New PostPPFSidebar Post

PPF अकाउंट म्हणजे काय ? | PPF अकाउंट बद्दल सर्व माहिती

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पीपीएफ (PPF) म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (Public Provident Fund) ज्याला मराठीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी असे देखील म्हटले जाते. जेव्हा जेव्हा दीर्घ कालीन बचत पर्यायांचा विषय निघतो तेव्हा पीपीएफ (PPF) खात्याचा उल्लेख नक्कीच केला जातो. PPF अकाउंट हे गुंतवणूक दारास इनकम टॅक्स वर बचत करण्यासोबतच रिटायरमेंटसाठी उत्तम धन संचय तयार करून देते. म्हणून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पीपीएफ (PPF) अकाउंट हे असलेच पाहिजे.



चला तर आता PPF (पीपीएफ) अकाउंट म्हणजेच पीपीएफ खात्या बद्दल एक एक करून सर्व माहिती जाणून घेऊ या.

PPF (पीपीएफ) अकाउंट म्हणजे काय?

मित्रांनो, PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड हा एक दीर्घ कालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आकर्षक व्याजदर सोबतच गुंतवणुकीवर उत्तम परतावा देते. पीपीएफ ही योजना 1968 मध्ये अस्तित्वात आली. आणि त्या नंतर आज पर्यंत ही योजना सर्व सामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. पीपीएफ मध्ये गुंतवलेला पैसा हा सरकारच्या पाठिंब्यामुळे एकदम सुरक्षित असतो. या शिवाय यात मिळणारा व्याज (interest) आणि परतावा (returns) हे आयकर कायद्या कलम 80C (Income Tax Act under Section 80C) च्या अंतर्गत खाते धारकाला टॅक्स पासून सूट मिळते. म्हणजे मिळणाऱ्या रिटर्न्स वर कुठल्याही प्रकारचे टॅक्स द्यावे लागत नाही.

नोट – हे लक्षात घेतले पाहिजे की PPF मध्ये जास्तीत जास्त योगदान हे एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रु पेक्षा जास्त असू शकत नाही

पीपीएफ (PPF) खाते कुठे उघडू शकतो?

मित्रांनो, तुम्ही पीपीएफ खाते एकतर पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकता. तसेच आजकाल काही खाजगी बँका देखील ही सुविधा देत आहेत.

PPF (पीपीएफ) खाते कोण उघडू शकतो?

मित्रांनो, भारतातील कोणताही नागरिक पीपीएफ अकाउंट किंवा खाते उघडू शकतो व गुंतवणूक करू शकतो. तसेच अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने सुद्धा खाते उघडता येऊ शकते. Joint पीपीएफ खाते उघडता येत नाही. पण त्याऐवजी तुम्ही नॉमिनी लावू शकता. कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर एका पेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडू शकत नाही. तसेच अनिवासी भारतीय व्यक्ती म्हणजे NRI व्यक्ती पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत.



पीपीएफ (PPF) अकाउंट चा व्याज दर किती आहे?

मित्रांनो, पीपीएफ अकाउंट चा व्याज दर हा वित्त मंत्रालय तर्फे दरवर्षी निश्चित केला जातो. आणि पीपीएफ अकाउंट चा सध्याचा व्याज दर हा 7.1 टक्के आहे.

पीपीएफ (PPF) अकाउंट उघडण्यासाठी व गुंतवणूक करण्यासाठी किमान मर्यादा किती आहे?

मित्रांनो, पीपीएफ खाते हे फक्त 100 रुपये देऊन उघडता येते. तसेच पीपीएफ खाते दर वर्षी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जात 1.5 लाख रुपये गुंतवणूक करण्यास परवानगी देते. तसेच वर्षाला दीड लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकिस परवानगी भेटत नाही.

पीपीएफ (PPF) खात्याचा कालावधी किती असतो?

