BSNL चा Net balance, Talktime Balance, SMS कसा चेक करायचा ?
या ब्लॉग मध्ये आपण BSNL सिम चा इंटरनेट बॅलन्स, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स आणि प्रीपेड प्लॅनची वैधता कशी चेक करायचा ते पाहणार आहोत. आम्ही आपल्याला BSNL बॅलन्स चेक करण्याच्या चार पद्धती सांगणार आहोत, आपण आपल्या सोयीनुसार कोणतीही पद्धत निवडू शकता. मग चला तर बघुयात BSNL चा बॅलन्स कसा तपासायचा.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) हि भारतातल्या मोजक्या दूरसंचार कंपनीपैकी एक आहे, जिचे विविध प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. हि कंपनी सरकारी मालकीची असून देशातील प्रत्येक कान्याकोपर्यात याचे नेटवर्क उपलब्ध आहे. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि रिलायन्स जिओ प्रमाणे बीएसएनएल देखील ग्राहकांना त्यांचा यूएसएसडी कोड आणि अँपद्वारे बॅलन्स चेक करण्याची मुभा देते.
USSD कोड द्वारे BSNL बॅलेन्स कसा तपासावा ?
सर्वात प्रथम आपण आपल्या फोनवर डायलर (कॉल लावताना वापर करता ते अँप) उघडा, खालील कोड टाइप करा आणि कॉल बटण दाबा.
BSNL USSD कोड | कोड फायदा |
---|---|
*123# or *124*1# | मेन बॅलन्ससाठी |
*124*2# *123*10# or *123*1# or *123*6# | नेट बॅलन्ससाठी |
*123*2# | मिनिट बॅलन्ससाठी |
*124*10# | व्हिडिओ कॉल बॅलन्ससाठी |
- *1242# – BSNL नेट बॅलन्स आणि बुस्टर पॅक तपासण्यासाठी
- *123# – BSNL टॉकटाइम बॅलन्स तपासण्यासाठी
SMS द्वारे BSNL बॅलेन्स कसा तपासावा ?
- 123 या नंबर वर “BAL” हा मेसेज पाठवा
- STV (Special Tariff Vouchers) बॅलन्स चेक करण्यासाठी 123 या नंबर वर “STVENQ” हा मेसेज पाठवा
BSNL अँपद्वारे बॅलन्स कसा तपासावा ?
- गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल अॅप स्टोअर वरून My BSNL अँप डाउनलोड करा.
- अॅप उघडा आणि आपला BSNL मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा
- My Account वर क्लिक करून तुम्ही इंटरनेट बॅलन्स, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स आणि प्रीपेड प्लॅनची वैधता पाहू शकता.
बीएसएनएल ग्राहक सेवा क्रमांक –
- BSNL Landline – 198 / 1500
- BSNL CDMA – 1502
- BSNL GSM Mobile – 1503
बीएसएनएल तक्रार क्रमांक –
- 1800 180 1503 हा नंबर बीएसएनएल विषयी तक्रार नोंदवण्यासाठी वापरू शकता
- BSNL Fiber Complaint – 1500
- BSNL Broadband – 1504
या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…