Aadhaar Card ला मोबाईल नंबर कसा Link करायचा ? | आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट करायचा ?
आधार कार्ड बनवताना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील लिंक केला जातो. पण काही कारणामुळे तुम्ही तो लिंक केला नसेल किंवा लिंक मोबाईल नंबर हरवला, बंद झाला असेल. तर नवीन मोबाईल लिंक कसा लिंक करायचा याची माहिती या ब्लॉग तुम्हाला दिली जाईल.
आपण ऑनलाइन मोबाइलला आधार कार्डला लिंक करू शकत नाही. पण ऑफलाइन, आपण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी आधार कार्डला लिंक करू शकतो. त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय आधारला मोबाईल नंबर लिंक होऊ शकतो. फक्त जाताना आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि लिंक करायचा मोबाईल घेऊन जा. केंद्रावर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरून तुमची ओळख तपासली जाते.
आधारला मोबाइल लिंक करण्याचा ऑफलाइन मार्ग –
- स्टेप 1: आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या
- स्टेप 2: जाताना आधार कार्डाची झेरॉक्स आणि मोबाइल घेऊन जा
- स्टेप 3: कर्मचारी तुम्हाला एक फॉर्म देईल त्यामध्ये तुमची माहिती भरा (नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, इ.)
- स्टेप 4: कर्मचारी तुमच्या मोबाईल वर OTP पाठवेल
- स्टेप 5: आता कर्मचारी तुमची फिंगरप्रिंट घेईल
- स्टेप 6: या सर्व प्रक्रियेनंतर ३ ते ४ दिवसात तुमचा मोबाईल नुंबर आधार कार्ड ला लिंक होईल
टीप: या प्रक्रियेला साधारण ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो. सरकारी नियमानुसार आधार सेवा केंद्राला ५० रुपये घ्यावेत असा नियम आहे.
FAQ
मोबाईल नंबरला आधार कार्डला जोडण्यासाठी किती खर्च आहे ?
आधार सेवा केंद्रावर या प्रक्रियेला साधारण ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो. सरकारी नियमानुसार केंद्राला ५० रुपये घ्यावेत असा नियम आहे.
आपण ऑनलाइन मोबाईल नंबर आधार जोडू शकतो का ?
सध्या तरी ऑनलाइन आधार कार्डला मोबाइल लिंक करण्याची कोणतीही तरतूद नाही. आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन मोबाईल लिंक करू शकता.
पोस्टपेड मोबाइल नंबर आधार कार्डला जोडला जाऊ शकतो का ?
हो, ज्या मोबाइल नंबर वर SMS येतो असा कोणताही मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडला जाऊ शकतो.
एक वेळी दोन पेक्षा जास्त मोबाइल नंबर आधार कार्डला लिंक केले जाऊ शकतात का ?
नाही, एक वेळी फक्त एकाच मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडला जाऊ शकतो.
या ब्लॉग बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…