फोन पे अँप मधून बाईक इन्शुरन्स कसा करायचा | Phonepe Bike Insurance
नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन लेखात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेखात आपण घर बसल्या फोन पे अँप मधून बाईक/कार इन्शुरन्स कसा विकत घ्यायचा, या बद्दल जाणून घेणार आहोत. जर तुमच्याकडे दोन-चार चाकी गाडी असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. म्हणून शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो, आज कालच्या दैनंदिन जीवनात खूप धावपळ होत आहे. हे धावपळीचे काम सोपे व्हावे म्हणून जास्त करून अनेक जण बाईक वापरतांना दिसतात. पण याच बाईकच्या धावपळी मुळे नुकसान होऊ शकते. कधी अजाणतेपणे अपघात झाला तर अश्या वेळेस आपला खूप खर्च होतो. तेच जर तुम्ही तुमच्या बाईकचा इन्शुरन्स काढला असेल तर तुम्हाला या खर्चातून वाचता येईल. म्हणूनच बाईकचा विमा करणे खूप गरजेचे आहे.
मित्रांनो, बाईक चा विमा करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. पण जर तुम्हाला घर बसल्या बाईक चा इन्शुरन्स करायचा असेल तर, फोन पे अँप वरून तुम्ही घर बसल्या बाईक इन्शुरन्स करू शकता. बाईक इन्शुरन्स म्हणजे काय आणि फोन पे अँप वरून कार/बाईक इन्शुरन्स कसा विकत घ्यायचा ते बघू.
सर्वात पहिले बघू या की बाईक इन्शुरन्स म्हणजे काय ?
मित्रांनो, बाईक इन्शुरन्स म्हणजे जर तुमच्या बाईक चे काही नुकसान झाले, जसे अपघात झाला, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाले तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या बदल्यात नुकसान भरपाई देते. तसेच मोटर वाहन अधिनियम 1988 च्या अंतर्गत तुमच्याकडे थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स असणे खूप जरुरी असते. हा इन्शुरन्स रस्त्यावर झालेल्या बाईक दुर्घटनेत आर्थिक मदत प्रदान करते. पण जर तुमच्याकडे थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स नसेल तर अश्या वेळेस तुम्हाला दंड सुद्धा होऊ शकतो.
फोन पे (PhonePe) अँप द्वारे बाईक इन्शुरन्स कसा करायचा ?
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये फोन पे अँप असायला हवे. नसेल तर प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला ते अँप इंस्टॉल करायचे आहे.
स्टेप 2: अँप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करायचे आहे. आता अँप च्या होम पेज वर तुम्हाला insurance चा ऑपशन दिसेल त्यात car, bike, health, term life असे अनेक ऑपशन दिसतील, आपल्याला बाईक इन्शुरन्स या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: आता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमच्या बाईकचा नंबर विचारला जाईल, तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. व Submit या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: आता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमच्या बाईक चे डिटेल्स दिसतील त्यात तुमच्या बाईक चा नंबर , कोणत्या कंपनीची बाईक आहे व कोणत्या साली ती बाईक घेतली आहे, ही सर्व माहिती तुम्हाला तिथे दिसेल. नंतर View Quotes या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आता पुढच्या पेज वर तुम्हाला इन्शुरन्स कँपनी ची लिस्ट बघायला मिळेल. त्याआधी तुम्हाला इन्शुरन्स प्लान सिलेक्ट करायचा आहे. ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे Comprehensive इन्शुरन्स आणि Third Party इन्शुरन्स प्लान.
- Comprehensive प्लान तुम्हाला विमा पॉलिसि काढणारी व्यक्ती सोबतच थर्ड पार्टी व्यक्तीला जर अपघातात दुखापत झाली तर कंपनी आर्थिक मदत देते.
- तसेच Third Party विमा प्लान च्या अंतर्गत जर तुमच्या बाईक कडून दुसऱ्या व्यक्तीला काही दुखापत झाली तर कंपनी त्या व्यक्तीला आर्थिक मदत प्रदान करते. इथे थर्ड पार्टी विमा प्लान मध्ये जर तुमचे आणि दुसऱ्या व्यक्ती चे ही नुकसान झाले असेल तर फक्त त्याच व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाईल. वैयक्तिक रित्या तुम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही.
म्हणून इन्शुरन्स प्लान सिलेक्ट करताना सहसा Comprehensive विमा प्लान सिलेक्ट करा. म्हणजे दोघांना नुकसान भरपाई मिळेल.
स्टेप 6: इन्शुरन्स प्लॅन सिलेक्ट केल्यावर तुमच्या समोर आता इन्शुरन्स कंपनी ची लिस्ट दिसेल. ( जसे की, Bajaj Insurance, GoDigit, SBI General, ICICI Lombard वगैरे… ) ज्या कंपनी तुन तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचा असेल ती कंपनी सिलेक्ट करा.
