शिलाजीत: म्हणजे काय, असली शिलाजीत कसे ओळखावे, फायदे व तोटे | Shilajit - MarathiDiary
Marathi Health TipsPopular Post Healthआरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

शिलाजीत: म्हणजे काय, असली शिलाजीत कसे ओळखावे, फायदे व तोटे | Shilajitनमस्कार मित्रांनो आज आपण शिलाजीत म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, असली/खरे शिलाजीत आणि नकली शिलाजीत कसे ओळखायचे, तसेच कोणत्या ब्रँड चे शिलाजीत चांगले आहे, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, जेव्हा जेव्हा औषधाचा विचार केला जातो तेव्हा बऱ्याचदा आयुर्वेदिक औषधांचा विचार येतो. पूर्वीच्या काळी औषधी वनस्पतीं किंवा खनिजांच्या सहाय्यानेच बरेच आजार बरे केले जात असे. ही औषधे ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, शिवाय त्यांच्यापासून कोणताही साइड इफेक्ट होत नाही. तशी आयुर्वेदिक औषधी वनस्पती बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात शिलाजीत चा वापर अगदी पूर्वी पासून वैद्य लोक करत आले आहेत. तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये मुख्यत्वे लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी शिलाजीत चा वापर केला जातो. बहुतेक लोक आपले लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी शिलाजीत चा च वापर करतात, त्यामुळे त्यांना वाटते की शिलाजीत फक्त लैंगिक आरोग्य साठीच आहे. पण मित्रांनो, तसे नाहीये. शिलाजीत हे अनेक काळापासून संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जात आहे.फक्त लैंगिक आजारच नाही तर इतरही अनेक प्रकारचे आजार या शिलाजीत मुळे बरे होतात. त्यामुळे शिलाजीत आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे खूप फायदेशीर आहे. पण बऱ्याच लोकांना शिलाजीत म्हणजे नेमकं काय आहे, व त्याचे विविध फायदे काय आहेत ते माहीत नाही. अश्या लोकांसाठी आज आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. आज आपण शिलाजीत बद्दल सर्व प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Shilajit Mahiti

सर्वात पहिले शिलाजीत म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या

What Is Shilajit?

शिलाजीत म्हणजे काय

मित्रांनो, शिलाजीत जे एक प्रकारचे रेझिन/राळ आहे. म्हणजेच तो एक काळपट तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ आहे. जो हिमालयातील पर्वतरांगा मधून काढला जातो. शिलाजीत हे सर्वात शक्तिशाली खनिजांपैकी एक मानले जाते. बऱ्याच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

मित्रांनो, खरंतर शिलाजीत ही काय कोणती वनस्पती नाही तर, शिलाजीत ची उत्पत्ती ही दगडापासून झालेली आहे. तीव्र उष्णतेमुळे पर्वतात असणारे अनेक धातूचे भाग वितळतात आणि पर्वतांमधून ते बाहेर पडतात. या वितळलेल्या पदार्थालाच शिलाजीत म्हणतात. या शिलाजीत मध्ये अनेक प्रकारचे शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट, पेप्टाइड्स, लिपिड, मॉलिक्यूल्स यांच्या सह 85 हून अधिक मिनरल्स म्हणजेच खनिजे आढळून येतात. शिलाजीत मध्ये प्रामुख्याने फुल्विक एसिड (Fulvic acid) असते, ज्यामुळे ब्लड प्यूरिफाय (blood purified) होते. तसेच प्रजनन क्षमता वाढविण्या व्यतिरिक्त शिलाजित चे सेवन करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग शिलाजीतच्या विविध फायद्यां बद्दल जाणून घेऊ या.Benefits of Shilajit

शिलाजीत चे फायदे

 • मित्रांनो, शिलाजीत चा सर्वात मोठा फायदा म्हणजे शिलाजीत शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते. कारण शिलाजीत मध्ये आयर्न चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना ऍनिमिया चा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी शिलाजीत खाणे खूप चांगले आहे.
 • तसेच स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही जर सतत थकवा जाणवत असेल किंवा श्वास फुलत असेल तर तुम्ही शिलाजीत चे सेवन करू शकता.
 • मित्रांनो, शिलाजीत चा आणखीन एक फायदा म्हणजे ते शरीरातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण देखील कमी करते.
 • तसेच अर्थरायटीस म्हणजेच संधिवात किंवा जॉईंट पेन, लो बॅक पेन असेल किंवा सूज येत असेल तर यासर्व त्रासा साठी सुद्धा शिलाजीत खूप उपयुक्त आहे.
 • शिलाजीत चा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे याच्या सेवनाने किडनी आणि युरिनरी ब्लॅडर मजबूत बनते. व ते चांगले कार्य करते. तसेच किडनी स्टोन, किडनीच्या सूज येणे, युरिन च्या वेळेस जळजळ होणे यासारख्या समस्यांसाठी तुम्ही शिलाजीत चे सेवन केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.
 • मित्रांनो, तुम्हाला जर CFS म्हणजेच Chronic fatigue Syndrome चा त्रास होत असेल म्हणजे जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, कोणतेही काम करण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही शिलाजीत चे सेवन करू शकता. यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होऊन तुम्ही स्वतःला नेहमी ऍक्टिव्ह ठेवू शकता.
Kapiva Himalayan Shilajit Resin Product
शिलाजित प्रॉडक्ट माहितीसाठी लिंक => कपिवा हिमालय शिलाजित
 • यासोबतच शिलाजीत मुळे तुम्हाला अल्झायमर च्या समस्येपासून ही सुटका मिळू शकते.
 • तसेच पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या वाढवण्यासाठी किंवा इन्फेर्टीलिटी (infertility) चा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी ही शिलाजीत चा उपयोग केला जातो.
 • याशिवाय शिलाजीत अँटी एजिंग चे काम करते. म्हणजेच वाढते वय कमी करण्याचे काम शिलाजीत करते.
 • तसेच तुमच्या इम्युनिटी ला वाढविण्याचे काम ही शिलाजीत करते.
 • मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी, डायबिटीस साठी, पोटातील अल्सर साठी देखील शिलाजीत चा उपयोग केला जातो.

Shilajit side effects

शिलाजीत चे साइड इफेक्ट्स म्हणजेच दुष्परिणाम काय आहेत?

 • मित्रांनो, शिलाजीत मुळे शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण वाढते. त्यामुळे जर आधीच तुमचे युरिक ऍसिड वाढलेले असेल तर या परिस्थितीत शिलाजीत चे सेवन करणे टाळावे.
 • तसेच गर्भवती स्त्रियांनी व स्तनपान करणाऱ्या महिलांनी शिलाजीत चे सेवन अजिबात करू नये.
 • अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे शिलाजीत घेत आहात ते प्युअर म्हणजेच शुद्ध शिलाजीत असायला हवे. जर त्यात काही इम्प्युरीटीझ असतील तर त्यामुळे तुमच्या शरीरास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 • मित्रांनो, शिलाजीत घेण्याचे ही एक ठराविक प्रमाण आहे. त्यामुळे चुकून जर त्याचे प्रमाण जास्त झाले तर शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणून शिलाजीत चे सेवन करताना काळजी पूर्वक करावे.
 • याशिवाय जर तुमच्या शरीरात नेहमी हार्मोन्स चा इमबॅलन्स असेल तर तुम्ही शिलाजीत चे सेवन करू नये. कारण शिलाजीत मुळे शरीरातील अनेक हार्मोन्स चे प्रमाण वाढते. त्यामुळे हार्मोनल इमबॅलन्स असणाऱ्या व्यक्तींनी शिलाजीत चे सेवन करण्याआधी आपल्या तज्ञ डॉक्टर चा सल्ला अवश्य घ्यावा.

शिलाजीत किती प्रमाणात घ्यावे?

मित्रांनो, शिलाजीत एका ठराविक प्रमाणात घ्यावे लागते. प्रति दिवस 100 ते 150 मिलिग्राम शिलाजीत तुम्ही घेऊ शकता. शिलाजीत विविध फॉर्म्स मध्ये मिळते. म्हणजेच ते कॅप्सूल मध्ये मिळते, लिक्विड फॉर्म मध्ये, सॉलिड फॉर्म, पावडर फॉर्म, टॅबलेट फॉर्म मध्ये ही मिळते. त्यामुळे त्याचे प्रमाण त्या त्या प्रकारानुसार घ्यावे. तसेच शिलाजीत ला तुम्ही कधीही घेऊ शकता. मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा. जर तुम्ही शिलाजीत ला लिक्विड फॉर्म मध्ये किंवा पेस्ट फॉर्म मध्ये घेत असाल तर तुम्हाला त्याला एक चणाडाळ च्या आकारएव्हढे घ्यायचे आहे. व त्याला एक ग्लास पाण्यासोबत किंवा दुधासोबत रात्री झोपताना घ्यायचे आहे.

How To Identify A Pure Shilajit

असली शिलाजीत कसे ओळखावे?

