वेब चेक इन म्हणजे काय? बोर्डिंग पास म्हणजे काय? | Boarding Pass & Web-checkin Info - MarathiDiary
Viman Pravas

वेब चेक इन म्हणजे काय? बोर्डिंग पास म्हणजे काय? | Boarding Pass & Web-checkin Info



नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण वेब चेक इन म्हणजे काय ? बोर्डिंग पास म्हणजे काय?, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Boarding Pass Ani Web Check In Mahiti

मित्रांनो, असे अनेक लोक आहेत ज्यांना कामानिमित्त अर्जंट बाहेरगावी जावं लागतं. तसेच काही असेही लोकं आहेत ज्यांना बाहेरगावी फिरायला जायला आवडतं. मग अश्या वेळी लोकं एकतर बसने प्रवास करत असत किंवा जास्तीत जास्त ट्रेनने प्रवास करत असत. पण आता चित्र बदलले आहे. आता लोक विमानाने प्रवास करायला लागलेत. पण आजही असे बरेच लोक आहेत ज्यांनी कधीही विमानाने प्रवास केला नाही. आणि जेव्हा कधी पहिल्यांदा विमानाने प्रवास करण्यासाठी जावे लागते तेव्हा विमानतळावर नेमके काय काय नियम असतात.



याबद्दल माहीती नसते आणि त्यामुळे तिथे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला विमानतळा वर जास्त त्रास सहन करायचा नसेल, तर फ्लाइटने प्रवास करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला आधीच जाणून घेतल्या पाहिजेत. ज्यात फ्लाइट चे तिकीट तर सर्वांनाच काढता येते. कारण आजकाल डिजीटलायझेशन मुळे सर्वजण ऑनलाईन फ्लाइट तिकीट काढुन घेतात. पण त्या नंतर केले जाणारे वेब चेक इन प्रोसेस, बोर्डिंग पास या सर्व गोष्टीं बद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते.

आता तुम्ही विचाराल वेब चेक इन म्हणजे काय? बोर्डिंग पास म्हणजे काय? तर काळजी करू नका मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला फ्लाइट मध्ये प्रवास करण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या वेब चेक इन व बोर्डिंग पास या बद्दल माहिती सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला विमानतळावर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर मग वेब चेक इन म्हणजे काय? बोर्डिंग पास म्हणजे काय? या बद्दल पुढे जाणून घेऊ या…

वेब चेक इन म्हणजे काय?

सर्वात पहिले वेब चेक इन म्हणजे काय? या बद्दल जाणून घेऊ या

Web Check In Sample

मित्रांनो, तुम्हाला जर विमानाने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी फक्त विमानाच तिकीट बुक करणे पुरेसे नसते तर विमानतळा वर तुम्हाला इतरही अनेक फॉर्मेलिटीझ पूर्ण कराव्या लागतात. त्यापैकीच वेब चेक इन हा एक महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की विमानाने प्रवास करण्यासाठी आधी तिकीट बुक करावे लागते आणि त्या नंतर विमानतळावर जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तुमचं तिकीट आणि ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जातो.

त्यानंतरच महत्त्वाचे काम म्हणजे वेब चेक इन चे असते. वेब चेक इन महत्वाचे असते कारण ते झाल्या नंतरच तुम्हाला बोर्डिंग पास दिला जातो. म्हणून फ्लाईट मध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट पेक्षा जास्त बोर्डिंग पास महत्त्वाचा असतो. त्यामुळे इथे आपण असं म्हणू शकतो की बोर्डिंग पास मिळवण्याच्या प्रक्रियेलाच वेब चेक इन असे म्हणतात.



थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही विमानाच प्रवास करण्यासाठी एअरपोर्ट वर आला आहात याची खातर जमा वेब चेक इन च्या माध्यमातून केली जाते.

या चेक इन प्रक्रियेत तुम्हाला सीट नंबर दिला जातो. त्या नंतर तुम्हाला लगेज स्टिकर दिले जाते आणि तुम्हाला तुमच्या फ्लाइट चे लेटेस्ट टाइम टेबल बोर्डिंग पास मध्ये ऍड केले जाते. मग तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास मिळतो.

वेब चेक इन केव्हा करावे?

