शासकीय वाळू चे बुकिंग ऑनलाईन कसे करायचे ? | Online Sand Booking in Maharashtra
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण शासकीय वाळू साठी ऑनलाईन बुकिंग कसे करायचे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर बांधायचे असते, पण त्यासाठी वाळू लागत असते. ही वाळू स्वस्त दरात कशी भेटेल याचा प्रत्येक जण विचार करत असतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की आपल्या राज्यात वाळू व्यवसाय हा पूर्वी पासूनच चालत आलेला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून वाळू व्यवसाय काही कारणांमुळे खूप बदनाम झाला आहे. वाळू व्यवसाय बदनाम होण्याची कारणे म्हणजे वाळूची होणारी तस्करी, भ्रष्टाचार, त्यातून होणारे वादविवाद, होणारे गुन्हे यासर्व गोष्टीचा वाळू व्यवसाय वर खूप परिणाम झाला आहे. एवढेच काय तर सरकारी यंत्रणा व अनेक मंत्रीही या वडाच्या भोवऱ्यात अडकलेले तुम्ही पाहिले व ऐकलेले असेलच.
खरंतर कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणारा हा व्यवसाय बऱ्याच ठिकाणी अनधिकृतपणे चालतो. हे सर्व थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करून झाले, विविध नियम करण्यात आले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट या व्यवसायात अनेक माफिया तयार झाले असून त्यांना सरकार तर्फे पाठिंबा मिळत चालला आहे म्हणून गुन्हेगारी देखील वाढली.
मित्रांनो, ही सर्व परिस्थिती बदलण्याचे काम नवीन सरकारने हाती घेतले. आणि नवीन वाळू धोरण अंमलात आणले. या धोरणे अंतर्गत जे नागरिक महाखनिज पोर्टल द्वारे शासकीय वाळूसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. काय आहे हे नवीन धोरण व या अंतर्गत वाळू मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
वाळू धोरण बद्दल थोडी माहिती
मित्रांनो, आपल्या राज्यातील वाळू चोरी, वाळू वाहतूक आणि बेकायदा वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी, वाळू लिलाव बंद करण्यासाठी, वाळूचे दर यासोबतच अवैध वाळू वाहतूक या बाबतच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन वाळू उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावेशक वाळू धोरण 1 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहे. या धोरण मार्फत लाभार्थ्यांना व देशातील नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास म्हणजेच 133 रू प्रति मेट्रिक टन या दराने तर घरकुल योजना घेतलेल्या लाभार्थ्यांना 5 ब्रास इतकी वाळू / रेती मोफत स्वरूपाने दिली जाणार आहे. याबाबतच काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर मध्ये वाळू डेपो निर्माण करून लाभार्थ्यांना 4 ब्रास रेती वितरण करण्यात आले.
अश्याच प्रकारे जिल्हा, तालुका, गाव इतर ठिकाणी ही रेतीचे डेपो निर्माण करून रेती वितरण सुरू केले जाणार आहे. मात्र या रेतीच्या मागणीसाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी नागरिक महाखनिज च्या पोर्टल वर जाऊन किंवा सेतू केंद्रावर जाऊन ही मागणी करू शकता. यासाठी तुमच्या कडे आधार कार्ड नंबर असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आता महाखनिज च्या पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने वाळू मागणी कशी करायची त्या बद्दल जाणून घेऊ या.
ऑनलाईन पद्धतीने वाळू/ रेती बुकिंग कशी करायची
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महाखनिज च्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
महाखनिज ऑफिशियल वेबसाईट => mahakhanij.maharashtra.gov.in
स्टेप 2: आता वेबसाईट च्या होम पेज वर तुम्हाला Sand Booking ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: तर आता रेती बुकिंग करण्यासाठी Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर युजर आयडी व पासवर्ड विचारला जाईल. तुम्ही जर पोर्टल वर नवीन असाल तर तुम्हाला तुमचं युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी Consumer Sign Up ऑपशन वर क्लिक करा आणि नंतर तुमचे नाव, ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकायचा आहे.
स्टेप 5: मित्रांनो, मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठविला जाईल. तो ओटीपी टाकून सबमिट करायचे आहे. व तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, इथे तुमचा मोबाईल नंबर च लॉगिन आयडी असणार आहे.
स्टेप 6: आता तुमच्या ई-मेल वर एक लिंक येईल त्यावर जाऊन तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे किंवा तुमच्या मोबाईल नंबर व ओटीपी सह लॉगिन (USE OTP) करून पासवर्ड तयार करू शकता. त्यासाठी लॉगिन आयडी टाकून आलेला ओटीपी टाकायचा आहे व नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व नंतर Login बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे प्रोफाइल कम्प्लिट करायचे आहे. त्यासाठी उजव्या बाजूला दिलेल्या edit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आता या प्रोफाइल मध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर वगैरे माहिती आलेली दिसेल. आता बाकीची माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे व पिनकोड टाकून नंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे.
आता तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. ज्यात पॅन कार्ड, रेशन कार्ड, आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. नंतर फोटो अपलोड करायचा आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा GST नंबर ही तुम्ही देऊ शकता. व शेवटी Update बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमची सर्व माहिती अपलोड झालेली दिसेल व तुमचे प्रोफाइल पूर्ण होऊन जाईल. आता तुम्हाला Project Registration करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला Register Project या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. प्रोजेक्ट रजिस्टर म्हणजे तुम्ही कोणत्या घर/बिल्डिंग साठी वाळू बुक करणार आहे त्याची माहिती असते.
स्टेप 10: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल माहिती टाकायची आहे. यात Project Type टाकायचा आहे म्हणजे हा प्रोजेक्ट तुम्ही कशासाठी करताय जसे की स्वतःच घर आहे, घरकुल आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे की प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे ते सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही स्वतःच्या घराचे प्रोजेक्ट करत आहात तुमचे नाव, पत्ता वगैरे सर्व माहिती येईल. या नंतर आता तुम्ही तुमच्या घराचे नाव द्यायचे आहे. कन्स्ट्रक्शन टाइप टाकायचे आहे, बिल्डिंग आहे की कम्पाउंड आहे की दुसरे काही ते सिलेक्ट करून टाकायचे आहे.
या प्रोजेक्ट साठी तुम्हाला किती वाळू/ रेती लागणार आहे ते टाकायचे आहे व नंतर साईट चा पत्ता टाकायचा आहे. तुम्ही इथे मॅप वरून डायरेक्ट तुमचे लोकेशन टाकू शकता. त्या नंतर खाली Submit बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे प्रोजेक्ट रेजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल.
स्टेप 11: मित्रांनो, आता तुम्हाला वाळू बुकिंग करायची आहे त्यासाठी Book Sand या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 12: त्या नंतर तुम्हाला Select Project या ऑप्शन मध्ये तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्या नंतर किती ब्रास रेती लागणार आहे ते टाकायचे आहे. आणि नंतर रेतीचा डेपो तुमच्या पासून किती किलोमीटर लांब आहे ती अंतर टाकायचे आहे. व नंतर Search ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 13: मित्रांनो, जर तुम्ही सर्च केलेल्या ठिकाणी डेपोत रेती नसेल तर तुम्हाला इथे काहीच माहिती दाखवली जाणार नाही. आणि जेव्हा डेपोत रेती येईल तेव्हा तुम्हाला इथे दाखवले जाईल.
स्टेप 14: आत्ता तुम्हाला जी स्टॉक ची माहिती दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये बुकिंग ची माहिती तपासून Confirm Booking बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 15: बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी पुढे जायचे का ते विचारले जाईल, तुम्ही Yes बटन वर क्लिक करून तुमच्या आवडत्या पेमेंट मेथड निवडून पेमेंट करू शकता.
मित्रांनो, याशिवाय तुम्ही Track order या ऑप्शन च्या साहाय्याने तुम्ही ऑर्डर केलेली वाळू कुठं पर्यंत आली आहे ते चेक करू शकता. किंवा Transporter या ऑप्शन मध्ये तुम्ही वाळू ट्रान्सपोर्ट करणाऱ्याला कॉल ही करू शकता.
FAQ
वाळू ऑनलाईन बुकिंग करताना कोण कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे?
मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे इथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर व फोटो लागणार आहे.
वाळू धोरण कधी पासून लागू करण्यात आले आहे?
मित्रांनो, वाळू धोरण हे 1 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहे.
या धोरणे अंतर्गत वाळू कोणत्या दराने मिळणार आहे?
मित्रांनो, सामान्य नागरिकांना 600 रू प्रति ब्रास दराने व घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत दिली जाणार आहे.
नवीन वाळू धोरणाचा काय उपयोग होईल?
मित्रांनो, या नवीन धोरणामुळे नागरिकांना व गरीब घरकुल लाभार्थ्यांना वाळू साठी आता जास्तीचे पैसे द्यायची गरज नाही. त्यामुळे निश्चितच त्यांना खूप मोठा फायदा झाला आहे. तसेच दुसरीकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना व अवैध वाहतूक करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर वाळू तस्करीमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल. तसेच वाळू कमी दराने मिळणार असल्याने नागरिकांचा बांधकामचा खर्च कमी होणार आहे
ऑनलाईन बुकिंग नंतर किती दिवसात वाळू मिळेल?
मित्रांनो, ऑनलाईन बुकिंग केल्या नंतर 15 दिवसांत वाळू घरपोच मिळेल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण शासकीय वाळू मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, सरकारच्या या नवीन धोरणामुळे जे गरीब घरकुल लाभार्थी आहेत त्यांना निश्चितच खूप मोठा फायदा झालेला आहे. आता त्यांना वाळू साठी जास्त पैसे द्यायची गरज नाही. तर दुसरिकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे मुळे खूप मोठा चाप बसलेला आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे ज्या लोकांचे घरकुल बांधकामाचं काम थांबलेलं आहे त्यांना आधी प्राधान्य देण्यात येणार आहे.
तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)
मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।