पाणी निरोगी आयुष्य जगण्यासाठी कसे मदत करते?
नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ‘पाणी हेच जीवन’ असे आपण नेहमी म्हणतो, पण असे म्हणण्याचं कारण काय आहे, का पाण्याला जीवन म्हटले जाते, आपल्या शरीराला पाण्याची गरज कशासाठी असते, आवश्यक तेवढे पाणी शरीरात न गेल्यास किंवा न पिल्यास काय होऊ शकते, पाणी पिल्या नंतर त्याचे काय होते, हे पाणी शरीरात कशासाठी वापरले जाते ,या अशा सर्व प्रश्नांबद्दल आपण आज सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.
मित्रांनो, आपले शरीर हे 65 ते 70 टक्के पाण्याने भरलेले आहे. शरीरातील प्रत्येक अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरातील अवयवांची अंतर्गत कार्यप्रणाली व्यवस्थित चालू राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे असते. पाण्या अभावी ही कार्य प्रणालीत बिघाड होऊ शकतो. त्यामुळे दिवस भरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. दिवस भर कामात गुंतलेले असल्याने बऱ्याच वेळा पाणी पिण्याकडे आपले दुर्लक्ष होते. व परिणामी शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. पुरेसे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता होते. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. थकवा येतो तसेच डोके दुखायला लागते. याशिवाय किडनीच्या कार्य प्रणाली मध्ये देखील बिघाड होऊ शकतो.
असे म्हटले जाते की आपला मेंदू ही 70 टक्के पाण्याने बनलेला आहे. जर असे असेल तर आपल्या मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी पाणी पिणे खूपच महत्वाचे आहे. खरंतर पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट न पाहता थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत रहावे. याशिवाय ही आपल्या शरीरासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे. चला तर मग पाण्याचे महत्व जाणून घेऊ या.
शरीरासाठी पाण्याचे महत्व
Benefits of Drinking Water
- मित्रांनो, आपल्या स्नायूंचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते. पाणी दिसायला जरी साधे असले तरी त्यात काही खनिजे व जीवनसत्त्वे विरघळलेले असतात. आणि त्यांचा आपल्या शरीराला फायदा होत असतो. त्यांच्या मुळेच आपले स्नायू त्यांचे कार्य नीट पार पाडतात.
- शरीरातील इतर द्रव्यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी पाण्याचे खूप महत्व आहे. यामध्ये लाळ, तसेच पचनाला आवश्यक असणारी पाचक द्रव्ये , मेंदूला संरक्षण देणारे सेरेब्रोस्पायनल फ्ल्युईड, यांचा समावेश होतो. या सर्व पातळ पदार्थांमुळे आपले शरीर नीट काम करते. त्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.
- मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी ही पाण्याचे खूप महत्व आहे. तुम्हाला जर व्यायाम पूर्ण कार्यक्षमतेने करायचा असेल तर भरपूर पाणी पिले पाहिजे. त्यामुळे ताजेतवाने वाटते. व भरपूर पाणी पिल्याने पोट भरल्याची कल्पना येते व वजन कमी होऊ लागते. तसेच नुसते पाणी जात नसेल तर तुम्ही दूध, सूप, दही, ताक, सलाद, फळे खाऊ शकता त्यातून ही शरीरात भरपूर प्रमाणात पाणी जाते. यांमुळे भूक ही लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.
- आपल्या त्वचेचे आरोग्य सांभाळण्यासाठी ही पाण्याचे खूप महत्व आहे. शरीरातून त्वचे मार्फत घाम निघतो. या घामामध्ये पाणी व इतर विषरी घटक असतात. यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित ठेवले जाते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. पाणी कमी पिल्यास त्वचा निस्तेज, सुरकुतलेली व कोरडी दिसते. म्हणून टवटवीत त्वचेसाठी पाणी पिणे महत्वाचे आहे.
- याशिवाय पोट साफ होण्यासाठी ही पाण्याचे खूप महत्व आहे. आपली चयापचय क्रिया पूर्ण होऊ पर्यंत पाणी मिळाल्याने शौचास नीट होते. पण जर पाणी कमी पडले तर आतडे त्या कामासाठी शरीरातील पाणी शोषून घेतात व त्यामुळे त्रास व्हायला लागतो. म्हणून पोट व्यवस्थित साफ करण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे असते.
- तसेच मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. मूत्रपिंडामध्ये रक्तातील अनावश्यक व विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. त्यातूनच मूत्र तयार होते. हे कार्य करण्यासाठी मूत्रपिंडाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. पण कमी पाणी पिऊन आपण मूत्रपिंडावरचा कामाचा ताण वाढवतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मुतखडाचा त्रास भोगावा लागतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.
- तसेच तोंडातील लाळ बनण्यासाठी सुद्धा पाण्याची खूप आवश्यकता असते. पाणी कमी पिल्याने लाळ कमी प्रमाणात बनली जाते. व त्यामुळे तोंडाचे विकार ही होऊ शकतात.
- तसेच दिवसाची सुरुवात जर पाणी पिल्याने केली तर शरिरातील मेटबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे चरबी कमी होऊन वजन कमी करण्यासाठी मदत होते.
- तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी ही पाणी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोज सकाळी ब्रश करण्या आधी पाणी प्यावे.
ही सर्व कार्ये व्यवस्थित पार पाडण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक आहे.
शरीरात पाणी कमी पडल्यास कोणती लक्षणे दिसतात
What are the signs of Dehydration
मित्रांनो, शरीरात पाण्याची कमतरता झाली की काही लक्षणे दिसू लागतात. ते कोणती लक्षणे आहेत ते जाणून घेऊ या.