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी वेब चेक इन ची पूर्ण प्रक्रिया ही विमानतळा वरच केली जात असे. पण आता जवळजवळ सर्वच एअर लाइन्स ऑनलाईन वेब चेक इन ची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन फ्लाइट तिकीट बुक केले असेल तर तुम्ही तुमच्या फ्लाइट च्या 48 ते 24 तास आधी कधी ही वेब चेक इन करून घेऊ शकता.

वेब चेक इन कसे करावे?

मित्रांनो, वेब चेक इन तुम्ही फोन पध्दतीने करू शकता. एक ऑनलाईन पद्धतीने व दुसरे ऑफलाईन पद्धतीने. मित्रांनो, ऑनलाईन वेब चेक इन पद्धतीत तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर 48 ते 24 तासांच्या आत तुमच्या फ्लाइट च्या एअर लाइन वेबसाईटला भेट देऊन वेब चेक इन प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर त्यात तुमची सीट निवडायची आहे व नंतर तुमचा बोर्डिंग पास जनरेट होईल. व तुमची वेब चेक इन प्रोसेस पूर्ण होईल.
तर ऑफलाईन पध्दतीत, वेब चेक इन ची पूर्ण प्रक्रिया ही विमानतळावर केली जाते. विमानतळावर प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एअर काउंटरवर जाऊन तिकीट दाखवावे लागेल. त्या नंतर बाकीच्या फॉर्मेलिटीझ पूर्ण करून मग तुम्हाला बोर्डिंग पास दिला जातो. आणि मग तुमची वेब चेक इन प्रोसेस पूर्ण होते.

त्यामुळे वरील पैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमचे वेब चेक इन करू शकता. फक्त ऑफलाईन पध्दतीत वेब चेक इन करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू शकते. तसेच या प्रोसेस साठी तुम्हाला फ्लाइट च्या 2 ते 3 तास आधीच विमानतळावर यावे लागेल. तथापि वेब चेक इनची वेळ प्रत्येक एअरलाइन आणि फ्लाइटच्या प्रकारा नुसार बदलत असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन वेब चेक इन हा तुमच्या फ्लाइटसाठी चेक इन करण्याचा एक सोयीस्कर व वेळ वाचवणारा मार्ग आहे.



बोर्डिंग पास म्हणजे काय?

आता बोर्डिंग पास म्हणजे काय? या बद्दल जाणून घेऊ या

Boarding Pass Sample

मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, बोर्डिंग पास हे एक असे डॉक्युमेंट आहे जे प्रवाशाला विमानात चढण्याची परवानगी देते. बोर्डिंग पास हे विमानतळावर चेक- इन करण्याच्या दरम्यान एअरलाइन द्वारे प्रदान केलेले एक डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज आहे, जे प्रवाशाला विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजे ज्याला विमानतळाचा एअरसाइड भाग म्हणूनही ओळखले जाते, अश्या ठिकाणी प्रवेश करण्याची आणि विमानात चढण्याची परवानगी देते.

या बोर्डिंग पास शिवाय तुम्ही विमानात जाऊ शकत नाही किंवा बसू शकत नाही. म्हणून हा एक खूप महत्वाचा दस्तऐवज आहे. बोर्डिंग पास हा तुम्ही विमानतळावर मिळवू शकता किंवा तो तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ई-मेल वर सुद्धा मिळतो.

बोर्डिंग पास वर कोणती माहिती मिळते?

मित्रांनो, बोर्डिंग पास वर प्रवाश्याची सर्व माहिती दिलेली असते. त्यासोबतच एअर लाइन चे म्हणजे च विमान कंपनी चे नाव, फ्लाइट क्रमांक, त्याची येण्याची व जाण्याची वेळ, सीट आणि केबिन वर्ग, गेट आणि चेक इन चे स्थान आणि बोर्डिंगची वेळ यासह प्रवाशाचे फ्लाइट डिटेल्स अश्या सर्व गोष्टी बोर्डिंग पास वर सूचीबद्ध केले जातात. तसेच तुम्ही विमानात काय आणू शकता आणि काय आणू शकत नाही या बद्दल ची महत्त्वाची माहिती देखील त्यात दिलेली असते. याशिवाय काही आपत्कालीन संपर्क माहिती, जसे की कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव आणि फोन नंबर देखील बोर्डिंग पासवर असू शकतात.

