Rojgar Hami Yojana

रोजगार हमी योजना जॉब कार्ड डाउनलोड, तुमच्या मोबाईल वर | Rojgar Hami Job Card Download | Mnrega Job Card

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण रोजगार हमी योजना जॉब कार्ड (मनरेगा) मोबाईल वरून डाउनलोड कसे करायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Rojgar Hami Yojana Job Card Download

मित्रांनो, शासनाच्या विविध योजनेच्या कामासाठी व लाभासाठी जॉबकार्ड असणे गरजेचे आहे. तसेच आता विहीर योजनेकरिता व फळबाग अनुदान योजने करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्यासाठी जॉब कार्ड ची आवश्यकता असते. तसेच इतर काही योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील लाभार्थ्यांकडे रोजगार हमी योजना जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.



मित्रांनो, अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना काम नसेल तर रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून दिले जाते. पण या सर्व गोष्टींसाठी जॉब कार्ड असणे खूप गरजेचे आहे. तुमच्याकडे जर जॉब कार्ड असेल पण जर ते हरवले किंवा खराब झाले असेल तर आता तुम्ही ते मोबाईल द्वारे ऑनलाईन डाउनलोड करून घेऊ शकता. हे रोजगार हमी योजना जॉब कार्ड मोबाईल वरून डाउनलोड कसे करायचे, या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

रोजगार हमी जॉब कार्ड डाउनलोड मोबाईल वर

रोजगार हमी योजना जॉब कार्ड मोबाईल वरून डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…

स्टेप 1: मित्रांनो, तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला https://nregastrep.nic.in/ या वेबसाईट वर जायचे आहे.

त्यानंतर नेक्स्ट इंटरफेस मध्ये थोडं खाली आल्यावर तुमचे राज्य निवडायचे आहे.

Rojgar Hami Yojana Job Card Download Step 1

स्टेप 2: आता पुढे तुम्हाला थोडे खाली आल्यावर उजव्या बाजूला Transparency and accountability या सेक्शन मध्ये Job Cards या पर्यायावर क्लीक करायचे आहे.



Rojgar Hami Yojana Job Card Download Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला काही माहिती भरायची आहे. ज्यात फायनान्शियल इयर मध्ये चालू वित्तीय वर्ष सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर तुमचा जिल्हा (District ), block (तालुका ), panchayat मध्ये तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. व नंतर Proceed या बटन वर क्लिक करायचे आहे.

Rojgar Hami Yojana Job Card Download Step 3

स्टेप 4: मित्रांनो, या नंतर आता तुमच्या समोर तुमच्या गावातील जॉब कार्ड लिस्ट नाव व क्रमांकासाहित ओपन होईल. त्यातून तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. मित्रांनो, या जॉब कार्ड लिस्ट मध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींची नाव लिहिलेली नसतात तर कुटुंबातील फक्त एका व्यक्तीचे नाव लिहिलेले असते. व त्या अंतर्गत इतर सदस्याची नावे असतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील एकूण व्यक्तींपैकी जर एकाचे ही नाव दिसले तर त्या नावासमोरील जॉब कार्ड क्रमांक वरती क्लीक करायचे आहे.

Rojgar Hami Yojana Job Card Download Step 4

व लगेच तुमच्या समोर तुमचे जॉब कार्ड आलेले दिसेल. तुम्ही ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याची पीडीएफ देखील बनवून ठेवू शकता व नंतर बाहेरून त्याची प्रिंट काढू शकता.

Rojgar Hami Yojana Job Card Download Step 5

जॉब कार्ड कोण बनवू शकतं?

मित्रांनो, जॉब कार्ड हे गावातील कोणतीही साधारण व्यक्ती काढू शकते. त्यातही जर तुम्ही काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही तुमचं जॉब कार्ड बनवू शकतात. फक्त सरकारी नोकरी करणारी व्यक्ती जॉब कार्ड बनवू शकत नाही.

जॉब कार्डचा वापर काय आहे?

मित्रांनो, रोजगार हमी योजना अंतर्गत मिळालेले जॉब कार्ड हे खूप फायदेशीर असते. जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुम्ही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीच्या, राज्य किंवा केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये मध्ये काम मिळवू शकतात.

कोणकोणत्या बाबींसाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे?

मित्रांनो, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड हे खूप महत्वाचे आहे. या योजनांमध्ये घरकुल योजना, शौचालय अनुदान, विहीर योजना, गाई गोठा, शेळीपालन, कुकुटपालन, फळबाग अनुदान अशा सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण रोजगार हमी योजना जॉब कार्ड मोबाईल वरून डाउनलोड कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl

Tags: job card download, rojgar hami yojana job card download, online job card download, rojgar hami yojana card download, rorjgar hami yojana card download, job card rojgar hami yojana, rojgar hami yojana job card, rojgar hami yojana job card download on mobile, रोहयो जॉब कार्ड, रोहयो जॉब कार्ड डाऊनलोड, रोजगार हमी योजना जॉब कार्ड डाऊनलोड, रोहयो ऑनलाईन जॉब कार्ड डाऊनलोड, मनरेगा जॉब कार्ड सूची, जॉब कार्ड ऑनलाइन, नरेगा महाराष्ट्र, नरेगा लिस्ट, mnarega list 2024, Employment Guarantee Job Card

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!