मित्रांनो, पीपीएफ खात्याचा कालावधी हा किमान 15 वर्षाचा असतो. जो तुमच्या इच्छेनुसार मॅच्युरिटी नंतर 5 वर्षांच्या कालावधी मध्ये वाढवला जाऊ शकतो. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याआधी खाते बंद केले जाऊ शकत नाही. फक्त काही विशिष्ट परिस्थिती मध्ये बंद केले जाऊ शकते. 2016 ला पीपीएफ नियम मध्ये काही बदल करण्यात आले ज्यात गंभीर आजार, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीपीएफ खाते वेळे आधी बंद केले जाऊ शकते.

या शिवाय जर खाते धारकाच्या निवासी स्थितीत बदल झाला असल्यास पीपीएफ खाते मॅच्युरिटी आधी बंद केले जाऊ शकते. फक्त यात पहिले 5 वर्षे पीपीएफ खाते बंद करता येणार नाही. जे काही करायचे आहे ते 5 वर्षे झाल्यानंतरच.

मित्रांनो, पीपीएफ खाते धारकाचा खाते मॅच्युरिटी होण्याआधीच जर मृत्यू झाला, आणि खाते 5 वर्षांपासून उघडले नसले तरी ही नॉमिनी असलेली व्यक्ती खात्यातील पूर्ण रक्कम काढू शकतो. तसेच खाते धारकाच्या मृत्यू नंतर पीपीएफ खाते बंद केले जाईल. आणि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीपीएफ खाते पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली जात नाही.

पीपीएफ (PPF) वर कोण कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?

मित्रानो, पोस्ट ऑफिस मध्ये पीपीएफ वर नामांकन सुविधा उपलब्ध आहे. तसेच अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने खते उघडण्याची सुविधा आहे. तसेच कर्ज सुविधा , इंट्रा ऑप्रेबल, नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंग सुद्धा उपलब्ध आहेत.

पीपीएफ (PPF) मधील गुंतवणूकीचे कोणते फायदे आहेत?

  • मित्रांनो, खाते उघडल्यापासून तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंत जमा रकमेवर कर्ज घेता येते.
  • निवृत्ती नंतर च्या काळात करमुक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
  • पीपीएफ खात्यातील रक्कम बुडण्याची भीती नसते.
  • पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक, खाजगी बँका कुठेही उघडता येते.
  • तसेच पीपीएफ खात्यामध्ये ऑनलाईन हि पैसे भरता येतात, त्यामुळे पैसे भरण्यासाठी बँकेत जायची गरज नाही.

पीपीएफ (PPF) खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?

मित्रांनो पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुमचे पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्राइविंग लायसन्स, रेशन कार्ड, सही केलेला चेक तसेच पासपोर्ट च्या आकाराचा तुमचा फोटो, खाते उघडण्यासाठी पूर्ण पणे भरलेला अर्ज आणि जर अल्पवयीन मुलाच्या नावे खाते उघडायचे असेल तर त्याच्या वयाचा दाखला. ही सर्व कागदपत्र तुम्हाला लागतील.

पीपीएफ (PPF) खात्या मधून पैसे कसे काढायचे

मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यातील थक बाकी अर्धवट किंवा पूर्ण पणे घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला संबंधित माहिती सह फॉर्म C (Form C) चा अर्ज भरायचा आहे व जिथे तुमचे पीपीएफ खाते आहे अश्या बँकेच्या संबंधित शाखेत तो अर्ज द्यायचा आहे.

या फॉर्म C मध्ये तीन विभाग असतात. त्या तिन्ही विभागात विचारलेली माहिती व्यवस्थित भरायची आहे. तसेच यात तिसऱ्या विभागात तुम्हाला ज्या बँकेत तुमचे पैसे जमा करायचे आहेत त्या बँकेचा संपूर्ण तपशील टाकायचा आहे. तुमचा पीपीएफ खाते क्रमांक टाकायचा आहे. तसेच अर्जासह पीपीएफ (PPF) पासबुक ची झेरॉक्स म्हणजेच प्रत सुद्धा जोडणे आवश्यक आहे.

मित्रांनो, तसेच जर तुम्हाला अल्पवयीन व्यक्तीच्या पीपीएफ (PPF) खात्यातुन मॅच्युरिटी आधी पैसे काढायचे असतील तर ते तुम्हाला 5 वर्षे झाल्यानंतरच मिळतील. त्यासाठी पण पालकांनी प्रमाणपत्र द्यायचे आहे, की ती अल्पवयीन व्यक्ती अजून जिवंत आहे आणि अल्पवयीन आहे. व त्या अल्पवयीन व्यक्तीसाठी ती रक्कम वापरणे खूप आवश्यक आहे. तेव्हाच ती रक्कम तुम्हाला मिळू शकते.

पीपीएफ (PPF) बद्दल आणखी महत्वाच्या गोष्टी

मित्रांनो, पीपीएफ च्या नियमानुसार गुंतवणूकदाराने म्हणजे खाते धारकाने त्याचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला किंवा त्याच्या आधी जमा केले पाहिजे. त्यामुळे त्यांना दर महिन्याला जास्तीत जास्त व्याज मिळण्यास खूप मदत होते. तसेच मॅच्युरिटी आधी खातेदार खात्यातुन जास्तीत जास्त 50 टक्‍क्‍यां पर्यंत पैसे काढू शकतो. आणि हे आर्थिक वर्षात फक्त एकदाच शक्य होऊ शकते. म्हणजे वर्षातून एकदाच पैसे काढता येईल. परत पैसे काढायचे असल्यास पुढच्या आर्थिक वर्षातच काढता येईल.

तर मित्रांनो, निवृत्ती नंतर प्रत्येक व्यक्तीला आनंदात आयुष्य जगायचं असतं. पण त्यासाठी आर्थिक स्थिरता असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याचाच आपल्याला शेवटी आधार राहतो. त्यामुळे तारुण्यात असतानाच आपल्या रिटायरमेंट चा प्लॅंनिंग करा आणि आजच आपलं पीपीएफ (PPF) च अकाउंट उघडा. कारण पीपीएफ हे सर्वात प्रसिद्ध लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पैकी एक आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा रिटायरमेंट नंतरच आयुष्य बिनधास्त व टेन्शन फ्री जगता येईल.

मित्रांनो आजचा लेख कसा वाटला ते नक्की कळवा. व लेख आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

FAQ

15 वर्षांनंतर PPF खाते चालू ठेवता येते का?

हो येते, 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पीपीएफ खात्यामध्ये जास्तीत जास्त 5 वर्षे गुंतवणूक करणे सुरू ठेवू शकता. त्यासाठी, तुम्हाला बँकेत चौकशी करून पीपीएफ खात्याची वेळ वाढवून घ्यावी लागेल या मध्ये दोन पर्याय बँक तुम्हाला देते. १) तुमचा पीपीएफ हप्ता पुढचे ५ वर्ष चालू ठेवणे २) पुढचे ५ वर्ष हप्ता न देता पीपीएफ खाते चालू ठेवणे. तुमच्या सोई नुसार तुम्ही पर्याय निवडू शकता.

EPF आणि PPF मधला फरक काय आहे ?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी / Employees’ Provident Fund (EPF) हि पगारदार व्यक्तींसाठी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. या योजनेत कंपनी मालक आणि कर्मचारी दोघेही EPF खात्यामध्ये आपले योगदान देतात, म्हणजे दोघे मिळून तुमच्या पगारातील काही भाग EPF खात्यामध्ये जमा करतात. दुसरीकडे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी / Public Provident Fund (PPF) खाते सर्व व्यक्तींच्या वृद्धापकाळाच्या उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी तयार केले गेले आहे, या मध्ये फक्त एकटा व्यक्ती पैसे टाकू शकतो.

पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी किती आहे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यांचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो. पण, PPF खाते १५ वर्षानंतर पुढचे 5 वर्ष वाढवता येते.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!