आता घर विकत न घेता देखील तुम्हाला मिळू शकत घरभाडे, कसं? हे वाचा…
आपलं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपल्याला हक्काचं घर असावं. आपण आपल्या मेहनतीने, काटकसरीने एखादं घर विकत घेतो देखील. पण या स्वप्नाच्या वर अजून एक स्वप्न असतं ते आपण नेहमीच अशक्य मानतो, ते म्हणजे गुंतवणूक म्हणून घराचा विचार… म्हणजे आपण जर गुंतवणूक म्हणून घराचा विचार केला तर त्याचे एकंदरीत दोन फायदे आपल्याला होतात, एक म्हणजे आपली ती प्रॉपर्टी भाड्याने देऊन दरमहा भाडे चालू होईल आणि काही काळानंतर प्रॉपर्टीचे भाव वाढत राहून प्राईझ आप्रिसीएशन पण मिळेल. पण या सगळ्या गोष्टी सत्यात उतरवताना मात्र इतक्या सहज शक्य नसतात. यामध्ये कोणकोणत्या समस्या येतात ते आपण खाली पाहू.
- एकतर या सगळ्याला लागणारा प्रचंड भांडवली खर्च आणि त्या मानाने भाड्याच्या रूपाने येणारा अत्यंत कमी स्वरूपाचा परतावा
- लोनचा पर्याय: मग जर लोन घेऊन अशी प्रॉपर्टी घायची ठरवली तर त्या लोनची परतफेड करताना लोन दिलेल्या संस्था मग त्या बँका असो किंवा अजून कोणत्याही संस्था त्यांना लोन म्हणून घेतलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट रक्कम आपल्याला भरावी लागते
- लागणारा वेळ: म्हणजे गुंतवणूक करण्यास लागणारा भांडवली खर्च आपण जमवण्यास यशस्वी झालो तरी भाडेकरू शोधण्यासाठी वेळ लागतोच, मग त्यासाठी अजेंटची शोधाशोध असो किंवा त्यांना कमिशन म्हणून द्यावा लागणार पैसा असो, हा अतिरिक्त खर्च मागे लागतो
- शिवाय भाडेकरू कसा निघेल याची शाश्वती नसते, मग सोसायटीच्या येणाऱ्या तक्रारी, आणि त्याचा वेगळा मनस्ताप
- प्रॉपर्टीच्या मेंटेनन्ससाठी दरमहा येणाऱ्या खर्चाचा मीटर देखील चालू झालेला असतो
मग यावर काय उपाय? असा काही उपाय आहे का जेणेकरून कमी पैशात आम्हाला एखाद्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळेल आणि त्यापासून भाडे देखील मिळेल आणि या सगळ्या भानगडी पासून मुक्ती देखील मिळेल.
तर यासाठी आपल्याला एक छान पर्याय रिटच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
रिट (REIT) म्हणजे नेमकं काय
तर सर्वप्रथम रिट (REIT) म्हणजे नेमकं काय ते आपण सर्वप्रथम समजून घेऊ. तर रिट म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. आता ही ट्रस्ट नेमकी काय करते ते पाहू. तर ही इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जागेमध्ये गुंतवणूक करणार. आणि ही गुंतवणूक रहिवासी (रेसिडेंट) भागामध्ये नसून व्यवसायिक (बिजीनेस पार्क सारख्या) भागात मध्ये असेल. म्हणजे आपण जाणतोच की रहिवासी भागात असलेले भाडे आणि व्यावसायिक ठिकाणी जसे दुकाने, कार्यालये यांचे भाडे यामध्ये खूप फरक असतो. दुकाने किंवा ऑफिसेस यांचे भाडे रहिवासी जागेतून मिळणाऱ्या भाड्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते.
म्हणजेच आपण गुंतवणूक केलेली ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आपली गुंतवणूक अश्या मोठमोठ्या बिजनेस पार्कमध्ये करणार आणि त्यामधील ऑफिसेस, दुकाने भाड्याने देणार. आणि त्या भाड्यातून येणारा पैसा गुंतवणूकदारांमध्ये डिव्हिडंड म्हणून वाटणार.
हा सगळा व्यवहार आपण कसा करू शकतो? याच उत्तर अगदी साधं आहे. म्हणजे आपण जसे शेअर बाजारातून शेअर्सची खरेदी विक्री करतो अगदी तसेच आपल्याला या रिटचे शेअर्स घ्यावे लागतील. सध्या तीन रिट स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
- एम्बसी (Embassy)
- माईंडस्पेस (Mindspace)
- ब्रूकफील्ड (Brookfield)
हे तीन पर्याय सध्या शेअर बाजारात आपल्यासाठी रिटच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. हे तीनही रिट साध्य 350 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहेत. यांची प्राईझ कमी जास्त होत असते. म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की यातून बाहेर पाडाव तर तुम्ही अगदी शेअर्स विकून शेअर त्या शेअर्स मधून बाहेर पडता अगदी तसेच तुम्ही या रिटमधून देखील बाहेर पडू शकता.
जर तुमच्याकडे डिमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही भारतातील नंबर 1 ब्रोकर झेरोधा (Zerodha) वर 100 ते 200 रुपयांमध्ये ऑनलाईन अकाउंट उघडू शकता. त्याचबरोबर तुम्ही आमच्या लिंकला क्लिक करून अकाउंट उघडले तर आम्हाला मदत होईल. झेरोधा (Zerodha) वर अकाउंट उघडण्यासाठी लिंक =>_zerodha.com_<=
बरं तुम्हाला डिव्हिडंड कधी मिळेल?
सध्या तरी हा डिव्हिडंड तिन्ही रिट हे तिमाही पध्दतीने देत आहेत. रिटच्या एका शेअर मागे साधारणपणे 6 रुपये अश्या पध्दतीने डिव्हिडंड या ट्रस्ट देत आहेत. त्यांना त्यांच्या गुंतवणूकीतून मिळणाऱ्या परताव्यातील 90 टक्के भाग हा गुंतवणूकदाराना परत करणे बंधनकारक आहे. ही सामान्य गुंतवणूकदांरासाठी समाधानाची बाब म्हणता येईल. म्हणजे आपले पैसे गुंतून राहतील. आणि एक छान पॅसिव्ह इनकम सोर्स तयार होईल.
तरी भविष्यात रिट हा गुंतवणूक म्हणून एक चांगला पर्याय ठरू शकेल यात शंका नाही.
लेखक – अभिजित ननावरे