Government CardsVoter ID

मतदान कार्डमध्ये घरबसल्या दुरुस्ती/अपडेट करा – नवीन नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख

मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करताना चुकून तुम्ही काही तपशील चुकीचे दिले असतील किंवा तुमच्यकडे असलेल्या मतदान कार्ड वर काही बदल तुम्हाला करायचे असतील, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे ते दुरुस्त करू शकता. मतदान ओळखपत्रातील तपशील दुरुस्त करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करून तपशील दुरुस्त करू शकता. आपण या पोस्ट मध्ये ऑनलाईन पद्धत बघणार आहोत.

मतदान ओळखपत्रातील तुमचा तपशील दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर, तुम्हाला आम्ही या लेखात दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.



स्टेप 1: सर्वप्रथम, तुम्ही राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा – electoralsearch.in

मुख्यपृष्ठावरील, लॉगिन लिंकवर क्लिक करा

How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi Step 1

स्टेप 2: आता तुम्ही नवीन पेजवर पोहचाल, आता तुम्हाला लॉगिन करायचे आहे.

पण जर तुम्ही या आधी कधीही या वेबसाईटवर खाते (अकाउंट) उघडले नसेल तर Don’t have account, Register as a new user. या लिंक वर क्लिक करून नवीन खाते उघडू शकता. या पेज वर तुम्हाला तुमचा चालू मोबाइल नंबर, Epic Number (म्हणजे Voter ID) आणि पासवर्ड टाकायचा आहे. खाते तयार करून झाल्यावर आधीच्या पेज वर जाऊन लॉगिन करा.

How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi Step 2

स्टेप 3: लॉगिन झाल्यावर डॅशबोर्डवरील Correction in Personal details लिंक वर क्लिक करा.



How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi Step 3

स्टेप 4: आता तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील 1) Self 2) Family याचा अर्थ तुम्हाला जर स्वतःच्या मतदान कार्डमध्ये बदल करायचा आहे तर पहिला पर्याय निवडा किंवा वर तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या मतदान कार्ड मध्ये बदल करायचा असेल तर दुसरा पर्याय निवडा. आणि Next बटन वर क्लिक करा.

How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi Step 4

स्टेप 5: आता तुमच्यासमोर कार्डमध्ये बदल करण्यासाठीचा फॉर्म उघडेल, थोडे खाली स्क्रोल करून (ड. कृपया सही की जाने वाली प्रविष्टी पर निशान लगाएं) या ऑपशन वर या. या ऑपशन वर तुम्हाला ज्या प्रकारच्या माहितीमध्ये बदल करायचे आहे त्या ऑपशन वर टिक करा, जसे नाव, फोटो, पत्ता इत्यादी

ज्या ऑपशन वर तुम्ही क्लिक कराल, त्या ऑपशनचा फॉर्म भरण्यासाठी हायलाइट होईल (थोडे खाली स्क्रोल करून बघा). आता तुम्ही तुमची नवीन माहिती त्या फॉर्म मध्ये टाईप करा.

How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi Step 5

स्टेप 6: वरती दिलेली माहिती पडताळणीसाठी तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, याची यादी खालीलप्रमाणे

जन्म प्रमाणपत्र, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, भारताचा पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड, भाडे करार, सध्याचे पाणी/लाईट/गॅस/फोन बिल इत्यादी…

ज्या प्रकारचे बदल तुम्ही कराल त्याप्रकारच्या डॉकमेंटची गरज तुम्हाला लागेल जसे जन्मतारीख बदलण्यासाठी जन्म प्रमाणपत्र, मार्कशीट, पासपोर्ट, पॅन कार्ड इत्यादींची गरज लागेल

आता शेवट Declaration चा भाग आहे, यामध्ये सध्याचे स्थान टाकून Submit बटन वर क्लिक करा.

How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi Step 6

तुमचा फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा मोबाइल वर मेसेज येईल. या मेसेज मध्ये एक Reference ID असेल याचा उपयोग तुम्ही तुमच्या अर्जाची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करू शकता.

मतदान कार्डची ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासणे

Check Voter ID Correction Status

सर्वात प्रथम मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.nvsp.in/Forms/TrackStatus

नंतर तुम्ही तुमच्यकडे असलेला Reference id फॉर्म मध्ये टाईप करा आणि Track Status बटन वर क्लिक करा. तुम्हाला काही सेकेंडमध्ये तुमच्या अर्जाची स्थिती समजेल.

Check Voter ID Correction Status in Marathi

संपर्क माहिती

या लेखाद्वारे आम्ही मतदार आयडी ऑनलाइन अर्जासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. हेल्पलाइन क्रमांक 1800111950 आहे. इतर काही संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

  • पत्ता: निर्वचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली 110001
  • ई-मेल: [email protected]
  • नियंत्रण कक्ष: 23052220, 23052221
  • फॅक्सलाइन: 23052219, 23052162/63/19/45

Tags: Voter ID Correction Marathi, Voter ID Name Correction info marathi, मतदान ओळखपत्र बदल, मतदार ओळखपत्र नाव बदल, मतदान कार्ड नाव दुरुस्ती, मतदार ओळखपत्र बदल, मतदान कार्ड अपडेट, मतदान कार्ड वय बदल, मतदान कार्ड पत्ता बदल, मतदान कार्ड पत्ता अपडेट, मतदान पत्ता अपडेट, How to Make Correction in Voter ID Card Online in Marathi, मतदान नाव बदल

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!