बोर्डिंग पास कसे वापरले जाते?

मित्रांनो, तुम्ही जेव्हा विमानतळावर चेक इन करता तेव्हाच तुम्हाला बोर्डिंग पास दिला जातो. बोर्डिंग पास मिळाल्यानंतर तुम्हाला सुरक्षा गेट कडे पाठवले जाते. तेथील गेट एजंट तुमच्या बोर्डिंग पास वरील माहिती गेटवर लिहिलेल्या माहितीशी जुळवेल. आणि तुमची माहिती व्हेरिफाय झाल्यावर मग तुम्ही तुमच्या फ्लाइटमध्ये चढू शकता.

बोर्डिंग पास कसा मिळवायचा?

मित्रांनो, बोर्डिंग पास मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पध्दतीने चेक इन करू शकता किंवा विमानतळावर होऊन चेक इन करू शकता. जर तुम्ही ऑनलाइन चेक इन केले तर तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास तुमच्या ई मेल द्वारे मिळून जातो व नंतर तुम्ही तो प्रिंट करून घेऊ शकता. आणि जर तुम्ही विमानतळावर जाऊन चेक इन करत असाल तर विमानतळावरील चेक- इन कर्मचारी तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास प्रदान करतो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण वेब चेक इन म्हणजे काय? बोर्डिंग पास म्हणजे काय? या बद्दल माहिती जाणून घेतली. मित्रांनो, आरामदायी व सुरक्षित विमान प्रवासासाठी तुम्ही ही वेब चेक इन व बोर्डिंग पास ची प्रोसेस पूर्ण नक्की करावी. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

बोर्डिंग पास सुरक्षित कसा ठेवावा?

मित्रांनो, तुमचा बोर्डिंग पास खराब होऊ नये किंवा हरवू नये यासाठी,तो सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे तुमचा फोन किंवा टॅबलेट आहे. तसेच बऱ्याच एअर लाईन्सचे स्वतःचे मोबाईल ऍप्स असतात. ज्यात तुम्ही तुमच्या बोर्डिंग पासची कॉपी डिजिटल स्वरूपात स्टोअर करून ठेवू शकता.

नवीन बोर्डिंग पास मिळवता येतो का?

मित्रांनो, तुमचा बोर्डिंग पास जर हरवला किंवा खराब झाला तर तुम्ही ते तुमच्या एअर लाईनला लगेच कळवले पाहिजे. तसेच नवीन बोर्डिंग पास मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या एअर लाइन च्या वेबसाईट वर जाऊन तुमचा तिकीट क्रमांक व नाव टाकून तुम्ही तुमचा नवीन बोर्डिंग पास मिळवू शकता.

वेब चेक इन शिवाय फ्लाइट ने प्रवास करता येईल का?

नाही मित्रांनो, वेब चेक इन शिवाय तुम्ही फ्लाइट मध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही.

वेब चेक इन प्रक्रियेत पसंतीची सीट निवडता येते का?

हो मित्रांनो, वेब चेक इन प्रक्रियेत तुम्ही उपलब्ध पर्यायांमधून तुमची पसंतीची सीट निवडू शकता. परंतु काही एअर लाइन्स कंपन्या काही विशिष्ट सीट साठी अतिरिक्त शुल्क आकारू शकतात.

वेब चेक इन केल्यावर बोर्डिंग पास ची प्रिंट काढावी लागते का?

मित्रांनो, तसं पाहिलं तर वेब चेक इन केल्या वर तुम्ही तुमच्या बोर्डिंग पास ची प्रिंट काढू शकता. परंतु त्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही डिजिटल पध्दतीने तुमच्या बोर्डिंग पास ची कॉपी तुमच्या मोबाईल किंवा टॅब वरून दाखवू शकता. त्यासाठी प्रिंट असणे गरजेचे नाही.

Tags: Boarding Pass Info in Marathi, Boarding Pass Mahiti, Boarding Pass Information Marathi, Web Check In Mahiti, Web Check In info in Marathi, Web Check In Information Marathi, Web Check In Mhanje Kay, Web Check In Kay Aste, Boarding Pass Mhanje Kay, Boarding Pass Kay Asto

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद