नेटफ्लिक्स प्लॅन्स 2023: किंमत, फायदे, ऑफर्स | Netflix Subscription Plans 2023
नमस्कार मित्रांनो, आज आपण नेटफ्लिक्स ( Netflix) च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत. यात आपण प्लॅन ची किंमत, त्याचे फायदे, ऑफर्स, वैधता या सर्वांबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
नेटफ्लिक्स (Netflix ) हे एक लोकप्रिय भारतीय ऑन-डिमांड स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हे अँप सध्या इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतरही काही प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच नेटफ्लिक्स वर नाटक, थ्रिलर आणि हॉरर, रोमान्स, कॉमेडी, सायन्स फिक्शन, बायोग्राफी, चित्रपट आणि टीव्ही शो पाहायला मिळतात.
मित्रांनो, खरंतर Netflix हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील आघाडीचे इंटरनेट टीव्ही नेटवर्क आहे, ज्यामध्ये 190 पेक्षा जास्त देशांमधील सदस्य ओरिजिनल मालिका, माहितीपट, चित्रपट आणि टीव्ही शो यांचा आनंद घेतात. तसे पहायला गेलं तर तुम्ही Netflix चे सदस्यत्व मिळवून Netflix Originals आणि इतरही काही कन्टेन्ट इंग्रजीत किंवा हिंदी, पंजाबी, मल्याळम, तेलुगु, तमिळ, बंगाली, कन्नड आणि मराठी यांसारख्या तुमच्या स्वतःच्या भाषेत पाहू शकता. एवढेच नाही तर तुम्ही लँग्वेज सब-टायटल च्या ऑप्शन द्वारे इंटरनॅशनल साऊथ कोरियन शो आणि मूव्हीज ही बघू शकता. मित्रांनो, नेटफ्लिक्स चे अजून काही फायदे म्हणजे त्यात कोणतीही वचन बद्धता नाही, म्हणजेच तुम्ही घेतलेले प्लॅन्स तुम्ही कधीही रद्द करू शकता किंवा बदलू शकता. तसेच यात कोणत्याही प्रकारच्या जाहिराती किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ने गेल्या वर्षी आपल्या प्लॅनच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यात त्यांना चांगलेच यश मिळाले. मित्रांनो, नेटफ्लिक्स च्या विविध प्लॅन पैकी तुम्हाला कोणत्या प्लॅनचे सबस्क्रिप्शन घ्यायचे आहे, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्सच्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅन बद्दल माहिती सांगणार आहोत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या प्लॅन्स चे आपण फायदे, किंमती, वैधता या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्हाला योग्य तो प्लॅन निवडायला मदत होईल. म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
Best Netflix Subscription Plans
नेटफ्लिक्स चे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स
मित्रांनो, नेटफ्लिक्स (Netflix) ही स्ट्रीमिंग सेवा आपल्या भारतात विविध प्रकारचे मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन्स ऑफर करते, ज्याची सुरुवात आता Rs 149 पासून होते. Netflix च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स च्या किंमती या संपूर्ण देशभरात म्हणजे मग ते दिल्ली, मुंबई किंवा हैदराबाद असो सगळीकडे सारख्याच आहेत. हे सबस्क्रिप्शन प्लॅन DTH रिचार्ज पॅक सह देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, नेटफ्लिक्स च्या मंथली म्हणजेच मासिक आणि वार्षिक प्लॅन्स बद्दल उपलब्ध आहेत. ज्यात Netflix चे भारतात चार सबस्क्रिप्शन प्लॅन आहेत – मोबाइल (Mobile), बेसिक (Basic) स्टँडर्ड (Standard) आणि प्रीमियम (Premium). या सर्व प्लॅन्स च्या किंमती, वैधता आणि फायदे हे भिन्न आहेत. चला तर मग नेटफ्लिक्स च्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल आपण पुढे सविस्तर पणे जाणून घेऊ या.
नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन (Netflix Mobile Subscription Plan)
मित्रांनो, Netflix मोबाइल सबस्क्रिप्शन च्या या प्लॅन ची किंमत रू 149 प्रति महिना इतकी आहे आणि वार्षिक किंमत रू 1788 आहे, यात नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना व्हिडीओ क्वालिटी स्टँडर्ड डेफिनिशन म्हणजेच SD 480p मिळते. आणि एकाच मोबाइल किंवा टॅबलेट डिव्हाइस ला प्लॅन सपोर्ट करतो. त्यामुळे ज्या लोकांना स्मार्ट फोन वर शो आणि चित्रपट स्ट्रीम करायला आवडते त्यांच्या साठी हा एक बेस्ट प्लॅन आहे.
नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन (Netflix Basic Subscription Plan)
मित्रांनो, नेटफ्लिक्स च्या या बेसिक सबस्क्रिप्शन प्लॅन ची किंमत रू 199 प्रति महिना इतकी आहे. आणि वार्षिक फी रू 2388 इतकी आहे. या प्लॅन मध्ये नेटफ्लिक्स मोबाईल पॅकेज सारखेच फायदे आहेत, परंतु चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही सह अधिक उपकरणांवर कन्टेन्ट स्ट्रीम करू शकता. या प्लॅन मध्ये तुम्हाला व्हिडीओ क्वालिटी ही HD 720p इतकी मिळते. याशिवाय ऍक्टिव्ह स्क्रीन आणि डाउनलोडची संख्या मात्र फक्त एका डिव्हाइस पर्यंत मर्यादित असेल.
