पीएम किसान योजनेचा तुमचा हप्ता कधी येणार, ऑनलाईन तपासा | How to Check PM Kisan Yojana Payment Status
नमस्कार मित्रानो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) पुढील हप्ता कधी येणार, हे कसे तपासायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपल्या भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये 6000 ची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या शेती संबंधीत येणाऱ्या खर्चात उपयोगी ठरते. मागील म्हणजेच 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता. त्यामुळे या योजनेचा 20 वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हप्ता कधी येईल? तसेच माझ्या खात्यावर 2000 रुपये जमा होतील का? याअसे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. पण मित्रांनो, आता तुम्ही पुढील हप्ता कधी येईल ते तपासू शकता. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, हे कसे तपासायचे? या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता तपासा
स्टेप 1: मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले pfms च्या अधिकृत वेबसाईट https://pfms.nic.in वर जायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्या नंतर Payment Status या ऑप्शन मध्ये DBT Status Tracker या पर्याया वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: त्या नंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. यात वेगवेगळ्या DBT कॅटेगरी दाखवण्यात आल्या आहेत. यातील PMKISAN/पीएम किसान हा ऑप्शन निवडायचा आहे.

स्टेप 3: त्या नंतर तुम्हाला तुमचा पीएम रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल, तो टाकायचा आहे. त्या नंतर दिलेला कॅपचा टाकून Search बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: मित्रांनो, जर तुमचा fto जनरेट झाला असेल तर त्याची तारीख, तो कधी जनरेट झाला, या पूर्वी आलेले हप्ते, त्याच्या तारखा, वगैरे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दाखवले जातील. पण जर तुमचा RFT साइन झाला नसेल, fto जनरेट झालेला नसेल तर इथे तुम्हाला कोणतेही स्टेटस दिसणार नाहीत. व हप्ता देखील मिळणार नाही.

ज्या लाभार्थ्यांचा rft साइन झाला असेल व fto देखील जनरेट झाला असेल त्यांना लवकरच हफ्ता मिळणार आहे. त्याची तारीख काय असेल या बद्दलची अपडेट आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू.
पीएम किसान सन्मान निधी FPT RFT माहिती
मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पुढील हप्ता क्रेडिट करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थ्यांची RFT म्हणजेच Request Fund Transfer ची लिस्ट केंद्र सरकार कडे पाठवली गेली आहे. केंद्र सरकार च्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांचा RFT रिक्वेस्ट आली आहे, त्यांचे FTO जनरेट केले आहेत. ( FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यापूर्वी FTO जनरेट केला जातो.)
आणि त्याच्या साठीची निधी बँकेकडे वळवण्यास सुरुवात करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्याचा fto जनरेट झाला आहे त्याला ऑनलाईन पद्धतीने fto जनरेट झाला आहे, असं दाखवल जात. तसेच ज्या तारखेला हप्ता वितरणाची मंजुरी मिळेल, त्या किंवा त्याच्या पुढच्या दिवशी बँक खात्यावर हप्ता क्रेडिट केला जाणार आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांचे RFT झाले नाही, त्यांची fto जनरेट झालेले नाहीत, त्यांना येणारा हप्ता सुद्धा मिळणार नाहीत. मित्रांनो, आता तुम्हाला येणारा हप्ता मिळणार आहे की नाही, तुमचं fto जनरेट झालं आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे, ते चेक कस करायचं हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, हे कसे तपासायचे? या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl
Tags: pm kisan beneficiary list, pm kisan labharthi yadi, pm kisan next installment update, Pm kisan Installment Status Check, Pm kisan Hapta Check, Pm kisan Fapta Check Kasa Karaycha, pm kisan 20th installment date 2025, pm kisan installment date 2025, pm kisan samman yojana check status 2025, pm kisan status kaise check kare, pm kisan 20th installment date marathi, pm kisan status 2025 new update, pm kisan 2025 status check, pm kisan status kaise dekhe 2025, pm kisan status kaise check kare 2025, pm kisan samman nidhi yojana status check 2025