 1. मित्रांनो, जर तुम्ही शिलाजीत ला आगीत ठेवळस तर ते आग पकडत नाही. तसेच ते वितळायला लागते व त्याची राख होते. म्हणजेच ते असली शिलाजीत आहे. आणि जर नकली शिलाजीत असेल तर ते आगीत टाकताच पेट घेईल व धूर यायला लागेल.
 2. असली शिलाजीत ओळखण्याचा दुसरा उपाय म्हणजे ते पाण्यात विरघळते का ते पहा. जर ते पाण्यात विरघळले तर ते असली शिलाजीत आहे. व जर ते नकली असेल तर त्यात असणारे इम्प्युरीटीझ हे तळाशी जाऊन बसतील व पाण्यात विरघळणारे नाही.
 3. तसेच शिलाजीत ला त्याच्या वासावरून देखील ओळखता येऊ शकते. असली शिलाजीत चा वास हा थोडा थोडा गोमूत्र सारखा येतो.
 4. या शिवाय जर तुम्ही अल्कोहोल मध्ये असली शिलाजीत टाकले तर ते त्यात विरघळणार नाही.

मित्रांनो, मार्केट मध्ये विविध ब्रॅंडचे शिलाजीत उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणते शिलाजीत वापरावे त्या बद्दल जाणून घेऊ या.कोणत्या ब्रँड चे शिलाजीत वापरावे?

Kapiva Himalayan Shilajit Resin:- मित्रांनो, या ब्रॅंडचे शिलाजीत मार्केट मध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे शिलाजीत हिमालयाच्या जास्त उंची वरून म्हणजेच जवळपास 18000 फीट उंचीवरून मिळवले जाते. म्हणून ते चांगले आहे. कारण शिलाजीत जेवढ्या जास्त उंचीवरून मिळवले जाईल तेवढे ते प्युअर असते व त्यात इम्प्युरीटीझ (impurities) कमी असतात. त्यामुळे कपिवा चे हे शिलाजीत खूप चांगले मानले जाते.

Kapiva Himalayan Shilajit Resin
>> कपिवा हिमालय शिलाजित चेक करा

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे शिलाजीत लॅब टेस्टेड आहे. म्हणून हे एक सुरक्षित शिलाजीत आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या इम्प्युरीटीझ (अशुद्धी) नसतात. याचा मुख्य फायदा म्हणजे जर तुम्ही स्वतःला सतत थकलेले जाणवत असाल, तर कपिवा चे हे शिलाजीत नक्की वापरावे. तसेच कपिवा हिमालयन शिलाजीत स्नायूंची ताकद वाढविण्यास मदत करते. हे टेस्टोस्टेरॉनची लेव्हल देखील वाढवते. जे पुरुषांच्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील जबाबदार असतात. मित्रांनो, कपिवा च्या या शिलाजित मध्ये 80 हुन अधिक खनिजे असल्याने, ते नैसर्गिक रित्या एनर्जी लेव्हल वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला नेहमी उत्साही आणि ताजेतवाने वाटते.

शिलाजित प्रॉडक्ट माहितीसाठी लिंक => कपिवा हिमालय शिलाजित

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण शिलाजीत म्हणजे नवमक काय असत, त्याचे फायदे काय आहेत, असली शिलाजीत कसे ओळखायचे, या अश्या सर्व गोष्टी बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिलाजीत घेण्याआधी तुमच्या डॉक्टरचा अवश्य सल्ला घ्यावा. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

FAQ

शिलाजित रोज घेणे योग्य आहे का?

मित्रांनो, शिलाजीत मध्ये झालेल्या संशोधनाप्रमाणे शिलाजीत मुळे आहारात चांगले बदल व्हावे म्हणून दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित आहे.

शिलाजीतचे दुष्परिणाम आहेत का?

हो मित्रांनो, शिलाजीत जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे थकवा किंवा चक्कर येणे, अशक्तपणा येऊ शकतो, तसेच जर शिलाजीत खूप जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील यूरिक ऍसिड वाढते आणि ते शरीरासाठी घातक ठरू शकते.

शिलाजीत म्हणजे नेमकं काय असतं?

मित्रांनो, शिलाजीत हे एक प्रकारचे रेझिन असते जे हिमालयाच्या पर्वतात सापडते. हे काळपट तपकिरी रंगाचे असते व त्यातून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो.

इतर औषधे चालू असताना शिलाजीत चे सेवन करू शकतो का?

मित्रांनो, तुमची जर आधी पासूनच इतर कोणतीही औषधे चालू असतील तर तुम्ही शिलाजीत चे सेवन करू नये. आणि जर तुम्हाला करायचेच असेल तर आधी तुमच्या डॉक्टर चा सल्ला अवश्य घ्या.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!