पाठदुखीच्या त्रासाची कारणे आणि घरगुती उपाय | How To Get Rid Of Back Pain at Home
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण पाठदुखीच्या त्रासावर काय उपाय करता येतील या बद्दल जाणून घेणार आहोत.
मित्रांनो स्त्री असो किंवा पूरुष कोणत्या ही वयोगटातील व्यक्तीला पाठदुखीचा त्रास हा होऊ शकतो. अगदी शाळेत जाणारी मुलांची ही दप्तराच्या ओझ्याने पाठ दुखू शकते. महिलांची अनेक कामे ही शारीरिक हालचालींवर अवलंबून असतात, तसेच ऑफिस मध्ये तासंतास एकाच जागी बसून पाठ आखडते व नंतर पाठ दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. कधी कधी या कडे आपण दुर्लक्ष करतो किंवा वाटेल तो घरगुती उपाय केला जातो. पण घरगुती उपाय करण्या आधी तुमच्या पाठ दुखीचे नेमके कारण काय आहे ते तुम्हाला स्वतःला माहीत असणे आवश्यक असते. मगच तुम्ही योग्य उपाय करू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पाठ दुखीची कारणे व त्यावरील उपाय सांगणार आहोत.
सर्वात पहिले पाठ दुखीची कारणे काय आहेत ते जाणून घेऊ या
- मित्रांनो, कधी कधी जड वस्तू उचलल्याने सुद्धा पाठीत रग भरते किंवा चमक येते, त्यामुळे ही पाठ दुखू शकते. तसेच रात्री झोपेत चुकीच्या पोझिशन मध्ये झोपल्यास ही पाठीत चमक वगैरे भरू शकते व पाठ दुखी होऊ शकते.
- तसेच सारखे खाली वाकून काम केल्यास पाठीचे स्नायू वर ताण पडतो व त्यामुळे पाठ दुखीचा त्रास होतो.
- या शिवाय एखाद्या अपघातामुळे किंवा मैदानी खेळ खेळताना पडल्यावर पाठीत दुखू शकते.
- महिलांना मासिक पाळीच्या काळात पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो.
- तसेच गरोदरपणात जास्त वेळ बसल्याने किंवा जास्त वेळ चालल्याने पाठ दुखी होऊ शकते.
- एखादी वस्तू जोराने खेचणे किंवा उचलणे यामुळे ही पाठदुखी होऊ शकते. तसेच बराच वेळ ड्रायव्हिंग केल्याने किंवा कम्प्युटरवर तासंतास काम केल्याने ही पाठ दुखू शकते.
- चुकीच्या हालचाली केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने जास्त वजन उचलल्याने पाठीत चमक भरून पाठ दुखु शकते.
- तसेच मणक्याचा सर्वात खालचा भाग म्हणजे हर्निएटेड डिस्क, जर तो वाढलेला असेल तरी सुद्धा पाठीत दुखू शकते.
- याशिवाय वाढत्या वयासोबत पाठ दुखीच्या तक्रारी वाढू शकतात, आणि ही एक सामान्य गोष्ट आहे.
पाठदुखीच्या त्रासावर काही उपाय
- मित्रांनो, झोपताना मऊ गादीवर किंवा फोमच्या गादीवर झोपण्या ऐवजी लाकडी फळीवर, पलंगावर किंवा जमिनिवर एखादे अंथरून टाकून झोपावे. त्यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो. व पाठ दुखीचा त्रास होत नाही.
- मित्रांनो, पाठदुखी होऊ नये म्हणून तुमच्या दैनंदिन जीवनशैली मध्ये काही बदल करावे लागतील. जसे की, ऑफिस मध्ये किंवा कम्प्युटर वर काम करायला बसताना खुर्चीवर ताठ बसा, वाकून बसू नये. तसेच पाठीला उशीचा आधार घ्यावा. थोडया थोड्या वेळाने मान उजवीकडे व डावीकडे फिरवावी. यामुळे पाठ दुखत नाही. तसेच थोडा वेळ ब्रेक घ्यावा व पाय मोकळा करावा म्हणजे थोडे चालावे.
- ज्यांना पाठीच्या खालच्या भागात दुखतो त्यांनी शक्यतो एका कुशीवर झोपावे. तसेच पाठवर झोपताना गुडघ्याखाली उशी घ्यावी, यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
- तुम्हाला जर तुमची पाठ निरोगी ठेवायची असेल तर रोज पंधरा ते वीस मिनिटं चालण्याची सवय करा. चालताना ही मान, पाठ ताठ ठेवून दोन्ही हात हलवत चालावे.
- तसेच वजन उचलताना ही विशेष काळजी घ्यावी. वजन उचलताना ते शक्यतो शरीराजवळ तसेच कमरेजवळ धरावे. वजन उचलताना पाठीत जास्त न वाकता पायांच्या स्नायूंवर जास्त जोर द्यावा व वजन उचलावे.
- मित्रानो, पाठदुखीचे अजून एक कारण जास्त ड्रायव्हिंग करणे हे सुद्धा आहे. कारण रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्यांना जास्त धक्के बसून त्रास होतो. त्यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीत दुखते. असे होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जसे की, कार चालवत असताना टेकून बसावे व सीट बेल्ट अवश्य लावावा. बसताना पाय पूर्णपणे जमिनी वर टेकतील अश्या पद्धतीने बसावे.
- मित्रांनो पाठ दुखी किंवा कंबर दुखीचा त्रास होऊ नये यासाठी चप्पल्स निवडतानाही काळजीपूर्वक निवडावी चपलांना शक्यतो हिल्स नसावी. फ्लॅट चप्पल किंवा सँडल वापरल्याने मणक्यांवर जास्त ताण पडत नाही आणि पर्यायी पाठदुखी होत नाही.
- मित्रानो, सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडावेळ बसून शेक घ्यावा. यामुळे ही पाठदुखी मध्ये बराच फायदा होतो.
- पाठ दुखत असताना कोणतीही जड असलेली किंवा वजनदार वस्तू उचलू नका. तसेच पाठ दुखत असेल तर थोडा आराम करावा. त्यामुळे पाठीचे स्नायू शिथिल होतात व दुखण्या पासून आराम मिळतो.
- पाठ दुखी जास्त होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार काही व्यायामाचे प्रकार करा. तसेच डॉक्टर ला विचारल्या शिवाय कोणतीही औषधे घेऊ नये.
- तसेच हलक्या हाताने मालिश केल्यास किंवा कोमट पाण्याच्या पिशवीने शेक दिल्यास ही पाठ दुखी मध्ये थोडा आराम मिळतो. फक्त कुणाकडून पायाने किंवा टाचेने पाठ तुडवू नये.
- पाठीचे दुखणे असणाऱ्या व्यक्तींनी पोटावर झोपू नये. तसेच बसताना कुबड काढून बसू नये.
- पाठीचे दुखणे असणाऱ्या व्यक्तींनी नेहमी कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. तसेच पाठ दुखीचा त्रास जर चार दिवसांपेक्षा जास्त राहिला तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच एखाद्या फिझिओथेरपिस्ट कडे जाऊन ही योग्य ते व्यायाम प्रकार केल्याने पाठ दुखी थांबते.
- तसेच शरीराने जाड असणाऱ्या व्यक्ती किंवा अति चरबीमुळे किंवा पोट पुढे आल्यामुळे ही पाठीवर ताण पडतो. त्यामुळे चरबी कमी करणारे व्यायाम करावे, यामुळे तुम्हाला पाठ दुखीचा त्रास कमी होईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पाठदुखीच्या त्रासा वर काय काय उपाय करता येतील हे जाणून घेतले. तुम्हला किंवा तुमच्या घरात कोणालाही पाठ दुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे वरील उपाय नक्की करून बघा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाठदुखी वर जो काही उपचार कराल तो डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच करा.
तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पुर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।