फॅन खोलीतील उष्णता किंवा गरम हवा पण बाहेर काढून टाकतो. तसेच एअर कंडिशनर वापरण्याआधी एक्झॉस्ट फॅन चालू केल्यास तो खोलीतील गरम हवा बाहेर काढून टाकले व नंतर मग तुम्ही एसी लावू शकता. त्यामुळे गर्मीच्या दिवसात हा फॅन खूप फायदेशीर आहे.
एक्झॉस्ट फॅन चे तोटे
- एक्झॉस्ट फॅन हे वीजचा वापर करतात. त्यामुळे लाईट गेल्यास तुम्हाला एक्झॉस्ट फॅनचा वापर करता येत नाही.
- एकदा फिट केलेले एक्झॉस्ट फॅन परत हलवता येत नाहीत.
- एक्झॉस्ट फॅन जर व्यवस्थित इंस्टॉल केले गेले नाही तर गरम हवा घरातील इतर भागात जाऊ शकते.
- तसेच एक्झॉस्ट फॅन चुकीचा लावल्यास तो जास्त आवाज करू शकतो.
एक्झॉस्ट फॅन कधी बदलावे
मित्रांनो, एक्झॉस्ट फॅनची नियमित साफ सफाई केल्यास ते दीर्घकाळ टिकतात. पण ते कायमचे टिकू शकत नाही. बाथरूम मधील एक्झॉस्ट फॅन हे अंदाजे दहा वर्षे टिकू शकतील व किचन मधील एक्झॉस्ट फॅन हे पंधरा ते वीस वर्षे टिकू शकतील. त्यानंतर मात्र तुम्हला ते बदलावे लागेल. तसेच इलेक्ट्रिशियन कडून नियमित पणे म्हणजे वर्षातून एकदा तरी एक्झॉस्ट फॅनची तपासणी व फिटिंग चेक करून घ्यावी. व काही बिघाड असल्यास एक्झॉस्ट फॅन बदलून घ्यावे. आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण एक्झॉस्ट फॅन बद्दल ची बरीचशी माहिती जाणून घेतली. तसेच भारतातील सर्वात चांगले एक्झॉस्ट फॅन कोणते आहेत त्याबद्दल हि जाणून घेतले. तुमच्या घरात ही जर एक्झॉस्ट फॅन नसतील तर आजच लावून घ्या. त्यासाठी कोणते एक्झॉस्ट फॅन निवडायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल.
तसेच हा लेख जर तुम्हाला महत्त्व पूर्ण वाटला असेल किंवा आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद