डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा? | Download 7/12 - MarathiDiary
Government AppGovernment LicenseGovernment YojanaHome Page 2

डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा? | Download 7/12नमस्कार मित्रांनो, आज आपण उमंग अँप (Umang App) द्वारे डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha

मित्रांनो, सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन पद्धतीने, डिजिटल स्वरूपात मिळायला लागलीय. मग ते शैक्षणिक दृष्ट्या असो, सरकारी किंवा खाजगी दृष्ट्या असो. आणि आता तर शेतकऱ्यां संबंधी असणाऱ्या गोष्टी देखील या ऑनलाईन पद्धतीने च बघायला मिळत आहेत. त्यात आता 7/12 (सातबारा) उतारा देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने, डिजिटल स्वाक्षरीकृत मिळणार आहे. हो मित्रांनो, डिजिटल स्वाक्षरी असणारे हे सातबारा उतारे आता सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. पूर्वी हे उतारे घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी च्या पोर्टल वर जावं लागत होतं. आणि त्यासाठी महा ई- सेवा केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. आता मात्र तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे.मित्रांनो, महसूल विभागाने संगणकीकृत केलेला, तसेच महाभूमीच्या पोर्टल वर उपलब्ध असलेला डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा आता केंद्र सरकारच्या ‘उमंग’ या मोबाईल अँप वर देखील उपलब्ध आहे. यात राज्यातील 35 जिल्ह्यातील 358 तालुक्यातील 44 हजार 560 महसुली गावातील 2 कोटी 57 लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यातील 99 टक्क्यांपेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा उतारा आता उमंग अँप देखील उपलब्ध आहे. आणि महत्वाचे म्हणजे हा डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा तुम्हाला उमंग अँप डाउनलोड केल्यास एक क्लीक वर मिळू शकणार आहे.

हे हि वाचा: घर, बंगला, व्यवसायाची इमारतचे डिजिटल स्वाक्षरीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

त्यासाठी तुम्हाला फक्त 15 रुपये भरून हा सातबारा कुठूनही व कधीही उपलब्ध करून घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी देखील तुम्हाला वापरता येणार आहे. पण हा डिजिटल सातबारा अँप वरून डाउनलोड कसा करायचा त्या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

उमंग अँप वरून सातबारा डाउनलोड कसा करायचा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर मधून उमंग अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. व नंतर ओपन करायचे आहे. अँप ओपन झाल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 1

स्टेप 2: आता अँप च्या होम पेज वर तुम्हाला Welcome to Umang मध्ये Register/LogIn असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. व नंतर काही परमिशन द्यायच्या आहेतUmang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 2

स्टेप 3: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. इथे जर तुमचे आधीच उमंग अँप वर अकाउंट असेल तर डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या सहाय्याने लॉगिन करू शकता. किंवा जर अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली New on Umang? Register here असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 3

व अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकून एक पिन तयार करायचा आहे व तुमचे अकाउंट तयार होऊन जाईल. व लॉग इन करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 3 Sub-Step 2

स्टेप 4: मित्रांनो, लॉगिन केल्या नंतर नेक्स्ट पेज वर All Services वर क्लिक करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 4

स्टेप 5: नंतर सर्च ऑपशन वर जाऊन Aaple Sarkaar सर्च करून त्यावर क्लिक करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 5

स्टेप 6: त्या नंतर नेक्स्ट पेज वर महाराष्ट्र सरकार च्या विविध सर्व्हीस तुम्हाला दिसतील, त्यातील थोडे खाली स्क्रोल करून Maharashtra Land Records या ऑप्शन मध्ये Download 7/12 Land Record, Check Your Wallet Balance असे ऑप्शन दिसतील. त्यातील Check Your Wallet Balance या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. कारण सातबारा काढण्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहेत. तर या दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर नेक्स्ट पेज वर तुमचा मोबाईल नंबर टाकून Submit/सबमिट करायचे आहे.Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 6

स्टेप 7: मित्रांनो, एक सातबारा काढण्यासाठी तुम्हाला 15 रुपये लागणार आहेत. त्यामुळे आता जर तुमच्या wallet मध्ये झिरो बॅलन्स असेल तर इथे तुम्हाला बॅलन्स ऍड/ Add Balance बटन वर करायचा आहे.

जर तुम्हाला 7/12 फ्री मध्ये पाहायचा असेल तर हा लेख वाचा: सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये)

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 7

स्टेप 8: नेक्स्ट पेज वर Pay Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 8

स्टेप 9: मित्रांनो, पैसे ऍड करताना तुम्ही 15 ते 1000 रुपये ऍड करू शकता. इथे तुम्हाला हवी तेवढी अमाउंट टाकायची आहे व बँकेचे पेमेंट गेटवे सिलेक्ट करून Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 9

स्टेप 10: आता पुढे डेबिट कार्ड चे डिटेल्स टाकून पेमेंट करायचा आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 10

स्टेप 11: पेमेंट पूर्ण झाल्यावर, पुढच्या पेज वर तुम्ही ऍड केलेले पैसे Available Balance समोर दिसतील. आत्ता Back to UMANG App बटन वर क्लिक करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 11

स्टेप 12: आत्ता परत All Services वरती क्लिक करून Download 7/12 Land Records या ऑप्शन वरती क्लीक करायचे आहे.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 12

स्टेप 13: नेक्स्ट पेज वर आता तुम्हाला ज्या जागेचा सातबारा हवा आहे त्या जागेची काही माहिती भरायची आहे. ज्यात ती जागा असलेला तुमचा जिल्हा, तालुका, गावचे नाव सिलेक्ट करून टाकायचे आहे. व त्या नंतर सर्वे नंबर म्हणजेच ज्याला आपण गट नंबर म्हणतो तो टाकायचा आहे. व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

जर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर माहिती नसेल तर हा लेख वाचा: सातबारा (7/12) ऑनलाईन बघा (Free मध्ये)

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 13

स्टेप 14: त्या नंतर तुम्हाला Download चा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून allow बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर तुमचा सातबारा ओपन होईल.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 14

स्टेप 15: आता याच पेज वर वरती तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करून डाउनलोड ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. तरच तुमचा सातबारा डाउनलोड होऊन तुमच्या फोन च्या गॅलरी मध्ये सेव्ह होईल.

Umang App Varun 7:12 Download Kasa Karaycha Step 15

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण उमंग अँप द्वारे सातबारा डाउनलोड कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!