- मित्रांनो, तुम्हाला जर सतत भूक लागत असेल किंवा जेवण केल्यानंतर ही भूक लागत असेल तर हे पाण्याच्या कमतरतेमुळे होऊ शकते.
- तसेच तुम्हाला जर लघवी पिवळी होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता आहे तसे समजून जावे.
- तोंडातून दुर्गंधी येत असेल तर ते पाण्याच्या कमतरतेची लक्षण असू शकते. कमी पाणी पिल्याने लाळ कमी प्रमाणात तयार होते, यामुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होऊ लागतात व परिणामी तोंडातून दुर्गंधी यायला सुरुवात होते.
- मित्रांनो, तुम्हाला जर जास्त थकवा वाटत असेल किंवा डोकेदुखी होत असेल तर हे शरीरात पाणी कमी असल्याचे लक्षण असू शकते.
- तसेच बद्धकोष्ठताचा त्रास होत असेल तर ते पाण्याच्या कमतरते चे लक्षण आहे.
- तसेच त्वचा, ओठ कोरडे पडत असतील तर ते शरीरातील पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकते.
कोणी किती पाणी प्यावे?
How Much Water Should You Drink Per Day?
मित्रांनो, भरपूर पाणी प्यावे, असे आपण नेहमी ऐकतो. पण भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यावे, ते कळत नाही. आणि भरपूर पाणी पिण्याच्या नादात आपण जास्तीचे पाणी पिऊन बसतो. जे आरोग्यास चांगले नसते. तसेच बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात. यामुळे ही शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे, याचा विचार करून मग त्या हिशोबाने पाणी पिले पाहिजे.
मित्रांनो, प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेग वेगळी असते. 15 वर्षे वय पर्यंतच्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे. प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी दररोज प्यावे. ज्यांचे वय 60 वर्षे पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तींनी तीन लिटर पर्यंत पाणी प्यावे.
तसेच 25 किलो वजनाच्या व्यक्तीने चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे 50 किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मेहनतीचे काम करणाऱ्यांनी व गरोदर स्रियांनी या पेक्षा थोडे म्हणजे एक दोन ग्लास जास्त पाणी पिल्यास चालते.
शरीरात पाणी जास्त झाले तर काय होते?
मित्रांनो, शरीरात पाणी जास्त झाले तरीही प्रॉब्लेम होऊ शकतो. जसे की शरीरात पाणी जास्त झाले तर वारंवार बाथरूम ला जावे लागेल. रात्रीच्या वेळेस जर असा त्रास झाला तर झोप अपुरी होते. आणि झोप अपुरी झाली तर मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, थकवा येऊ शकतो, चिडचिड होऊ शकते. तसेच अनेक वेळा इतर शारीरिक त्रास ही होऊ शकतो. याशिवाय पाण्याचे प्रमाण गरजे पेक्षा जास्त वाढले तर शरीरात सोडियमची पातळी ही वर-खाली होऊ शकते. म्हणून पाणी योग्य प्रमाणात पिले जात आहे की नाही ते काळजी पूर्वक पहावे.
पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे ?
What is the Correct Way to Drink Water?
मित्रांनो, पाणी नुसते पिऊन उपयोग नसतो, ते योग्य पद्धतीने प्यायले पाहिजे. पाणी पिताना नेहमी एका जागी बसून प्यावे. उभे राहून, चालतांना, किंवा गटागट पाणी पिऊ नये. हळू हळू एक एक घोट पाणी प्यावे. तसेच जर तुम्ही खूप तहानलेले असाल तर एकदम पाणी न पिता, एक ग्लास आत्ता व दुसरा ग्लास एक तासाने प्यावे.
मित्रांनो, तसेच पाणी काही ठराविक वेळी पिल्यास त्याचे शरीराला चांगले फायदे मिळतात. जसे की सकाळी उठल्यावर लगेच ब्रश न करता एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट होते व पित्ताचा त्रास होत नाही. त्यानंतर जेवणा आधी न जेवणा नंतर एक ग्लास पाणी प्यावे. डोके दुखत असेल तर पाणी प्या.
तसेच व्यायाम करण्याआधी एक ग्लास व व्यायाम झाल्यावर थोडा वेळाने एक ग्लास पाणी प्यावे. व झोपताना अगदी थोडे पाणी प्यावे. जेणेकरून रात्री बाथरूमला उठण्याचा त्रास होणार नाही. तसेच कुठेही बाहेर जाताना किंवा काही काम करताना जवळ पाणी ठेवणे कधीही चांगले.
टीप – मित्रांनो, मोठया व्यक्तींना पाण्याचे महत्व समजेल ही, पण लहान मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. कारण बरेच मुलं पाणी प्यायला टाळाटाळ करतात. अश्या परिस्थितीत त्यांना हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी मुलांना पाण्याचे महत्व व त्याचे फायदे समजवून सांगितले पाहिजे. तसेच लहान मुलांमध्ये लठ्ठपणा जास्त दिसून येतो. ते कमी करण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून त्याना सतत पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. यासाठी शाळांनी सुद्धा पुढाकार घ्यायला हवा. पाणी पिण्याचे महत्व मुलांना पटवून देण्यासाठी काही उपक्रम व पाण्याचे फवारे बसवले पाहिजेत.
मित्रांनो, पाणी किती महत्वाचे आहे ते आपल्या सर्वांना समजले असेलच. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्या व निरोगी आयुष्य जगा.
तर मित्रांनो, अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही स्वतःला पाणी पिण्याची सवय लावू शकता. जी आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचे आहे. तर अश्या प्रकारे आज आपण चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याचे महत्व व त्याची योग्य पद्धत व प्रमाण याबद्दल आज आपण जाणून घेतले. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा महत्व पूर्ण लेख तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद