फ्लाइट मोड म्हणजे काय ? फ्लाइट मोड कसा चालू करायचा
- फ्लाइट मोड म्हणजे काय ?
- फ्लाइट मोड कधी / कुठे वापरला जातो
- फ्लाइट मोड कसा चालू करायचा
- फ्लाइट मोड चालू करण्याचे फायदे
- फ्लाइट मोडचे तोटे
तुम्हाला माहित आहे का फ्लाइट मोड कशासाठी वापरला जातो आणि तो का चालू केला जातो, जर नसेल तर ही ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, या पोस्टमध्ये आपण फ्लाइट मोड म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत? फ्लाइट मोड कसा चालू करायचा आणि त्याचा उपयोग काय असतो ?
अनेक नवीन स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोबाईलच्या अनेक फीचरबद्दल माहिती नसते, फ्लाइट मोड हे असेच एक फीचर आहे, जे काहींसाठी खूप फायद्याचे आहे आणि काहींसाठी कमी फायद्याचे.
Flight Mode ला Airplane Mode देखील म्हणतात, परंतु याची माहिती नसल्यामुळे, आपण हे फीचर योग्यरित्या किंवा योग्य ठिकाणी वापरू शकत नाही, फ्लाइट मोडबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत त्याबद्दल आपण या पोस्ट मध्ये माहिती करून घेऊ.
फ्लाइट मोड म्हणजे काय ?
What is Flight Mode
फ्लाइट मोड हे एक मोबाइलचे फीचर आहे, जे तुमच्या मोबाईलच्या सर्व वायरलेस सेवा बंद करते. जसे कि सिम नेटवर्क, नेट कनेक्शन, WIFI, Bluetooth इत्यादी. फ्लाइट मोड चालू असताना तुम्ही फक्त WIFI चालू करू शकता बाकीच्या सर्व वायरलेस सेवांसाठी तुम्हाला फ्लाइट मोड बंद करावा लागतो.
फ्लाइट मोड कधी / कुठे वापरला जातो ?
बर्याच लोकांच्या मनात हा प्रश्न पडत असेल की फ्लाइट मोड कुठे आणि कधी वापरला जातो, शिवाय फ्लाइट मोडला एअरप्लेन मोड असेही म्हणतात, तर याचा विमानाशी काही संबंधित असतो का.
आपला मोबाईल नेहमी नेटवर्क टॉवरशी कनेक्ट राहण्याचा प्रयत करत असतो, जेणेकरून तुम्हाला अधिक चांगले नेटवर्क मिळू शकेल, जेव्हा तुम्ही विमानात बसता आणि टेक ऑफ करता तेव्हा मोबाईल आणि टॉवरमध्ये अंतर वाढत जाते त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क कमी होण्यास सुरुवात होते, त्यामुळे तुमचा मोबाईल टॉवरला कनेक्ट होण्यासाठी जास्तीचे संदेश पाठवतो.
अशा परिस्थितीत तुमचा आणि तुमच्या बरोबर असलेल्या सहप्रवासीच्या मोबाइलमुळे, विमानाच्या नेव्हिगेशन आणि ट्रान्समिशनमध्ये समस्या उद्भवू शकतात, म्हणून जेव्हाही तुम्ही विमानाने प्रवास करता तेव्हा तुम्हाला मोबाईल फोन स्विच ऑफ करण्यास सांगितले जाते किंवा तुम्हाला एअरप्लेन मोड चालू करण्यास सांगितले जाते.
फ्लाइट मोड कसा चालू करायचा
फ्लाइट मोड चालू करणे खूप सोपे आहे, फ्लाइट मोड चालू करण्यासाठीचे दोन मार्ग खाली दिले आहेत.
- तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन बारमध्ये जिथून तुम्ही नेट चालू करता, त्याच्या आसपास तुम्हाला विमानाचा एक आयकॉन दिसेल, ज्याखाली Flight Mode किंवा Airplane Mode लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा आणि फ्लाइट मोड चालू होईल.
- मोबाईलच्या सेटीन्ग्स मध्ये जाऊन Flight Mode किंवा Airplane Mode शोधा आणि त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही फ्लाइट मोड चालू करू शकता.
फ्लाइट मोड चालू करण्याचे फायदे
- जर तुम्ही प्रवास करत असाल तर मोबाइलची बॅटरी वाचवण्यासाठी तुम्ही फ्लाइट मोड चालू करू शकता
- जर तुम्ही कामात व्यस्त असाल आणि काही काळ मोबाईलचा त्रास होऊ इच्छित नसाल तर तुम्ही फ्लाइट मोड चालू करू शकता
- फ्लाइट मोड मध्ये नेटवर्क जरी काम करत नसले तरी Wifi काम करते, याचा फायदा असा कि तुम्ही मोबाइलची बॅटरी वाचवण्यासाठी फ्लाइट मोड चालू करून दुसऱ्याच्या Wifi चा वापर करू शकता
- जर कधी मोबाइलला नेटवर्क येत नसेल (किंवा कमी असेल) तर मोबाइल रिस्टार्ट करण्यापेक्षा तुम्ही फ्लाइट मोड चालू बंद करून काही वेळासाठी जास्त नेटवर्क येईल
फ्लाइट मोडचे तोटे
- फ्लाइट मोड चालू असताना तुमच्या मोबाईलची कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद असते.
- तुम्ही मोबाइलचे इंटरनेट वापरू शकत नाही, तुम्ही Wifi वापरू शकता.
- फ्लाइट मोड चालू असताना तुम्ही ब्लूटूथ ची कोणतीही सेवा वापरू शकत नाही.
- तुम्ही कोणालाही मेसेज करू शकत नाही.
- तुम्हाला आलेले फोन तुम्हाला समजणार नाही जर तुमची मिस कॉल अलर्ट सेवा चालू असेल तर फ्लाइट मोड बंद केल्यावर तुम्हाला त्याचे मेसेज मिळतील.