New PostTata Neu

Tata Neu संपूर्ण माहिती | Tata Neu अँप कसे वापरायचे ?

नमस्कार मित्रांनो, आज काल टीव्ही वर IPL (आयपीएल) मॅच चालू आहे. तुम्ही ती बघतच असाल मॅच च्या दरम्यान सध्या टीव्ही वर एका सुपर अँप (super app) ची ऍड सतत दाखवत असतात, तुम्हाला माहीत आहे का त्या बद्दल? नसेल माहीत तर त्यासाठी तुम्हाला आजचा हा लेख पूर्ण वाचा. या लेखातून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

मित्रांनो, मी TATA च्या Super App, TATA Neu App बद्दल बोलत आहे. Tata neu अँप काय आहे? हे अँप डाउनलोड कसे करायचे? हे अँप वापरायचे कसे ? यात काय काय नवीन फीचर्स आहेत? या सर्वांची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे.



मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की यावर्षी ची IPL मॅच TATA कंपनी ने स्पॉन्सर (sponsor) केली आहे. आणि म्हणून या वर्षीच्या आयपीएल मॅचला TATA IPL 2022 या नावाने संबोधले जात आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का टाटा कंपनी यावर्षी IPL मॅच का स्पॉन्सर करत आहे, कारण या वर्षी टाटा चे नवीन मोबाईल अँप लाँच होत आहे. आणि हे अँप सफल बनवण्यासाठी किंवा या अँपची पब्लिसिटीसाठी. म्हणूनच टाटा कंपनी ने IPL ला स्पॉन्सर करायचे ठरवले, या मागचे कारण असे की आजचा युवा वर्गाला IPL मॅच बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून टाटा ने आपले नवीन मोबाईल अँप लाँच केले आहे त्याचे नाव TATA Neu App असे आहे. आणि सगळ्यांना या अँप बद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला या अँप बद्दल सर्व माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या या नवीन TATA Neu अँप बद्दल…

Tata Neu अँप म्हणजे नेमकं काय आहे?

मित्रांनो, Tata Neu अँप हे टाटा ने लाँच केलेले एक ऑल इन वन (All in One) मोबाईल अँप आहे. म्हणजे टाटा शी निगडित सर्व अँप्स तुम्हाला या एकाच Tata Neu अँप मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. या अँप च्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित बरेच कामं करू शकता. जसे की तुम्ही या अँप वर तिकिट बुकिंग, शॉपिंग , ग्रोसरी, बिल पेमेंट तसेच फूड सुद्धा ऑर्डर करू शकता. अश्या अनेक सर्व्हिसेस टाटा ने या एका अँप मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

Tata Neu अँप ची खास गोष्ट अशी की जर तुम्ही या अँप मधून एखाद्या सर्विस चा उपयोग केला, तर यात तुम्हाला चांगला reward सुद्धा मिळु शकतो.

How to use TATA Neu App?



Tata Neu अँप कसे वापरायचे?

मित्रांनो, Tata neu अँप कसे वापरायचे हे समजून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…

स्टेप 1: सर्वात पहिले प्ले स्टोअर मध्ये जाऊन Tata Neu अँप इंस्टॉल करायचे आहे. इंस्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा.

how to register Tata Neu Step 1

स्टेप 2: आता तुम्हाला Tata Neu अँप चे इंटरफेस दिसेल त्याखाली असलेल्या Lets Start या बटन वर क्लिक करा.

how to register Tata Neu Step 2

स्टेप 3: नवीन पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व Get OTP या बटन वर क्लिक करा. त्या नंतर तुमच्या मोबाईल वर व्हेरिफिकेशनसाठी एक OTP नंबर येईल तो दिलक्या बॉक्स मध्ये टाका. तुमचा नंबर आपोआप व्हेरिफाय होऊन जाईल.

how to register Tata Neu Step 3

स्टेप 4: आता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचे नाव (First Name), आडनाव (Last Nav) व ई-मेल (E-mail ID) टाकायचा आहे. व खाली दिलेल्या Lets Go बटन वर क्लिक करायचे आहे.

how to register Tata Neu Step 4

आता तुमचे Tata Neu अँप वर अकाउंट तयार झाले आहे.

how to register Tata Neu Step 5

मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Tata Neu अँप चे होम पेज दिसेल. या होम पेज वर वरती सर्च बटन मध्ये तुम्हाला हवी ती वस्तू सर्च करून बघू शकता. किंवा खाली Expolre मध्ये Tata Neu अँप मध्ये असलेल्या सर्व categories ची लिस्ट दिसेल. त्यात ग्रोसरी, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, हॉटेल, फ्लाइट, ईट अँड ड्रिंक, एंटरटेनमेंट अश्या बऱ्याच Categories दिसतील. तुमच्या आवडत्या कॅटेगरी मध्ये जाऊन शॉपिंग करू शकता.

