Check Maharashtra RTO FineMaharashtra 2 - 4 Wheeler E-Challan CheckMaharashtra Traffic ChallanNo Parking E-Challan CheckParivahan

गाडीचे RC Book हरवले/खराब झाले असेल तर, घरात बसून ऑनलाईन मागावा (5 मिनिटात) | डुप्लीकेट RC Book तयार करणे

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या लेखात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गाडीसाठी महत्वाच्या RC बुक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Apply Duplicate RC Book Maharashtra

मित्रांनो, तुमच्याकडे तुमचे स्वतःचे वाहन असेल तर त्या वाहनांची सगळी कागदपत्रे ही तुमच्या जवळ असायला हवीत. कधी कधी वाहतूक पोलीस वाहनांची चेकिंग करताना तुमच्याकडे वाहनांच्या या कागदपत्रांची मागणी करू शकतात. आणि अश्या वेळेस जर तुमच्या कडे कागदापत्र नसतील तर मात्र तुम्हाला दंड भरावा लागतो. त्यामुळे वाहन संबंधी कागदपत्रं ज्यात तुमचे ड्राइविंग लायसन्स, आरसी बुक (RC Book) ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्या जवळ असणे खूप महत्वाचे आहे. त्यातल्या त्यात आरसी बुक (RC Book) हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे.



मित्रांनो, आरसी बुक (RC book) म्हणजे वाहन नोंदणी प्रमाणपत्र. यामध्ये असलेल्या नंबर द्वारे तुम्ही त्या वाहनाची सर्व माहिती पाहू शकता किंवा मिळवू शकता. यात गाडीच्या मालकाचे नाव, नोंदणीची तारीख, या वाहनाने कधी अपघात झाला आहे का, अश्या सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकतो. तसेच वाहन कोणत्या RTO चे आहे हे देखील समजते. तुम्ही नवीन वाहन खरेदी केल्या नंतर RTO विभाग तुमच्या वाहनाची नोंदणी तुमच्या नावावर करून देते. आणि महिन्या भरात वाहनाचे आरसी बुक तुमच्या दिलेल्या पत्त्यावर येते. हा लेख महत्वाचा ऐवज असल्याने तो नेहमी गाडी सोबतच ठेवायला हवा. पण जर कधी हे RC बुक हरवले किंवा खराब झाले तर काय करावे असा प्रश्न पडतो. पण आता चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही ऑनलाईन तुमचे दुसरे आरसी बुक मिळवू शकता. ते कसे ? चला तर मग जाणून घेऊ या…

RC बुक ऑनलाईन घरी मागवा

RC बुक हरवले किंवा खराब झाले तर अश्या प्रकारे ऑनलाईन काढू शकता

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हला parivahan.gov.in या वेबसाईट वर यायचे आहे. त्या नंतर वेब साईटच्या होम पेज वर थोडं खाली Vehicle Registration असा ऑप्शन दिसेल, त्यात More या बटन वर क्लिक करायचे आहे.

परिवहन वेबसाईट => parivahan.gov.in

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 1

स्टेप 2: त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हला तुमचे राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे.



Apply Duplicate RC Book Maharashtra Step 2

स्टेप 3: त्या नंतर पुढच्या पेज वर डाव्या बाजूला एक बॉक्स दिसेल तिथे तुम्हाला Vehicle Registration No. असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुमच्या गाडीचा रेजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे. त्या नंतर खाली Proceed या बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 3

स्टेप 4: या नंतर एक नवीन पेज वर वरच्या बाजूला Services असा ऑप्शन दिसेल. यावर क्लीक केल्यावर तुम्हला काही ऑपशन्स दिसतील. त्यापैकी RC Related Services या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर अजून काही ऑप्शन दिसतील त्यातील पहिल्या ऑप्शन वर म्हणजे Apply Transfer of Ownership, Change of Address, Duplicate RC या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 4

स्टेप 5: या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर लिहिलेला दिसेल. त्या खाली तुम्हाला chassis नंबर पण टाकायचा आहे. हा नंबर टाकताना फक्त शेवटचे पाच नंबर्स टाकायचे आहेत. व नंतर Verify Details वर क्लिक करायचे आहे.

(Chassis नंबर हा टू व्हिलर च्या हँडल जवळ असतो. आणि फोर व्हिलर च्या खाली असतो.)

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 5

स्टेप 6: आता तुम्हाला Authenticate Yourself (म्हणजेच तुमची ओळख पटवणे) मध्ये दोन ऑप्शन दिसतील.

  1. मोबाईल नंबर OTP (Using Mobile OTP)
  2. आधार नंबर (Using Aadhaar)
Apply Duplicate RC Book Maharashtra Step 6

स्टेप 7: या पैकी मोबाईल OTP (पर्याय 1) हा ऑपशन सिलेक्ट केला तर इथे तुम्हला तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे चार डिजिट दिसतील. मोबाईल नंबर बरोबर असेल तर Generate OTP या बटन वर क्लीक करून OTP मिळवू शकता.

पण जर तुम्हाला आधार हा पर्याय निवडचा असेल तर तुम्हाला आधार Authentication साठी मोबाईल नंबर आधारला लिंक असायला हवा. व नंतर त्याच्या साहाय्याने OTP घेऊ शकता.

तर समजा तुम्ही मोबाईल नंबर OTP पर्याय निवडला तर मोबाईल नंबर वर OTP येईल तो Enter OTP बॉक्स मध्ये टाकायचा व Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 7

स्टेप 8: आता नवीन पेज वर तुम्हाला Application Entry Form दिसेल. त्यात तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी Duplicate RC हा ऑप्शन निवडायचा आहे. त्या नंतर खाली तुम्हला डुप्लिकेट RC का हवे आहे याचे कारण विचारले जाईल. तर इथे Lost, Theft, Torn , Other असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी एक सिलेक्ट करायचे आहे.

जर तुम्ही Lost ऑप्शन निवडला म्हणजे जर तुमचं आरसी हरवले असेल तर खाली तुम्हाला FIR नंबर, FIR DATE आणि POLICE Station चे नाव अशी माहिती टाकावी लागेल. म्हणजे तुमचं RC बुक हरवल्यास तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवावी लागेल.

तसेच जर तुम्हाला कोणतीही माहिती टाकायची नसेल तर Torn म्हणजे तुमचे RC बुक फाटलंय असे कारण सिलेक्ट करा.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 8

स्टेप 9: आता तुम्हाला पुढच्या पेज वर Fee panel मध्ये डुप्लिकेट आरसीसाठी काही फी लागणार आहे. त्यात तुम्हला

  • Issue of duplicate RC चे 150 रुपये,
  • Postal फी 50 रुपये
  • तसेच smart card RC पण मिळते त्याची फी 200 रुपये.

असे एकूण 400 रुपये द्यावे लागतील. त्या नंतर Save As Draft या बटन वर क्लिक करून Ok करायचे आहे.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 9

स्टेप 10: आता तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल त्यासाठी Pay Now या बटन वर क्लिक करायचे आहे. त्यासाठी दिलेल्या टर्म्स आणि कँडीशन्स ऍक्सेप्ट करून Confirm Details बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 10

स्टेप 11: त्या नंतर तुम्हाला Payment Gateway विचारले जाईल. आम्ही इथे SBIePay पर्याय निवडत आहोत. यात तुम्ही कोणत्याही कार्ड, UPI ने पेमेंट करु शकता. आता टर्म्स आणि कँडीशन्स ऍक्सेप्ट करून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 11

स्टेप 12: आता पेमेंट करताना तुम्ही कसा करणार आहात ते सिलेक्ट करायचे आहे. म्हणजे इंटरनेट बँकिंग, डेबिट/ क्रेडिट कार्ड, भीम यूपीआई, वगैरे. या पैकी एक मेथड सिलेक्ट करून पेमेंट करायचा आहे. त्यानंतर तुमची पेमेंट स्लिप येईल. या पेमेंट स्लिपची प्रिंट/स्क्रीन शॉट काढून ठेवायची आहे. व काही दिवसातच पोस्टाने तुम्हाला तुमचे RC बुक व Smart Card भेटून जाईल.

Apply Duplicate RC Book Maharashtra Step 12

तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आरसी बुक हरवल्यास किंवा खराब झाल्यास ते ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून कसे मिळवावे या बद्दल जाणून घेतले. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख महत्त्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!