घरबसल्या पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ? | Aadhar PVC Card Online
आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपल्या आयुष्यातील एक महत्वाचं ओळखपत्र झालेले आहे. अगदी मोबाइल सिम कार्ड घेण्यापासून ते बँकेतील लोन घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा स्वतःची डिजिटल KYC करण्यासाठी आधार कार्ड लागतेच. युनिक आयडेटिंफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) यावर्षी PVC आधारकार्ड आणलंय. हे आधारकार्ड वापरायला अगदी सोपं असून ते जास्त टिकाऊ आहे.
UIDAI नुसार नवीन PVC कार्डांची छपाई आणि कार्डची गुणवत्ता चांगली आहे. हे कार्ड दिसायला कलरफुल आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड वॉटर्प्रूफ आहे. याशिवाय PVC आधार कार्ड आधुनिक सुरक्षा फीचर्संनी सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी या नवीन कॉर्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, Guilloche पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट असे फीचर्स आहेत.
या PVC कार्डचे अनेक फायदे आहेत. PVC च्या स्वरूपातील कार्ड आपण ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणे कायमचे आपल्या पाकिटात ठेवू शकतो. ते वॉटरप्रूफ असल्याने खराब वगैरे होत नाही. हे कार्ड मिळवण्यासाठी ही आपल्याला 50 रुपयांचा खर्च येतो. परंतु हे कसे मिळवायचे ते समजून घेण्यासाठी हा पुर्ण लेख लक्षपूर्वक वाचा.
स्टेप 1: सगळ्यात आधी आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईट वर जा. तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यातील Order Aadhaar PVC Card या ऑप्शनवर क्लिक करा.
आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईट – eaadhaar.uidai.gov.in
स्टेप 2: ती विंडो उघडताच त्यावर PVC आधारची वैशिष्ट्ये दिसतील, जसे सुरक्षित असा QR code, होलोग्राम, गिलोची पॅटर्न इत्यादी
इथे तीन ऑपशन आहेत
- (A) तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असेल तर
- (B) तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर
(A) तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असेल तर
चालू पेजवर तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर तिथे दिसणारा कॅप्टचा कोडही टाईप करा. नंतर Send OTP बटन वर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर OTP येईल तो खालच्या बॉक्स मध्ये टाईप करा आणि Submit बटनावर क्लिक करा. आता सरळ स्टेप ३ वाचा
(B) तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर
चालू पेजवर तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर तिथे दिसणारा कॅप्टचा कोडही टाईप करा. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड बरोबर लिंक नसेल तर My Mobile Number is not registered वर क्लिक करा. खाली उघडलेल्या मेन्यूमध्ये तुम्ही सध्या वापरत असलेल्या मोबाईल क्रमांक टाका. Send OTP वर क्लिक केल्यावर आताच दिलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. OTP टाकल्यावर टर्म्स अँड कंडीशन बॉक्स वर टिक करा आणि Submit बटनावर क्लिक करा. आता सरळ स्टेप ३ वाचा
स्टेप 3: सबमिट केल्यावर तुम्हाला एक अलर्ट मेसेज दिसेल. ज्यावर असे लिहिले असेल की गुप्ततेच्या कारणासाठी तुमची वैयक्तिक माहिती स्क्रीनवर लपवली जात आहे. पण तुम्ही आत्ता दिलेली सर्व माहिती तुमच्या कार्डवर छापली जाईल. या मेसेजवरही Okay क्लिक करून सहमती द्या.
स्टेप 4: त्यानंतर कार्डसाठी असलेले शुल्क भरण्याबाबतची विंडो उघडेल. आधी म्हटल्याप्रमाणे 50 रुपयांचे शुल्क आकारले जाते. टर्म्स अँड कंडीशन वर टिक करा आणि नंतर Make Payment बटन वर क्लिक करा.
स्टेप 5: आता तुमच्यासमोर पेमेंटचे काही पर्याय दिसतील. जसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, Paytm, Net Banking वगैरे. त्यातील तुम्हाला हवा तो पर्याय निवडून शुल्क भरा.
स्टेप 6: शुल्क भरल्यावर तुम्हाला त्याची पावती मिळेल. ती तुम्ही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी फक्त तिथे दिलेला कॅपचा कोड टाईप करा आणि Download Acknowledge बटन वर क्लिक करा. त्या पावतीवर तुमच्या पेमेंटचे डिटेल्स, आधार नंबर आणि SRN नंबर असेल. तुमच्या आधार कार्डचे स्टेट्स पाहण्यास हा SRN नंबरच तुमची मदत करेल.
तुमच्या आधार कार्डच्या ऑर्डरचा स्टेट्स पाहण्यासाठी हे वाचा –
परत myAadhaar Portal च्या डॅशबोर्डवर या. तिथे Check Aadhar PVC Card Status Order Status वर क्लिक करा.
उघडलेल्या विंडोमध्ये तुमचा SRN नंबर भरा. कॅपचा कोड भरा आणि सबमिट करा. तुम्हाला तुमच्या आधारचे आत्ताचे स्टेट्स दिसेल.
तुमचे कार्ड तयार झाल्यावर आठवडा भरात तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने घरी पाठवले जाते.
SRN म्हणजे काय?
ऑनलाईन आधार कार्ड ऑर्डर करताना SRN नंबर तयार होतो. SRN हा १४ अंकी नंबर असून तो सेवा विनंती क्रमांक (Service Request Number) आहे. हा नंबर uidai.gov.in आधार कार्ड ऑर्डर करताना तयार होतो आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या आधार कार्डचा स्टेट्स बघू शकतो.
आधार पीव्हीसी कार्ड किती दिवसात मिळते ?
जेव्हा आपण ऑनलाईन पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करतो, तो दिवस सोडून पुढच्या 5 कामकाजाच्या दिवसांत ते प्रिंट केले जाते. आणि भारतीय स्पीड पोस्ट च्या माध्यमातून ते आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते.
लेखात दिलेल्या माहितीनुसार तुम्ही घरबसल्या तुमचे PVC आधार कार्ड जरुर मिळावा.
Tags: Aadhar PVC Card Online Marathi, PVC Aadhar Card Online Marathi, PVC aadhar card online order Marathi, PVC aadhar card online order in Marathi, पीव्हीसी आधार कार्ड मराठी