Subscription Plans

डिझनी प्लस हॉटस्टार प्लॅन्स 2023: किंमत, फायदे, ऑफर्स | Disney Plus Hotstar Subscription Plans 2023

नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझनी प्लस हॉटस्टार च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत. यात आपण प्लॅन ची किंमत, त्याचे फायदे, ऑफर, वैधता या सर्वांबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, Disney plus Hotstar हे सध्या देशातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म पैकी एक प्लॅटफॉर्म आहे. डिझनी + हॉटस्टार हे नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ या देशातील इतर दोन ओटीटी प्लॅटफॉर्म पेक्षा जास्त लोकप्रिय आहे. पूर्वी याला OTT Hotstar म्हणून ओळखले जात होते. पण आता Disney सोबतच्या पार्टनरशिप नंतर त्याचे नाव Disney+ Hotstar (डिझनी प्लस हॉटस्टार) असे ठेवण्यात आले. डिझनी, मार्वल, पिक्सर यां सारखे ओरिजिनल कन्टेन्ट या प्लॅटफॉर्म वर ऑफर केले जातात. Disney+ Hotstar देशातील सर्वात जास्त परवडणारी OTT प्लॅन्स ऑफर करते.



Disney plus Hotstar plan information in marathi

मित्रांनो, डिझनी प्लस हॉटस्टार या प्रसिद्ध स्ट्रीमिंग सेवेमध्ये तुम्ही HBO, Fox आणि Showtime सारख्या सुप्रसिद्ध स्टुडिओ मधील शेकडो चित्रपट आणि शो तसेच आशियाई कप, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL, फॉर्म्युला 1, विम्बल्डन यांसारख्या क्रिकेट आणि सॉकर सारख्या असंख्य लाइव्ह स्पोर्ट्स चा आनंद लुटू शकता. या शिवाय डिझनी प्लस हॉटस्टार ही सबस्क्रिप्शन आधारित स्ट्रीमिंग सेवा अनेक भाषां मध्ये चित्रपट, टीव्ही शो, स्पोर्ट्स आणि लाइव्ह चॅनेल सह अनेक कन्टेन्ट ऑफर करते. तसेच यूएस, कॅनडा, यूके आणि भारत यांसारख्या अनेक देशांमध्ये डिझनी प्लस हॉटस्टार ही स्ट्रीमिंग सेवा उपलब्ध आहे. मित्रांनो, हॉटस्टार च्या प्लॅन्सची किंमत ही तुम्ही ज्या कन्टेन्ट मध्ये प्रवेश करू इच्छिता त्यानुसार ठरवली जाते. त्यामुळे हॉटस्टार चे कोणते सबस्क्रिप्शन प्लॅन निवडायचे हे जर तुम्हाला कळत नसेल तर काळजी करू नका. या लेखात आम्ही तुम्हाला हॉटस्टार च्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही योग्य तो प्लॅन निवडू शकाल. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Best Disney plus Hotstar Subscription Plans

डिझनी प्लस हॉटस्टार चे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स

मित्रांनो, आपल्या भारतात डिझनी प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅन्स हे तीन प्रकार मध्ये उपलब्ध आहेत: मोबाइल, सुपर आणि प्रीमियम (Mobile, Super, व Premium). या सर्व प्लॅन्स मध्ये कन्टेन्ट कॅटलॉग (सर्व व्हिडीओ) सारखाच असला तरी, त्यांच्या किंमती, स्क्रीन सपोर्ट आणि रिझोल्यूशनच्या बाबतीत भिन्न आहेत. चला तर मग डिझनी प्लस हॉटस्टार च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स वर एक नजर टाकूया.

Disney plus Hotstar subscription plans mahiti

डिझनी प्लस हॉटस्टार मोबाईल प्लॅन (Disney Plus Hotstar Mobile Plan)

मित्रांनो, डिझनी प्लस हॉटस्टारचा हा एक सर्वात बेसिक प्लॅन आहे. हा प्लॅन फक्त मोबाइल फोन वर किंवा टॅब्लेट वरच चालवता येऊ शकतो. आणि याची व्हिडीओ क्वालिटी HD 720p मध्ये मिळते. हे प्लॅन तुम्हाला मल्टिप्लेक्स ब्लॉकबस्टर, डिझनी प्लस ओरिजिनल्स, हॉटस्टार स्पेशल, लाइव्ह स्पोर्ट्स याशिवाय बरेच कन्टेन्ट ऑफर करते. परंतु डिझनी प्लस हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन एका वेळी फक्त एका स्क्रीनला सपोर्ट करते. तसेच हा प्लॅन पूर्ण पणे जाहिरातमुक्त आहे फक्त लाइव्ह स्पोर्ट्स मध्ये जाहिरात दिसतील.

मित्रांनो, डिझनी प्लस हॉटस्टारच्या किंमती बद्दल सांगायचे झाले तर डिझनी प्लस हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन दोन स्तरांमध्ये उपलब्ध आहे: तीन महिन्यांसाठी आणि वार्षिक. 3 महिन्यांसाठी प्लॅनची किंमत रू 149 आहे तर वार्षिक फी रू 499 इतकी आहे. याशिवाय डिझनी प्लस हॉटस्टार मोबाइल मासिक आणि सहामाही प्लॅन्स ची चाचणी घेत आहेत.



हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन एकट्या माणसासाठी जो एकाच मोबाइल वर हॉटस्टार बघणार आहे त्यासाठी योग्य राहील.