नेटफ्लिक्स स्टॅंडर्ड प्लॅन (Netflix Standard Subscription Plan)
मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मित्रांसोबत किंवा परिवार सोबत नेटफ्लिक्सला स्ट्रीम करायचं असेल तर आणि जर एकापेक्षा अधिक स्क्रीन मर्यादा हवी असेल तर, Netflix Standard हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला Full HD 1080p व्हिडीओ रिझोल्यूशन मिळते. तसेच या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत ही रू 499 प्रति महिना इतकी आहे व वार्षिक किंमत रु. 5,988 इतकी आहे. या शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे Netflix चे हे पॅकेज तुम्हाला एका वेळी दोन उपकरणांवर म्हणजेच डिव्हाइस वर ऑफलाइन कन्टेन्ट डाउनलोडला देखील सपोर्ट करते.
नेटफ्लिक्स प्रिमियम प्लॅन (Netflix Premium Subscription Plan)
मित्रांनो, चार जणांच्या कुटुंबासाठी किंवा नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन एकत्र खरेदी करणाऱ्या मित्रांच्या ग्रुपसाठी हा सबस्क्रिप्शन प्लॅन अगदी योग्य आहे. या प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन ची किंमत रू 649 प्रति महिना इतकी आहे. महत्वाचे म्हणजे हे प्लॅन FHD (Full HD) आणि अल्ट्रा HD (Ultra HD) कन्टेन्ट ला ही सपोर्ट करते. या शिवाय अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकावेळी चार डिव्हाइस वर टीव्ही शो आणि चित्रपट स्ट्रीम करू शकता आणि डाउनलोड ही करू शकता.
Netflix सबस्क्रिप्शन प्लॅन: किंमत, फायदे, वैधता
Netflix सबस्क्रिप्शन प्लॅन्स | वैधता | फायदे |
---|---|---|
मोबाईल प्लॅन | प्रति महिना: रू 149 वार्षिक: रू 1788 | – चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाइल गेम जाहिरातमुक्त – एका वेळी 1 फोन किंवा टॅबलेट सपोर्ट – एका वेळी 1 फोन किंवा टॅबलेट डाउनलोड सपोर्ट – SD 480p रिझोल्यूशन |
बेसिक प्लॅन | प्रति महिना: रू 199 वार्षिक: रू 2388 | – चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाइल गेम जाहिरातमुक्त – एका वेळी 1 फोन किंवा टॅबलेट सपोर्ट – एका वेळी 1 फोन किंवा टॅबलेट डाउनलोड सपोर्ट – HD 720p रिझोल्यूशन |
स्टॅंडर्ड प्लॅन | प्रति महिना: रू 499 वार्षिक: रू 5988 | – चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाइल गेम जाहिरातमुक्त – एका वेळी 2 फोन किंवा टॅबलेट सपोर्ट – एका वेळी 2 फोन किंवा टॅबलेट डाउनलोड सपोर्ट – Full HD 1080p रिझोल्यूशन |
प्रिमियम प्लॅन | प्रति महिना: रू 649 वार्षिक: रू 7788 | – चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाइल गेम जाहिरातमुक्त – एका वेळी 4 फोन किंवा टॅबलेट – एका वेळी 6 फोन किंवा टॅबलेटवर डाउनलोड – Ultra HD रिझोल्यूशन |
FAQ
नेटफ्लिक्स ( Netflix) जाहिराती देते का?
नाही मित्रांनो, नेटफ्लिक्स कोणत्याही प्रकारच्या जाहिराती देत नाही. सध्या काही देशामध्ये नेटफ्लिक्स जाहिराती सह सेवा देत आहे. भारतात हि काही दिवसात हि सेवा चालू होऊ शकते.
Netflix चे सबस्क्रिप्शन 30 दिवस मोफत आहे का?
नाही मित्रांनो, Netflix कोणत्याही प्रकारचे फ्री ट्रायल्स देत नाहीत. परंतु जर तुम्ही Netflix विकत घेतलेले असेल तर तुम्हाला तुमचा सबस्क्रिप्शन प्लॅन बदलण्याचे किंवा ऑनलाइन रद्द करण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी कोणतेही काँट्रॅक्टस नाही, किंवा कोणतेही कॅन्सलेशन फी नाही आणि कोणतेही कमिटमेंट्स नाहीत.
नेटफ्लिक्स (Netflix) वर हिंदी शो पाहता येतात का?
हो मित्रांनो, Netflix ने ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा हिंदी इंटरफेस लाँच केला होता. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे सर्व शो, तसेच आंतरराष्ट्रीय शो देखील हिंदी मध्ये पाहता येतील.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण नेटफ्लिक्स (Netflix ) च्या विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात आपण विविध प्लॅन्स सह त्यांची किंमत, वैधता आणि फायदे देखील बघितले. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।