PunePuneri Patya

पुणे मेट्रो तिकीट ऑनलाईन बुक कसे करायचे ? | How can I book a Pune Metro ticket online

६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते पुणे मेट्रोच उदघाटन झालं. त्याच दिवसापासून पुणेकरांना मेट्रो प्रवासासाठी खुली झाली. आणि पहिल्याच दिवशी मेट्रोने प्रवास करण्यासाठी पुणेकरांची झुंबडच उडाली. का नाही उडणार रोजच त्या PMPML बस ने प्रवास करून पुणेकर कंटाळले होते. १० मिनिटाच्या रस्त्याला अर्धतास तेही BRT असून.

महामेट्रो प्रशासनाने पुणेकरांना घरबसल्या तिकीट मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. फक्त पुणे मेट्रोसाठी वेगळे अँप तयार करण्यात आले आहे. या अँप मध्ये तिकीट बुकिंग बरोबर मेट्रो मॅप, मेट्रो स्टेशन यादी, फीडर सेवा, तक्रार निवारण हेल्पलाइन इत्यादींची माहिती आहे. चला तर बघुयात या अँप पुणे मेट्रो अँप (Pune Metro App) मधून तिकीट कसे बुक करायचे.



स्टेप 1: सर्वात प्रथम प्ले स्टोर वर जाऊन Pune Metro App डाउनलोड करा. खाली दिलेल्या फोटो मध्ये असलेले अँप महामेट्रो प्रशासनाचे अधिकृत आहे. बाकी दुसरे कोणतेही अँप डाउनलोड करू नका.

How can I book a Pune Metro ticket online Step 1

स्टेप 2: डाउनलोड अँप उघडा, आता तुम्हाला अँप वर रजिस्टर व्हायचे आहे. त्यासाठी तुमचा चालू मोबाइल नंबर टाका. आणि खाली असलेल्या Terms and Conditions ऑपशन वर टिक करून Next बटन वर क्लिक करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 2

स्टेप 3: आता तुमच्या मोबाइल वर OTP येईल तो OTP टाकून Next बटन वर क्लिक करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 3

स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला मेट्रो अँपसाठी पासवर्ड सेट करायचा आहे. कोणताही चार अंकी पासवर्ड दोन वेळा टाका आणि Next बटन वर क्लिक करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 4

स्टेप 5: आता KYC साठी तुमची वैयक्तिक माहिती टाकायची आहे. जसे पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख आणि अँप ची भाषा निवडा. आणि नंतर Next बटन वर क्लिक करा.



How can I book a Pune Metro ticket online Step 5

स्टेप 6: आता तुम्ही भरलेली माहिती तुमच्यासमोर दिसेल. ती एकदा चेक करा आणि बदल करायचा असेल तर बॅक बटन दाबा. माहिती बरोबर असेल तर Submit बटन वर क्लिक करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 6

स्टेप 7: आता तुमच्यासमोर मुख्य अँपचे ऑपशन उघडतील. त्यातील Book Ticket (बुक तिकीट) बटन वर क्लिक करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 7

स्टेप 8: आता On Way टॅब वर क्लिक करा, जेथून तुम्हाला तुमचा मेट्रोचा प्रवास सुरु करायचा आहे ते स्टेशन From Station ऑपशन वर क्लिक करून निवडा. आणि ज्याठिकाणी तुम्हाला उतरायचं आहे, त्याठिकाणचे स्टेशन To Station ऑपशन वर क्लिक करून निवडा.

खाली तुम्हाला किती तिकीट (No. of Tickets) पाहिजे ते निवडा. खाली तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे दिसतील. आता Pay बटन वर क्लिक करून तिकिटाचे पैसे ऑनलाईन भरायचे आहेत.

How can I book a Pune Metro ticket online Step 8

स्टेप 9: आता तुमच्या समोर डिजिटल तिकीट दिसेल ते एकदा चेक करा. आणि Payment Gateway (PayU) असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

नोट: भविष्यात येथे दुसरे बटन असू शकते. कोणतेही बटन असेल तरी क्लिक करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 9

स्टेप 10: आता तुमच्यासमोर तिकिटाचे पेमेंट करण्यासाठीचे पर्याय दिसतील, जसे क्रेडिट/डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग इत्यादी. तुमच्या सोयी नुसार योग्य तो पर्याय निवडून पेमेंट करा.

How can I book a Pune Metro ticket online Step 10

अशा तऱ्हेने तुमचे मेट्रोचे तिकीट बुक झाले. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या Marathidiary Facebook Page वर विचारू शकता.

धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!