डार्क सर्कल्स आलेत? ट्राय करा हे घरगुती रामबाण उपाय, मुळापासून हटवा
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण डोळ्याखाली असलेले डार्क सर्कल्स घालवायचे कसे, त्यावर उपाय काय करावा याबद्दल माहिती बघणार आहोत.
मित्रांनो, तुमचा चेहरा कितीही सुंदर असला तरी जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील तर तुमचा चेहरा खूप विद्रुप दिसतो. स्त्री असो किंवा पुरुष तुमच्या डोळ्याखाली असणारे हे डार्क सर्कल्स तुमचं सौंदर्य खराब करते. पण हे डार्क सर्कल्स का होतात, त्याचे कारण काय आहेत, आणि त्यावर काय उपाय करावा याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत.
मित्रांनो, जर तुम्हाला ही डार्क सर्कल्स ची समस्या असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
डार्क सर्कल्स म्हणजे नेमकं काय व त्याबद्दल थोडी माहिती
मित्रांनो, डार्क सर्कल्स म्हणजे तुमच्या डोळ्याखालची त्वचा काळी पडणे. हा कुठला वैद्यकीय आजार नाही, पण शरिरातील काही कमतरतांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल्स हे स्त्री व पुरुष कुणालाही असू शकतात. तसेच कोणत्या वयोगटातील म्हणजे किशोरवयीन मुलांपासून ते पन्नास साठ वयापर्यंत डार्क सर्कल्स होऊ शकतात. तुमच्या आहारात काही कमतरता किंवा गडबड असली किंवा स्वतः कडे तसेच त्वचेकडे व्यवस्थित लक्ष नाही दिले तर डार्क सर्कल्स तुम्हाला घेरू शकतात. त्यामुळे तुम्ही स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येक वयात या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.
डार्क सर्कल्स होण्यामागचे कारणे काय आहेत?
What Causes Dark Circles Under Your Eyes?
मित्रांनो, डार्क सर्कल्स तर कोणालाही व कधीही होऊ शकतात, पण ते का होतात, हे बऱ्याच जणांना माहीत नसते. चला तर मग डार्क सर्कल्स होण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊ या.
कारण 1 – डार्क सर्कल्स होण्याचे पहिले कारण म्हणजे अनुवांशिकता. तुमच्या घरात जर एखादया व्यक्तीला डार्क सर्कल्स ची समस्या असेल तर ते तुम्हाला ही होण्याची शक्यता असते. काही जणांमध्ये ही समस्या लहान पणापासूनच दिसायला सुरुवात होते.
कारण 2 – डार्क सर्कल्स होण्याचे दुसरे कारण म्हणजे थकलेले डोळे. खूप जास्त वेळ टीव्ही पाहत बसने किंवा कम्प्युटर वर तासनतास काम करत राहणे. यामुळे डोळे थकून जातात. त्यामुळे डोळ्यांच्या आस पास असलेल्या नसांना त्रास होतो व परिणामी डोळ्या खालील त्वचा गडद म्हणजे डार्क दिसू लागते.
कारण 3 – डार्क सर्कल्स होण्याचे तिसरे कारण म्हणजे कमी किंवा जास्त झोप. गरजेपेक्षा जास्त झोप किंवा कमी झोप झाल्याने सुद्धा डार्क सर्कल्स होऊ शकतात. कमी झोपे मुळे डोळ्याखालची त्वचा कमकुवत होऊन तेथे डार्क सर्कल्स तयार होतात.
कारण 4 – डार्क सर्कल्स होण्याचे चौथे कारण म्हणजे तुमचे वाढते वय. जस जसे वय वाढत जाते तस तसे डार्क सर्कल्स होण्याचे प्रमाण ही वाढत जाते. याचे कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्याखालची त्वचा सैल पडते व डार्क सर्कल्स वाढतात.
कारण 5 – डार्क सर्कल्स होण्याचे पाचवे कारण म्हणजे ऍलर्जी. मित्रांनो, धूळ, माती किंवा प्रदूषणमुळे डोळ्याखालील त्वचेला ऍलर्जी होऊन डार्क सर्कल्स होऊ शकतात.
कारण 6 – डार्क सर्कल्स होण्याचे सहावे कारण म्हणजे पाण्याची कमतरता. शरीरात पाणी कमी झाल्याने डोळ्याखालील त्वचा कोरडी व निस्तेज होते. त्यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स होण्याचे प्रमाण वाढते.
कारण 7 – डार्क सर्कल्स होण्याचे सातवे कारण म्हणजे इतर आजार. तुम्हाला असणारे इतर आजार किंवा औषधांचे अति सेवन किंवा थायरॉईड यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स होऊ शकतात.
कारण 8 – डार्क सर्कल्स येण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मानसिक ताण तणाव. अतिविचार केल्यास किंवा कुठल्याही गोष्टीचा ताण किंवा टेन्शन घेतल्यास डार्क सर्कल्स वाढू शकतात.
डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय
Home Remedies for Removing Dark Circles
डोळ्याखालील डार्क सर्कल्स किंवा काळे डाग जाण्यासाठी किंवा डार्क सर्कल्स होऊ नयेत यासाठी काय उपाय करावा?
- मित्रांनो, डार्क सर्कल्स होऊ नयेत यासाठी तुम्ही नियमित पणे सन ग्लासेसचा वापर करावा. तसेच हॅटचा वापर करावा. यामुळे सूर्य किरणे तुमच्या चेहऱ्या वर डायरेक्ट येणार नाही आणि किरणांमुळे तुमच्या चेहऱ्याला तसेच त्वचेला हानी पोहोचणार नाही.
- डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी ताण किंवा स्ट्रेस घेणं कमी करा. तसेच काम कमी करून स्वतःसाठी वेळ काढा.
- नियमितपणे डोळ्यांची काळजी घ्या. तुमच्या घरात एखाद्याला आधी पासूनच डार्क सर्कलचा त्रास असेल तर तुम्हाला तो होऊ नये यासाठी थंड दूध किंवा काकडी डोळ्यावर ठेवणे चालू करा.
- मित्रांनो डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी टोमॅटो हे अतिशय उपयुक्त आहे. टोमॅटोच्या रसामुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. याशिवाय टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने डार्क सर्कल्स लवकर कमी होण्यास मदत होते.
- डोळ्या खालचे काळे डाग म्हणजेच डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी बटाटा पण खूप फायदेशीर आहे. बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने डोळ्याखाली लावल्याने काळे डाग लवकर घालवता येतात.
- टी बॅग्स चा वापर करून डार्क सर्कल कमी करता येतात. पहिले टी बॅग थंड पाण्यात भिजत ठेवा. व नंतर थोडा वेळ फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नंतर काढून डोळ्यांवर दहा ते पंधरा मिनिटे ठेवा. व नंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. असे केल्याने डार्क सर्कल्सला कमी होण्यास मदत होते.
- मित्रांनो, थंड दुधात कापूस बुडवून तो डोळ्यांवर ठेवल्यास डार्क सर्कल्स कमी करता येऊ शकतात. असे तुम्ही रोज ही करू शकता.
- संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर करून त्यामध्ये गुलाब पाणी मिसळून ते लावल्याने डार्क सर्कल्स कमी होऊ लागतात.
- मित्रांनो, बदामाचे तेल ही डार्क सर्कल्ससाठी उत्तम उपाय आहे. थोडे बदामाचे तेल घेऊन ते डोळ्याखालील त्वचेला लावून बोटांच्या मदतीने हळुवार मसाज केल्याने ही डार्क सर्कल्स कमी होण्यामध्ये फायदा होतो.
- तसेच काकडी ही थंड असल्याने त्याचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कल्स कमी होऊ लागतात. या उपाय नियमित करावा. यामुळे डोळ्यांना पण आराम मिळतो.
- संत्र्याच्या रस मध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिडमुळे डार्क सर्कल्स मध्ये लवकर फायदा होतो.
- याशिवाय कोरफड सुद्धा खूप औषधी आहे. यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.
- नारळाचे तेल ही डार्क सर्कल्स मध्ये फायदेशीर आहे. नारळाचे तेल ने डोळ्याखाली हळुवार मालिश केल्याने काळे डाग निघून जातात. आणि डोळयांच्या भोवतालची त्वचा तजेलदार होते.
- पुरेशी झोप घ्या. कमीत कमी रोज आठ तास तरी झोप घ्यावी. तसेच तुमच्या आहार कडे व्यवस्थित लक्ष द्या. भरपूर पाणी प्या. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
- पुरुषांनी धूम्रपान करणे टाळावे. कारण धूम्रपान मुळे त्वचे वर परिणाम पोहचून डार्क सर्कल्स होऊ शकतात.
- स्त्री व पुरुष दोघांनी नियमितपणे व्यायाम करावा. तसेच जास्त डोळे चोळणे टाळावे. घरा बाहेर जाताना नियमित पणे सनस्क्रीन चा वापर करावा.
वरील सर्व उपाय करून ही जर तुमचे डार्क सर्कल्स जात नसतील तर एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
मित्रांनो, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कोणताही उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तर मित्रांनो, डार्क सर्कल्स हे अनुवंशिकते मुळे असतील किंवा काही इतर कारणामुळे असतील तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि हो डार्क सर्कल्स कमी करणे ही अशक्य गोष्ट नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर डार्क सर्कलचा त्रास असेल तर टेन्शन घेऊ नका. वरील उपाय वापरून व डॉक्टर चा सल्ला घेऊन तुम्ही त्यासमस्ये पासून सुटका करू शकता.
तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आज चा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरु नका. धन्यवाद.