Payment AppPaytm

Paytm अकाउंट कसे तयार करावे ? | मोबाइल वरून Paytm अकाउंट कसे तयार करावे ? | Paytm अकाउंट ओपन कसे करायचे ?

Paytm Account Kas Tayar Karave ? आजच्या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात डिजिटल Trasaction होत आहेत आणि Paytm अकाउंट ओपन करून आपण त्याचा भाग होऊ शकतो. मन चला तर बघुयात Paytm अकाउंट कसे तयार करायचे.

Paytm अकाउंट कसे तयार करावे?

Paytm Account तयार करणे खूप सोपे आहे, यासाठी तुमचा मोबाईल नंबर पुरेसा आहे आणि तो मोबाइल नंबर बँक अकाउंट लिंक असेल तर त्याहून चांगले. खाली दिलेल्या सर्व स्टेप काळजीपूर्वक वाचा आणि फॉलो करा.



सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअर वर जा आणि Paytm चे अँप शोधा आणि Install करा किंवा खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा – पेटीएम डाउनलोड इथे क्लिक करा

अँप इन्स्टॉल करताना काही अडचण येत असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला पूर्ण सहकार्य केली जाईल.

आता पुढील स्टेप म्हणजे अकाउंट तयार करणे. यासाठी फक्त पाच मिनिटे लागतील. पेटीएम अकाउंट कसे तयार करावे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात.

Paytm अकाउंट तयार करण्याची संपूर्ण माहिती मराठीमध्ये

स्टेप 1: Paytm इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा. नंतर आपल्याला पेटीएम कोणत्या भाषेत वापरायची आहे ते निवडा.

स्टेप 2: पेटीएम आपल्याला अकाउंट Login साठी विचारेल, परंतु आता आपण अकाउंट तयार करीत आहोत म्हणून, Create a New Account पर्यायावर क्लिक करा.



Paytm ओपन करून Create a New Account पर्यायावर क्लिक करा

स्टेप 3: आता आपल्याला आपला मोबाइल नंबर आणि पेटीएम अकाउंटचा पासवर्ड टाईप करायचा आहे. आपल्याकडे Email ID असेल तर ईमेल बॉक्समध्ये लिहा, नसल्यास रिकामा ठेवा. या सर्व टाईप करून झाल्यावर, Create a new Account बटण वर क्लिक करा.

(टीप : बँकेला लिंक असलेला मोबाइल नंबर वापरला तर भविष्यात BHIM UPI App वापरणे सोपे जाईल)

स्टेप 4: आपल्याला मेसेजद्वारे OTP तुमच्या मोबाईल येईल. जो तुम्हाला OTP बॉक्समध्ये टाईप करायचा आहे, नंतर Done बटणावर क्लिक करा. जर OTP लवकर येत नसेल तर Resend OTP वर क्लिक करा

मोबाइल नंबर आणि पेटीएम अकाउंटचा पासवर्ड टाईप करा. नंतर OTP टाकून अकाउंट वेरीफाई करा

स्टेप 5: OTP वेरीफाई/पडताळणी झाल्यानंतर, पुढील पेजवर आपली बेसिक माहिती टाईप करा जसे First name (स्वतःचे नाव), Last name (आडनाव), Date of Birth (जन्म तारीख) आणि Gender (लिंग). या सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर Create Account बटण वर क्लिक करा.

या सर्व स्टेप पूर्ण केल्यानंतर, आपले पेटीएम खाते तयार आहे आणि आता आपण ते लॉगिन करून वापरू शकता, वरती टाकलेला मोबाइल नंबर तुमचा Username आणि Password असेल.

Paytm चा वापर करून तुम्ही आता मोबाइल रिचार्ज, गॅस बुकिंग, डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल, इलेक्ट्रिसिटी बिल आणि पैसे पाठवणे असे बरेच काही करू शकता.


या ब्लॉग बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!