आता खाली दिलेल्या Select Plan या ऑपशन वर क्लिक करा.
Note – कंपनी सिलेक्ट करण्याआधी ती कंपनी तुम्हाला काय काय फॅसिलिटी किंवा बेनिफिट्स देत आहे हे नीट वाचून घ्या.
आम्ही इथे उदाहरण म्हणून Bajaj Allianz चा इन्शुरन्स निवडला आहे.
स्टेप 7: आता पुढे एक फॉर्म दिसेल त्यात तुमचे नाव व अन्य माहिती भरायची आहे. सोबतच तुमचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे. इथे मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अगदी बरोबर टाकायचा आहे, कारण त्यावरच तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी ची PDF फाइल पाठवली जाईल. तसेच तुम्हाला एक ऑपशन दिसेल, Personal Accidental Cover या ऑपशन मध्ये, जर तुमचा अपघात झाला आणि त्यात तुमचा मृत्यू झाला तरी तुम्ही तुमचे विमा कवर घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला इथे नॉमिनी टाकायचा आहे व 331 रुपये एक्सट्रा Pay करावे लागतील.
स्टेप 8: त्यानंतर तुम्हाला Previous Policy Details या ऑपशन मध्ये जर या आधी तुम्ही कोणत्या कंपनी चे इन्शुरन्स घेतले आहे ती सगळी माहिती टाकायची आहे.
तसेच जर तुम्ही या आधी इन्शुरन्स क्लेम घेतला असेल तर Yes या ऑपशन वर क्लिक करायचे आहे. आणि जर नसेल घेतला तर No या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
आता नंतर तुम्हाला खाली दिलेल्या Continue या ऑपशन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर सगळे डिटेल्स येतील. जसे की Bike Name, Bike Number, Owner Name, रेजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर, पोलिसी नंबर, expiry date वगैरे डिटेल्स येतील. त्या नंतर agree या बटन वर क्लिक करा व नंतर Buy Plan या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: Buy Plan या बटन वर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला पेमेंटचा ऑपशन दिसेल. या पेमेंट मध्ये GST सुद्धा लावलेला असतो.
स्टेप 10: पेमेंट करताना तुम्ही UPI ने पेमेंट करू शकता, त्याचबोबर debit card ने किंवा credit card ने सुद्धा पेमेंट करू शकता. या पैकी एक ऑपशन सिलेक्ट करून पेमेंट करायचा आहे. व नंतर तुम्हाला कॉन्फर्मेशन चा मेसेज येईल.
तुमच्या ई-मेल आयडी वर तुम्हाला Policy ची PDF फाइल सेंड होऊन जाईल. अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या bike चा फोनपे अँप मधून इन्शुरन्स करू शकता.
मित्रांनो, जर तुमच्या गाडीचा अपघात झाला आणि तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर काय करायचे , कसे करायचे ते आता जाणून घेऊ या.
फोन पे बाईक इन्शुरन्स क्लेम
मित्रांनो, इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर तुम्ही ज्या कंपनी कडून इन्शुरन्स घेतला आहे त्या कंपनी च्या शोरूम वर जाऊन मदत घेऊ शकता. याशिवाय तुम्ही त्या कंपनीच्या टोल फ्री नंबर वर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता.
त्याचबरोबर फोन पे अँप मध्ये जाऊन तुम्ही इन्शुरन्स क्लेमची माहिती घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला परत फोन पे अँप मध्ये bike इन्शुरन्स वर यायचं आहे. व policy details मध्ये तुम्हाला खाली claim चा ऑपशन दिसतो. त्यावर क्लिक केल्या वर ज्या कंपनी चे तुम्ही इन्शुरन्स घेतला आहे त्या कंपनी ची एक pdf ओपन होईल. व त्यावर तुम्हाला त्यांचा टोल फ्री नंबर दिसेल, त्यावर कॉल करून तुम्ही डिरेक्टली त्या कंपनीच्या कस्टमर केअर शी बोलू शकता. ते तुम्हाला policy चे काही डिटेल्स विचारतील ते सांगायचे आहेत व नंतर ते तुमच्या घरी येऊन तुमचा जो काही इन्शुरन्स आहे, जी काही IDV value आहे ती मिळून जाईल, म्हणजेच तुम्हाला तुमचा जो काही क्लेम आहे तो करून देतील.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घर बसल्या फोन पे अँप द्वारे बाईक इन्शुरन्स कसा करायचा ते जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास ती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद !
Tags: Phonepe Bike Insurance information in Marathi, Phonepe Bike Insurance info, Phonepe Car Insurance information in Marathi, Phonepe Bike Insurance in Marathi, Phonepe Car Insurance in Marathi, Phonepe 2 wheeler Insurance information in Marathi, Phonepe 4 wheeler Insurance information in Marathi, Phonepe vahan Insurance