उपवासामुळे खरंच वाढतं का आयुष्य?… पहा संशोधक काय म्हणतात ते?
कॅलरी-प्रतिबंधित आहारामुळे उंदरांचे आयुष्य वाढवते. असाच प्रयोग जर माणसांवर केला तर माणसाचेही आयुष्य वाढू शकते का?
काही शास्त्रज्ञांनी मिळून एक प्रयोग केला. त्यानी उंदराच्या आहाराचे निरीक्षण केले आणि त्यांनी त्या उंदरांच्या आहारावर मर्यादा घातल्या. उंदरांच्या आहारावर मर्यादा घातल्यावर आणि दररोज तीन तासांच्या अंतराने त्यांना आहार दिल्यानंतर उंदरांची चयापचय क्षमता वाढलेली आढळून आली आणि याच कारणामुळे ज्या उंदरांवर प्रयोग केला ते जास्त काळ जगू शकले, असे संशोधकांना आढळले.
कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्ल्याने उंदीरांचे आरोग्य आणि आयुर्मान सुधारते, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
ऑनलाइन जर्नल नेचर मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जे उंदीर दिवसातून फक्त एकदाच खातात त्यांनी देखील चयापचय सुधारला. आणि त्यांचे आयुष्यमान वाढले.
यूएसमधील विस्कॉन्सिन विद्यापीठातील अभ्यास लेखक डडली लॅमिंग यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांना सुमारे एका शतकापासून माहित आहे की कॅलरी मर्यादित केल्याने उंदीरांचे आयुष्य वाढते.
जर हाच निष्कर्ष मनुष्य प्राण्यावर देखील लागू होत असेल तर आहाराच्या वेळा कमी केल्याने मनुष्याचे आयुर्मान देखील वाढू शकते असा काही शास्त्रज्ञ अनुमान काढत आहेत