EPFएम्प्लॉई पोव्हिडन्ट फंड (EPF)

पीएफ (PF) अकाउंट मध्ये बँक डिटेल्स ऍड किंवा अपडेट कसे करायचे

नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएफ अकाउंट मध्ये बँक डिटेल्स ऍड किंवा अपडेट कसे करायचे या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

PF Account Madhe Bank Update Karne

मित्रांनो, तुम्ही जर नोकरदार असाल आणि जर तुमच्या पगारातून जर पीएफ कट होत असेल, तर तुम्ही कधीही गरज पडल्यावर तुमच्या पीएफ अकाउंट मधून पैसे काढू शकता आणि हे पैसे तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता. पण त्यासाठी तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये तुमचे बँक डिटेल्स योग्य प्रकारे ऍड किंवा अपडेट असणे खूप आवश्यक आहे. म्हणून तुम्ही आधीच तुमच्या बँक डिटेल्स पीएफ अकाउंट ला अपडेट करून ठेवल्या पाहिजे. जेणे करून गरज पडल्या वर पीएफ मधले पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट ला ट्रान्सफर होतील. मित्रांनो, पीएफ अकाउंटला बँक डिटेल्स अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कारण आता तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पीएफ अकाउंट ला बँक डिटेल्स अपडेट करू शकता. ते कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला epfo च्या वेबसाईट वर जायचे आहे. त्या नंतर होम पेज वर उजव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील Online Claim Member Account Transfer या ऑप्शन मध्ये जायचे आहे.

epfo वेबसाईट – epfindia.gov.in

PF Account Madhe Bank Update Karne Step 1

स्टेप 2: त्यानंतर तुमच्या समोर Unified Member पोर्टल ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचा UAN नंबर व पासवर्ड व कॅपचा टाकून लॉग इन करायचे आहे.

जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या पीएफ अकाउंट वर लॉग इन करत असाल तर हा लेख वाचा: पीएफ अकाउंट चा पासवर्ड तयार कसा करायचा ?

PF Account Madhe Bank Update Karne Step 2

स्टेप 3: या पूर्ण प्रोसेस मध्ये तुम्हाला तुमच्या आधार नंबर शी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे कारण आधार ओटीपी व्हेरिफिकेशन द्वारेच ही प्रोसेस पूर्ण होत असते.



या नंतर तुम्हाला Manage ऑप्शन मध्ये जाऊन KYC या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

PF Account Madhe Bank Update Karne Step 3

त्या नंतर नेक्स्ट पेज वर काही ऑप्शन दिसतील त्यातील Bank या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

PF Account Madhe Bank Update Karne Step 3 Sub-Step 2

बँक ऑप्शन वर क्लीक केल्या नंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स विचारले जातील. जसे की तुमचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड. हीच प्रोसेस कन्फर्मेशन साठी परत करायची आहे. मित्रांनो IFSC कोड टाकल्या वर त्याला व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला बाजूला दिलेल्या Verify या बटन वर क्लिक करायचे आहे. व नंतर तुमचा IFSC कोड व्हेरिफाय होऊन जाईल. त्या नंतर दिलेले डिस्क्लेमर टिक करून Save बटन क्लीक करायचे आहे.

PF Account Madhe Bank Update Karne Step 3 Sub-Step 3

स्टेप 4: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स तपासून पाहायचे आहेत. आणि नंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तुम्हाला खाली टाकायचा आहे. व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

PF Account Madhe Bank Update Karne Step 4

स्टेप 5: या नंतर तुमचे बँक डिटेल्स व्हेरिफिकेशन साठी तुमच्या बँकेत पाठवले जातात.

मित्रांनो, फक्त काही बँकेत म्हणजे SBI, Canara bank, Punjab National Bank या मध्येच व्हेरिफिकेशन साठी तुमचे बँक डिटेल्स पाठवले जातात. तुम्ही परत Manage ऑप्शन मध्ये जाऊन KYC या ऑप्शन वर क्लिक करून प्रोसेस चा स्टेटस पाहू शकता.

PF Account Madhe Bank Update Karne Step 6

तर काही बँक असे आहेत की तुमचे KYC Approve होण्यासाठी म्हणजेच बँक डिटेल्स व्हेरिफिकेशन साठी Employer (तुमच्या चालू कंपनी) कडे पाठवले जातात. अश्या परिस्थितीत तुमचा Employer च तुमची KYC approved करू शकतो. जर Status मध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन employer कडे pending दिसत असेल तर तुम्ही तुमच्या employer ला कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि KYC approved केली पाहिजे. त्या नंतरच तुमचे बँक डिटेल्स पीएफ अकाउंट मध्ये ऍड होतील.

PF Account Madhe Bank Update Karne Step 8

आणि काही दिवसांत तुमच्या बँके द्वारे हे डिटेल्स व्हेरिफाय केले जातात व तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये तुमचे बँक डिटेल्स सक्सेसफुली ऍड होऊन जातात. काही दिवसांनी तुम्ही तुमचे पीएफ अकाउंट चेक केले तर तुम्हाला स्टेटस या ऑप्शन मध्ये Verify by Bank असे लिहिलेलें दिसते.

PF Account Madhe Bank Update Karne Step 7

तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही कोणाची ही मदत न घेता, कुठेही न जाता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या पीएफ अकाउंट ला बँक डिटेल्स अपडेट करू शकता. मित्रांनो, पीएफ अकाउंट ला बँक डिटेल्स ऍड किंवा अपडेट केल्यामुळे तुम्हाला भविष्यात कधी पैसे काढावे लागले तर कोणत्याही टेन्शन शिवाय तुम्ही तुमच्या पीएफ (PF )मधील पैसे काढून ते बँकेत ट्रान्सफर करू शकता.

हा लेखा पण वाचापीएफ (PF) घरबसल्या ऑनलाइन क्लेम/Withdraw कसा करायचा

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीएफ अकाउंट ला बँक डिटेल्स ऍड किंवा अपडेट कसे करायचे त्या बद्दल जाणून घेतले. आशा करतो की या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असल्यास किंवा महत्वपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: How to update bank account details in EPF account in Marathi, PF Bank Account Add in Marathi, PF Bank Account Update in Marathi, PF Bank Account Change in Marathi, PF Madhe Navin Bank Account Add Kase Karayche

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!