डिझनी प्लस हॉटस्टार सुपर प्लॅन (Disney Plus Hotstar Super Plan)

मित्रांनो, Disney Plus Hotstar Super सबस्क्रिप्शन प्लॅन ची किंमत रु 899 प्रति वर्ष इतकी आहे. हे सुपर सबस्क्रिप्शन प्लॅन स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही सारख्या कोणत्याही डिव्हाइस वर कार्य करते. तसेच हे प्लॅन दोन स्क्रीनला सपोर्ट करते. आणि महत्वाचे म्हणजे यात व्हिडिओ रिझोल्यूशन 1080p (FHD) आहे आणि या प्लॅन मध्ये हि तुम्ही स्टिरिओ साउंड चा आनंद घेऊ शकता. तसेच या प्लॅनचा कन्टेन्ट वरच्या मोबाइल प्लॅन प्रमाणेच आहेत.

हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन थोट्या कुटुंबासाठी जे एकावेळी 2 (मोबाईल, TV, लॅपटॉप) डिव्हाईस वर हॉटस्टार बघणार आहे त्यासाठी योग्य राहील. आणि ज्या लोकांना व्हिडीओ हाय क्वालिटी मध्ये बघणे आवडते त्यांच्यासाठी.

डिझनी प्लस हॉटस्टार प्रीमियम प्लॅन (Disney Plus Hotstar Premium Plan)

मित्रांनो, टीव्हीसाठी हा एक बेस्ट प्लॅन आहे. तसेच Disney Plus Hotstar Premium सबस्क्रिप्शन प्लॅन तुम्हाला एकाच वेळी चार उपकरणांवर 4K कन्टेन्ट स्ट्रीम करण्याची परवानगी देते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही प्लॅन निवडू शकता. यात मिळणारी व्हिडीओ क्वालिटी ही 4K 2160p इतकी मिळते, ज्याचा तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकता. तसेच हा प्लॅन पूर्ण पणे जाहिरातमुक्त आहे.

या प्लॅन ची किंमत प्लॅनची ​​किंमत रू 299 प्रति महिना आणि रू 1499 प्रति वर्ष इतकी आहे.

हा प्लॅन कोणी घ्यावा: हा प्लॅन मोठ्या कुटुंबासाठी जे एकावेळी 4 (मोबाईल, TV, लॅपटॉप) डिव्हाईस वर हॉटस्टार बघणार आहे त्यासाठी योग्य राहील. आणि ज्या लोकांकडे मोठा स्मार्ट टीव्ही आहे आणि ज्यांना हाय क्वालिटी मध्ये व्हिडीओ बघणे आवडते त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे.

Disney Plus Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन: किंमत, फायदे, वैधता

Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन्सवैधताफायदे
प्रिमियम प्लॅनप्रति महिना: रू 299
वार्षिक: रू 1499
– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– हॉटस्टार स्पेशल शो, चित्रपट
– टीव्ही शो, जाहिरातमुक्त
– अमेरिकन टीव्ही शो
– 4K 2160p रिझोल्यूशन
– एका वेळी 4 स्क्रीनला सपोर्ट
सुपर प्लॅनवार्षिक: रु 899– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– हॉटस्टार स्पेशल शो, चित्रपट
– टीव्ही शो, जाहिरातमुक्त लाइव्ह स्पोर्ट्स उपवाद
– अमेरिकन टीव्ही शो
– Full HD 1080p रिझोल्यूशन
– एका वेळी 2 स्क्रीनला सपोर्ट
मोबाईल प्लॅन3 महिन्यांसाठी: रू 149
वार्षिक: रू 499
– लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल
– हॉटस्टार स्पेशल शो, चित्रपट
– टीव्ही शो, जाहिरातमुक्त लाइव्ह स्पोर्ट्स उपवाद
– अमेरिकन टीव्ही शो
– HD 720p रिझोल्यूशन
– एका वेळी 1 स्क्रीनला सपोर्ट

FAQ

डिझनी प्लस हॉटस्टार चे कन्टेन्ट डाउनलोड करता येतात का?

मित्रांनो, जर तो लाइव्ह शो असेल तर तुम्ही त्या कन्टेन्ट ला डाउनलोड करून ठेवू शकत नाही. लाइव्ह शो नसेल तर तुम्ही तुमच्या डिव्हाइस वर कोणताही Disney Plus Hotstar कन्टेन्ट डाउनलोड करू शकता. सहसा डाउनलोड ऑपशन हा मोबाइल आणि टॅबलेट मधेच उपलब्ध असतो, टीव्ही वर नाही.

डिझनी प्लस हॉटस्टार चे सबस्क्रिप्शन प्लॅन कॅन्सल करता येतात का?

नाही मित्रांनो, एकदा का प्लॅन खरेदी केला की डिझनी प्लस हॉटस्टार चे सबस्क्रिप्शन प्लॅन तुम्हाला कॅन्सल करता येत नाही. त्यामुळे सबस्क्रिप्शन प्लॅन घेताना योग्य विचार करून निवडा.

डिझनी प्लस हॉटस्टार मोबाईल किंवा सुपर वरून प्रीमियम वर अपग्रेड करता येऊ शकते का?

हो मित्रांनो, तुम्ही डिझनी प्लस हॉटस्टार मोबाइल किंवा सुपर सबस्क्रिप्शन प्लॅन मधून प्रीमियम प्लॅन मध्ये अपग्रेड करू शकता. पण यासाठी तुम्हाला प्रीमियम प्लॅनची रक्कम भरावी लागेल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण डिझनी प्लस हॉटस्टार च्या विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात आपण विविध प्लॅन्स सह त्यांची किंमत, वैधता आणि फायदे देखील बघितले. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!