Aadhaar CardGovernment Cards

आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे करायचे? | आधार कार्ड ऑनलाइन चेक करा

भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि एक भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड कडे पहिले जाते. त्याच बरोबर बँकेतील आर्थिक व्यवहारात हि आभार कार्ड ची खूप गरज भासते. थोडक्यात आधार एखाद्या व्यक्तीच्या पत्त्याचा आणि ओळखपत्राचा पुरावा आहे. तर आधार हा एक 12 अंकी क्रमांक आहे जो युनिक आयडेंटिफिकेशन थॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI ) जारी केला आहे.

आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे करायचे?

सध्या आधार कार्ड डाऊनलोड करणे खूप सोपे झाले आहे. UIDAI अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करता येते. याला ई-आधार देखील म्हणतात. मग चला तर बघूयात आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे करायचे?



आधार नंबरद्वारे आधार कार्ड डाउनलोड करा

स्टेप 1: प्रथम यूआयडीएआय uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ‘Download Aadhar‘ पर्याय निवडा

स्टेप 2: जर तुम्हाला वरील पर्याय सापडत नसेल तर या पेज ला भेट द्या eaadhaar.uidai.gov.in

स्टेप 3: या पेज वर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी चे तीन पर्याय उपलब्ध आहेत यातील Aadhaar Number टॅब वर क्लिक करा

स्टेप 4: तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा

स्टेप 5: कॅप्चा/Captcha कोड टाईप करा आणि ‘Send OTP‘ बटण वर क्लिक करा (आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल)



जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर हा ब्लॉग वाचा – Aadhaar Card ला मोबाईल नंबर कसा Link करायचा

तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा

स्टेप 6: आलेला OPT टाईप करा

स्टेप 7: नंतर ‘Verify And Download‘ वर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता

स्टेप 8: तुम्ही डाउनलोड केलेले आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड होईल आणि त्याला पासवर्ड असेल तो माहित करून घेण्यासाठी खालचा भाग वाच

OPT टाईप करा. नंतर 'Verify And Download' वर क्लिक करा

आधार कार्ड PDF पासवर्ड

तुम्ही जेव्हा ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करता तेव्हा त्या PDF ला पासवर्ड जोडलेला असतो तो पासवर्ड प्रत्येकासाठी वेगळा असतो, तर तो पासवर्ड काय आहे ते बघुयात

आधार कार्ड PDF चा पासवर्ड 8 अंकी/अक्षरी असतो.

आपल्या नावाची पहिली चार अक्षरे (आधार कार्ड वर असलेल्या नावानुसार) English CAPITAL Letters मध्ये आणि YYYY स्वरूपात असलेले जन्म वर्ष यांना एकत्र करून पासवर्ड तयार होईल.

उदा. तुमचे नाव Sachin Ramesh Tendulkar आहे आपले जन्म वर्ष 1973 आहे
आपला आधार कार्डचा पासवर्ड – SACH1973


या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!