आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आणि टिप्स | How To Get Rid Of Smelly Hair

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी केसांशी निगडित असणारा एक महत्व पूर्ण लेख घेऊन आलो आहोत. आज आपण केसांमधला दुर्गंध कमी कसा करायचा त्यावर काय उपाय करायचे या बद्दल जाणून घेणार आहोत.

How To Get Rid Of Smelly Hair in Marathi

मित्रांनो सुंदर केस सगळ्यांना आवडतात. केसांमुळेच आपल्या सुंदरतेत भर ही पडत असते. काहींचे केस एकदम सुंदर, मुलायम आणि हेल्दी असतात पण त्यातून दुर्गंधी किंवा वास येत असतो. त्यामुळे एकंदरीतच आपल्या पर्सनॅलिटी वर सुद्धा वाईट परिणाम होत असतो. केसांमध्ये दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामुळे, विषाणू होणे, जंतू होणे, अती कोंडा होणे यामुळे केसां मध्ये दुर्गंधी येऊ शकते. अनेक जणांना ही दुर्गंधी कमी करण्यासाठी काय उपाय करावे हे माहीत नसते. म्हणून आज आम्ही तुम्हाला या लेखातून केसांमधील दुर्गंधी कमी कशी करायची व त्यावर काय उपाय करायचे हे सांगणार आहोत. तेव्हा शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.



केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी काही उपाय

  • मित्रांनो तुमच्या घरी दालचिनी पावडर किंवा मध असेलच. हे दोन्ही मिश्रण एकत्र करून अर्धा ते एक तास केसांना लावावे व नंतर पाण्याने स्वच्छ धुऊन टाकावे. यामुळे केसांमधील येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
  • मित्रांनो गुलाब पाण्याचे महत्व किंवा उपयोग तुम्हाला माहित आहे. हे गुलाब पाणी केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी तुम्ही ज्या पाण्याने केस धुणार आहात त्या पाण्यात थोडे गुलाब पाणी मिक्स करावे व या पाण्याने केस धुऊन टाकावे. यामुळे तुमच्या केसांमधील दुर्गंधी दूर होईल. तसेच तुमच्या केसांना छान वास येईल.
  • मित्रांनो केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी कडुलिंब तेल सुद्धा खूप फायदेशीर आहे. तसेच जर तुमच्या कडे कडुलिंबाचे तेल नसेल तर तुम्ही कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या व ते पाणी थंड झाल्या वर, त्या पाण्याने केस धुतल्याने सुद्धा केसांमधील दुर्गंधी हळुहळू दूर होण्यास मदत होते. शिवाय कडुलिंब औषधी असल्याने टाळू (स्काल्प) वर जर इन्फेक्शन असेल तर तेही निघून जाते.
  • मित्रांनो जर तुम्हाला केसांमधील दुर्गंधी दूर करायची असेल, तसेच केस मुलायम करायचे असतील तर तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. थोडेसे कोरफड जेल घेऊन ते तुमच्या टाळू (स्काल्प) व केसांना लावून हळूवार हाताने मालिश करा व थोड्या वेळाने ते स्वच्छ धुवून टाका. असे केल्याने केसां मधील दुर्गंधी दूर होऊन केस सुंदर व मुलायम होतील.
  • केसांमध्ये दुर्गंधी येण्याचे कारण घाम ही असू शकते. त्यामुळे केसांमधून घामाचा वास काढून टाकण्यासाठी तुम्ही टोमॅटो चा वापर करू शकता. त्यासाठी टोमॅटो ला मिक्सर मध्ये बारीक करून त्याची पेस्ट केसांना लावावी. व थोड्या वेळाने केस स्वच्छ धुवून टाकावे. असे नियमित केल्यास केसातील दुर्गंधी हळूहळू दूर होते.
  • मित्रांनो केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे कांद्याचा रस. कांद्याचा रस आणि लिंबूचा रस एकत्र करून केसांना लावावा. व थोड्या वेळांव थंड पाण्याने जेस स्वच्छ धुऊन टाकावे. त्यामुळे केसांमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तसेच कांद्याच्या रसामुळे केस मजबूत आणि दाट होण्यासाठी सुद्धा मदत होते.
  • केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही एप्पल साइडर विनेगरचा सुद्धा वापर करू शकता. यासाठी एप्पल साइडर विनेगर आणि पाणी मिक्स करा व हे मिश्रण केसांना लावा आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने केस धुऊन टाका. यामुळे केसांमधील दुर्गंधी तर दूर होतेच शिवाय तुमचे केस मऊ आणि चमकदार ही होतात.
  • केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा हेअर पॅक पण वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडी मुलतानी माती, थोडे ऍलो वेरा जेल म्हणजे कोरफड जेल आणि थोडे गुलाब पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा व ती केसांना व स्काल्प ला लावा व दहा ते पंधरा मिनीटांनी थंड पाण्याने केस स्वच्छ धुवून टाका. यामुळे केसातील दुर्गंधी तर दूर होईलच पण केस मुलायम व चमकदार सुद्धा दिसतील.

मित्रांनो, केसां मधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वरील कोणताही उपाय तुम्ही करून बघू शकता. पण प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेग-वेगळे असतात. प्रत्येकालाच हे उपाय सूट होतील असे नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्या आधी पॅच टेस्ट करून बघा किंवा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण केसांमधील दुर्गंधी दूर करण्याचे काही उपाय बघितले. आशा आहे की तुम्हाला आज चा हा लेख नक्की आवडला असेल. तसेच हा लेख तुम्हाला महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!