Tata Neu Expolre tab information in Marathi

होम पेज वर अजून खाली गेल्या वर तुम्हाला बरेच ऑफर्स बघायला मिळतील. त्या बरोबरच या Categories च्या वरती तुम्हाला TATA Neu चे आणखी काही फीचर्स दिसतील त्यात तुम्हाला Scan and Pay, Send Money, Pay Bill, Finance असे ऑपशन दिसतील.

यात Send money या ऑपशन च्या मदतीने तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला UPI रेजिस्ट्रेशन करावे लागेल.

Pay Bill या ऑपशन च्या मदतीने तुम्ही वापरत असलेल्या वस्तूंचे बिल Pay करू शकता. जसे की broadband, electricity , mobile prepaid, water, landline वगैरे. या बरोबरच इथे तुम्ही टीव्ही recharge मोबाईल recharge सुद्धा करू शकता.

Scan and Pay या ऑपशन च्या मदतीने तुम्ही Tata Neu UPI चा उपयोग करून कोणताही क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता.

तसेच Finance या ऑपशन मधून एखाद्या गॅजेट्स किंवा Appliances वर फायनान्स करू शकता. किंवा loan व EMI पण सुविधा देण्यात आली आहे.

Tata Neu Coins आणि Neu Pass बद्दल जाणून घेऊ या

मित्रांनो, टाटा कंपनीने आपल्यासाठी NeuPass नावाचा एक नवीन फिचर सुद्धा बनवले आहे. त्या मध्ये खरेदी करून तुम्ही नव नवीन reward मिळवू शकता. NeuPass मध्ये वापरकर्त्यांला प्रत्येक वेळी Tata Neu वर कोणत्याही प्रकारची खरेदी केल्यास कमीत कमी 5 टक्के पर्यंत NeuCoins मिळतील. इथे एक NeuCoin म्हणजे 1 रुपया असे आहे. तसेच इथे खरेदी करून कोणीही NeuCoins मिळवू शकतो. तसेच हे coins मिळवण्याची कोणतीही मर्यादा नाही. कोणी कितीही neucoin मिळवू शकतो.

हे हि वाचा – Tata Neu Coin व Neupass म्हणजे काय ? | कसे मिळवायचे ?

Tata Neu अँप वर आणखी काही सुविधा आहेत

मित्रांनो, Tata Neu अँप वर बऱ्याच सुविधा दिल्या गेल्या आहेत. जसे की Air Asia, 1mg, Croma, Qmin, Big Basket, IHCL वगैरे. या सर्व कंपनी, सुविधा टाटा कंपनीच्या आहेत, म्हणजेच या कंपनी टाटा समूहाचा भाग आहे.

  • यात Airasia मधून तुम्ही फ्लाइट चे तिकीट बुकिंग करू शकता.
  • 1mg मधून तुम्ही तुमचे गरजेचे आवश्यक ते मेडिसिन्स ऑनलाईन मागवू शकता.
  • Croma मधून तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करू शकता.
  • Qmin मधून तुम्ही तुमच्या आवडीचे फूड ऑर्डर करू शकता.
  • Big basket मधून तुम्ही तुमचा किराणा सामान मागवू शकता.
  • तसेच हॉटेल बुकिंग करण्या साठी तुम्ही IHCL मधून करू शकता.
  • तसेच टाटा क्लिक व वेस्ट साइड मधून तुम्ही फॅशन रिलेटेड शॉपिंग करू शकता.

Tata Neu अँप सेटिंग

मित्रांनो, या शिवाय Tata Neu अँप च्या होम पेज वर उजवीकडे वरती तीन लाइन्स दिसतील त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही ऑपशन्स दिसतील. त्यात Profile मधून तुम्ही तुमचे नाव व पर्सनल डिटेल्स ऍड करू शकता जसे की तुमचे Gender, डेट ऑफ बर्थ, Marital स्टेटस वगैरे.

Tata Neu Setting Option information Marathi

Address मध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्याचा उपयोग तुम्हाला तुम्ही काही ऑर्डर कराल तेव्हा होईल.

My order मध्ये तुम्ही केलेल्या ऑर्डरचे सर्व डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील.

My Transaction मध्ये तुम्हाला तुम्ही आत्ता पर्यंत केलेले सर्व ट्रांझेकशन (transaction) दिसतील.

Manage security मध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता. तसेच अँप स्क्रीन लॉक सुद्धा बदलू किंवा Disable करू शकता.

तर मित्रांनो, Tata Neu App हे इतर अँप म्हणजे फ्लिप कार्ट, अमेझॉन , पेटीएम वगैरे अँप सारखेच आहे. पण यात काही नवीन व खास फीचर्स म्हणजे सर्व सुविधा एकाच अँप मध्ये देण्यात आल्या आहेत जे त्याला इतर अँप पेक्षा जास्त चांगले बनवते. तसेच या अँप मध्ये बरेचशे प्रॉडक्ट्स कमीत कमी किंमतीत उपलब्ध केल्या गेल्या आहेत. म्हणूनच याला सुपर अँप असे म्हटले जाते.

तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा हा लेख, तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा व आजच Tata Neu अँप डाउनलोड करून भरपूर rewards मिळवा
धन्यवाद!

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!