रिफरबिश्ड मोबाइल म्हणजे काय ? | What Are Refurbished Mobile?
नमस्कार मित्रांनो, आज आपण नेहमी पेक्षा एखाद्या वेगळ्या टॉपिक बद्दल माहिती बघणार आहोत. आज आपण Refurbished (रिफरबीश्ड) मोबाईल म्हणजे काय त्याचे फायदे, नुकसान व रिफरबीश्ड मोबाईल खरेदी करताना काय काळजी घ्यावी, अश्या सर्व गोष्टी बद्दल जाणून घेऊ या.
मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा काही वस्तू ऑनलाईन खरेदी करतो. अगदी किराणा पासून घरातल्या वस्तू सुद्धा. मग त्यात मोबाईल पण आला. आजकाल बरेच जण मोबाईल ऑनलाईन खरेदी करतात. म्हणजेच ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतर काही वेबसाइट्स वरून आपण मोबाईल खरेदी करतो. त्यामुळे तुम्ही रिफरबिश (Refurbished) हे नाव ऐकल असेलच. पण जर तुम्हाला त्या बद्दल काही माहिती नसेल तर आज आपण त्या बद्दल जाणून घेणार आहोत.
Refurbished म्हणजे काय
सगळ्यात आधी Refurbished म्हणजे काय ते जाणून घेऊ या.
मित्रांनो, Refurbished म्हणजे एखादी वस्तू पुन्हा नव्या सारखी बनवणे म्हणजेच त्याचे पुनर्निर्माण करणे. Refurbished मोबाईल चा अर्थ पण असाच आहे. समजा तुम्ही ऑनलाईन एखादा मोबाईल खरेदी केला व नंतर तुम्हाला त्यात काही प्रॉब्लेम आढळला तर तुम्ही तो मोबाईल परत रिटर्न करता. हे रिटर्न केलेले खराब मोबाईल दुरुस्त करून पुन्हा नवीन केले जातात व परत सेल करायला म्हणजे विकायला ठेवतात. शिवाय दुरुस्त करून विकायला ठेवलेल्या या मोबाईल ची किंमत ही कमी असते.
उदाहरणार्थ, समजा एखादा मोबाईल 16 हजाराचा आहे. तर Refurbished मोबाईल हे तुम्हाला 10 हजार रुपये पर्यंत किंवा त्या पेक्षा कमी किमतीत मिळू शकतात. पण बऱ्याच वेळा लोकांना असे वाटते की हे Refurbished मोबाईल किंवा प्रोडक्ट खराब असतात. पण तसे काही नाही. बऱ्याच वेळा ग्राहकांना घेतलेले प्रोडक्ट पसंत पडत नाही त्यामुळे ते प्रोडक्ट परत केले जातात. किंवा त्या प्रोडक्ट मध्ये काही दोष असतात किंवा इतर काही कारणाने हे मोबाईल किंवा प्रोडक्ट Refurbished प्रोडक्ट मध्ये टाकले जातात तसेच विक्रीसाठी ठेवण्या आधी त्यांच्यातले दोष नीट केले जातात. व नंतर कमी किमतीत विकले जातात.
Refurbished मोबाईल खरेदी करण्याचे फायदे
- Refurbished मोबाईल कमी किमतीत मिळत असल्याने तुमचे पैसे वाचतात.
- Refurbished मोबाईल किंवा प्रोडक्ट वर वॉरंटी सुद्धा मिळते.
- Refurbished प्रोडक्ट वर रिटर्न करण्याची सुविधा पण दिली जाते.
- सेकंड हँड प्रोडक्ट पेक्षा Refurbished प्रोडक्ट चांगले आहे.
- जर तुमचे बजेट कमी असेल तर त्याच ब्रँड ची वस्तू म्हणजे ब्रँड तोच फक्त Refurbished मोबाईल किंवा लॅपटॉप तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.
Refurbished (रिफरबीश्ड) मोबाईल खरेदी करण्याचे नुकसान
- हे पूर्ण पणे नवीन फोन नसतात.
- कधी कधी Refurbished मोबाईल लवकर खराब होतात.
- यांची वॉरंटी कमी असते.
- Refurbished मोबाईल मध्ये फोन शी निगडित असलेले ऍक्सेसरिझ जसे की हेडफोन, मोबाईल कवर, चार्जर दिले जात नाहीत.
Refurbished मोबाईल खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- तुम्हाला जर Refurbished मोबाईल फोन घ्यायचा असेल तर तो फक्त विश्वासू वेबसाईट वरून च खरेदी करा.
- Refurbished मोबाईल खरेदी करताना त्याची गॅरंटी किती आहे ते तपासून बघा. शक्यतो सहा महिन्या पेक्षा जास्त गॅरंटी असलेले Refurbished मोबाईल फोन खरेदी करा.
- तुम्ही घेत असलेल्या Refurbished मोबाईल वर रिटर्न पॉलिसी आहे की नाही ते चेक करून घ्या.
- Refurbished मोबाईल फोन वर दिलेले टर्म्स अँड कंडिशन्स नीट वाचून मगच खरेदी करा.
- Refurbished प्रोडक्ट किंवा मोबाईल कधी लाँच झाला आहे ते तपासून घ्या.
- खूप जुन्या असलेल्या Refurbished प्रोडक्ट किंवा मोबाईल खरेदी करू नका.
Refurbished फोन खरेदी करणे योग्य आहे का?
Refurbished मोबाईल फोन हे ओरिजिनल मोबाईलच असतात. फक्त त्यांना काही कारण मुळे परत केले जाते. मग त्यात खराबी असेल म्हणून किंवा पसंत नसेल म्हणून किंवा इतरही काही कारण असू शकते. अश्या मोबाईल ला Refurbished केले जाते. म्हणजे त्यात जो काही दोष आहे तो नीट दुरुस्त केला जातो. व नंतरच तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे जर तुम्हाला Refurbished मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही तो बिनधास्त पणे घेऊ शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आम्ही तुम्हाला Refurbished मोबाईल बद्दल माहिती दिली आहे. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुढेही आम्ही तुमच्यासाठी असेच नव नवीन लेख आणत राहू व विविध गोष्टींशी संबंधित माहिती तुमच्या पर्यंत पोचवत राहू.
धन्यवाद !