Shop

सर्वात चांगले बीपी (BP) मशीन | Best BP (Blood Pressure) Monitor Machine in India

नमस्कार मित्रांनो, नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी महत्वाची माहिती आणली आहे. पण आज आपण आरोग्याला उपयोगी पडणाऱ्या BP मशीन बद्दल जाणून घेणार आहोत.

Best BP Monitor Machine information in Marathi

सर्वात पहिले BP मशीन म्हणजे नेमकं काय ? ते काय काम करते ? या बद्दल जाणून घेऊ या



मित्रांनो, BP म्हणजे ब्लड प्रेशर मशीन हे एक प्रकारचे उपकरण आहे जे रक्तदाब म्हणजे BP मोजण्यासाठी वापरले जाते. आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते.

BP मॉनिटर मशिन चे प्रकार

मित्रांनो, BP मॉनिटर मशीन चे दोन प्रकार असतात. एक ऑटोमॅटिक आणि दुसरे मॅन्युअल. डॉक्टर लोक BP च्या मशीनला स्फिग्मोमॅनोमिटर असे म्हणतात.

1) ऑटोमॅटिक – ऑटोमॅटिक बीपी BP मॉनिटर्स वापरण्यास अगदी सोपे असतात. याचा वापर घरातील मोठी कोणतीही व्यक्ती करू शकते. त्याचे फक्त एक बटन दाबले की एक मिनिटात रक्तदाब मोजला जातो. त्यात दिलेल्या डिजिटल डिस्प्ले वर तुम्ही तुमचा रक्तदाब किती आहे ते पाहू शकता.

2) मॅन्युअल – मॅन्युअल BP मॉनिटर्स हे फक्त प्रोफेशनल्स वापरू शकता. यामध्ये एक कफ (cuff) येतो जो हवेने फुगवता येतो, एक बल्ब जो प्रेशर तयार करण्यासाठी हवा पंप करतो आणि मोजमाप करणारे युनिट ज्याला मॅनोमिटर असे म्हणतात. हाताच्या दंडावर असलेल्या धमणी तून रक्त प्रवाह ऐकण्यासाठी वरील सर्व गोष्टीं शिवाय स्टेथोस्कोप ही गरजेचा असतो. हे सर्व मॅन्युअली ऑपरेट केले जाते, म्हणून फक्त प्रोफेशनल डॉक्टर किंवा नर्सेसच वापरू शकता. याशिवाय अप्पर आर्म कफ ब्लड प्रेशर मॉनिटर, रिस्ट माउंट ब्लड प्रेशर मॉनिटर, आणि फिंगर ब्लड प्रेशर मॉनिटर असे ही प्रकार आहेत.

सर्वात बेस्ट ब्लड प्रेशर (BP) मॉनिटर

चला तर बघुयात भारतातील सर्वात बेस्ट ब्लड प्रेशर (BP) मॉनिटर मशिन्स कोणते आहेत.



1) डॉ. ट्रस्टचे BP मॉनिट (Dr. Trust Dual Talking Automatic Digital BP Monitor)

मित्रांनो, डॉ. ट्रस्ट चे हे डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर तुम्हाला 2500 रुपये च्या आसपास मिळू शकते. ब्लड प्रेशर मॉनिटर करण्यासोबतच हे प्रोडक्ट तुमचे पल्स रेट आणि इर्रेगुलर हार्ट बिट पण मॉनिटर करते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यात तुमचे रिडींग स्टोअर करता येतात, जास्तीत जास्त दोन लोकांचे रीडिंग हे सेव्ह करून ठेवते व जास्तीतजास्त 120 रिडींग यात स्टोअर करून ठेवता येतात.

तसेच यात तुम्हाला USB कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी कनेक्टिव्हिटी पण मिळते. या ब्लड प्रेशर मॉनिटरचे सगळ्यात चांगले फ़ंक्शन म्हणजे यात तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश टॉकिंगचा ऑपशन मिळतो. म्हणजे तुमचे रिडींग हे दोन्ही भाषेमध्ये सांगितले जाते. तसेच याचे cuff साईझ पण चांगली आहे. कुठल्याही प्रकारच्या हातात हे सहज बसते. असे हे डॉ ट्रस्ट चे ब्लड प्रेशर मॉनिटर वापरण्यास पण खूप सोपे आहे.

Dr Trust Dual Talking Automatic Digital BP Monitor

2) डॉ. मोरपेन BP मॉनिट (Dr. Morepen Automatic Blood Pressure Monitor)

मित्रांनो, डॉ मोरेपनचे हे ब्लड प्रेशर मॉनिटर तुम्हाला 1500 रुपये पर्यंत मिळू शकते. हे BP मॉनिटर तुम्हाला रक्तदाब सोबतच तुमचे पल्स रेट आणि हार्ट बिट इर्रेगुलॅरिटी पण मॉनिटर करते. यात ही तुम्हाला दोन लोकांचे BP रिडींग घेता येईल, व या ब्लड प्रेशर मॉनिटर मध्ये 120 रिडींग स्टोअर करू शकता.

तसेच यात रिडींग स्टोरेज चे फ़ंक्शन पण आहे. याचे cuff साईझ ही कोणत्याही हाताला व्यवस्थित बसेल. यात तुम्हाला USB कनेक्टिव्हिटी नाही मिळत फक्त बॅटरी कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच यात तुम्हाला टॉकिंग चा ऑपशन मिळत नाही.

Dr Morepen Automatic BP Monitor

3) एल्को BP मॉनिटर (ELKO Automatic Digital BP Machine)

मित्रांनो, एलकोचे हे ब्लड प्रेशर मशिन तुम्हाला जवळ पास 1200 रुपये पर्यंत मिळू शकते. इतर प्रोडक्ट प्रमाणें यात ही तुम्हाला रक्तदाब मोजण्यासोबतच पल्स रेट, व हार्ट बिट इर्रेगुलॅरिटी पण मॉनिटर म्हणजे मोजले जाते. यात ही 120 रिडींग स्टोअर करून ठेवता येते व दोन लोकांचे रिडिंग सेव्ह करता येते. यात तुम्हला लांब cuff साईझ मिळते ही कोणत्याही हातावर फिट बसेल. तसेच यात तुम्हाला रिडींग म्हणजे मेमरी स्टोरेज चे फंक्शन पण मिळते.

सोबतच यात फक्त तुम्हाला बॅटरी कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच जर तुमच्या मॉनिटर ची बॅटरी कमी असेल तर ते सांगण्यासाठी तुम्हाला यात लो बॅटरी इंडिकेटर चा ऑपशन दिला आहे. सोबतच यात WHO इंडिकेटर पण दिले आहे. म्हणजे तुमचा रक्तदाब WHO ने निर्धारित केलेल्या रिडींग पेक्षा जास्त आले तर हे फ़ंक्शन तुम्हाला इंडिकेशन देते की तुमचे ब्लड प्रेशर वाढले आहे.

ELKO Automatic Digital BP Machine

4) Beurer BP मॉनिटर (Beurer Automatic Upper Arm Blood Pressure Monitor)

मित्रांनो, या ब्लड प्रेशर मॉनिटर ची किंमत ही 1500 रुपये पर्यंत मिळू शकते. या मॉनिटर मध्ये तुम्ही रक्तदाब सोबतच पल्स रेट पण मॉनिटर करू शकता. या प्रोडक्ट मध्ये ही तुम्हाला मेमरी स्टोरेजचा ऑपशन मिळतो तसेच दोन लोकांचे 120 रिडींग यात स्टोअर करता येतात. यात तुम्हाला फक्त बॅटरी कनेक्टिव्हिटी मिळते, व लो बॅटरी इंडिकेटर चे फ़ंक्शन सुद्धा यात दिले आहे. यात दिलेले cuffs हे कोणत्याही हातावर व्यवस्थित बसू शकतात.

Beurer Automatic Upper Arm Blood Pressure Monitor

5) Vandelay BP मॉनिटर (Vandelay Fully Automatic Wrist BP Monitor)

मित्रांनो, Vandelay चे हे BP मशीन तुम्हाला रिस्ट म्हणजे तुमच्या मनगटावर लावायचे आहे. याचे फीचर्स बघायचे झाले तर यात तुम्हाला रक्तदाब शिवाय पल्स रेट आणि इर्रेग्यूलर हार्ट बिट पण मॉनिटर करते. तसेच यात ही तुम्हाला मेमरी स्टोरेज चा फंक्शन मिळतो. यात मात्र दोन लोकांसाठी 99 रिडींग स्टोअर केले जातात.

यात तुम्हाला फक्त बॅटरी कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच यात दिलेले cuff हे ऍडजस्टेबल असल्याने कोणत्याही हातात व्यवस्थित फिट बसते. सोबतच यात ही तुम्हाला WHO इंडिकेटरचे फंक्शन देण्यात आले आहे. या प्रोडक्ट ची किंमत तुम्हाला ही अंदाजे 1700 रुपये पर्यंत मिळू शकते.

Vandelay Fully Automatic Wrist BP Monitor

ब्लड प्रेशर मॉनिटर मशीन खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

योग्य कफ (cuff) आकार – मित्रांनो, तुम्ही जे BP मॉनिटर खरेदी करत आहात ते तुमच्या हाताच्या दंडावर किंवा मनगटावर व्यवस्थित बसते आहे का ते चेक करून घ्या. ते जर व्यवस्थित बसले नाही तर चुकीचे रिडींग दाखवेल.

वॉरंटी आणि किंमत – अश्या उपकरणं बद्दल आपल्याला जास्त माहिती नसते, त्यामुळे दुकानदार आपल्याला खोटी किंमत सांगून जास्त पैसे घेऊ शकता. त्यामुळे खरेदी करण्याआधी तीन चार ठिकाणी चौकशी करा. म्हणजे तुम्हाला त्याची योग्य किंमत कळेल. तसेच त्या प्रोडक्ट ला वॉरंटी आहे की नाही व ती किती आहे हे सुद्धा चेक करून पहा.

रिडींग सेव्ह करणारे BP मॉनिटर म्हणजे मेमरी स्टोरेज BP मॉनिटर्स – मित्रांनो ,आजकाल जवळ जवळ सगक्याच डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर्स मध्ये रिडींग सेव्ह करायचे फंक्शन दिलेले असते. तुमच्या घरात एक पेक्षा जास्त जणांना जर हायपर टेन्शनचा त्रास असेल तर हे फंक्शन तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अनेकांनी वापरले तरी प्रत्येकाचे रिडींग हे मॉनिटर सेव्ह करून ठेवते. तेव्हा तुम्ही जो BP मॉनिटर घेत आहात त्यात हे फंक्शन आहे की नाही ते चेक करून घ्या.

इर्रेगुलर (Irregular) BP डिटेक्टर – मित्रांनो, तुम्ही घेत असलेले ब्लड प्रेशर मॉनिटर BP मोजण्या बरोबरच हार्ट बिट मधील इर्रेग्यूलॅरिटी पण सांगते की नाही ते ही चेक करून घ्या, कारण नवीन तंत्रज्ञान मुळे अनेक BP मॉनिटर्स मध्ये ही सुविधा पण असते.

अँड्रॉइड किंवा iOS शी लिंक करणारे BP मॉनिटर्स – मित्रांनो, काही ब्लड प्रेशर मॉनिटर्स ब्लुटूथ वापरून तुमच्या अँड्रॉइड किंवा iOS शी वायरलेस पध्दतीने लिंक केले जाऊ शकता. त्यामुळे सगळा डेटा एका ठिकाणी सेव्ह केला जाऊ शकतो. तेव्हा तुम्ही घरात असलेल्या ब्लड प्रेशर मॉनिटर मध्ये हे फ़ंक्शन आहे का ते तपासून बघा.

तसेच तुम्ही जो BP मॉनिटर घेत आहात तो क्लीनिकली अप्रुव्ह (Clinically approved) आहे की नाही ते ही तपाऊन पहा. नाहीतर ते चुकीचं रिडींग दाखवेल.

BP (ब्लड प्रेशर) मशीन वापरण्याचे काय फायदे आहेत

  • ब्लड प्रेशर मॉनिटर मशीन वापरणे खूप सोपे आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याचे ब्लड प्रेशर मोजणे शक्य होते.
  • तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर चे रिडींग हे मॉनिटर मध्ये स्टोअर करून ठेवता येतात.
  • या मशीनमुळे तुमच्या ब्लड प्रेशर मधील चढ उतार वेळेत लक्षात येतात. व त्यानुसार तुम्ही तुमच्या डॉक्टर चे मार्गदर्शन घेऊ शकता.
  • हे मशीन मार्केट मध्ये तसेच ऑनलाईन ही उपलब्ध होतात. तसेच याचा मेंटेनन्सचा खर्च ही नगण्य आहे.
  • हे मशीन पोर्टेबल आणि कॉम्पॅक्ट साईझ चे असल्याने ते तुम्ही कुठेही नेऊ शकता.

BP (ब्लड प्रेशर) मशीन वापरण्याचे तोटे काय आहेत?

  • ब्लड प्रेशर मॉनिटर मशिन्स हे खूप महाग असतात. सामान्य माणसाला परवडण्या सारखे नसतात.
  • ब्लड प्रेशर मॉनिटर हे खूप संवेदनशील व नाजूक उपकरण आहे. त्यात बिघाड किंवा तुटल्यास दुरुस्त करणे कठीण आहे.
  • मित्रांनो, कुठलेच मशीन 100 टक्के बरोबर नसतात. त्यामुळे प्रत्येक वेळी यावर अवलंबून न राहु नका, हे मशीन कधी कधी चुकीचे रिडींग ही दाखवू शकतो. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये डॉक्टर कडून महिन्यातून एकदा तरी मॅन्युअल पध्दतीने ब्लड प्रेशर चेक करून घ्यावे.

मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्लड प्रेशर मशीन हे जास्तीत जास्त दोन किंवा तीन वर्षे टिकतात. त्यानंतर मात्र तुम्हाला त्याची ऍक्युरसी चेक करून घ्यावी लागेल. ते अचूक चालत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला तुमचे BP मशीन बदलावे लागेल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ब्लड प्रेशर मॉनिटर मशीन बद्दल माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख व ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!