तिरुपती बालाजी दर्शन तिकीट बुकिंग ऑनलाईन | Tirupati Balaji Darshan Online Tickets Booking Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण तिरुपती बालाजी दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुक कसे करायचे, तसेच तिकिटासाठी किती फी /पैसे लागतात या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, पृथ्वी वरचे वैकुंठ असे समजले जाणारे स्थान म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर. मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश- विदेशातून असंख्य लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे तिरुपती बालाजीला येणाऱ्या भाविकांची या मंदिरावर किती श्रद्धा आहे याचा अंदाज येतो. तसं पाहिलं तर येथे दर्शनासाठी सुमारे सहा ते सात तास लागतात. प्रचंड गर्दी झाल्यास जास्त वेळ लागतो पण गर्दी टाळायची असेल तर तुम्ही तिरुपती बालाजीच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता.
हो मित्रांनो, तुम्हाला जर जास्त वेळ गर्दीत उभे रहायचे नसेल तर तुम्ही तिरुपती बालाजी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म व काही फी भरावी लागेल. या प्रक्रियेमुळे तुम्हाला कमी वेळेत दर्शन मिळते. त्यामुळे तुम्ही ही जर तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण या लेखात तुम्हाला दर्शनासाठी तिकीट बुक करण्याची पूर्ण प्रोसेस सांगितली जाणार आहे.
बालाजी दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग
तिरुपती बालाजी दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तिरुपती बालाजी च्या ऑफिशियल पोर्टल tirupatibalaji.ap.gov.in या वर जायचं आहे.
स्टेप 2: आता वेबसाइटच्या होमी पेज वर वरच्या बाजूला दिसणार्या लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
नोट: जर तुम्ही ही प्रक्रिया तुमच्या फोनवर करत असाल, तर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला वेबसाइटच्या होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या बाणावर बटन क्लिक करावे लागेल.
स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व Get OTP ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: त्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून Login बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आता होम पेजवर दिसणार्या अनेक पर्यायांपैकी स्पेशल एंट्री दर्शन (Special Entry Darshan) या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 6: या नंतर आता तुमच्या समोर एक कॅलेंडर उघडेल.
- त्यात लाल रंग म्हणजे बुकिंग फुल आहे.
- हिरवा रंग मध्ये बुकिंग चालू आहे.
- निळा रंग असेल तर बुकिंग अजून Available नाही.
ज्यामध्ये तुम्हाला ज्या तारखेला दर्शन घ्यायचे आहे ती तारीख निवडावी लागेल. इथे तुम्हाला हिरव्या रंगाच्या तारखा घ्याव्या लागतील कारण हिरव्या रंगाच्या तारखांवर दर्शनाचे तिकिटं उपलब्ध आहेत.
आता तारीख निवडल्यानंतर, खाली तुम्हाला स्लॉट निवडावा लागेल. स्लॉट म्हणजे वेळ. तुम्ही कोणत्याही तारखेवर क्लिक करताच, खालील स्लॉट पर्याय उघडतील, तुम्हाला जी वेळ हवी आहे तो स्लॉट निवडायचा आहे. तसेच इथे तिकिटाची किंमत दाखवली जाईल. इथे दर्शनासाठी एका व्यक्तीला 300 रू आकारले जातात. व इथे तुम्ही कमीत कमी एक व जास्तीत जास्त सहा व्यक्तींचे तिकीट बुक करू शकता.
स्टेप 7: त्यानंतर Number of person मध्ये किती व्यक्ती व्यक्तींचे तिकीट बुक करायचे आहे त्यांची संख्या टाकायची आहे. त्यानंतर Number of additional Laddus मध्ये तुम्हाला अजून किती लाडू हवे आहेत ती संख्या टाकायची आहे. त्या नंतर खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून मग continue बटन वर क्लिक करायचे आहे.
नोट: हे लक्षात ठेवा की एक मोफत लाडू सोडून, प्रत्येक लाडूवर तुम्हाला ₹ 50 आकारले जातील. आणि 12 वर्षांखालील मुलांसाठी मोफत दर्शनाची सुविधा आहे, पण तुम्हाला मुल 12 वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
स्टेप 8: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्ही आत्तापर्यंत भरलेल्या सर्व डिटेल्स, तारीख, वेळ वगैरे सेवा माहिती आलेली दिसेल. तुम्हाला जर त्यात काही बदल करायचा असेल तर तुम्ही Change details या ऑप्शन चा वापर करू शकता.
आता खाली Pilgrim Details मध्ये जेवढ्या व्यक्ती सिलेक्ट केलेल्या आहेत त्या सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड नुसार नाव, वय, लिंग, फोटो प्रूफ, आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचे आहे. त्या नंतर ई-मेल व नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. व नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: आता नेक्स्ट पेज वर तुम्ही टाकलेली सर्व माहिती आलेली दिसेल. तुम्हाला हवे असल्यास Change details चा ऑप्शन वापरून तुम्ही ती माहिती चेंज करू शकता. आता खाली स्क्रोल केल्यावर पेमेंट चा ऑप्शन दिसेल. इथे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग ने पेमेंट करू शकता. त्या नंतर Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: त्यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला स्कॅन करण्यासाठी एक क्यू आर कोड दिसेल. तुमच्या पेमेंट ऑप्शन वरून हा कोड स्कॅन करून पेमेंट करायचा आहे. व त्या नंतर तुम्हाला एक रिसीट येईल ती रिसीट म्हणजेच तुमचे तिकीट असणार आहे. व या तिकिटाला सांभाळून ठेवा. कसरत याच्या साहाय्याने तुम्हाला तिरुपती बालाजीचे दर्शन करता येईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण तिरुपती बालाजी दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद
Tags: tirupati balaji darshan tickets booking, tirupati balaji darshan booking, tirupati balaji darshan, tirupati balaji online booking, tirupati balaji darshan ticket, tirupati balaji darshan pass, tirupati balaji booking, thirupathi ticket booking, tirumala darshan booking, thirupathi dharisanam booking, tirumala darshan tickets, tirupati balaji online darshan booking, tirupati balaji temple booking, tirumala darshan, thirupathi ticket booking online, book online tickets for tirumala darshan, book tickets for tirumala darshan, book tirumala darshan online, book tirumala tickets online, darshan for tirupati balaji, darshan ticket tirupati balaji, special darshan at tirumala, thirumalai thirupathi ticket, thirupathi devasthanam ticket booking online, thirupathi dharisanam online booking, thirupathi devasthanam ticket booking, thirupathi dharisanam booking online, tirumala balaji darshan booking, tirumala darshan reservation, tirupathi online ticket booking for darshan, tirupati balaji darshan tirupati balaji darshan, ttd tirumala tickets