रोजगार हमी जॉब कार्ड कसे काढावे | Rojgar Hami Job Card Apply | Mnrega Job Card - MarathiDiary
Rojgar Hami Yojana

रोजगार हमी जॉब कार्ड कसे काढावे | Rojgar Hami Job Card Apply | Mnrega Job Card



नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण जॉब कार्ड कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, तसेच कार्ड बनवण्यासाठी कोणत्या नियम व अटी आहेत, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Rojgar Hami Job Card

मित्रांनो, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत द्वारे जॉब कार्ड दिले जाते. या जॉब कार्डचे खूप फायदे आहेत. ज्यात तुम्हाला जर घरकुल योजना, गायगोठा शेड, फळबाग लागवड अनुदान, नवीन विहीर साठी अनुदान इत्यादी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर जॉब कार्डचा उपयोग होतो. पण बऱ्याच जणांना या योजनांचा फायदा तर घ्यायचा असतो पण त्यांच्याकडे जॉब कार्ड नसते. तर हे जॉब कार्ड कसे बनवायचे? त्यासाठी काय पात्रता लागते, कागदपत्रे कोणती लागतात या अश्या सर्व गोष्टी बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे?

मित्रांनो, नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन जॉब कार्ड बनवण्याकरिता एक अर्ज भरायचा आहे. हा नमुना नंबर 1 चा फॉर्म असतो. हा फॉर्म महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन नाव नोंदणी करण्यासाठी व कुटुंबाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे.

Job Card pdf Marathi

हा फॉर्म निःशुल्क असतो. या सोबत तुम्हाला जॉब कार्ड बनवण्याकरिता आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून, फॉर्म मधील माहिती भरून तुमचा फोटो लावून नंतर तो तुमच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांच्याकडे जमा करायचा आहे.

फॉर्म जमा केल्यावर तुम्हाला त्याची पावती देखील दिली जाते व त्या नंतर पुढील काही दिवसांत तूमचे जॉब कार्ड तयार होऊन जाईल. त्या नंतर तुम्हाला जॉब कार्ड चा क्रमांक देखील मिळेल. त्यावरून तुम्ही मोबाईल द्वारे जॉब कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता.



जॉब कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

मित्रांनो, जॉब कार्ड काढण्यासाठी

  • लाभार्थ्याचा पासपोर्ट साइज फोटो,
  • आधार कार्डची प्रत,
  • बँक पासबूक ची प्रत,
  • रेशन कार्डची प्रत व ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.

जॉब कार्ड काढण्यासाठी काय पात्रता आहे?

मित्रांनो, नरेगा जॉब कार्ड काढण्यासाठी सर्वात पहिले अर्जदार हा भारताचा कायम स्वरूपी रहिवासी असला पाहिजे. तसेच या योजने अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण जॉब कार्ड कसे बनवायचे? या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

Tags: job card tayar karne, rojgar hami yojana job card apply, online job card apply, rojgar hami yojana card apply online, rorjgar hami yojana card download, job card rojgar hami yojana, rojgar hami yojana job card, rojgar hami yojana job card apply on mobile, रोहयो जॉब कार्ड, रोहयो जॉब कार्ड, रोजगार हमी योजना जॉब कार्ड डाऊनलोड, रोहयो ऑनलाईन जॉब कार्ड डाऊनलोड, मनरेगा जॉब कार्ड सूची, जॉब कार्ड ऑनलाइन, नरेगा महाराष्ट्र, नरेगा लिस्ट, mnarega list 2024, Employment Guarantee Job Card

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद